शृँगार २

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
15 Feb 2016 - 6:09 pm

आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत . पुढे ती लोकल त्यातली ती गर्दी , सुरूवाती सुरूवातीला त्याचही थ्रील वाटायच . नंतर त्याची सवय झाली आणि आता तर उबग येतो त्याचा . एवढी माणस वाढली तेवढया लोकल नाही वाढल्या . आता काही दिवसांनी एकमेकांच्या उरावर बसून प्रवास करावा लागतो की काय कुणास ठाऊक . हं डबलडेकर लोकल नाही तर हा उपाय होईल . जाऊदे मी पण काय विचार करत बसलो . जो प्रश्न इतक्या वर्षात नाही सुटला तो आता काय सुटणार आहे . पण चांगला विचार आहे एकमेकांच्या उरावर बसून . पण यात वर बसणा-याची मजा आहे , तेही खाली कोण आहे याच्यावर . बाकी खालच्याच मरणच आहे . आणि हा अनुभव तर रोजचाच आहे , बॉस बसलेलाच असतो रोज उरावर . आता लोकल शिवाय दुसरा इतका फास्ट आणि परवडणारा पर्याय नाही . त्यामुळे ते तर बदलता येणार नाही . दुसर म्हणजे ऑफिस तिथ काही तरी करून वेळ वाचवायला हवा . बाकीच नंतर पाहू पण आधी आठ एक दिवस रजा काढून कुठतरी फिरून येऊ . अगदी बाहेर नाही गेलो तरी घरी तरी राहू सोबत काही वेळ , तेवढाच चेंज . बघू एवढ्यातच थोडातरी फरक पडेल . आता ऑफिसमध्ये जाऊन पहिल हे काम करूया . लोकल स्टेशनवर पोहोचली सोबत विचारही निर्णयाच्या स्टेशनवर पोहोचले होते . आता आनंदातच आपला मोर्चा ऑफिसकडे वळविला . ऑफिसमध्ये सर्व आलबेल आहे हे पाहून काही वेळाने बॉसच्या केबिनमधे गेलो . आणि बॉससमोर रजेचा विषय काढला . इतका वेळ शांत बसलेला कुत्रा अचानक अंगावर धाऊन आल्यासारख झाल . काही बचाव करता आला नाही . छे काही कारण पण पुढ ठेवू दिल नाही . ह्या माणसाला काय बोलाव तेच कळत नाही . घरी बायकोशी भांडून येतो कि काय ऑफिसला कुणास ठाऊक . याच्या तर .... चार दोन शिव्या तरळून गेल्या जीभेवरून . आता पुढे काय ? मोठा प्रश्न आ वासून उभा होता . काहीतरी करून वेळ काढणे गरजेचे होते . काय कराव आता ? पण मला प्रश्न पडतोय काय प्रॉब्लेम असेल बॉसचा ? काय असणार स्वतःच वैवाहिक जीवन सुखी नसेल म्हणून बघवत नसेल दुसऱ्याच . घरी कर्तबगारी दाखवण्यात कमी पडत असेल म्हणून इथे कर्तबगारी दाखवत असेल . घरी कमी पडतोय म्हणून बायको ओरडत असेल आणि त्याच फ्रस्ट्रेशन हा इथ काढत असेल . कमी पडतोय म्हणून बायको ओरडत असेल ; बाकी जास्त पडत असेल तरी बायको ओरडणारच . एकूण काय तर कमी किंवा जास्त पडो बायको ओरडणारच . बाकी पुरूष म्हणून उभ राहण हीच कोणत्याही पुरुषाची सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट . पण नुसत उभ राहूनही फायदा नाही , काम आणि रिझल्ट महत्त्वाचे . जाऊदे आपल काय चालल होत आणि हे काय . मग काय करु सरळ राजीनामा देऊन दुसरी नोकरी पहावी का ? छे हे फारच होईल .पण आयुष्य अस वाया घालवण्यात काय अर्थ आहे ? हो कितीही अघोरी वाटला तरी या शिवाय दुसरा मार्ग नाही आपल्याकडे . ठिक आहे हेच करू पण आधी कुणालातरी सांगून बघू . सावंत काकांकडे हा विषय काढला .

" अरे वेडा झाला आहेस का तू ? अरे अशी कशी तडकाफडकी नोकरी सोडण्याचा विचार केलास ? हे बघ एक तर आपण काय IT वाले नाही कि कधीही आणि कितीही वेळा नोकरी सोडायला . तेही फार विचार करुनच करतात अस . आणि बघ तुला या वयात जो पगार मिळतो तो बराच जास्त आहे . इथून सोडून दुसरीकडे कुठ गेलास तर तुला इतका पगार मिळेल याची शाश्वती नाही आणि एक्सपिरियंस असला तरी तिथे तू नवखाच ना ? म्हणजे काम नक्कीच जास्त . अरे म्हणजे पगार कमी आणि काम जास्त . मुर्खपणाच नव्हे का हा ."

