उरोज नितंब आणि तसलेच काही शब्द असलेल पुस्तक होत ते . शेजारी बसलेला मुलगा ते वाचत बसला होता . छे नुसत अस काही वाचुनही लोक एक्साईट होतात . नाही म्हणजे आपण एक्साईट व्हायला हव कि नको . काही हरकत नाही , पण आता आपले दिवस कर्तृत्व दाखवण्याचे , कृती वाचत बसण्याचे नाहीत . पण काय हरकत आहे अस वाचून स्फुरण चढणार असेल तर . हं किती दिवस झाले बायकोशी नीट बोलणही झाल नाही . चला आजचा दिवसच चांगला आहे आज चक्क बसायला जागा मिळाली आणि मग ते पुस्तक चांगलच स्फुरण चढल कि चला एकदा घरी पोहोचलो कि मग या उत्साहाचा खरा फायदा होईल . अशाच सुखस्वप्नात स्टेशन आल . चला आज कस मस्त वाटतय . तेच ऑफिस आज एकदम भारी वाटतय . त्याच उत्साहात कामाला सुरूवात केली . कायमस्वरुपी एक हास्य पसरून राहिल होत चेहऱ्यावर . बॉसच बोलावण आल . तशीच हास्य मुद्रा घेऊन बॉसच्या केबिनमधे प्रवेश केला . बॉसने कामातून नजर वर करून पाहिल . अरर चूक झाली . तिरडी बांधून ठेवली आहे आणि पुढच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे त्यात तुम्ही सुहास्य वदनाने गेला आहे तेव्हा लोक तुमच्याकडे जसे पाहतील तशी परिस्थिती निर्माण झाली . क्षणात सुतकी चेहरा करून त्या वातावरणात सामील झालो तेव्हा बॉस थोडा नॉर्मल झाला . पण मघाशी केलेल्या पापाचा बदला घेण्यासाठीच . दिवसभर कामाचा नुसता रतीब चालू होता . त्यात बॉसची कटकट वेगळीच . थोड लवकर निघायचा विचार होता पण बॉसने थोडा वेळ जास्तच थांबवल . शेवटी एकदाची सुटका झाली आणि स्टेशन गाठल .
जो थोडा उशीर झाला होता त्यामुळे सगळच बदलल होत , स्टेशनवर फारच गर्दी झाली होती . आता अवघड होत पुढच . मग कसतरी लोंबकळत पोहोचलो आपल्या इच्छित स्टेशनवर . अगदीच त्राण गेल्यासारख वाटत होत . शेवटी कसबस घर गाठल . तिथ पोहोचल्यावर आठवण आली अरे मोकळ्या हातानेच आलो आपण . निदान गजरा तरी आणायला हवा होता . जाऊदे आता परत जाऊन काही आणण्याची अजिबात इच्छा नाही . बायकोन दार उघडल . हं आज खरच सुंदर दिसते आहे . हे विचार क्षणभरच मेंदूत तरळले असतील तेवढयात तिन तोंड उघडल ते बंद न करण्याच्या इराद्यानेच . सगळ्या गोष्टींवर प्रेम हाच इलाज असतो . थोड रोमँटिक होत तिच तोंड स्वतःच्या तोंडाने बंद केल.
----------------------------------------------------------------
आत शिरायला अजिबात जागा नव्हती . तसाच थोडा जोर लावून एकदाचा आत शिरलो . आज काही पर्याय नसल्यामुळे सगळा प्रवास लटकतच करावा लागला . विचार विचार आणि नुसते विचार होते डोक्यात .
-----------------------------------------------------------------
तिला आज बहुतेक तोंड बंद तरी करायच नव्हत तिने स्वतःला वेगळ करत परत बोलायला सुरूवात केली . बराच वेळ बोलत होती ती . रात्री सगळ आवरल्यावर आली ती . झाल शेवटी एकदाच सगळ . काय होत ते प्रेम शारीरिक गरज का नुसत आपल रुटीन . करायला हव म्हणून करायच . पुरुष आणि स्त्री एकत्र असले अस करायला हव म्हणून की स्वतःच पुरुषत्व आणि स्त्रीत्व सिद्ध व्हाव म्हणून .
प्रतिक्रिया
11 Feb 2016 - 7:27 pm | उगा काहितरीच
__/\__
12 Feb 2016 - 1:00 pm | अनाहूत
--^--
14 Feb 2016 - 10:26 am | अनाहूत
Thanks
15 Feb 2016 - 11:22 am | पैसा
कथेचा विषय आणि मांडणी आवडली. जरा अजून लिहून खुलवली असती तर अजून चांगली झाली असती, हे माझे मत.
15 Feb 2016 - 4:52 pm | अनाहूत
बरोबर आहे तुमच . पण नविनच सुरूवात आहे आणि सेंसॉरचा problem नको म्हणून हात बराचसा आवरता घेतला आहे . पुढे नक्कीच गोष्ट खुलवण्याचा प्रयत्न करेन . प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
15 Feb 2016 - 5:32 pm | पैसा
खुलवणे म्हणजे कथेतील पात्रांच्या मनातले विचार, संवाद असे अजून हवे होते. की त्यातून त्याची मनस्थिती अधिक स्पष्ट लोकांपर्यंत पोचेल. इथे तुम्ही म्हणताय त्या अर्थाने सेन्सॉर नाही, पण कथा खुलवणे म्हणजे तेवढेच एक वाढवायचे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही!
15 Feb 2016 - 6:14 pm | अनाहूत
Ok , part 2 प्रकाशित केला आहे. I think काही प्रमाणात बदल आहे
15 Feb 2016 - 6:22 pm | मराठी कथालेखक
??
15 Feb 2016 - 7:11 pm | जिन्क्स
बरंच झालं अजुन खुलवली नाही ते. नाहीतर ते स्त्री-पुरुषांचे ऑरगॅजम, ब्रेस्ट कॅन्सर इकडे ही आले असते.
ता.क - संदर्भ हवे अस्ल्यास गेल्या आठव्ड्यातले मिपा वर प्रकाशित झालेले कोणतेही धागे उघडावेत आणि प्रतिक्रिया चाळाव्यात (खासकरुन पिरा आणि विठांचे)
15 Feb 2016 - 11:25 pm | बोका-ए-आझम
काय problem आहे? न वाचण्याचा पर्याय आहेच तुमच्याकडे! आॅरगॅझम एकवेळ सोडून देऊ पण ब्रेस्ट कॅन्सरवर चर्चा झाली तर काय problem आहे? रच्याकने तो पुरुषांनाही होऊ शकतो बरं का!
16 Feb 2016 - 11:54 am | जिन्क्स
ह्या प्रशनांवर सुद्रुढ (हेल्दी) चर्चा झाली तर चांगलच आहे. पण इतर धाग्यांवर चाललेली चर्चा पाहता ती चर्चा कमी आणि एकमेकांची उणीधुणी काढण्याची स्पर्धा जास्त वाटते.
15 Feb 2016 - 5:59 pm | मराठी कथालेखक
??
15 Feb 2016 - 6:15 pm | अनाहूत
हो. क्रमशः आहे. भाग २ प्रकाशित केला आहे.
15 Feb 2016 - 6:20 pm | अनाहूत
भाग २ : http://www.misalpav.com/node/34922
15 Feb 2016 - 6:58 pm | होबासराव
काहि दिवसांपुर्वि खफ वर असेच गमतित लिहिले होते कि पुरुषांकरता एक वेगळे सदर असावे का ? अनाहुत म्हणुन ? कारण एका सन्माननिय मिपा कराला अनाहिता जॉइन करण्याचि ऑफर मिळालि होति :))