हिवाळ्यातला लदाख - लेह पैलेस आणि शान्ति स्तूप (भाग ६)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
28 Mar 2016 - 10:07 am

1
.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिवाळ्यातला लदाख - लेह पैलेस आणि शान्ति स्तूप (भाग ६)

मागील पानावरून ............
मी मोलभाव करून ३५०० ची चादर २००० ला ठरवली. ती चादर पैक झाल्यावर मी पैसे द्यायला लागलो तितक्यात एक लद्दाखी बाई तिथे आली. तिने १६०० वाली चादर चा भाव विचारला. दुकानदार म्हणाला ४८० रुपये. ती बाई खूप जास्त भाव आहे असं म्हणत तिथून निघून गेली. मग काय माझं डोकच सटकला. जर त्या बाईन तिथे थांबून मोलभाव केला असता तर त्या दुकानदाराने ती चादर २०० ला पण दिली असती.
मी ती पैक केलेली चादर नाही घेतली..........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२२ जानेवारी २०१३

२१ जानेवारीला पूर्ण दिवस आराम केला. दुसर्या दिवशी म्हणजे २२ जानेवारीला लेह फिरण्यासाठी बाहेर पडलो. माझे परतीचे विमानाचे तिकीट २५ तारखेला आहे आणि इतक्या दिवसा पर्यंत माझ्याकडे काहीच काम नाही. म्हटलं चला राहिलेल्या तीन दिवसात लेह आणि आजूबाजूचा परिसर पाहून घेऊया.

सगळ्यात पहिल्यांदा गेलो ते लेह पैलेस पाहायला. नऊ मजल्याचा हा महाल तिब्बत मधील पोटाला राजमहालाच्या धर्तीवर आधारित बनवलेला आहे. नामग्याल सम्प्रदायचे संस्थापक सेवांग नामग्याल यांनी १५३३ मध्ये याचे बांधकाम सुरु केले आणि त्यांचा पुतण्या सेंगे नामग्याल यांनी ते पूर्ण केले. यामध्ये जास्त करून मातीचा उपयोग केलेला आहे. लद्दाख मध्ये सर्वत्रच मातीचा उपयोग केला जातो. पैलेस बंद होतं. मुख्य दरवाजा वरती कुलूप लावलेलं होतं. याच्या समोर सेमो नावाच्या टेकडी वरती एक गोनपा पण दिसत होता. गोनपा पर्यंत जाण्यासाठी एक कच्ची पायवाट बनवलेली होती. मग मी त्या पायवाटेने चालू लागलो. चढाई जास्त नव्हती. गोनपा वरून लेहचा मस्त नजारा दिसत होता. पण सुर्य डोळ्यासमोर येत होता. जर हिच वेळ संध्याकाळची असती तर अजून सुंदर दृश्य पाहायला मिळाले असते. फोटो पण चांगले आले असते.

मी गोनपा च्या आत मध्ये गेलोच नाही. बाहेरूनच काही फोटो काढले आणि तिथून निघालो. लद्दाख मध्ये बहुतेक ठिकाणी तीन ते चार इंच बर्फ पडला होता. मी आता बराच दिवसा पासून बर्फावर्ती चाललो होतो. त्यामुळे कसली भीती वाटत नव्हती. अजून एक रस्ता गोणपा पर्यंत येउन संपत होता. नंतर समझले कि, हा रस्ता तर खारदुंगला वरून इकडे येत आहे.

खारदुंग ला- म्हणजे जगातील सर्वात उंचावरील मोटारसायकलीचा रस्ता - ५६०० मीटर पेक्षा पण जास्त. येथील ऊंचाई इंग्रजांच्या काळात मोजली गेली होती. आता अत्याधुनिक जीपीएस यन्त्र आलेले आहेत. त्यामुळे माहित पडले कि,खारदुंगला ची उंची हि ५३०० मीटरच्या आसपास आहे. त्यामुळे हा जगातील सर्वात उंच रस्ता नाहीय. तिब्बत आणि चिली मध्ये पण या पेक्षा जास्त उंचावर रस्ते आहेत. आता वेळे नुसार भारताला पण हे रेकॉर्ड अपडेट करावे लागेल.

ज्या दिशेने गोनपा पर्यंत चढलो होतो. त्याच्या उलट दिशेने खाली उतरलो. हि पायवाट उतार दिशेला असल्याने इकडे पण बर्फ जास्त होता. लवकर खाली उतरून मुख्य रस्त्याला लागलो. वरती टेकडी वरती अजून एक गोनपा दिसत होता. ते शान्ति स्तूप आहे. मी त्याच दिशेने चालू लागलो. रस्त्यात ठीक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे भयंकर घसरडे झाले होते. रस्त्यामध्ये दोन तीन पाण्याचे तलाव दिसले. ते पण गोठले होते. एक तलाव वरती मुले आइस हॉकी खेळत होती.