अरेच्या ही गोष्ट माझ्या ध्यानातच आली नाही कि काम वाढुही शकत आणि त्यामुळे वेळही . छे यात काहीच शाश्वती नाही वेळ वाचण्याची , उलट वेळ जास्त जाण्याची शक्यताच जास्त .आणि नविन जागी तर मग फारस काही करताही येणार नाही . छे हे म्हणजे आगीतून फुफाट्यात गेल्यासारख होईल . बर झाल आपण आधी विचारल सावंत काकांना . काकांचे आभार मानले . मग कामाला लागलो . म्हणजे झाल आता नोकरी बदलणे हाही पर्याय गेला . फिरून परत पहिल्याच ठिकाणी पोहोचलो होतो . आता काय ? ठिक आहे मग आहे तो वेळ चांगल्या पद्धतीने वापरूया . थोडी फिटनेस वाढवूया , थोडा इंटरेस्ट वाढवूया , स्वतःचा आणि बायकोचाही . जिम जॉइन करूया . पण जिमसाठी वेळ कुठे आहे ? जाऊदे नाहीतरी आपण घरी जाऊन काय उपटतो ? उपटणे , कापणे का क्रीम काय कराव ? हे या क्षेत्रातले दिग्गज कसे अगदी क्लीन क्लीयर असतात तस कराव काहीतरी . पण काय करत असतील ? उपटणे छे आतंकी पर्याय . कापणे ठिक आहे पण भलतच कापल तर अवघड व्हायच , आहे तेही हातच जायच . क्रीम कुणाला माहीत याच्यासाठी वेगळ असत का ते बायका हाता पायावरच्या केसांसाठी वापरतात तेच असत , कुणाला माहीत ? एकदा चौकशी करायला हवी . कुणाकड करावी चौकशी ? जाऊदे उगाच ओळखी पाळखीच्यात नको . मेडिकलमधे करुया चौकशी , तेही जरा लांबच्या , उगाचच आपल अज्ञान नको जगापुढे . आपण इतक्या दिवसात अस काही वेगळ करण्याचा प्रयत्न केला नाही . नेहमी आपली तीच घिसीपिटी टेक्निक . घिसी आणि पिटी या पेक्षा वेगळ काय करणार ? तेच ते पण जरा नये अंदाज मे .......

..... क्रमशः

भाग १ : http://www.misalpav.com/node/34867

कथा

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2016 - 6:21 pm | मराठी कथालेखक

बाकी पुरूष म्हणून उभ राहण हीच कोणत्याही पुरुषाची सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट . पण नुसत उभ राहूनही फायदा नाही , काम आणि रिझल्ट महत्त्वाचे

उपटणे , कापणे का क्रीम काय कराव ? हे या क्षेत्रातले दिग्गज कसे अगदी क्लीन क्लीयर असतात तस कराव काहीतरी . पण काय करत असतील ? उपटणे छे आतंकी पर्याय . कापणे ठिक आहे पण भलतच कापल तर अवघड व्हायच , आहे तेही हातच जायच . क्रीम कुणाला माहीत याच्यासाठी वेगळ असत का ते बायका हाता पायावरच्या केसांसाठी वापरतात तेच असत , कुणाला माहीत ?

आँ....काय बोलावं आता...सायंकाळ /रात्र चढत जाईल तसतसे पुढचे अतिउत्कट भाग येतील असं दिसतंय.

अनाहूत's picture

18 Feb 2016 - 7:22 am | अनाहूत

शृँगार आयुष्याचा एक भाग आहे . इथेही तसच आहे .

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 6:31 pm | टवाळ कार्टा

खि खि खि....और आंदो

अनाहूत's picture

18 Feb 2016 - 7:24 am | अनाहूत

लवकरच पुढील भाग घेऊन येईन

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2016 - 6:37 pm | मराठी कथालेखक

आता संस्कृतीरक्षक (त्यांच्या दुसर्‍या रुपात अर्थात डुआयडी) येतील आणि "पुन्हा असल्या कथा टाकू नका" म्हणून तुम्हाला समज देतील... त्या आधी पुढचे भाग होवून जावू द्या.

अनाहूत's picture

18 Feb 2016 - 7:37 am | अनाहूत

एक कथा धागा होता मनात , तो फक्त इथे मांडण्याचा प्रयत्न आहे . कोणत्याही गोष्टीवर सर्वांच एकमत होणं अशक्य आहे . मी फक्त एक बाजू सर्वांसमोर ठेवत आहे

शित्रेउमेश's picture

18 Feb 2016 - 8:28 am | शित्रेउमेश

येऊ द्या हो पुढचे भाग....
मस्त लिहिताय...

बॅटमॅन's picture

18 Feb 2016 - 12:04 pm | बॅटमॅन

येऊद्यात पुढचा भाग लौकर.

मराठी कथालेखक's picture

18 Feb 2016 - 1:48 pm | मराठी कथालेखक

शृँगारात इतका खंड ?
असा तुकड्यातुकड्यानी शृँगार करुन कसं चालेल ? :)

आधी डोक्यावरची चंद्रबिंदी काढण्यापासून सुरुवात करा पाहू. ;)

राहूल.'s picture

18 Feb 2016 - 10:44 pm | राहूल.

येऊ द्या

सतिश गावडे's picture

18 Feb 2016 - 10:56 pm | सतिश गावडे

धाग्याचे नाव कसे वाचायचे याची कुणी ऑडीओ क्लीप चढवेल का?

अनाहूत's picture

19 Feb 2016 - 6:13 pm | अनाहूत

भावना नक्कीच पोहोचल्या असतील .

अनाहूत's picture

19 Feb 2016 - 6:15 pm | अनाहूत