हिवाळ्यातला लदाख - जांस्कर घाटीमध्ये बर्फवृष्टी (भाग ३)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
17 Mar 2016 - 10:43 pm

1
.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिवाळ्यातला लदाख - जांस्कर घाटीमध्ये बर्फवृष्टी (भाग ३)

मागील पानावरून ............
निम्मू मध्ये सिन्धु आणि जांस्कर या नद्यांचा संगम आहे. आम्हाला आता श्रीनगर रोड सोडून जांस्कर किनार्यावरून जाणारा रस्ता पकडायचा होता. आम्ही त्या रस्त्याने निघालो. तिथून अजून सुद्धा चिलिंग २८ किलोमीटर लांब आहे. जिथे मला आज थांबायचे होते. उद्या चादर ट्रेक सुरु करायचा आहे. ह्यावेळेस जास्त हिस्स्या मध्ये सिंधू नदी गोठलेली होती. सिंधू नदी रुंदी ला मोठी असल्याने पूर्ण पणे गोठत नाही. त्याच्या उलट जांस्कर नदी रुंदीला छोटी असल्याने पूर्ण पणे गोठली जाते........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१७ जानेवारी २०१३

साडे तीन वाजता चिलिंग मध्ये पोहोचलो. इथे मला राहण्यासाठी खोली शोधायची होती. त्या कामासाठी मला ड्राइवर इब्राहिम ने मोलाची मदत केली. इथे एक पण हॉटेल नाही. सर्वत्र होमस्टे आहे. घरातल्याच माणसाबरोबर पाव्हणे बनून राहावे लागते. अश्याच एका घरी गेल्यावर लगेच घराच्या मालकिणीन शेगडी पेटवून आणून ठेवली. आता इब्राहिम ला सोडायची वेळ आली होती. मी विचारले कि, किती पैसे झाले. लेह वरून निघाल्यावर मोलभाव करायचे राहून गेले होते. आम्ही तसेच निघालो होतो. तो म्हणाला कि, चोवीसशे रुपये. मी एक हजार रुपये द्यायला तयार झालो होतो. आणि तसा पाहिला गेलं तर लेह पासून चिलिंग फक्त सत्तर किलोमीटर तर आहे. शेवटी ना-हो करता मी बाराशे द्यायला तयार झालो. तो सोळाशे वर आला. तो म्हणाला कि बाराशे मध्ये माझं खूप नुकसान होईल. मी पण तेच म्हणालो कि, जर तुला बाराशेच्या वर दिले तर माझं पण खूप नुकसान होईल.
मग काय तो खूप रागावला आणि मला म्हणाला कि, "हे बाराशे रुपये पण नका देऊ. तुमच्या जवळच ठेवा." इथले सगळ्या लोकांची तसेच काश्मीर मध्ये पण लोकांची बोलण्याची हीच लकब आहे.
मी त्याला सरळ सांगितले बाराशेच्या वर एक रुपया पण देणार नाही. शेवटी तो बाराशे घेऊन निघून गेला.

होमस्टे म्हणजे घरातला पाव्हनाच. बादली भरून वाळलेली लाकडे आली. शेगडी पेटवलेलीच होती. मग मी त्यात लाकडं टाकत राहिलो. अधून मधून चहा पण यायचा. खोली मध्ये मोठ्या गाद्या आधीच अंथरल्या होत्या. अंगावरती घ्यायला एक ब्लंकेत मिळालं. काल जेव्हा विमानातून उतरलो तेव्हा तापमान माइनस दहा डिग्री होतं आता नक्कीच माइनस वीस तरी असेल.

