महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - २

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
21 Jan 2009 - 11:26 am

पुर्वसुत्र :
एकंदरीत मागच्या निवडणुकीपेक्षा ह्यावेळी परिस्थीती काँग्रेससाठी "कठिण" आहे हे नक्की.
आता नक्की जागा किती मिळतील ह्याचा अंदाज व्यक्त करायला मी काही "न्युजचॅनेलवरचा भविष्यवाला पोपट" नाही त्यामुळे क्षमस्व पण जागात +/- १० जागांचा फरक पडणार हा माझा अंदाज आहे.

या आधीचा भाग : महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - १

डिसक्लेमर : पुर्वीसारखाच ...!

*** राष्ट्रवादी काँग्रेस ***

तसं पहायला गेलं तर ह्या पक्षाची नोंदणी एक "राष्ट्रीय पक्ष" म्हणुन निवडणुक आयोगकडे केलेली दिसेल परंतु आसाम, राजस्थान व काही अंशी गुजराथ वगळता ह्यांचा प्रभाव फक्त आणि फक्त "महाराष्ट्रातच" जास्त आढळतो, हा महाराष्ट्रातला एक प्रमुख राजकीय पक्ष आहेच. जर ह्याच्या स्थापनेकडे पाहिले तर ( आपल्याला पंतप्रधानपद नक्की मिळणार नाही ह्याची खात्री पटल्यावर ) श्री. शरद पवार यांना श्रीमती सोनिया गांधी यांच्या "विदेशी वंशाचा" साक्षात्कार होऊन व आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाला प्रतिसाद देऊन त्यांनी पी.ए.संगमा व तारिक अन्वर यांना घेऊन काँग्रेस पक्ष सोडला व "स्वदेशी" मुद्द्याच्या धर्तीवर "राष्ट्रवादी काँग्रेसची" स्थापना केली. कालांतराने मुकाबला एवढा सोपा नाही हे लक्षात आल्याने शरद पवारांनी पुन्हा एकदा पल्टी मारुन आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाला दाबुन पुन्हा एकदा "काँग्रेसशी" हातमिळवणी केली व विवीध पातळीवर सत्ता वाटुन घ्यायला सुरवात केली. थोडक्यात काय तर "सत्ता महत्वाची " हे ह्यांचे ब्रीद आहे व त्यासाठी ह्यांना काँग्रेसच काय पण कुठलाही पक्ष "अस्पॄष्य" नाही, पुण्यात "शिवसेनेबरोबर" पासुन ते जिल्हापातळीवर अगदी "भाजपाशी" ही ह्यांनी हातमिळवणी करुन सत्ता उपभोगल्याची उदाहरणे आहेत, बाकी "शेकाप, आरपीआय" वगैरे तर ह्यांचे हक्काचे साथीदार ....