जेव्हा रस्त्यामध्ये बर्फ असलेला उतार यायचा तेव्हा घसरण्याची खूप भीती वाटायची. शान्ति स्तूप चे निर्माण जपानी लोकांनी केले आहे. जापान मध्ये बौद्ध धर्म आहे आणि भारत हि बुद्ध भूमि असल्याने ते भारताला खूप पवित्र स्थळ मानतात. भारत आणि नेपाल मध्ये असेच किती तरी शान्ति स्तूप त्यांनी बनवले आहे. असाच एक शान्ति स्तूप मी नेपाल मधील पोखरा या ठिकाणी बघितला होता.

स्तूप पर्यंत जाण्यासाठी खूप चांगला रस्ता बनवलेला आहे. पण पायांनी चालत जाताना साडे पाचशे पायऱ्या चढाव्या लागतात. स्तूप हे ४००० मीटर पेक्षा जास्त उंचीवर आहे. मी या आधी ५ वेळा ४००० मीटर पेक्षा जास्त उंची वर चढलो आहे. या आधी अमरनाथ, श्रीखण्ड महादेव, तपोवन आणि रूपकुण्ड ची यात्रा केली आहे. इथून सुद्धा लेह आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतो. सुर्य पश्चिमेकडे झुकला होता. उत्तर दिशेला पांढरी कपडे परिधान केलेले डोंगर दिसत होते. अचानक पणे लक्ष्यात आले कि तिथे तर खारदुंगला आहे. मी गूगल मैप आणि गूगल अर्थ वरती सारखे नकाशे बघत असतो. त्यामुळे मला पक्कं माहित होतं कि तिथेच खारदुंग ला आहे. नित लक्ष्य देऊन पाहिलं तर वाकडे तिकडे रस्ते दिसत होते. त्यावरून मी अंदाज बांधला कि, खारदुंग ला उघडा आहे. नंतर माझा अंदाज बरोबर निघाला.

जेव्ह शान्ति स्तूप वरून उतरून खाली लेह च्या मुख्य बाजारापर्यंत आलो तेव्हा सहा वाजले होते. अंधार पडला होता. आज मोमो चे दुकान मिळाले. संघ्याकाळी साडे सहा ला जेल मध्ये परत आलो. तेव्हा खूप दमलो होतो.

एक गोष्ट मनात सारखी टोचायला लागली कि, परवापासून इथे खालीच बसलो आहे. काल तर दिवस भर जेल च्या बाहेर पडलोच नाही. जेल मधून खारदुंग ला स्पष्टपणे दिसतो. मग का नाही खारदुंगला ला जाउन यावं? मी जर काल परमिट घेतलं असतं तर आज खारदुंगला पार करून नुब्रा घाटी ला गेलो असतो दोन दिवसा साठी. जिथे दोन कूबडाचे ऊंट पाहायला मिळाले असते. उद्या २३ तारीख आहे. उद्या दुपार पर्यंट परमिट मिळेल. २४ ला फक्त खारदुंगला पर्यंतच जाऊ शकतो. उद्या खारदुंगला ला जायचं घेणार आणि माहिती करून घेणार कि सकाळी किती वाजता तिकडे बस जाते.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्षणचित्रे :

लेह पैलेस


मुख्य दरवाजा वरती कुलूप लावलेलं होतं


समोर केसर सेमो गोनपा पण दिसत होता.


केसर सेमो वरून लेहचा मस्त नजारा दिसत होता.


खारदुंगला रोड वर धावनारा ट्रक


ज्या दिशेने गोनपा पर्यंत चढलो होतो. त्याच्या उलट दिशेने खाली उतरलो. हि पायवाट उतार दिशेला असल्याने इकडे पण बर्फ जास्त होता


दाव्या बाजुला केसल सेमो दिस्तोय. तेथुनच मि आलोय


शान्ति स्तूप


वर तिथेच खारदुंग-ला आहे. निट लक्ष्य देऊन पाहिलं तर तिकडे जानारे वाकडे तिकडे रस्ते दिसत आहेत


शान्ति स्तूप वरुन दिसनारा लेह पैलेस आनि केसल सेमो

--------------------------------------------------------------(क्रमशः)-------------------------------------------------------------

मागील भागात जाण्यासाठी...
.....पुढील भागात जाण्यासाठी

प्रतिक्रिया

बबलु's picture

28 Mar 2016 - 10:27 am | बबलु

अप्रतिम !!!!

एस's picture

28 Mar 2016 - 12:42 pm | एस

वाचतोय.

राजकुमार१२३४५६'s picture

30 Mar 2016 - 2:08 pm | राजकुमार१२३४५६

धन्यवाद