रात्री जेवणामध्ये लाल घेवडा (राजमा) आणि भात होता. घरामध्ये म्हातारा म्हातारी, त्यांच्या दोन मुली आणि दोन नाती होत्या. रात्री त्यांच्या पाशी बसून खूप गप्पा मारायला वेळ मिळाला. बौद्ध कुटुंब होतं. त्यामुळे त्यांना पूजा पाठ करायला खूप वेळ लागतो. म्हातारा मंत्र असलेलं चक्र फिरवण्यात आणि भजन म्हणण्यात व्यस्तं होता. म्हातारी आणि मुलगी लोकरीचे धागे विणत होती. लहान मुलं अभ्यास करत होती. शाळेतला होम वर्क पूर्ण करत होती. त्यांना तिकडे हिवाळ्यात सुट्या असतात. दुसरी मुलगी जेवण बनवत होती. मग त्यांना शुभ रात्री म्हणून झोपी गेलो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१८ जानेवारी २०१३
आज मला चादर ट्रेक ची सुरुवात करायची होती. चिलिंग गांवा पासून आठ किलोमीटर पुढे रस्ता चांगला बनलेला आहे. त्यानंतर खरा ट्रेक सुरु होतो. रात्रीच घरातल्या माणसाना मी बोललो होतो कि, या ट्रेक साठी मला एखादा माहितीगार माणूस पाहिजे. जो मला या ट्रेक साठी साथ देईल. जेवढे पैसे होतील ते मी द्यायला तयार आहे. मालकिणीन सांगितलं कि सकाळी बघू.

अंथरुणा जवळच एक मोठी खिडकी होती. त्यावर पडदा लावलेला होता. सकाळी आठ वाजता उठून पडदा उघडून बाहेर पाहिले तर माझे डोळेच चक्रावले. बाहेर सगळं पांढर होतं. रात्री बर्फवृष्टी झाली होती. अजून सुद्धा बर्फ पडत होता. जसं पायांना कळाल कि बाहेर बर्फ पडतोय तसा त्यांनी स्वताला चादरीच्या आत मध्ये ओढून घेतलं.

हि बर्फवृष्टी अचानक आली होती. कोणाला कल्पना पण नव्हती कि आज बर्फ वृष्टी होईल म्हणून. काळ जेव्हा लेह मध्ये होतो तेव्हा वडिलांनी फोन करून सांगितलं होतं कि, मेरठ मध्ये खूप गारा पडल्यात. त्याचाच परिणाम म्हणून कि काय इथे पण खूप हवामानात बदल झाला होता.

हिवाळ्यामध्ये उत्तर भारतात थंड वारे वाहतात. ते युरोप व साइबेरिया कडून येतात. त्यामुळे खूप थंडी पडते. हे वारे भूमध्य समुद्रावरून येतात. त्यामुळे त्याच्यात दमटपणा पण असतो. जसे ते वारे अफगानिस्तान पार करून पाकिस्तान व पंजाब मध्ये घुसतात. तेव्हा हिमालयामुळे ते दोन भागामध्ये विभागले जातात. एक भाग पंजाब, हरियाणा, यूपी च्या मैदानावरून दक्षिण पूर्वे कडे जातात. त्यामुळे आपल्या मार्गात कधी कधी गारा पण पाडतात.
दूसरा भाग हे वारे हिमालयात घुसतात. कश्मीर, डलहौजी, मनाली, शिमला व उत्तराखण्ड मध्ये त्यामुळेच बर्फवृष्टी होते. लद्दाख हे हिमालयाच्या पड्याळ आहे. जास्तकरून हे वारे हिमालय पार करत नाहीत. नाहीत. त्यामुळेच लद्दाख भाग हा वर्षभर या वाऱ्यापासून सुरक्षित राहतो. तरी पण काही राक्षसी खोडकर वारे सहा सहा हजार मीटर चे हिमालय पार करून लदाख मध्ये पोहोचतात. काल मेरठ मध्ये गारा आणि आज इथे बर्फ त्याचाच तर परिणाम आहे.

आतापर्यंत चार इंचा पर्यंत बर्फवृष्टी झाली होती. अधिक थंडी असल्याने अजून एक महिन्यापर्यंत तरी हा बर्फ पाघळणार नाही. या बर्फवृष्टीमुळे, मला कुणीच पार्टनर मिळाला नाही. आता मला एकट्यालाच चादर ट्रेक वरती जावे लागणार नाहीतर परत लेहला जावे लागणार.