महाराष्ट्रापुरते पहायला गेल्यास गेल्या विधानसभा निवडणुकीत "सर्वाधीक जागा" मिळवणारा हा पक्ष व तरीही काँग्रेसबरोबर युती करताना "ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री" ह्या ठरलेल्या धोरणाला धाब्यावर बसवुन काही मोक्याची खाती व महामंडळे ह्यांच्या बदल्यात ह्यांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद बहाल केले व स्वतःची तुंबडी भरुन घेतली.
वरवर पाहता हे सर्व स्वतःच्या फायद्यासाठी व स्वर्थासाठी केले असे दिसत असले तरी सत्य काहीतरी वेगळेच आहे. ह्याचा कारण पक्षाच्या बांधणीत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस हा मुळात "सारंजामशाहीवादी पक्ष " आहे, जो नेता निवडणुक जिंकु शकतो व सत्ता टिकवु शकतो त्यालाच ह्या पक्षात "मानाचे पान" आहे , बाकी पराभुत नेत्यांना ह्या पक्षात तशी पहायला गेली तर जास्त जागा नाही. तुम्ही आधी "जिंकुन या" मग आम्ही तुम्हाला आपले म्हणु अशी सरळसरळ अलिखीत पॉलीसी असलेला हा पक्ष आहे. स्वाभावीकपणेच मग ह्यापक्षात नेत्यांची कमी नाही, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन आलेले अक्षरशः ढीगभर नेते ह्या पक्षात आहेत व त्यांनी आपल्याबरोबर स्वतःचा स्वाभीमान, इगो, आत्मप्रौढी वगैरे गोष्टी ह्या पक्षात आणल्या.
मुळात काही सन्माननीय अपवाद सोडले तर ह्यातले बहुसंख्य नेते थेट काँग्रेसमधुनच आयात असल्याने तेथील "एकमेकांचे पाय ओढणे, लठ्ठालठ्ठी, स्थानीक राजकारणे" इथेही मोठ्ठ्या प्रमाणावर सुरु असतात, फक्त वर शरद पवारांचा वॉच असल्याने परिस्थीती कधीही हाताबाहेर गेली नाही (कारण एकदा पवार साहेबांच्या मनातुन एखादा माणुस उतरला तर त्याचे राजकीय करियर उद्धवस्त व्हायला फार वेळ लागत नाही हे सत्य सर्वांना माहित आहे.). पण आतल्या आत राजकारण शिजत असतेच व डाव-प्रतिडाव चालुच असतात.
मग ते अतिशय फटकळ तोंडाचे व कडक स्वभावाचे म्हणुन विख्यात असणारे पुणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा अजितदादा पवार असो व त्यांच्याच जहागिरीत वेळेवेळी त्यांना नाकी दम आणणारे श्री. हर्षवर्धन पाटील , अकलुजच्या बाहेर अजुन काही जग आहे हे माहितच नसणारे व स्वतःच्या ऐश्वर्यात मग्न झालेले अकलुजचे "मोहिते पाटील" व त्यांच्या विरोधात असणारा दिगंबर बागल गट ( व ह्या गटाला मदत करणारे थेट अजितदादा ) व ह्यांना रसद पुरवणारे पण सध्या मोहिते पाटलांनी जवळपास जिल्ह्यातुन हद्दपार केलेले लक्ष्मण ढोबळे , जळगावात अनभिषीक्त सम्राट झालेले व कुणालाही न जुमानणारे श्री. सुरेश जैन , तिकडे तासगावात आर.आर.पाटलांच्या तोंडाला फेस आणणारे संजयकाका पाटील व त्यांच्या विरोधात आर.आर. आबांना रसद पुरवणारे सांगलीचे मदन पाटील , कोल्हापुरात तर सदाशिवराव मंडलीक व त्यांचेच शिष्य हसन मुश्रीफ ह्यांच्या वादाचे तर अनेक अध्याय लिहता येतील, बाकी राहता राहिलेले छगन भुजबळ किंवा गणेश नाईक किंवा मुंबईतले इतर नेते हे जरे गटातटाचे राजकारण खेळत नसले तर प्रत्येकाचा स्वतःचा असा एक "इलाका" नक्कीच आहे.

अशा नेत्यांच्या भाऊगर्दीत प्रत्येकाचे रुसवेफुगवे संभाळत मुख्यमंत्रापदाचा उमेदवार ठरवणे हे फार डोक्याला त्रास देणारे काम आहे हे आधीच शरद पवारांनी ओळखुन सोईस्करपणे हे भिजलेले घोंगडे काँग्रेसच्या गळ्यात बांधले व तात्पुरती का होईना स्वतःची ह्या प्रश्नातुन मुक्तता करुन घेतली.

"काँग्रेस पक्षाप्रमाणे" हा पक्षही गेली ८-१० वर्षे सलग सत्ता उपभोगत असल्याने त्यांच्यापुढेही ह्यावेळी मतदाराना कोणत्या तोंडाने सामोरे जायचे ह्याची जाणीव करुन देणारे मागच्या भागात उल्लेखलेले प्रश्न आहेतच, जेवढी काँग्रेस वचने न पुर्ण करण्याला दोषी आहे तेवढाच दोष राष्ट्रवादी काँग्रेसकडेही जातो कारण त्यांचा "जाहीरनामा" हा "आघाडी"चा होता, ह्यावेळी त्यांना उत्तरे द्यावीच लागणार हे नक्की.

