माणसाच्या मनाचही अस असत ना कधी कोणता विचार येईल आणि काय मानसिक स्थिती होईल सांगता येत नाही . तसच झाल होत आता . साधी दाढी करायची त्यातही दोन तीनदा कापून घेतल होत आता अशा परिस्थितीत मी न डगमगता मिशांकडे मोर्चा वळवला .
फारच वाढल्या आहेत म्हणून त्यांना थोड बारीक करण्याचा आणि आकार देण्याचा प्रयत्न होता पण हे साध कामही किचकट झाल होत . कधी इकडची मिशी बारीक कधी तिकडची . इकडं एक आकार तिकड भलताच फार प्रयत्न करूनही काही जमेना तेव्हा तीन पर्याय राहिले होते आहे तसच राहू देण व हस करून घेण . इतके दिवस अस्ताव्यस्त दाढी मिशा घेऊन फिरत होतो पण आता तो उपाय अशक्य होता . दुसरा उपाय ह्या परिस्थितीत सलूनमधे जाऊन ठीक करून घेणे पण तेही ठीक वाटेना तेव्हा शेवटचा पर्याय मिशा पुर्णपणे काढण . शेवटी वाईट वाटत असूनही हाच पर्याय निवडला . कधीही पूर्ण मिशी न काढलेल्या माणसाला पहिल्यांदाच मिशी काढल्यावर काय वाटत हे ज्यांना अनुभव आहे त्यांनाच माहीत . सो आता घरातून बाहेर पडल्याबरोबर काहीही न बोलता अनेकांच्या प्रतिक्रिया मिळू लागल्या . कशाचही फारस मनावर न घेता तसाच पाय-या उतरत होतो तेव्हढ्यात पाटलांनी हाक मारली .
" बायको माहेरी गेली त्याच सेलीब्रेशन का परत बॅचलर लाईफ एंजॉय करायला सुरूवात . " - पाटील
" अहो काय पाटील साहेब मस्करी करताय काय माझी ? " - मी
" अहो छे छे आम्ही कुठले साहेब ? साहेब तर तुम्ही . आणि रविवारी एवढ्या सकाळी सकाळी बनठनके कहा ? " - पाटील
म्हणजे आज रविवार आहे आणि मी ऑफिसला निघालो होतो , हे अतीच झाल होत . असो इथेच कळल ते बर झाल . आता सावरायला हव .
" नाही जरा काम होत म्हणून निघालो होतो . " - मी
" अस अस " करत पाटील गेले . आता तयार होऊन बाहेर तर पडलो पण जाणार कुठे ? असा विचार करत होतो तोपर्यंत
" अरे दादा थांब ना रविवारी सुद्धा कुठ निघाला आहेस इतक्या लवकर जरा थांब तर . "
' अरे ' ' दादा ' आपुलकी आणि जिव्हाळा वाटत होता या शब्दांमधे . आमच्या जीममधे पाहिल होत याला . नेहमी एकमेकांना ' भाई ' बोलणारे या लेहज्यात नविन होते . मलाही कुठ जायच होत ? म्हणून थांबलो .
" काय दादा आपण दोघ एकाच जीममधे जातो पण तू काय आम्ही यायच्या आधीच निघतो . बाकी बॉडी भारी बनवली आहेस . आम्हालाही काही टिप्स दे . "
माझ्यापेक्षा चांगली शरीरयष्टी असलेला मला त्याबद्दल विचारत होता . चांगल आहे , यात उत्तर अपेक्षित नसत तर दाखवलेली आत्मियता महत्त्वाची . बोलत बोलत त्याने मला गच्चीवर यायला सांगितल .
आम्ही तिकडे गेलो तर त्यांचा सगळा ग्रूप होता . गप्पा-गप्पांमधे गणेशोत्सव आता जवळ आला आहे आणि त्याची वर्गणी याचा विषय निघाला आणि मला जे आतापर्यंत झाडावर चढवल होत त्याच्या बिलासकट १००० चा आकडा आला . आधीही मला ५०० जास्त वाटायचे आणि आता एकदम डबल . पण हे निगोशिएबल होते पण मी त्या मूडमधे नव्हतो . मी आपला झाडावर बसल्या बसल्या खूष होत होतो . मानसिक स्थितीच अशी होती की कुणाच चांगल बोलण छान वाटत होत अगदी ते वरकरणी किंवा गरजेपुरत असल तरीही . मी तयार होतो पण त्यांचा काहीतरी घोळ सुरू होता .
एवढ सगळ केल्यावर त्यांना पावती पुस्तक सापडत नव्हत . ते शेवटी एक एक करून सगळेच खाली गेले तरी मी जाऊ नये यासाठी त्यांच्या ग्रूपमधल्या मुलींना त्यानी तिथ थांबायला सांगितल होत . यातल्या ब-याच मुली तशा आमच्याच सोसायटीतल्या पण कधी कुणाशी बोलण झाल नव्हत त्यामुळे काय बोलायच हा प्रश्नच होता पण त्यांच्यातल्या एकीने स्वतःहून सुरूवात केली .
