डॉनराव, तुमचा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा फार चांगला अभ्यास दिसतो. चांगलं लिहिलं आहेत. पुढचे भागही अशाच तयारीने पण जरा लवकर टाकाल अशी रास्त अपेक्षा.
अदितीताई अवखळकर पाटील.
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
अभ्यास पुर्ण लेख आवडला
मनसे बद्दल आपले विश्लेषण वाचायला जास्त आवडेल.( कुर्ला महापालिका पोटनिवड्णूकीत मनसे चक्क तिसर्या क्रमांकावर जाईल असे वाटले नव्हते.)
तेंव्हा पुढचा लेख मनसे बद्दल यावा ही विनंती
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
डानराव,
तुमच्या राखीव कुरणातला हाही लेख(क्रमशःचा भाग) उत्तम जमलाय.
निवडणुकीसाठी रसद म्हणुन पैसा व ग्रास रुट लेव्हलला काम करणारे कार्यकर्ते ह्यांची भरपुर बेगमी ह्या पक्षाकडे आहे. ठिकठिकाणचे साखरसम्राट, शेतकरीनेते, विकासमहर्षी, कर्मयोगी ह्यांनी हा ही पक्ष खचाखच भरलेला आहे. ठिकठिकाणच्या गढ्यांमधून तर राष्ट्रवादीची माणसांची आणि पैशाची कुमक येत असते. शिवाय "बेरजेच्या राजकारणातुन" ह्यांना बर्याच वेळा विरोधी पक्षातली माणसेही मदत करत असल्याने तशी ह्यांना जास्त तोशीश नाही ...
फक्त ह्यांनी "अंतर्गत कारभार" व्यवस्थीत सांभाळला तर ह्यांना टक्कर देणारे फार कमी आहेत ...
अत्यंत कळीचा मुद्दा!
बाकी, हर्षवर्धन पाटील, मोहिते पाटील इ.इ. अगदी अचुक निरिक्षणं!
बाकी, संसदेच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हापिसाला दांडी मारुन दिवसभर 'लाईव्ह टेलेकास्ट' पहात बसणार्या राजकारणाच्या अभ्यासु माणसाला आम्ही पामरानं काय पावती द्यावी???
पु.भा.शु. :)
-(गल्लीतल्या राजकारणात अपक्ष राहुन शेवटी मलिदा ओढणारा) ध मा ल दादा.
बाकी ईथुन तिथुन सगळे सारखेच !
खालील मराठी शेर त्यांच्याच साठी , आहे
दोस्त हो दुनियेस धोका मेलो तरी आम्हि दिला,
जाउनिया नर्कात पत्ता कैलासाचा आम्हि दिला,
हाय हे वास्तव्य आमुचे सर्वान्स कळाले शेवटी
सारेच हे सन्न्मित्र आमुचे येथेच आले शेवटी. (नर्कात )
~ वाहीदा
डॉन्या,
राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाचा अभ्यासपुर्वक आढावा घेतला आहेस. :)
शरद पवार आहेत तो पर्यत तरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिलच, त्याच्या नंतर मात्र रा.काँ.पक्षाच्या सत्तेतील अस्तित्वा बद्दल शंका आहे.
आता भाजपावर लवकर लिहायला तुला वेळ मिळु दे. :)
डॉन साहेब, राजकारणाचा चांगलाच अभ्यास आहे वाटते. खूप छान विश्लेशन केलेत. लेख आवडला. अभिनंदन!
पण उदाहरणे देताना व बेरजा वजाबाक्यांचा खेळ मांडताना आपण पश्चिम महाराष्ट्रातच रेंगाळलात असे दिसते. जरा पुढे मराठवाडा-विदर्भातही जा, अजून रंगिबेरंगि राजकारण दिसेल. उदा. विमलताई मुंदडांनी मागच्या निवडणूकीत एकहाती राखलेला बुरुज व त्याचे परिणाम. तिकडे अमरावती -नागपुरात सुरु असलेल्या धुरवडी, वगैरे.
आता पुढील भाग येऊ द्यात.
आपला,
(प्रभावित) भास्कर
"विमल मुंदडा" यांचा किस्सा डोक्यात होताच पण ऐनवेळी लिहताना गडबडीत विसरुन गेलो होतो.
मराठवाड्यात तसा सध्या राष्ट्रवादीच जोर कमीच आहे व विदर्भ म्हणजे अजुन स्पष्ट लिहायचे तर अमरावती-नागपुराचे मला जास्त काही माहित नाही. कदाचित ह्यामुळे हे घडले असावे ...
ह्या लेखावर प्रतिक्रीया म्हणुन "विसरलेले / माहित नसलेले" वगैरे पुन्हा अभ्यास करुन मांडण्याचा प्रयत्न करीन ..!
आपल्या योग्य टिपण्णीबद्दल आभारी आहे ...!
------
छोटा डॉन
तसा केवळ विधानसभेच्या संख्येवरुन बघायला गेलात तर जोर वाटणार नाही. पण स्था स्व सं, सहकार क्षेत्र, शिक्षण संस्था, आदींचा विचार केलात तर राष्ट्रवादीची ताकद लक्षात येईल. बीडच्या क्षिरसागर घराण्यातला खासदार-आमदार सद्य स्थितीत नसला तरीही त्यांची ताकद मुंडेंना पाणी दाखवण्या इतकी नक्कीच आहे. कदाचित हेच ओळखून मुंडे सुद्धा क्षिरसागरांच्या जास्त फंदात पडत नाहीत. मिळूण लोणी खातात. पण आता मुंदडांच्या भरारीने समिकरणे बदलतील असे वाटते. एकंदरीत विचार केल्यास मराठवाडा काँग्रेस व सेना-भाजप युतीच्या पारड्यात राष्ट्रवादीपेक्षा जास्त घबाड टाकेल असे वाटते. पण पवार साहेब काहीही चमत्कार करु शकतात हा फॉक्टर आलाच.
आमचं मत -
महाराष्ट्र हा कुणाही सामान्य जनांचा नसून तो फक्त पैसे खाणार्या आणि सत्तेचं राजकारण करणार्या राजकारण्यांचा आहे. पक्ष आणि त्यांची नावे वेगवेगळी आहेत परंतु सर्व राजकारण्यांची जात एकच आहे!
तात्या.
प्रतिक्रिया
उत्तम पुढच
डॉनराव,
"साहेब
अभ्यास
अभ्यासपुर्ण
+१
ध्यास
उत्तम!
लई भारी इश्लेसन
बेष्ट लिवलंय..
छान जमलयं
मस्तच रे.
मस्त, पण...
करेक्ट ..!
जोर
राष्ट्रवा
जबरदस्त आहे रे तुझा अभ्यास.
अभ्यासपुर
आमचं मत