हा झाला "सर्वसमावेशक मुद्दा" पण ह्याव्यतिरीक्त "राष्ट्रवादी काँग्रेसला" अडचणीत आणु शकणारे व सध्यापासुनच डोकेदुखी ठरु पाहणारे दुसरे मुद्दे सुद्धा आहेतच.
पहिला व सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे "मराठा समाजाला आरक्षण" हा आहे, मराठा समाज हा राष्ट्रवादीचा कणाच आहे, बहुसंख्य नेते व कार्यकर्ते ह्याच समाजातुन येतात, थोडक्यात राष्ट्रवादीची प्रतिमा ते कितीही नाकारत असले तरी "मराठ्यांची गढी" अशीच आहे. मग अशा प्रसंगी स्वाभावीकपणे हा समाज राष्ट्रवादीकडे मोठ्ठ्या अपेक्षेने पहात आहे. इतिहासातसुद्धा अनेक वेळा राष्ट्रवादीने ह्या "कट्टर मराठा" गटाची पाठराखण केली आहे व आतासुद्धा करते आहे. उदाहरणे द्यायचीच झाली तर भांडारकर संशोधन संस्थेवर झालेला हल्ला न बोलता दडपण्याचा यशस्वी प्रयत्न असो, मराठा महासंघाच्या पदाधिकार्‍यांना चुचकारणे असो, की विनायक मेटेंसारख्या त्रासदायक ठरू शकणार्‍या व्यक्तीला दत्तक घेणे असो किंवा इतिहासाची पुनर्बांधणी करण्याच्या प्रयत्नात "दादोजी कोंडदेवांचे" नाव काढण्याचा प्रयत्न असो व आरक्षणाच्या साठी झालेल्या सभा, मोर्चांना "राष्ट्रवादी नेत्यांची" ठळक उपस्थिती असो. येनकेन मार्गांनी ह्यांनी "मराठा समाज" चुचकारत का होईना आपल्या मागे ठेवला व त्यांच्या ताकदीच्या जोरावर सत्ता उपभोगली. पण आता जेव्हा स्पष्टपणे मराठा समाजाला "आरक्षण" देण्याची मागणी व त्यावर निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा हेच नेते मुग गिळुन गप्प बसत आहेत किंवा संदिग्ध विधाने करत आहेत. प्रत्यक्ष शरद पवारांनी उघडपणे आरक्षणाला "विरोध" दर्शविला असला तर बहुसंख्य नेते मनाने आरक्षणाच्या "बाजुने" आहेत, फक्त स्पष्ट फार कमी जण बोलतात हे सत्य आहे. ह्या वैचारीक द्वंद्वातुन शक्य तितक्या लवकर बाहेर पडुन काहीतरी स्पष्ट निर्णय जाहीर करणार नाही तोवर ही बाब राष्ट्रवादीला "डोकेदुखी" ठरणार हे नक्की. कट्टर मराठा संघटना आत्तापासुनच "बहिष्कार, जिल्हा बंदी, फिरु देणार नाही" अशी हत्यारे उपसत आहेत, निवडणुकीच्या कळात ह्यांची धार वाढेल ह्यात शंका नाही. जर राष्ट्रवादीकडुन उशीर/ दुर्लक्ष झाले व त्याचा फायदा दुसर्‍या कुणी उचलला तर ह्यांची ताकद असणारा "कुर्‍हाडीचा दांडा" मराठा समाज राष्ट्रवादीच्या "गोतास काळ" होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ह्याशिवाय डाऊ कंपनीच्या जमिन ताब्यात घेण्यावेळी शिवसेनेने पेटवलेले रान व त्यामुळे काहीसा विरोधात गेलेला "वारकरी समाज" तसेच मालेगाव स्फोटांमागे हिंदुत्ववादी संघटना असल्याच्या आरोपातुन ह्यांच्याकडे असलेल्या "गॄहमंत्रालयाकडुन"काहीच स्पष्ट भुमिका न घेतल्याने काही कट्टर "हिंदु" सुद्धा दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
"दलित वर्गाला" खुष ठेवण्याचे काम आधीपासुनच जोमाने चालु आहे, रामदास आठवलेंना पवारांनी झुलवत ठेवले आहे. मधूनच 'आता आम्हांला गृहित धरू नका' अशी डरकाळी ठोकायचा प्रयत्न होतो, पण कुंईकुंईच ऐकू येते. जोगेंद्र कवाड्यांनी खैरलांजी प्रकरणावरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करून पाहिले, पण काही जमले नाही. एकंदर दलित समाजाचा एक मोठासा तुकडा राष्ट्रवादीला साथ देतो आहे एवढेच म्हणता येईल.
"मुस्लीम वर्ग" फार प्रभावशाली मतदार ठरु शकेल अशी परिस्थीती महाराष्ट्रात नाही, पण त्यातुनही राष्ट्रवादीने कोल्हापुरच्या हसन मुश्रीफांपासुन ते थेट अजितदादांच्या मर्जीत असलेले आकुर्डीचे "जावेद शेख" ह्यांना वेळोवेळी पुढे आणले आहे व पक्षाचा चेहरा "सर्वंकष" ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण ह्याच काळात पुण्यासारख्या ठिकाणी घडलेल्या राष्ट्रवादीच्या शिवसेनेशी झालेल्या जवळीकेमुळे व नारायण राण्यांना तक्कर देण्यासाठी वेळोवेळी शिवसेनेला मदत केल्याच्या खात्रीशीर बातम्यांमुळे अजुनही मुस्लीम समाज राष्ट्रवादीला म्हणावे इतके "आपले" मानत नाही हेच सत्य आहे.