मला जङला (Zangla) पर्यंत चादर ट्रेक करायची इच्छा होती. तसा पाहिला गेलं तर चादर ट्रेक हा १०० किलोमीटर पेक्षा जास्त आहे. ट्रेकर हे जांस्कर चे मुख्यालय पदुम पर्यंत जातात. काही लोक त्याच्या निम्मा म्हणजे नेरक किंवा लिङशेड (Lingshed) पर्यंत जातात. नेरक हे इथून ४० किलोमीटर वर आहे. नेरक आणि लिङशेड हे जांस्कर नदीच्या किनार्यावरती समोर समोर असलेले गावे आहेत. नेरक पासून वीस किलोमीटर पुढे जङला (Zangla) आहे.

मला बर्फावरून चालायला खूप भीती वाटते. याआधी पण मी ट्रेक केले आहेत. पण जेव्हा बर्फावरून चालायची वेळ आली तेव्हा मी लांबून वेढा मारून जायचो. कधी कधी तेथून माघारी पण आलेलो आहे. कधी कधी तर रडत रडतच बर्फावरून चाललेलो आहे. खर म्हणजे बर्फावरून चालायला माझे पाय तयारच होत नाहीत.

नदीच्या वरून कडेने चिलिंग ते नेरक आणि पुढे जङला पर्यंत जायला पायवाट आहे. याच पाय वाटे वरून जायची माझी योजना होती. चादर ट्रेक उद्या करणार होतो. इतक्या बर्फात चादर ट्रेक करणं अश्यकच होतं. बर्फवृष्टीमुळे ती पायवाट पण आता खतरनाक झाली असेल. त्यामुळे मन तयार होत नव्हतं.

घरातील मुलगी अङमो (Angmo) हिने माझ्या सोबत दोन ते तीन तास फिरण्याची तयारी दाखवली. आमच्या बरोबर मुले पण निघाली. मग आम्ही घरातून बाहेर पडलो. म्हटलं चला निदान फिरून तर येऊया. थोडे लांब गेल्यावर मुलेपण माघारी फिरली आणि मी आणि अङमो दोघेच पुढे निघून गेलो. गावातून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर आलो तर रस्त्यावर पूर्ण पणे बर्फ पडला होता. रस्ताच दिसत नव्हता. एक गाडी बर्फावरून गेली होती तिचे चाकाचे निशाण बर्फावर दिसत होते. इथून गाडी गेली म्हणजे नक्कीच ती पुढे तिलत सुम्डो पर्यंत गेली असणार. तिलत सुम्डो हा या रस्त्यावरचा शेवटचा बिंदू आहे. या अश्या हवामानात इथे चादर ट्रेक खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे ट्रेकर लेह वरून गाडीने येतात आणि दोन किलोमीटर नदीवरून चालत तिलत सुमडो नावाच्या ठिकाणी तंबू लावून तेथे आराम करतात. मग दुसर्या दिवशी पुढची योजना आखतात.

मी बर्फवृष्टी या आधी पण पहिली होती पण खूप थोडा वेळ. बर्फ पडून चादर बनणे तर लांबच बर्फ पडल्यावर थोडावेळाने बर्फाचे निशाण पण राहत नसायचे. जुन्या पडलेल्या बर्फावर्ती खूप चाललो आहे पण नव्या ताज्या बर्फावर चालण्याची हि पहिलीच वेळ होती. पक्क्या रस्त्यावरती पडलेल्या बर्फावर चालायला काही वाटले नाही.

