"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही
तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
तुम्हां सर्व रसिक वाचकांना आणि लेखन करतांना हुरूप देत आपुलकीचे नाते जपणार्या MisalPav.com, Aisiakshare.com, MaayBoli.com येथील संचालक, सभासद यांना सविनय अर्पण.
ऑनलाईन कम्युनिटी वेबसईट्स वरील (म्हणजेच येथील) मित्र - सुहास साळवे, जयपाल पाटील, प्रसन्न केसकर, विशाल विजय कुलकर्णी, चित्रकार शरद सोवनी (चित्रगुप्त), प्रमोद देव, प्रा. डॉ. दिलीप बिरूटे, चंद्रशेखर अभ्यंकर (तात्या), कैवल्य देशमुख, मदणबाण, प्रसाद ताम्हणकर (परा), सागर भंडारे, राजेश घासकडवी, पराग दिवेकर (आत्मा), राज जैन व इतरांनीही लेखनकामी प्रोत्साहन दिले.
नव्या स्वरूपातील हे वगनाट्य आपणांस आवडेल याची खात्री आहे.
धन्यवाद.
आपला,
पाषाणभेद उर्फ दगडफोड्या उर्फ सचिन बोरसे!
प्रतिक्रिया
20 Mar 2017 - 1:11 am | अभ्या..
अहाहाहाहा,
दफोराव, जोरात मांडला की हो कारभार. एकच लंबर. बोलक्या रेषावाल्या घनश्याम देशमुखाचे कव्हर पाहिले अन जी खुष झाला बघा.
आता आतल्या रसाळ वग गौळणींचा आस्वाद घेतो निवांतपणे.
जोरात हाभिनंदन आणि आगामी लेखनास प्रचंड शुभेच्छा.
मिपाचे आणि मिपाकरांचे ऋण याचा मात्र जोरात निर्देश केलाय बरका. तुमच्याबद्दलचा आदर वाढलेला आहे.
20 Mar 2017 - 1:20 am | पाषाणभेद
हाच तो उत्साह, असलेच प्रोत्साहन मिळाल्याने हे शक्य झाले.
अभ्याजी आपल्यासारखे आभारपत्रीकेत उल्लेखिलेले सभासद येथे आहेत.
माझ्या लेखी हे पुस्तक पुर्ण करणे हा एक प्रोजेक्ट होता. या पुस्तकासाठी मिसळपाव.कॉम चा सहभाग लक्षणीय आणि आदरणीय आहे. त्यामुळेच हे शक्य झाले. तमाशा मी एकदाही बघीतलेला नाही. लावणी ह्या केवळ सिनेमातील पाहूनच माहीत झाल्या. काळ एखादे काम आपल्याकडून करवून घेतो तसे हे काम झाले आहे.
20 Mar 2017 - 1:24 am | पाषाणभेद
इतरही अनेक सदस्यांचा नामोल्लेख टळला गेल्यास क्षमस्व. आपण समजून घ्याल ही अपेक्षा.
अवांतरः एखाद्या संकेतस्थळाला अर्पण केले गेलेले हे प्रथमच पुस्तक असावे काय? मी माझा उदोउदो करत नाही पण तसे वाटते.
20 Mar 2017 - 1:27 am | अभ्या..
असायला हवे, नसले तरी काय फरक पडत नाही.
हे पुस्तक आपल्या मिपाकराचे आहे आणि त्याने ते मिपाला अर्पण केले आहे. बस्स.
सब मामला सुपरहिट्ट.
20 Mar 2017 - 7:19 am | अत्रुप्त आत्मा
प्लस प्लस वन. असच म्हनायलो. आमचे पा. भे उर्फ भेदकपाषाण रॉक्स!
20 Mar 2017 - 1:37 am | एस
अरे वा! अभिनंदन पाभे!!
20 Mar 2017 - 4:31 am | जयंत कुलकर्णी
अभिनंदन !
जयंत कुलकर्णी.
20 Mar 2017 - 9:55 am | खेडूत
अरे वा!
अभिनंदन अन शुभेच्छा पाभे.. !
20 Mar 2017 - 11:08 am | ५० फक्त
अभिनंदन पाभे...
पहिल्या लेकराच्या जन्माची प्यार्टी लागु झाली तुम्हाला बरं का .
20 Mar 2017 - 5:30 pm | अत्रुप्त आत्मा
@प्यार्टी लागु झाली तुम्हाला बरं का . >>> आले..आले. खादाड पण्णासराव आले.
20 Mar 2017 - 4:14 pm | सूड
अभिनंदन अधिक शुभेच्छा!!
20 Mar 2017 - 4:39 pm | किसन शिंदे
पहिल्या वाहिल्या पुस्तकासाठी जोरदार अभिनंदन पाभेशेठ. :)
आणि हो, प्रमुख भूमिकेत आमचे नाव टाकल्याबद्दल आभार. ;)
20 Mar 2017 - 8:30 pm | उगा काहितरीच
अभिनंदन !