आता पाहुयात राष्ट्रवादीच्या ताकदीकडे, ह्या पक्षाचे सर्वेसर्वा असणारे व पक्षाचा एकखांबी तंबु असणारे श्री. शरद पवार हे पक्षाची सगळ्यात मोठ्ठी ताकद आहेत. "साहेब कधीही चमत्कार करु शकतात" हा विश्वासच ह्यांना लढण्यासाठी बळ देतो व साहेबांनी वेळोवेळी चमत्कार करुन दाखवला आहे.
बाकीचे सर्व काँग्रेसप्रमाणेच आहे, निवडणुकीसाठी रसद म्हणुन पैसा व ग्रास रुट लेव्हलला काम करणारे कार्यकर्ते ह्यांची भरपुर बेगमी ह्या पक्षाकडे आहे. ठिकठिकाणचे साखरसम्राट, शेतकरीनेते, विकासमहर्षी, कर्मयोगी ह्यांनी हा ही पक्ष खचाखच भरलेला आहे. ठिकठिकाणच्या गढ्यांमधून तर राष्ट्रवादीची माणसांची आणि पैशाची कुमक येत असते. शिवाय "बेरजेच्या राजकारणातुन" ह्यांना बर्‍याच वेळा विरोधी पक्षातली माणसेही मदत करत असल्याने तशी ह्यांना जास्त तोशीश नाही ...
फक्त ह्यांनी "अंतर्गत कारभार" व्यवस्थीत सांभाळला तर ह्यांना टक्कर देणारे फार कमी आहेत ...

