सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आपला अनिकेत's picture
आपला अनिकेत in जनातलं, मनातलं
7 May 2020 - 12:00 pm

सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व.

आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची... सुजलाम सुफलाम महाराष्ट्र !‌‌
तर आता हा प्रश्न पडतो की खरोखरच हा माझा महाराष्ट्र त्या tagline प्रमाणे सुजलाम सुफलाम राहिल का...?
आपला महाराष्ट्र या देशाच्या विकासात आणि देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यात नेहमीच अग्रेसर असतो, पण सध्या आपला महाराष्ट्र नको त्या गोष्टीत (Corona) देशामध्ये सर्वात पुढे आहे.
Coronaने आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला जो विळखा घातलाय तो कधीपर्यंत सुटेल ते त्या भगवंताला पण नाही माहित... कारण त्याने सुध्दा यातून काढता पाय काढलाय आपली दारे बंद करून.
Lockdown संपल्यानंतर आपल्या महाराष्ट्राची तसेच या देशाची अर्थव्यवस्था थोड्याफार प्रमाणात का होईना पण डगमगणार आहे.ह्याला कारणं पण तशीच आहेत, सांगायचं झालं तर सद्यस्थितीत आपल्या महाराष्ट्राची आणि प्रामुख्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उद्योगधंदे आणि वाहतूक बंद झाल्याने ती पुर्णपणे ठप्प झालिये आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या विकासाला आणि अर्थव्यवस्थेला कात्री लागली आहे. कारण तिचा या महाराष्ट्राला आणि देशाला आर्थिक महसूल मिळवून देण्यात मोठा वाटा आहे.
त्यामुळे महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची आर्थिक घडी बसवायला थोडाफार वेळ लागेल, त्यासाठी आपलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार योग्य ते निर्णय आणि उपाय योजना अंमलात आणतील. तरीहि हा Lockdown संपेपर्यंत महाराष्ट्राच्या मराठी आणि अमराठी जनतेने आपला संयम बाळगून या सरकारला सहकार्य करावं. महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार जे काही निर्णय आणि सुचना करतील त्यांचा प्रत्येक माणसाने एक सुजाण नागरिक बनून त्या आपल्या नैतिक जबाबदाऱ्या समजून त्यांचं पालन करावं. तरच आपल्या महाराष्ट्रावर आणि देशावर भविष्यात जे आर्थिक संकट येणार आहे त्याचा मुकाबला करू आणि पुढेही आपल्या या सह्याद्रीच्या सिंहाला आपल्या देशाच्या विकासात अग्रेसर राहून पुन्हा एकदा गर्जण्याची संधी देवु.

मांडणीमुक्तकसाहित्यिकप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादसमीक्षालेखमत