एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ६

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
16 Jun 2009 - 3:29 pm

(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)

आधीचे भाग येथे वाचा :
भाग एक - http://misalpav.com/node/८१२७
भाग दोन - http://misalpav.com/node/8138
भाग तीन - http://www.misalpav.com/node/८१४९
भाग चार - http://misalpav.com/node/८१७२
भाग पाच - http://www.misalpav.com/node/८१८९

९ जुलै
मेलो! ठार मेलो!! पार एनकाउंटर झाला आपला!!! गेम पडली!!!! क्राईम रिपोर्टिंगच्या पहिल्याच दिवशी दांडू बसला, दांडू कसला बाम्बूच!!!!!
काल क्राईम रिपोर्टिंग करायला सांगितल्यावर सरळ उठून प्रेस रूम मधे गेलो आणि पोलिसांनी तयार केलेली प्रेस नोट घेउन आलो. ज्या पोलिस स्टेशन मधे मोठे खून, जबरी चोरी असे गुन्हे दाखल झालेले होते तिथे फोन केले आणि ज्यास्त माहिती घेवून चांगल्या मोठमोठ्या पाच बातम्या तयार केल्या रंगवून-रंगवून. डोक्यात एकच विचार तोड़करपेक्षा चांगल्या बातम्या रोज द्यायच्या. नंतर नाईट शिफ्ट पण केली. खरतर तोड़करची नाईट होती, मला ट्रेनी असल्यामुले नाईट लावलीच नव्हती अजून पण तोड़कर उडाला आणि माझ्याकडे क्राईम बीट आले अन त्याबरोबरच त्याची नाईट शिफ्ट पण. तरी जाताना बाराथे साहेब काय करायचे सांगुन गेले होते काय करायचे ते - रात्री थोड्या-थोड्या वेळाने कंट्रोल रूम मधे फोन करून कुठे काही गुन्हा घडलाय का ते विचारायचे, फायर ब्रिगेडला फोन करून कुठे आग लागली आहे का, पावसाने घर पडले आहे का हे विचारायचे, वेधशाळेत फोन करून हवामान घेऊन द्यायचे, परगावाचे बातमीदार फोन करतात त्यांच्या बातम्या लिहायच्या, लोक फोन करून बातम्या सांगतात त्या कन्फर्म करून द्यायच्या हे अन ते.... रात्री सगळे तसेच केले पण सगळे मुसळ केरात....
रात्री बाराथे साहेब घरी गेले अन पाठोपाठ इतर सगळे रिपोर्टर पण. मी एकटाच उरलो रिपोर्टिंग सेक्शन मधे. मग टीव्ही लावला, एम् टी व्ही वर छान पौष्टीक आयटम कपड्यांची बचत करत नाचत होते ते बघत होतो तर फोन वाजला. कोणीतरी माणूस बोलत होता, नाव नाही सांगितले त्याने. फक्त म्हणाला, "गांधीनगर मधे चिंधी पथकाच्या लोकानी एक इराण्यण्याहॉटेल हल्ला करून लुटले आहे. पुढे काय ते तुमचे तुम्ही बघून घ्या!" अन फोन कट. झक मारत टीव्ही बंद केला अन पोलिस स्टेशनला फोन लावला. विचारले काही गड़बड़ आहे का? तर तिथला मामा म्हटला, "एक १४७, १४८, १४९, ३२३ चा प्रकार आहे पण अजून केस दाखल व्हायची आहे." बरं म्हणालो अन फोन बंद केला. मला काय माहिती तो कायद्याच्या कलमांच्या भाषेत बोलतोय ते. म्हटले पोलिस कन्फर्म करत नाहीत तर कसली बातमी द्यायची अन सरळ घर गाठले.
आज सकाळी बघतो तर काय, सगळ्या पेपरात पहिल्या पानावर त्या प्रकाराच्या बातम्या फोटोसकट. लगेच लक्षात आले आपण गेलो बाराच्या भावात. त्यात सकाळीच दहा वाजता आगलावे साहेबांबरोबर सगळ्या सम्पादकीय स्टाफची मीटिंग. म्हटले आगलावे चांगलेच रेशन घेणार. नोकरीवरून काढून टाकले नाही म्हणजे मिळवले.
अन तसेच झाले! मीटिंग मधे आगलावे आले तेच लालबुंद होवून, जणू त्यानाच आज आग लागली होती. हातात पेपर होतेच ते आल्या-आल्या फ़डकवले अन बाराथे साहेबांवर कडाडले, "हे काय आहे. एव्हदी मोठी घटना शहरात घडली पण आपल्या पेपरमधे साधा उल्लेख पण नाही. करता काय तुम्ही सगळे, झोपा काढता काय?" बाराथे साहेब पार रडायला आले होते. कॉर्पोरेशन बीटच्या दोगळे चा पण उद्धार झाला, "तीन अपक्ष कॉर्पोरेटर जमावाचे नेतृत्व करत होते आणि तुम्हालापण कळली नाही एव्हडी मोठी घटना? कश्याला पगार घेता?" बाराथे साहेबानी ट्रेनी रिपोर्टर नाईट वर होता, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तर तो हरामखोर माजिरे उपसंपादक तम्बाखू खाऊन पिवळे पडलेले दात दाखवत हसला अन वर म्हणाला, "तरी आधीच सांगत होतो कुठल्यातरी टपोरी पोराला क्राईम रिपोर्टर करू नका. अहो पत्रकारिता किती जबाबदारीचा व्यवसाय आहे, अन त्यात क्राईम रिपोर्टिंग! पेपरचे ऑफिस म्हणजे काय अम्रुततुल्य हॉटेल बाहेरचा कट्टा आहे का? कुठलाही टपोरी येऊन गुटका खात बसतो अन भाषा तरी कशी त्याची. पण बाराथे तुम्हाला फार पुळका होता ना? भोगा आता!" अजूनही बरेच बोलला असता पण संपादक होते म्हणुन एव्हडेच! बाराथे साहेब बिचारे खाली मान घालून ऐकून घेत होते. फार वाईट वाटले. त्या माणसाने आपल्याला नोकरी दिली. वर आपल्या बातम्या तपासतात रोज. अन आपल्यामुळे त्याचाच एव्हदा अपमान.....
पण बाराथे साहेब मात्र एकदम देव माणूस. काहीच बोलला नाही आपल्याला. मीटिंग संपल्यावर मला अन दोगळेला त्यांच्या टेबल जवळ बोलावले आणि सांगितले, "आज या विषयावर चांगली बातमी करा. लक्षात ठेवा हौदाने गेलेली लाज थेम्बा-थेम्बाने परत मिलवायचीय आपल्याला. प्रमोद तू क्राईम ब्रांच मधून माहिती घे गेल्या पाच वर्षात किती नेत्यांवर असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत, ते नेते कोण आहेत, त्यांच्यावर काय कारवाई झाली अशी सगळी. शिवाय रात्रीच्या प्रकाराबाबत कोणाला अटक झाली आहे का ते ही बघ. अटक झाली असेल तर आज कोर्टात उभे करून त्यांची रिमांड घेतील पोलिस, ते पण कव्हर कर. कोर्टात त्याना नेतील तेव्हा फोटो काढायला सांग आपल्या फोटोग्राफर डोळसला. त्या ईरान्याशी बोल. त्याचा आणि त्याच्या हॉटेलाचा पण फोटो काढ. आणि दोगळे तुम्ही आत्ता निवड्णुका जवळ आल्या आहेत तर निवड्णुकांच्या तोंडावर अशा संघटना आणि नेते कसे जातीय प्रश्न उकरून काढतात हा अ‍ॅंगल कव्हर करा सर्व पक्षाच्या आणि वेगावेगल्या संघटनांच्या नेत्यांशी बोलून. या पूर्वी अशा जातीय घटनांची झळ बसलेल्या लोकांशी पण बोला, त्याना न्याय मीळालाय का ते पण बघा..."
नंतर मला हळूच म्हणाले, "प्रमोद तू मात्र खरेच कष्ट करायला हवेत. क्राईम रिपोर्टिंग निट शिकून घे. कायदे समजावून घे. पोलिस, वकील, दवाखान्यांमधे काम करणारे लोक, फायर ब्रिगेड अशा सगलीकडे ओलखी करून घे. अश्या ओळखींमुळेच बातम्या मिलतात."
लगेच आपण ठरवले आता बाराथे साहेब सांगतील तसे करायचे. आज आपल्यामुले त्यांचा अपमान झाला त्याचा पुरेपुर वचपा काढायचा. आयची जे त्या माजिर्‍याची, कधीतरी आपलीपण वेळ येईलच!