राहता राहिला प्रश्न नेतॄत्वाचा तर अजुन तरी पवारसाहेबांनी त्यांचा "वारस" अधिकॄतपणे जाहीर न केल्याने सर्वांच्याच तोंडासमोर गाजर बांधलेले आहेच, ते आपल्यालाच मिळेल ह्या भावनेतुन प्रत्येकजण झटुन काम करेल ह्यात शंका नाही. तसे पहायला गेले तर पर्यात अनेक आहेत. उदा: अजितदादा ह्या कसोतीला पुर्ण उतरतात पण त्यांचा फटकळ स्वभाव व घराणेशाहीला छेद म्हणुन त्यांना दाबले जात आहे, भुजबळांकडे ताकद आहेच पण पक्षांतर्गत विरोधक फार आहेत व तेलगी प्रकरणार त्यांचे हात पोळल्याने सध्या जरा ते शांत आहेत, सुप्रियाताई अजुन फारच नवख्या आहेत, आर आर आबांची प्रतिमा स्वच्छ आहे हा फायदा आहे पण नुकत्याच्च घडलेल्या मुंबई हल्ल्याच्या प्रकरणात त्यांचा "असमंजसपणा, नवखेपणा, बुजुन जाणे" स्पष्ट दिसल्याने हा पर्यायही कटाप झाला आहे.

थोडक्यात, राष्ट्रवादीला सध्या तरी मोठे आव्हान असे दिसत नाही. पवार आहेत (आणि सत्तेत आहेत) तोवर तरी....

आता नक्की जागा किती मिळतील ह्याचा अंदाज व्यक्त करणे अवघड असले तरीही जागात +/- १० जागांचा फरक पडणार हा माझा अंदाज आहे. थोडक्यात काय तर जो "तोटा" काँग्रेसला, भाजपा-सेना युतीला होईल तो राष्ट्रवादीला "फायदा" असेल हे नक्की ...!

***********************************************************

बाकी पक्षांचा व राजकारणाचा आढावा पुढच्या काही भागात.
विस्तारभयावास्तव मी हा भाग इथेच थांबवतो, पुढचा भाग शक्य तितक्या लवकर .....
धन्यवाद ...!

( *** क्रमश : **** )

समाजजीवनमानराजकारणविचारसमीक्षालेख

प्रतिक्रिया

अवलिया's picture

21 Jan 2009 - 11:29 am | अवलिया

उत्तम
पुढचा भाग शक्य तितक्या लवकर .....येवु द्या

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jan 2009 - 11:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉनराव, तुमचा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा फार चांगला अभ्यास दिसतो. चांगलं लिहिलं आहेत. पुढचे भागही अशाच तयारीने पण जरा लवकर टाकाल अशी रास्त अपेक्षा.

अदितीताई अवखळकर पाटील.
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

दशानन's picture

21 Jan 2009 - 11:35 am | दशानन

"साहेब कधीही चमत्कार करु शकतात" "

हे मात्र खरं आहे.. !

मस्त विष्लेशन !

आवडले !

अमोल केळकर's picture

21 Jan 2009 - 11:46 am | अमोल केळकर

अभ्यास पुर्ण लेख आवडला
मनसे बद्दल आपले विश्लेषण वाचायला जास्त आवडेल.( कुर्ला महापालिका पोटनिवड्णूकीत मनसे चक्क तिसर्‍या क्रमांकावर जाईल असे वाटले नव्हते.)
तेंव्हा पुढचा लेख मनसे बद्दल यावा ही विनंती

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आनंदयात्री's picture

21 Jan 2009 - 11:59 am | आनंदयात्री

अभ्यासपुर्ण लिखाण. मागील भाग पुन्हा वाचला, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

सहज's picture

21 Jan 2009 - 12:11 pm | सहज

हेच म्हणतो.

विनायक प्रभू's picture

21 Jan 2009 - 12:30 pm | विनायक प्रभू

ध्यासपुर्ण लेख.

धमाल मुलगा's picture

21 Jan 2009 - 1:25 pm | धमाल मुलगा

डानराव,
तुमच्या राखीव कुरणातला हाही लेख(क्रमशःचा भाग) उत्तम जमलाय.

