आज, 24 मार्च 2022, आपल्या सर्वांना, "गाॅडफादर डे" च्या शुभेच्छा...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
24 Mar 2022 - 3:25 pm

50 वर्षांपुर्वी, आजच्याच दिवशी, द गाॅडफादर, हा अविस्मरणीय सिनेमा प्रदर्शित झाला ...

काही काही चित्रपट, एखादी लाट तयार करतात. द गाॅडफादर, हा पण असाच.

चित्रपट परिक्षण, हा माझा प्रांत नाही. कारण, चित्र, नाटक, सिनेमा, अभिजात संगीत हे व्यक्तीसापेक्ष असते.

माफिया, हा शब्द माहिती पडला तो, ही कादंबरी वाचतांना आणि संघटित गुन्हेगारीचे, भारतातील स्वरूप देखील समजत गेले... बाबू रेशीम, मन्या सुर्वे, इत्यादी समकालीन गुन्हेगारांपेक्षा, दाऊद इब्राहीमच साम्राज्य का उभारू शकला? ह्याची थोडीफार कल्पना, ही कादंबरी वाचतांना येतेच येते. It's a family business.

ही कादंबरी आणि चित्रपट, काल्पनिक असली तरी, कुठल्याही परिस्थितीत, ही काल्पनिक वाटत नाही. मुळांत, बेकायदेशीर धंदा करणे, हा माफियाचा प्रमुख व्यवसाय, पण तो करत असतांना, सुत्रधार कुठेच कायदेशीर मार्गाने अडकणार नाही, ह्याची संपूर्णपणे खबरदारी पण घेतली जाते. टेलीफोन टॅप केले जातात, म्हणून सगळे आदेश तोंडी आणि आदेशाची अंमलबजावणी झाली की मेसेज साध्या वाक्यात.

माहिती देणारे स्त्रोत आपल्या हातात हवेत आणि योग्य वेळी त्यांचा वापर केला पाहिजे , उदाहरण म्हणजे ... सोलोझो आणि मायकेलची मिटिंग कुठल्या हाॅटेल मध्ये आहे? ते ओळखणे आणि तिथ पर्यंत पिस्तूल पोहोचवणे. सोलोझो आणि कॅप्टनच्या मृत्यु नंतर, कॅप्टनच कसा ड्रग रॅकेट मध्ये सामील होता, अशी बातमी वृत्तपत्रां द्वारे प्रसारित करणे.

कथेचा प्लाॅट देखील खूपच सोपा आहे. एका पापभिरू(?) माफिया डाॅनला, ड्रगच्या व्यवसायात, इतर फॅमिली जबरदस्तीने ओढतात आणि नंतर त्याच्या मृत्युनंतर, त्याचा मुलगा बदला घेतो.

एखाद्या गाजलेल्या कादंबरी वरून, उत्तम चित्रपट बनवणे हे तसे जास्त कष्टदायक . कारण, कादंबरी वाचतांनाच, सर्वसामान्य वाचक, डोळ्यासमोर पात्राचे व्यक्तीचित्रण उभे करत असतो. अशा वेळी, अभिनेत्यांची निवड, कथे नुसार करणे, हे तसे आव्हानात्मकच. कथेच्या पात्रांना न्याय देणारे अभिनेते, ही गाॅडफादरची सगळ्यात मोठी खासीयत. मग तो लुका ब्रासी साकारणारा, Lenny Montana, असो किंवा कार्मेला काॅर्लिआॅन साकारणारी, Morgana King, असो. किंवा फक्त एका दृष्या पुरते येणारे, काही कलाकार असोत, अगदी Enzo Aguelloची भुमिका साकारणारा, Gabrielle Torrei, पण, कथेला पुरक अभिनय करून जातो ....

भुमिका जगणे म्हणजे नक्की काय असते? हे बघायचे असेल तर, मार्लन ब्रॅन्डोचा आणि फ्रेडो साकारणारा, John Cazale आणि मायकेल साकारणारा, अल पचिनो, यांचे अभिनय... घराणेशाहीच्या वलयामुळे पद मिळाले तरी त्या पदाला न्याय देण्याची कुवत नसलेला मनुष्य, कसा हतबल होत जातो, हे John Cazaleने फ्रेडोची भुमिका साकारतांना अप्रतिम दाखवले आहे. स्त्रीलंपट पणा हा फ्रेडोचा एक अवगूण आणि "के"ला भेटतांना देखील, John Cazaleने हा अवगूण, पहिल्याच फ्रेम मध्ये दाखवला.

मार्लन ब्रॅन्डोने तर, अभिनयाची पाठशाळाच उघडली की काय? असे वाटावे, इतपत तो ही भुमिका जगला आहे. ("विधाता" नामक तद्दन फालतू सिनेमांत, युसूफने, मार्लन ब्रॅन्डोच्या अभिनयाची भ्रष्ट नक्कल केली आहे.) पहिल्याच दहा मिनीटांत, नाराज डाॅन, फॅमिली मेंबर बरोबर आनंदात राहणारा डाॅन आणि बिजिनेस सांभाळण्या साठी, धोकादायक मित्रांना, योग्य हातावर ठेवणारा डाॅन, तिन्ही वेळा कमीत कमी शब्द वापरून आणि हातांचा, डोळ्यांचा आणि देहबोलीचा अप्रतिम वापर केला आहे. आपण नाराज आहोत, हे अमेरिगोला दाखवतांना, कुठेही आक्रस्ताळे पणे भाषेचा वापर केलेला नाही. तुझी आज्ञा ऐकण्या इतपत, मी भाडोत्री गुंड नाही, हे अमेरिगोला संयमित भाषेत समजावतांना, स्वरांचा आणि चेहर्याचा सुरेख वापर केला आहे.