" हाय , मी पूजा . तुम्ही नॉर्मल बोलता हो पण त्या तुमच्या वाईफ किती लाऊड आहेत अगदी भांडायला आल्यासारखे बोलतात . म्हणून तर आम्ही त्यांच्यापासून लांबच असतो . "
काय हे माझ्यासमोरच मंजूबद्दल कशाला बोलायला लागली ही ?
" सॉरी , तुम्हाला राग येईल पण खर तेच बोलले मी . "
आता याला काय बोलायच . सॉरी म्हणून स्वतःला बोलायच ते बोलून मोकळ व्हायच आणि दुस-याला काय बोलायची सोयही नाही ठेवायची .
" you look quite young , वाटत नाही you are married but your wife ... Whatsoever ...."
माझ्या चेह-यावरचे expressions पाहून तिने आवरत घेतल . तेव्हढ्यात तिलाही तिच्या घरून बोलावण आल आणि ती निघाली पण जाताना एका शाळकरी मुलीला तिथे सोडून गेली . खाली गेलेली मंडळी अजून आली नव्हती आणि त्यांना मला जाऊ द्यायच नव्हत म्हणून हा सगळा उपद्व्याप सुरू होता . बाकी मलाही इतक्या लवकर आवरून बाहेर पडल्यामुळे करण्यासारखही दुसर काही नव्हत म्हणून मीही थांबलो होतो .
" तुम्ही किती शांत आणि चांगल बोलता पण तुमची वाईफ आणि माझी आई जेव्हा गप्पा मारतात तेव्हा तिथ थांबायचीही भिती वाटते . त्या दोघींच छान जमत . तुम्ही आज इथे बोलत होता म्हणून समजल तुम्ही किती छान आहात ते . नाहीतर अस अनोळखी लोकांबरोबर बोलायची भितीच वाटते . तुम्हाला तर माहीतच आहे गर्ल्सला किती त्रास सहन करावा लागतो ते . बसमधे , मार्केटमधे अगदी कुठेही . बॉइजच तस नसत ना . "
कितीतरी वेळ ती continuously बोलत होती पण या शेवटच्या वाक्यामुळ मला बोलायला लागल .
" तुला कोणी सांगितल की हे बॉईजना face कराव लागत नाही ? "
" हो . बॉइजना कुठे असल काही face कराव लागत ? "
जखमेवरची खपली निघाली होती आणि जुन्या जखमेची ठसठस जाणवू लागली होती . पण आता पर्याय नव्हता या गोष्टी समजणे खरच गरजेच होत तिला . तिला झाली तर यातून मदतच होणार होती .
" It does not matter that you are a boy or girl , या गोष्टी कोणाच्याही बाबतीत होऊ शकतात ."
" कोणाच्या बाबतीत घडलय का अस ? "
" हो "
" कोण आहे ज्याला असे experience आले आहेत ? "
" मी स्वतः "
कोणी कोणाशी पहिल्या वेळी बोलताना असे विषय निघतील अस वाटल नव्हत पण आज तस झाल होत . स्वतःला लागलेल्या ठेचांच्या अनुभवातून दुस-याला सावरण्याचा प्रयत्न होता तो .
....क्रमशः
भाग १ http://www.misalpav.com/node/34867
भाग २ http://www.misalpav.com/node/34922
भाग ३ http://www.misalpav.com/node/34975
भाग ४ http://www.misalpav.com/node/35040
भाग ५ http://www.misalpav.com/node/35115
भाग ६ http://www.misalpav.com/node/35170
भाग ८ http://www.misalpav.com/node/35325
भाग ९ http://www.misalpav.com/node/35678
प्रतिक्रिया
15 Apr 2016 - 1:56 pm | विवेक ठाकूर
पण भाग त्रोटक असल्यानं अपेक्षा वाढण्याऐवजी निराशा होतेयं.
15 Apr 2016 - 2:32 pm | मराठी कथालेखक
ह्या अवांतराची कथेसाठी गरज होती का ?
अहो कथेचे आधीच खूप भाग झाले आहेत, अवांतर टाकून तुम्ही अजून भाग वाढवत आहात..एकूणात किती भागांचा विचार आहे ते तरी एकदा सांगून टाका.
15 Apr 2016 - 5:56 pm | आनन्दा
अवांतर काय आहे? एका मोठ्या विषयाला हात घातला आहे त्यांनी..
15 Apr 2016 - 5:57 pm | पैसा
वाचत आहे
15 Apr 2016 - 7:17 pm | अगोचर
वाचत आहे .. वेगवेगळ्या विषयांना संयमित हात घातला आहे ..
सातवा भाग हरवला आहे का ?
15 Apr 2016 - 8:21 pm | अनाहूत
भाग ७ संपादक मंडळ कृपेने उडवण्यात आला आहे .
15 Apr 2016 - 8:25 pm | अनाहूत
भाग ७ http://www.maayboli.com/node/55591
15 Apr 2016 - 8:27 pm | अनाहूत
सर्व प्रतिसादासाठी आभार .
16 Apr 2016 - 12:13 pm | सरदार
वाचत आहे