निवडणुकीसाठी रसद म्हणुन पैसा व ग्रास रुट लेव्हलला काम करणारे कार्यकर्ते ह्यांची भरपुर बेगमी ह्या पक्षाकडे आहे. ठिकठिकाणचे साखरसम्राट, शेतकरीनेते, विकासमहर्षी, कर्मयोगी ह्यांनी हा ही पक्ष खचाखच भरलेला आहे. ठिकठिकाणच्या गढ्यांमधून तर राष्ट्रवादीची माणसांची आणि पैशाची कुमक येत असते. शिवाय "बेरजेच्या राजकारणातुन" ह्यांना बर्‍याच वेळा विरोधी पक्षातली माणसेही मदत करत असल्याने तशी ह्यांना जास्त तोशीश नाही ...
फक्त ह्यांनी "अंतर्गत कारभार" व्यवस्थीत सांभाळला तर ह्यांना टक्कर देणारे फार कमी आहेत ...

अत्यंत कळीचा मुद्दा!

बाकी, हर्षवर्धन पाटील, मोहिते पाटील इ.इ. अगदी अचुक निरिक्षणं!

बाकी, संसदेच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हापिसाला दांडी मारुन दिवसभर 'लाईव्ह टेलेकास्ट' पहात बसणार्‍या राजकारणाच्या अभ्यासु माणसाला आम्ही पामरानं काय पावती द्यावी???

पु.भा.शु. :)

-(गल्लीतल्या राजकारणात अपक्ष राहुन शेवटी मलिदा ओढणारा) ध मा ल दादा.

अभिरत भिरभि-या's picture

21 Jan 2009 - 12:50 pm | अभिरत भिरभि-या

वा डान सेठ,
लई भारी इश्लेसन !!
तुमचा ह्या विषयावरचा अभ्यास मोटारीपेक्षा दांडगा दिसतो :)
आपल्यालाबी मनसे वरचा लेख वाचायचा आहे

अभिरत

ढ's picture

21 Jan 2009 - 1:25 pm |

डानराव,

उत्कृष्ट विवेचन केलंय आपण. अभिनंदन.

छोटा प्रणॉय रॉय म्हणावे काय आपल्याला?

वाहीदा's picture

21 Jan 2009 - 3:56 pm | वाहीदा

बाकी ईथुन तिथुन सगळे सारखेच !
खालील मराठी शेर त्यांच्याच साठी , आहे
दोस्त हो दुनियेस धोका मेलो तरी आम्हि दिला,
जाउनिया नर्कात पत्ता कैलासाचा आम्हि दिला,
हाय हे वास्तव्य आमुचे सर्वान्स कळाले शेवटी
सारेच हे सन्न्मित्र आमुचे येथेच आले शेवटी. (नर्कात )

~ वाहीदा

शितल's picture

21 Jan 2009 - 7:49 pm | शितल

डॉन्या,
राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाचा अभ्यासपुर्वक आढावा घेतला आहेस. :)
शरद पवार आहेत तो पर्यत तरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिलच, त्याच्या नंतर मात्र रा.काँ.पक्षाच्या सत्तेतील अस्तित्वा बद्दल शंका आहे.
आता भाजपावर लवकर लिहायला तुला वेळ मिळु दे. :)

भास्कर केन्डे's picture

21 Jan 2009 - 8:31 pm | भास्कर केन्डे

डॉन साहेब, राजकारणाचा चांगलाच अभ्यास आहे वाटते. खूप छान विश्लेशन केलेत. लेख आवडला. अभिनंदन!

पण उदाहरणे देताना व बेरजा वजाबाक्यांचा खेळ मांडताना आपण पश्चिम महाराष्ट्रातच रेंगाळलात असे दिसते. जरा पुढे मराठवाडा-विदर्भातही जा, अजून रंगिबेरंगि राजकारण दिसेल. उदा. विमलताई मुंदडांनी मागच्या निवडणूकीत एकहाती राखलेला बुरुज व त्याचे परिणाम. तिकडे अमरावती -नागपुरात सुरु असलेल्या धुरवडी, वगैरे.

आता पुढील भाग येऊ द्यात.