चार किलोमीटर पुढे गेल्यावर एक छोटी वस्ती लागली. त्याला काठमाण्डू म्हणतात. इथे कोणतेच गाव नाही. निम्मू ते पदुम वरून दारचा पर्यंत रस्ता बनवण्याचे काम चालू आहे. थोडक्यात प्रोजेक्ट चालू आहे. दारचा लेह-मनाली रस्त्यावरती आहे. आणि ह्या प्रोजेक्ट चे मुख्य केन्द्र इथे काठमाण्डू मध्ये आहे. काही ट्रक आणि मशीनि इथे आहेत. कामगारांना राहण्यासाठी छोटे छोटे तंबू पण बनवलेले आहेत. तसेच या काठमाण्डू च अजून एक महत्व आहे. हे ठिकाण म्हणजे मारखा नदी आणि जांस्कर नदी चा संगम आहे. मारखा घाटी आपल्या सौदर्यसाठी खूप प्रसिद्ध आहे. मारखा घाटी मध्ये जितकी पण गावे आहेत त्यांच्या साठी बाहेरच्या जगासोबत संपर्क ठेवण्यासाठी हेच पहिले ठिकाण आहे. जांस्कर नदीच्या त्या दिशेला जाण्यासाठी पूल तर नाही पण तारगाडी आहे. पुलाचे काम चालू आहे. लेह ला जाण्यासाठी आठवड्यातून फक्त दोन दिवसच गाडी असते. रविवार आणि गुरुवार.

काठमाण्डू पासून पुढे एक किलोमीटरवर अशीच एक वस्ती आहे. तिथे जास्त करून मिलिटरी वाले आणि सीमा सडक संघटनेचे लोक राहतात. आम्हाला पाहून पाच सहा कुत्रे भुकत भुकत धावत आले. त्यांना पाहून अङमो खूप घाबरली. बर्फाचे गोळे बनवून आम्ही त्यांना फेकून मारले. त्यामुळे ते आमच्यापासून दूरच भुकत राहिले.

इथून जांस्कर नदी पूर्ण पणे गोठलेली दिसते. इथून तीन किलोमीटर पुढे ते ठिकाण दिसले जिथे हा रस्ता संपतो. आम्हाला तिथे एक गाडीपण उभी असलेली दिसली. जिचे चाकाचे निशाण आम्ही मागेच पाहिले होते. तिथे आज एक ग्रुप ट्रेकिंग ची सुरुवात करणार होता. तसेच दुसर्या ग्रुपचा आज शेवटचा दिवस होता. सुरुवात करणारी लोक आज लेह वरून आली होती तर ट्रेक संपलेली लोक त्याच गाडीने परत लेह ला जाणार होती. इथून जवळ जवळ दोन किलोमीटर पुढे तिलत सुमडो आहे. तिथे कैम्पिंग ग्राउंड आणि एक गुफा आहे. हे दो किलोमीटर जमलेल्या नदीवर सराव करण्यासाठी असतात. इथे सुमडो दोन नद्यांच्या संगमाला म्हणतात. पण साधारण बोलीभाषेत या ठिकाणाला फक्त तिलत म्हणतात.

चिलिंग पासून तिलत पर्यंत अंतर आठ किलोमीटर आहे. आम्हाला अडीच तास लागले इथपर्यंत यायला. शेवटचे दोन किलोमीटर पार करायला तर पाय खूप दुखायला लागले. पायाच्या टाचे मध्ये खूप वेदना होत होत्या.

पाच दहा मिनिट थांबून मी आणि अङमो माघारी फिरलो. कुत्री परत भूकायला लागली. काठमाण्डू मध्ये एका नेपाली दुकानामध्ये चहा आणि मैगी खाल्ली. मी नाही म्हटले तरी चहा आणि मैगी चे सत्तर रुपये अङमो नि दिले. संध्याकाळी पाच वाजता परत चिलिंग मध्ये पोहोचलो. दोन तासासाठी निघालो होतो. पण पाच तास लागले. परत येताना पायांनी खूप त्रास दिला. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना खूप त्रास होत होता. चिलिंग मध्ये आल्यावर आराम मिळाला.

सकाळी खायला चपाती मिळाली होती. पण भाजी नाही. त्यासोबत खायला लोणी आणि जैम चे डब्बे होते. चपाती वरती लोणी आणि जैम लावून रोल बनवून खायला मजा आली. चहात पण लोणी टाकून खाल्ल. चहा मस्त लागला.

