सध्या मी काय पाहतोय ? भाग १०
खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.पण वेळ घालवायचा कसा ? कारण कामात व्यस्त राहण्याची नशा मला इतके वर्षात लागलेली आहे ! त्रास होत असला तरी देखील इथे मिपावर येऊन डोळे किलकिले करुन अधुन मधुन येऊन एखादा प्रतिसाद देऊन मग परत विश्रांती घेत होतो.