जे न देखे रवी...
नजर..
नजर..
बालपणीचा पाऊस
म्हणजे असे
मजामस्ती,
शाळेत जाण्याची धांदल
,वाहत्या पाण्यात
सोडलेल्या कागदी होड्या
आणि अवखळ खेळ
तारुण्यात तोच
पाऊस म्हणजे
गुलाबी जग सारे,
प्रेमपत्र,
चोरटी बावरलेली नजर
आणि
पावसातली ती घट्ट मिठी
तुझी वाट
तुझ्या वाटेवर उभा मी एकाकी
डोळे मुके होऊन झाली नजर बोलकी
चोरपावलाने हळूच तू येऊन जा
पाखरांचे उदास सूर घेऊन जा
जाग्या झाल्या भोवती रानसावल्या
आकाशवाटा ढगांना बिलगून बसल्या
जीवघेणी ओढ तुझी प्राणात दाटली
क्षितीजावर उभी राहीली मावळतीची सावली
पापण्यांच्या पंखात अश्रूंचे घन भरले
प्रितीची आग ह्रदयात ठेऊन गेले
सोहळा
जाई बरसुनी मेघ
करी धरेशी सलगी
धरा येता मोहोरुनी
विरे मेघ तो बैरागी
आसुसल्या धरणीशी
गाठ पडता जळाची
बीज अंकुरुनी येई
कुस चिरीत आईची
हात जोडुनिया कोंब
सांगे भूमीचे मार्दव
जरा थांब क्षणभर
करी मेघाला आर्जव
वीण बांधुनी भुईशी
करी लवलव पाते
नवलाईचे हे बंध
झाले नव्हत्याचे होते
युग प्रवाहीणी
युग प्रवाहीणी
-+-*-+-
समोर दिसत असलेलं भग्न राऊळ पाहताना जाणवतंय,
या तुझ्या काठावर कधीकाळी वसलं असेल एखादं छोटंसं गाव
अथवा एखादा शांत, एकांत आश्रम...
विसावला असेल इथे, अविरत काळप्रवाहात प्रवास करणारा मानव समुह
वा या अनंत प्रवासातुन मुक्तिकडे निघालेला कुणी तपस्वी
येत नाही...
हारण्याची* वेळ जोवर येत नाही
शक्यता नाकारता तर येत नाही...
प्रश्न हा भंडावतो आहे मनाला
का कधी प्रश्नास उत्तर येत नाही...
हा उन्हाचा दोष की माझा म्हणू मी?
सावली माझ्याबरोबर येत नाही...
टेकल्यावर रोज डोके, समजलो मी
पत्थराला कधिच पाझर येत नाही...
चोरले अन तोडले आहे हृदय तू
आळ त्याचा पण तुझ्यावर येत नाही...
(मन भूत भूत ओरडते..)
पेरणा अर्थात प्राची तैंची मन राधा राधा होते...
आज दिव्याच्या अमावस्ये निमित्त मिपावरच्या सर्व ब्रम्हराक्षसांना आणि डाकीणिंना सादर नमन करुन
(मन भूत भूत ओरडते..)
तिन्हीसांजेच्या व्याकुळ वेळी
का बाहेरची बाधा होते?
मळभ दाटते तेव्हा
मन भूत भूत ओरडते..
तू
तूला आठवून, तूला गवसणे
अन् शब्दांतून तूला सजवणे
कधीही न्हवता छंद माझा
तरीही मला तू, नकळत सूचणे
अंगिकारू पाहील्या काही सवयी
तयातून मज तूझी उकल व्हावी
काय बरे त्या अद्भूत समयी
नशा तूझी मज वरचढ व्हावी
आठवणिंच्या प्रवासातले कही
क्षण तूझे माझे, विरळ कधी होतच नाही
तूझ्या माझ्या नात्याते धागे
विरळ कधी ते होतच नाही
मन राधा राधा होते...
सांजेच्या व्याकुळ वेळी
का गोकुळ बाधा होते?
आभाळ दाटते तेव्हा
मन राधा राधा होते..
साहवे मला ना जेव्हा
काहिली तनूची उष्ण,
आवेग असा वा-याचा
भासतो जणू की कृष्ण..
मिटताना डोळे माझे
कुशीत मजला घेतो,
रोज मला उठवाया
पाऊस होउनी येतो..
कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?
केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो
कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?
घर पुन्हा एकदा सॅनिटाईज होईल, अमिताभ बरा होईल
तरीही प्रश्न शिल्लक रहातो
सगळे नोकर चाकर व्यवस्था असून
कोरोना अमिताभ पर्यंत कसा पोहोचतो ?
