" Hi friend how r u ? " - राधिका
" I m fine n hows u ? " - मी
" काय बोलू fine म्हणू की खर सांगू ? " - राधिका
" खरच सांग . " - मी
" काही प्रॉब्लेम असला की कुणापुढे बोलाव तेच समजत नाही . बाबा किती रागीट आहेत ते तुम्हाला माहीत आहेच . त्यामुळे त्यांच्यासमोर काही बोलायची हिंमत्तच होत नाही . आणि आई एकतर ignore करते नाहीतर भांडायला येऊ का तिथे अस बोलते , त्यामुळे तिला काही सांगण्यात अर्थ वाटत नाही . तुम्ही सांगत होता ते पटत आहे , काही bad girls पण असतात . आमच्या क्लासमधे पण एक ग्रूप आहे , ज्या सगळ्यांना टॉंन्ट मारतात , खूप वाईट कमेंट करतात . Even girls नी ज्या गोष्टींमधे दुस-या girl ला मदत करावी किंवा तिला समजून तरी घ्याव त्या टॉपिकवर या टॉंटिंग करतात even about ... जाऊ द्या . त्यांना स्वतःलाही हे फेस करायच असूनही त्या अस कस करू शकतात ते समजतच नाही . आणि काही गोष्टी classmates ना ज्या good friend वाटतात म्हणून सांगितल्या त्यानी त्या गोष्टी इतरांसोबत शेअर केल्या . त्यामुळे कुणाशी काही बोलाव काही शेअर कराव की नाही हा प्रश्न पडतो . पण का कुणास ठाऊक तुमच्यासोबत बोलावस वाटल , हे शेअर करावस वाटल . तुमच्याशी बोलून आधार वाटतो . " - राधिका
" तुला ऐकतोय तेव्हा मला अस वाटायला लागल आहे की स्वतःबरोबरच बोलतो आहे . स्वतःलाच ऐकतो आहे . मीही सुरूवातीपासून थोडा अबोल , काहीसा एकलकोंडाच त्यामुळे मित्रही फार कमीच . पण पुढे त्या घटनेनंतर मला पुढे अनेक दिवस फार दडपण वाटत होत , अगदी शाळा सुरू झाली तरीही . आमची काहीतरी internal exam छोटी test वगैरे होती . त्यात मला फारच कमी मार्क्स् मिळाले होते हे मी माझ्या एका मित्राला सांगत होतो . तिथे मला याच कारण शेअर करायच होत पण तिथे कुणीतरी आल त्यामुळे मला पुढे बोलता आल नाही पण नंतर मला समजल की मला कमी मार्क्स् मिळाले हे सर्वांना समजल आहे , त्या तसल्या टेस्टला फारसा काही अर्थ नसतो पण मी फेल झालो अशी जाहिरातच झाली , आमचे नातेवाईक शेजारी सर्वांनाच . मी हुशार विद्यार्थी त्यात अस म्हटल्यावर नातेवाईकांनी लक्ष द्या अशी पालकांकडे सूचना केली . याच मला वाईट वाटत होतच पण ज्याला आपण मित्र मानून हे सांगू इच्छित होतो त्याने हे सर्वांपर्यंत पोहोचवल याच जास्त वाईट वाटत होत . पण याच्यानंतर जी गोष्ट सांगणार होतो ती सांगणच अशक्य झाल . मग हळूहळू सर्वांवरचाच विश्वास कमी कमी होत कायमस्वरूपी उडाला . याचा फार तोटा मला झाला पुढील आयुष्यात . सोप्या सोप्या गोष्टींचही टेंशन वाटू लागल . त्यामुळे वयापेक्षा पुढे मानसिक आणि शारिरीक स्थिती पोहोचली होती . आता जीमला जातो त्या फिजीकल वर्कआउट मुळे काही प्रमाणात परिस्थिती सुधारते आहे असे वाटते आहे . पण आपल्याला थोड समाजात मिसळायलाच हव किमान काही गोष्टी शेअर करायलाच हव्या . मेन इशू हा नाही की त्याच समाधान व्हाव पण फक्त शेअर करूनही तुझ्या मनावरचा भार थोडा हलका होईल . तुला ती सर्वांपर्यंत पोहोचायची भिती आहे ना मग असे लोक शोध जे किमान ऐकतील , जशी तुझी आई . तू म्हणते ती इग्नोर करते . पण तू ती ऐकते आहे अस समजूनच सांग . May be ती लक्ष नाही देणार पण एखादी मोठी गोष्ट जी तीला वाटेल तेव्हा नक्कीच ती काही स्टँड घेईल . तुझ्या स्कुलच्या टिचर ना सांग . जी मुलगी तुला असे टॉंट मारते तेव्हा तिला विचार की तिला हे नाही का फेस कराव लागत ? ती ऐकेल . नाहीच ऐकल तर इतर मैत्रीणींना सोबत घेऊन तिची तक्रार कर टीचरकडे . ती होईल ठीक पण नाहीच झाली तरी तुझ्या सोबत तेव्हा अशा मैत्रीणी असतील ज्यांना हा त्रास होतो आहे तिच्यामुळे आणि त्यांच्यासाठी तू heroच असशील . ज्यामुळे त्या तुझ्या आणखी close friends बनतील . आणि तुला भविष्यात चांगली साथही देतील . आयुष्य म्हणजे काही सगळ्या गोष्टी परफेक्ट करणे किंवा असणे नाही तर आपण परफेक्ट होण्याचा आणि सगळ परफेक्ट करण्याचा प्रयत्न करणे आहे . " - मी
" थँक्स तुमच्यामुळे फार आधार वाटला . आणि confidence ही वाटतो आहे . पण एक शंका आहे मी त्यांना hero का वाटेन heroine का नाही ? "
...क्रमशः
भाग १ http://www.maayboli.com/node/55229
भाग २ http://www.maayboli.com/node/55239
भाग ३ http://www.maayboli.com/node/55264
भाग ४ http://www.maayboli.com/node/55293
भाग ५ http://www.maayboli.com/node/55354
भाग ६ http://www.maayboli.com/node/55545
भाग ७ http://www.maayboli.com/node/55591
भाग ८ http://www.maayboli.com/node/58057
भाग ९ http://www.maayboli.com/node/58315
भाग १० http://www.maayboli.com/node/58327
भाग ११ http://www.maayboli.com/node/58339
भाग १२ http://www.misalpav.com/node/35716
प्रतिक्रिया
18 Apr 2016 - 5:41 pm | मराठी कथालेखक
शृंगाराच्या वाढलेल्या वेगाबद्दल आभार !!
बाकी मूळ विषय/कथा बाजूला पडत आहे की काय अशी शंका येते. असो.
पुढचे भाग अशाच वेगाने येवू द्यात.
18 Apr 2016 - 6:36 pm | आनन्दा
ह्म्म.. आता मलाही असे वाटायला लागले आहे.. अवांतर थोडे जास्ती होते आहे.. किंबहुना ते थोडे विषयाला सोडून चाललेले आहे.
19 Apr 2016 - 3:21 pm | राहूल.
वेग जरा बेताचा ठेवला तरी चालेल पण भाग जरा मोठे टाका .