हिवाळ्यातला लदाख - पिटुक गोनपा (स्पिटुक गोनपा) (भाग ९)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
6 Apr 2016 - 12:47 pm

हिवाळ्यातला लदाख - पिटुक गोनपा (स्पिटुक गोनपा) (भाग ९)

मागील पानावरून ............
बलाल ओपी हे एक सैनिकांचा अड्डा आहे. त्याशिवाय जनरल जोरावर सिंह याचा लद्दाख अभियान याविषयी सुद्धा माहिती आहे. कश्मीरचा राजा गुलाब सिंह यांच्या सेने मध्ये जोरावर सिंह होते. सन १८३५ च्या सुरुवातीला जोरावर सिंह यांनी पहिल लद्दाखी अभियानाला सुरुवात केली. हे अभियान श्रीनगर, कारगिल च्या रस्त्याकरिता बनवलं होतं. जोरावर सिहानी १८३७ आणि १८३९ मध्ये सुद्धा अभियान चालवलं. त्यामुळेच लदाख हा भारताचा भाग झाला. १९६२ मध्ये जेव्हा चीन नि आक्रमण केलं होतं. तेव्हा चीनी सैनिक गुवाहाटी पर्यंत येउन पोहोचले होते. पण लदाख मध्ये असं नाही झालं. तरी पण चीन नि भारताच्या खूप मोठ्या भागावरती कब्जा केला. संग्रहालयातून बाहेर पडून पिटुक साठी निघालो.
..........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२४ जानेवारी २०१३

युद्ध संग्रहालय पासून पिटुक गोनपा दोन किलोमीटरवर कारगिल रस्त्यावर आहे. मी चालतच तेथे गेलो. पिटुकच्या जवळ एका टेकडी वरती एक छोटंसं मैदान आहे. मी तिकडे गेलो. सगळीकडे बर्फ पडला होता. वरती जाणार्या पायर्या वरती सुद्धा बर्फ पडला होता. मी वरच्या पायऱ्यावरती जवळ जवळ एक तास बसून राहिलो. उन पडले होते. त्यामुळे मस्त वाटत होते. सोबत मनुके आणले होते. तेच बसून खात होतो. समोर खाली लेह चे विमान तळ दिसत होते.

थोडा वेळ थांबून पिटुक गोनपाच्या दिशेने निघालो. कोणीच दिसलं नाही. हा गोणपा गेलुक्पा सम्प्रदायच्या संबंदित आहे आणि त्याची स्थापना अकराव्या शतकात झाली होती. गोणपा खूप मोठा आहे आणि आत मध्ये मुख्य मूर्ती बुद्धाची आहे. मूर्ती ह्या वेळेस एका खोली मध्ये बंद होती. खोलीला बाहेरून कुलूप होते. खोलीच्या बाहेर सोयाबीन तेलाच्या बाटल्या होत्या. गोणपा मध्ये सोयाबीन चं तेल चढवलं जातं.
या टेकडीच्या एकदम वरच्या ठिकाणी सुद्धा काही तरी बनवलेलं आहे. बहुतेक काली मातेचं मंदिर असेल. मी त्या दिशेने गेलो. इथे पण सोयाबीन बाटल्यांचा संग्रह होता. आत मध्ये कोल्ड ड्रिंक पासून इग्लिश दारू पर्यंत बाटल्या पडल्या होत्या. दारू शक्यतो काली माते साठी असेल.

काली मातेच्या आत मध्ये फोटो काढण्यासाठी मज्जाव होता. तिथे एक पुजारी दिसला. त्याने मला पाहिल्यावर चार चीबोनी चे दाने दिले आणि वेगळंच तोंड बनवून बघू लागला. त्याचा इशारा मला समझला. त्यामुळे एक रुपया खिशातून काढायच्या नादात हाता मध्ये पाच रुपये आले. मग काय काली मातेच्या मंदिरा मध्ये पाच रुपये चढवावे लागले.

तेथून परत मुख्य रस्त्यावरती आलो. तेथून टैक्सी पडून दहा रुपयात मेन चौकात आलो. नंतर रस्ता पार करून चोगलमसर ला जाणारी टैक्सी पकडली आणि जेल पर्यंत यायला अजून पंधरा रुपये लागले. दिल्ली वरून निघताना एक मुंबई वरून फोन आला होता कि, येताना सिन्धु नदीचं पाणी घेऊन ये म्हणून. माज्याकडे अजून खूप वेळ होता. बाटली घेतली आणि सिंधू घाटावर पोहोचलो. चार दिवस झाले लेह फिरतोय. तेच तेच नजारे बघून आता वैताग आला होता. कधी घरी जातोय असे झाले होते. उद्या अकरा वाजता फ्लाइट आहे. त्यामुळे फक्त आजची रात्र लेह मध्ये काढायची होती.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्षणचित्रे :

समोर तेकडिवर पिटुक गोनपा आहे


लेह विमानतळ


पिटुक गोनपा प्रवेश दरवाजा


गोनपाच्या आत मधे गेल्यावर


या खोलि च्या आत मधे बुद्ध मुर्ति आहे


काली माता मन्दिर पासुन दिसनारा पिटुक गोनपा

--------------------------------------------------------------(क्रमशः)-------------------------------------------------------------

मागील भागात जाण्यासाठी...
.....पुढील भागात जाण्यासाठी

प्रतिक्रिया

वर्णन छान आहे. पुभाप्र.

यशोधरा's picture

6 Apr 2016 - 1:59 pm | यशोधरा

सुरेख फोटो.

शंतनु _०३१'s picture

6 Apr 2016 - 5:39 pm | शंतनु _०३१

एप्रिलच्या उष्म्यात हा लेख (संपूर्ण लेखमाला) नेत्रसुखद नी शितल आहे. पु ले शुभेच्छा

अजया's picture

6 Apr 2016 - 5:56 pm | अजया

अप्रतिम फोटो.
पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2016 - 10:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर फोटो ! पुभाप्र.

दिपक.कुवेत's picture

7 Apr 2016 - 10:50 am | दिपक.कुवेत

हे बर्फाचे फोटो पाहून वेड लागतय. आता तर एकदा जायलाच्च हवय.....

नीलमोहर's picture

7 Apr 2016 - 10:55 am | नीलमोहर

फोटो पाहून शांत, प्रसन्न वाटलं.

पैसा's picture

12 Apr 2016 - 7:54 pm | पैसा

मस्त!