आपला,
(प्रभावित) भास्कर

छोटा डॉन's picture

21 Jan 2009 - 8:39 pm | छोटा डॉन

"विमल मुंदडा" यांचा किस्सा डोक्यात होताच पण ऐनवेळी लिहताना गडबडीत विसरुन गेलो होतो.
मराठवाड्यात तसा सध्या राष्ट्रवादीच जोर कमीच आहे व विदर्भ म्हणजे अजुन स्पष्ट लिहायचे तर अमरावती-नागपुराचे मला जास्त काही माहित नाही. कदाचित ह्यामुळे हे घडले असावे ...
ह्या लेखावर प्रतिक्रीया म्हणुन "विसरलेले / माहित नसलेले" वगैरे पुन्हा अभ्यास करुन मांडण्याचा प्रयत्न करीन ..!

आपल्या योग्य टिपण्णीबद्दल आभारी आहे ...!

------
छोटा डॉन

भास्कर केन्डे's picture

21 Jan 2009 - 9:42 pm | भास्कर केन्डे

तसा केवळ विधानसभेच्या संख्येवरुन बघायला गेलात तर जोर वाटणार नाही. पण स्था स्व सं, सहकार क्षेत्र, शिक्षण संस्था, आदींचा विचार केलात तर राष्ट्रवादीची ताकद लक्षात येईल. बीडच्या क्षिरसागर घराण्यातला खासदार-आमदार सद्य स्थितीत नसला तरीही त्यांची ताकद मुंडेंना पाणी दाखवण्या इतकी नक्कीच आहे. कदाचित हेच ओळखून मुंडे सुद्धा क्षिरसागरांच्या जास्त फंदात पडत नाहीत. मिळूण लोणी खातात. पण आता मुंदडांच्या भरारीने समिकरणे बदलतील असे वाटते. एकंदरीत विचार केल्यास मराठवाडा काँग्रेस व सेना-भाजप युतीच्या पारड्यात राष्ट्रवादीपेक्षा जास्त घबाड टाकेल असे वाटते. पण पवार साहेब काहीही चमत्कार करु शकतात हा फॉक्टर आलाच.

सखाराम_गटणे™'s picture

21 Jan 2009 - 9:29 pm | सखाराम_गटणे™

राष्ट्रवादी काँग्रेस ला पाहुन मला उत्तर पेशवाईची आठवण येते, सगळे सरदार वेगवेगळे असुन प्रत्येकाचा सवता-सुभा आहे. ज्याची त्याची पिढीजात जहागिर आहे. पण दबाव गटाचे बळ समजल्यामुळे सगळे एकत्र आले आहेत. वैचारीक बांधिलकी पेक्षा आर्थीक बांधिलकी जास्त महत्वाची आहे. उद्या अधिक चांगली ऑफर मिळाली तर, रॉकॉचे तिरडे करयला ही मंडळी कमी करणार नाहीत.

काही दिवसांपुर्वी एका गुंडाला (नाव विसरलो त्याचे) पुण्यात मोठ्या थाटात रॉ़काँ मधे प्रवेश देण्यात आला आणि त्याच वेळी गुंडगिरी खणुन काढली जाईल अशी आरोळी देण्यात आली.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

हा आढावा जो घेतला आहेस त्यासाठी नक्कीच तुझं अभिनंदन!
लेख मस्त. पुढचा लेख लवकर येऊद्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

21 Jan 2009 - 11:31 pm | अनामिक

अभ्यासपुर्ण लेख... अभिनंदन! पुढचा लेख लवकर येऊ देत.

अनामिक

विसोबा खेचर's picture

22 Jan 2009 - 8:13 am | विसोबा खेचर

आमचं मत -

महाराष्ट्र हा कुणाही सामान्य जनांचा नसून तो फक्त पैसे खाणार्‍या आणि सत्तेचं राजकारण करणार्‍या राजकारण्यांचा आहे. पक्ष आणि त्यांची नावे वेगवेगळी आहेत परंतु सर्व राजकारण्यांची जात एकच आहे!

तात्या.