प्रत्येक स्पर्शित जागा सॅनिटाईज व्हायला हवी
प्रत्येक स्पर्ष सॅनिटाईज असायला हवा
त्या पोराने
येता गिर्हाईक दारावर त्याने तिला बाई म्हणावे?
वेश्येच्या त्या पोराने कधी आईला आई म्हणावे ?
चुरगळलेल्या पाकळ्यांना जरी मोहक तो सुगंध येतो
हाती घेत अश्या फुलाला कधी कुणी मग जाई म्हणावे?
नाही केली फसवा फसवी सरळ जमला व्यवहार आहे
आरोप करत का लोकांनी केली दांडगाई म्हणावे?
क्षमा प्रार्थना
https://www.misalpav.com/node/47149#new
शाम भागवत सरांचा हा धागा वाचून मनात काही विचार आले ते शब्दबध्द केले आहेत. त्या धाग्यावर हे टाकले तर कदाचित विषयांतर होईल असे वाटल्याने वेगळा धागा काढत आहे.
रात्र - चारोळी
मदनाच्या भेटीला आज रती ही आली
चंद्राच्या कुशीत ती चांदणी विसावली
तुझ्या माझ्या प्रितीसाठी रात्र थबकली
दूर का उभी तू तिथे ये इथे जवळी
विठूचा रंग काळा, आगळा
आषाढी किंवा कार्तिकी, एरवी ही जेव्हा येई विठूदर्शनाचा उमाळा
फक्त मिटा डोळे, आठवा अंतरी, तो राजस, सुकुमार, नीटस काळा
त्याचा रंग काळा, त्याला वाटे, भक्तांना सदैव दिसावा
जो रंग, प्रतीक उपेक्षितांचा, वंचितांचा, त्याचा कधी विसर न व्हावा
कधी कुणा भक्तांस वाटावे, हा विश्वाचा धनी कां स्वतः काळा
काय आहे त्याला सांगायचे, दाखवत आपुला अवतार काळा
अन् मग
माझ्या क्षणभंगुर कवितेवर
प्रतिसाद देणार्या क्षमाशील वाचकांनो,
या कवितेच्या शवपेटीवर मी शेवटचा खिळा ठोकेन.
धन्यवादाचा.
अन् मग
विस्मृतीच्या विस्कळखाईत कायमची दफनल्यावर
ह्या कवितेचं
काळंशार मायाळू खत होवो.
वारी नाही ...
वारी नाही बारी नाही
दिसणार हरी नाही
विठ्ठला रे तुझ्या विना
दुसरा कैवारी नाही
साल भर खपायचे
वावरात झिजायचे
एका दर्शनाने देवा
दु:ख सारे जिरायचे
पावसाच्या सरी माथी
पाया खाली घाट वाट
लाख लाख तूच सवे
मैल गेले पटापट
आला गाव गेला गाव
खाणे पिणे तमा नाही
मुखी नाव चित्ती रूप
बाकी काही जमा नाही
कोविड-कोविड गोविंद गोविंद
आली एकादशी
ग्रासे जरी कोविड
मुखी तरी गोविंद
वारकरी
हाती ग्लोव्हज्
मुखी मास्क
एकची टास्क
नाचूरंगी
सॅनीटाझर ची उधळण
वैष्णवां ना ताप
डोळ्यांपुढे बाप
पांडूरंग
कसले हे वर्ष
यंदा नाही वारी
तूच देवा तारी
भक्तजना
एकमेका आता
नाही लोटांगणे
उभी घटींगणे
पोलीस ते
ती आली तर
रंग किती गगनात पसरले ती आली तर
मेघ कसे हलकेच बरसले ती आली तर
उभा असा मी बस थांब्यावर जाण्यासाठी
कुठे जायचे तेच विसरले ती आली तर
नजर अशी नजरेस मिळाली जादू झाली
भले भले ते ना सावरले ती आली तर
मंजुळ संगीत अवचित कसे ऐकू आले
पैंजण छनछन तिचे वाजले ती आली तर
मी रसिक फारसा नाही ती दाद द्यायला
वाह का आपसूक उमटले ती आली तर
सुशांत
नव्हते जेव्हा पाहत कुणिही ...
रडलो होतो
झगमगताना पायतळीच्या अंधारी...
तगमगलो होतो
बेमालुमसा प्रतिमेमागे...
दडलो होतो
उजेड नाकारून अंधारा...
भिडलो होतो
श्रेयस प्रेयस तुंबळात..
सापडलो होतो
रुजताना उन्मळलो...
का मी किडलो होतो?
- ‹ previous
- 39 of 468
- next ›