१० जुलै
कालचा प्रकारच आज दिवसभर डोक्यात घोळत होता. साला जर्न्यालिझमचा कोर्स केला तेव्हा केव्हडी हवा गेली डोक्यात. वाटले आपण एकदम भारी पत्रकार झालो... एकदम शौरीसारखे. पण साला आत्ता लक्षात येते आहे अजुन काहीच येत नाही आपल्याला. काहीतरी करायला पाहिजे. जबरा क्राईम रिपोर्टिंग करायला काहीतरी जुगाड़ केला पाहिजे. कुणालातरी विचारले पाहिजे पण आपल्याला कोण मार्गदर्शन करणार. साला माजिरे म्हटला ते खरे आहे. आत्तापर्यंत सगळी जिन्दगी टपोरीपणा करण्यात घालवली आपण, आता कोण सीरियासली घेणार आपल्याला. कोण सांगणार जबरा क्राईम रिपोर्टिंग करण्याच्या आयडीया! कुणाला धरावे..... दिवसभर विचार केला अन संध्याकाली अचानक भेजात आयडीया आली. पाच वर्षापुर्वी बस्तर घेवून मी, पक्या, ठोंग्या अन रव्या शेजारच्या गल्लीतल्या काम्बळ्यावर गेम टाकायला चाललो होतो तेव्हा मामानी पकडून पोलिस स्टेशनला नेले होते. केस पडणारच होती पण तेवढ्यात पीआय खत्री तिथे आले. भला मानुस तो, आम्हाला समजावले असे राडे करण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दया म्हणुन अन सोडून दिले. त्यालाच विचारावे. लगेच पोलिस स्टेशनला फोन लावला. खत्री खराच भला माणूस... लगेच ओळखले आपल्याला तो प्रसंग सान्गितल्यावर. विचारले तू सॅनिटरी इंस्पेक्टर भोंड्यांचा मुलगा ना? पत्रकार कधी झालास? माझा प्रॉब्लेम ऐकल्यावर म्हणाले उदया निवांत येवून भेट. काढू काहीतरी मार्ग. कालपासून सगळे अंधारून आल्यागत वाटत होते त्यात हा आशेचा किरण.