सोनीच्या मृत्यु नंतर, खचलेला डाॅन ते मांडवली करतांना, कुठल्याही प्रकारे, तुम्ही मला दबावाखाली ठेऊ शकत नाही, हे कणखरपणे सुनावणारा डाॅन आणि फॅमिली बिझीनेस साठी, मायकेलला तयार करणारा मार्गदर्शक बाप...

पहिल्यांदा हा चित्रपट बघीतला तो, अल पचिनो मुळे .... पण नंतर नंतर लक्षांत आले की मार्लन ब्रॅन्डो, हे रसायन काही वेगळेच आहे ...

ह्या सिनेमातले आणि कादंबरीतले, डायलाॅग पण तोडीस तोड आहेत, पण लक्षांत मात्र दोनच राहतात ...

“I’m Gonna Make Him An Offer He Can’t Refuse.”

"Revenge Is A Dish Best Served Cold.”

-------

आपल्या सर्वांना, "द गाॅडफादरच्या" सुवर्ण महोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा...

मौजमजाचित्रपटशुभेच्छा

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

24 Mar 2022 - 8:01 pm | कुमार१

छान आठवण.
तुम्ही दिलेल्या अवतरणांमध्ये एक भर :
त्या मूळ पुस्तकावर लिहिलेलं बालझाक यांचे हे अवतरण :

Behind every great fortune there is a crime.
—Balzac

बाजीगर's picture

24 Mar 2022 - 11:18 pm | बाजीगर

हा dialigue चोरला, आणि कालीया मधे अमजदखान च्या तोंडी दिलाय,
अमजद बच्चन ला भेटायला त्याच्या घरी जातो, बच्चन नसतो, भाभी वहिदा रेहमान असते,
अमजद फ्लॅट च्या इंटिरियल डेकोरेशन ची तारिफ करतो,
वहिदा म्हणते,ये मेरे देवर ने मेहनत से कमाया है.
अमजद म्हणतो,
" मेहनत से आदमी झोपडी बना सकता है,
आलीशान महल नही...."

मी ऐकून स्टन झालो होतो, एवढ चिरंतन सत्य आणि ते हि व्हिलन च्या तोंडी कसं दिलं ...काय सोच कि उडिन है लेखकाची वगैरे.

धर्मराजमुटके's picture

24 Mar 2022 - 8:13 pm | धर्मराजमुटके

चित्रपटापेक्षा मुळ पुस्तक आणि त्याचा मराठी अनुवाद कैकपटीने सरस वाटला. अर्थात चित्रपट देखील उत्तम आहे.

मुक्त विहारि's picture

24 Mar 2022 - 8:37 pm | मुक्त विहारि

पण, पुस्तक वाचतांना, साधारण पणे, पात्रांची चेहरेपट्टी कशी असेल? कसे बोलतील? हा विचार येतोच ...

पुस्तका वरून चित्रपट तयार करतांना, पात्रांची निवड, योग्य नसेल तर, चित्रपट मनावर पकड घेत नाही...

उदाहरण म्हणजे, जॅक रीचर हे पात्र साधारण कसे दिसत असेल? हे मनावर ठसत जाते, त्यामुळे टाॅम कृज पेक्षा, सिरीज मधला, Alan Ritchson, जास्त आवडला ....

जॅक रीचर, अस्सल सैनिक असल्याने, Alan Ritchson, जास्त आवडला.

अर्थात, चित्रपट व्यक्ती सापेक्ष असल्याने, कुणाला जेम्स बाॅन्ड म्हणून सीन काॅनेरी आवडतो तर कुणाला डॅनियल क्रेग... वैयक्तिक सांगायचे तर, मला डॅनियल क्रेग जास्त आवडला .... (जाता जाता, "द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू", ह्यात देखील, Mikael Blomkvist च्या भुमिकेत आवडला.... तोडीस तोड अभिनय करायला, Rooney Mara, Lisbeth Salander ह्या भुमिकेत चपखल बसली...आता, परत एकदा ,द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू, हा सिनेमा बघणे आले...)

कॉमी's picture

24 Mar 2022 - 8:21 pm | कॉमी

गॉडफादर II> गॉडफादर I> गॉडफादर III

मार्लन ब्रँडो तर भारीच आहे. पण डीनिरो ने तरुण व्हीटो सुद्धा भारी साकारलाय.

वेळ काढुन हा चित्रपट पाहिला आहे. कमल हसन वर देखील अगदी खोल प्रभाव आहे. परत मोकळा वेळ मिळाला तर परत पाहीन.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lalana... :- Me Vasantrao

अनिंद्य's picture

27 Mar 2022 - 6:54 pm | अनिंद्य

५० वर्ष झालीसुद्धा ?

ऑल टाईम फेवरेट आहे गॉडफादर.

चौथा कोनाडा's picture

28 Mar 2022 - 4:57 pm | चौथा कोनाडा

गाॅडफादर मैलाचा दगड आहे सिनेमाच्या इतिहासातील !

"द गाॅडफादरच्या" सुवर्ण महोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा !