(मन भूत भूत ओरडते..)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
20 Jul 2020 - 10:58 am

पेरणा अर्थात प्राची तैंची मन राधा राधा होते...

आज दिव्याच्या अमावस्ये निमित्त मिपावरच्या सर्व ब्रम्हराक्षसांना आणि डाकीणिंना सादर नमन करुन

(मन भूत भूत ओरडते..)

तिन्हीसांजेच्या व्याकुळ वेळी
का बाहेरची बाधा होते?
मळभ दाटते तेव्हा
मन भूत भूत ओरडते..

सहावे इंद्रिय जेव्हा
शंकांची उडवीते राळ,
आवेग जरा वा-याचा
भासतो जणू वेताळ..

मिटताच डोळे माझे
उभा मज समोर ठाकतो,
रोज मला उठवाया
तो झोटिंग बनुनी येतो..

लोक म्हणती आहे वेडा
दिवस असो वा रात्र,
किंचाळत असतो सारखा
ताणूनी सर्व ही गात्रं..

(ही भुताटकी खास श्रीयुत थंडमाणूसछान यांच्यासाठी....:))

पैजारबुवा,

आरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडप्रेमकाव्यइंदुरीकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

20 Jul 2020 - 11:46 am | प्रचेतस

=))

तरी ह्यावेळी हे विडंबन तुलनेने उशिरा आलं :)

mrcoolguynice's picture

20 Jul 2020 - 12:00 pm | mrcoolguynice

(ही भुताटकी खास श्रीयुत थंडमाणूसछान यांच्यासाठी....:))

पैंबुंचे हे विडंबन वाचून, थंडमाणूसछान म्हणाला, पैंबूनाना तुमचं छान-विडंबन नेहमीप्रमाणे पटतंय,
पण तुम्ही मौन सोडल्याने हा मी निघालो...
असे म्हणून थंडमाणूसछान पुन्हा खफवरील पाराच्या पिंपळाच्या फांदीवर जाऊन उलटा लटकू लागला...

वीणा३'s picture

21 Jul 2020 - 1:31 am | वीणा३

मजेशीर :D

चौथा कोनाडा's picture

21 Jul 2020 - 8:23 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा ......
भूत भूत, वेताळ, झोटिंग ..... भीतीच वाटायला लागली ना राव !
पैजारबुवा _/\__

Jayant Naik's picture

22 Jul 2020 - 3:45 pm | Jayant Naik

खूप मजेशीर

रातराणी's picture

24 Jul 2020 - 12:01 pm | रातराणी

:) :)

एकदमच मस्त...ते पारावर लटकलेल्यावरुन मी पूर्वी लिहल..होतं इथं देते.

पिंपळाच्या फ़ांद्यांवर लटकतांना
झाडांच्या गात्रा गात्रात तु पोहचला
आणि सुसाट वारा जेव्हा आला
तू पानांच्या सळसळीतून निसटतांना
अंगणात सैरभैर धावला
तिथे दिवा होता लावलेला
-भक्ती

प्राची अश्विनी's picture

5 Aug 2020 - 5:26 pm | प्राची अश्विनी

:):)