कथाविनोदविडंबनसमाजनोकरीमौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

16 Jun 2009 - 3:38 pm | श्रावण मोडक

काय पण गेम झाली होती? छानच. मस्त रंगवता आहात.
फोटोग्राफर डोळस? अहो, ही अशी समर्पक, मार्मीक नावं कुठून येताहेत तुमच्या डोक्यात. हे तुमचं डोकं निश्चितच नाही. हे पम्याचंच डोकं आहे हे नक्की.

Nile's picture

16 Jun 2009 - 10:51 pm | Nile

+१.

धमाल मुलगा's picture

16 Jun 2009 - 3:39 pm | धमाल मुलगा

पुणेरीशेठ,
एकदम जबरा चाललंय हो पत्रकारिता प्रकरण :)

सह्ही आहे...आपण तर साला ह्या डायरीचा एकही भाग सोडत नाय....आला की भर्रर्रकन वाचुन टाकतो!

फोटोग्राफरचं नाव डोळस.. :) लय भारी.

बाकी साला तो माजिरे लैच्च माजुरा दिसतोय.. घोंगडी टाकून द्यायचा त्याला खर्चापानी? :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

श्रावण मोडक's picture

16 Jun 2009 - 3:49 pm | श्रावण मोडक

धमाला,
बाकी साला तो माजिरे लैच्च माजुरा दिसतोय.. घोंगडी टाकून द्यायचा त्याला खर्चापानी?
असं लिहिलंस खरं, पण इतकं सोपं नसतं ते. साला कॉपीची वाट लावण्याचे अधिकार असतात त्याच्याकडं. एखाद्या चुकीवरून त्यानं माप काढलं तरी ऐकून घ्यावं लागतात. कारण त्याच्याच हातात नंतर आपल्या एक्स्क्यूझिव्ह बातम्या जाणार असतात. तिथं बायलाईनपासून तो पंचाईत करू शकतो. त्यामुळ पम्या आत्ता गप्प आहे हेच बरं आहे रे बाबा. ही दुखणी तुला काय सांगायची? :(

धमाल मुलगा's picture

16 Jun 2009 - 4:24 pm | धमाल मुलगा

म्हणुन तर घोंगडी टाकून म्हणलं ना! घोंगडी टाकल्यावर आपल्याला नक्की कुणी पिसलं हे कसं कळेल?
बरं, हा माजुरे असल्यामुळं बर्‍याचजणांनी त्याच्यावर डुख धरलेला असणारच की... दुसर्‍या कुणाशी कधी काही वाजलं की तो मौका पकडायचा आणि काढायचा पिसून....आलाच संशय तर तो दुसर्‍यावर ;)
काय म्हण्ता?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

श्रावण मोडक's picture

16 Jun 2009 - 5:29 pm | श्रावण मोडक

ही घोंगडी बिंगडी त्याला ठावकी असतीया. हे पाणी लई मुरलेलं असतंया. रात्रपाळीचा उपसंपादक, मुख्य उपसंपादक ही साधी खायची गोष्ट नाही धमाला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jun 2009 - 3:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मजा येत आहे वाचायला, गाडी रूळही पटापट बदलत आहे. येऊ द्या अजून!

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jun 2009 - 10:57 pm | बिपिन कार्यकर्ते

चालू द्या. भाग एवढे पटापट टाकत असल्यामुळे छोट्या भागांबद्दल माफी देतो.

बिपिन कार्यकर्ते

गणा मास्तर's picture

16 Jun 2009 - 5:53 pm | गणा मास्तर

मस्त चालले आहे रे. लिहित रहा लेका...
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

मैत्र's picture

17 Jun 2009 - 1:44 pm | मैत्र

लिखाण खतरनाक आहे...

मला काय माहिती तो कायद्याच्या कलमांच्या भाषेत बोलतोय ते. म्हटले पोलिस कन्फर्म करत नाहीत तर कसली बातमी द्यायची अन सरळ घर गाठले.

पण जर्नालिझमचा कोर्स करुन आणि क्राईम रिपोर्टरची खुमखुमी असताना मामा पिनल कोड बोलतो आहे हे पण कळलं नाही हे पटलं नाही. तोडकरची जागा मिळाली असताना जर कुठे प्रकरण घडलं आहे तर तिथे जाऊन चौकशी न करता सरळ घर गाठले म्हणजे त्याला आळस आला होता... काय विशेष नसेल असं गृहीत धरलं. हे बाकी पार्श्वभूमी बघता पटलं नाही.