आता संध्याकाळी जेवायला दाल आणि भात मिळाला. सोबत आमलेट पण. एका ताटामध्ये भात त्याच्यावरती डाळ त्यावरती कोबीची भाजी आणि त्यावर आमलेट. मी आमलेट खातो त्यामुळे काही प्रोब्लेम नव्हता. त्यांनी मला न विचारताच आमलेट केलं होतं. त्यांना त्यांची चूक दाखवून दिली कि, मैदानी प्रदेशात राहणारे सर्वच लोक आमलेट खात नाहीत. आता मी खातोय म्हणून ठीक आहे पण जर मी खात नसतो तर हे ताट परत मागे सरकवले असते आणि एवढे अन्न वाया गेले असते. त्यामुळे करायच्या आधी विचारायला पाहिजे होतं.

आता माझ्या शरीराच्या सर्व अंगाचं एकमेकान बरोबर बोलणे सुरु झाले कि,चादर ट्रेक करायचा कि नाही. या ट्रेक साठी पायालाच खूप प्रोब्लेम होता. अजून सुद्धा गोठलेल्या नदीवरून चालायला तयार होत नव्हते. आज पण खूप दमलो होतो. दुखत पण होते. मेंदू नि पण आदेश दिला कि, तू आज १६ किलोमीटर चालला आहेस. आता सवय झालीय तुला. उद्या चादर वरती चालावेच लागणार. सकाळ पर्यंत दुखायचे थांबेल. पायाचं म्हणण असं होतं कि, रस्त्यावर पडलेल्या बर्फावरून चालणे आणि गोठलेल्या नदीच्या पात्रावरून चालणे यात खूप फरक आहे. त्या बर्फाच्या खालून पण नदी वाहत आहे. काय माहित कुठे कमकुवत चादर असेल आणि ती तुटून आत पडायची भीती होती.

शेवटी सर्व निर्णय हा अंतरआत्म्यावर सोडला.
निर्णय असा आला कि, माझं ह्या ट्रेकिंगचं उदिष्ठ, नाही पायवाटेवरून चालायचं होतं, ना नदी वरून चालायचं. आता पायवाट पण बंद झाली आहे बर्फवृष्टी मुळे, तर चादर ट्रेक पण बंद करावा. भटकंती हि काय कोणती शर्यत नाही कि जो जीता वही सिकन्दर. परत आयुष्यात असे कितीतरी चादर ट्रेक येतील. ह्यावेळेस तर चादर च्या तोंडाजवळ येउन गेलोय. जानेवारी महिन्यात लद्दाख फिरायला मिळणे हीच खूप मोठी गोष्ट आहे.
शरीराच्या सर्व अंगानी आत्म्याच्या या निर्णयाचे स्वागत केले. पहिले स्वागत तर पायांनीच केले.
आज शुक्रवार होता. परवा म्हणजे रविवारी लेहला जाणारी बस येणार आहे. उद्या थांबून इथले जनजीवन बघून परवाच्याला लेहला जाऊया.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्षणचित्रे :


चिलिंग मध्ये बर्फवृष्टी


योकमापा- लद्दाख इको होमस्टे (चिलिंग)


घरातला एक छोटा मुलगा


घरातला दुसरा छोटा मुलगा


चपाती वर लावायला लोणी आणि जैम चे डब्बे


चहाचा स्वाद घेताना


जास्कर घाटी फिरण्यासाठी बाहेर पडल्यावर


हाच तो मुख्य रस्ता आणि बर्फावर गाडीचे निशाण


अङमो आणि तिचा भाचा


खरंच..हा रस्ता नेरक पर्यंत पाहिजे होता. तरी पण नेरक पर्यंतचे अंतर इथे खूप कमी लिहिलेले आहे. नेरक इथून कमीत कमी चाळीस किलोमीटर लांब आहे.


जांस्कर नदी


जांस्कर नदी - काही ठिकाणी गोठलेली आहे तर काही ठिकाणी वाहते आहे.


हा कोणता साप वाप नाही. यावरून साध्य होतं कि बर्फामध्ये चिकटण्याचा गुण आहे.


इथपर्यंतच रस्ता बनलेला आहे. इथून पुढे दोन किलोमीटर वरती तिलत सुमडो आहे. तिलत पर्यंत जायला खाली उतरून नदी पात्रावरून जावे लागते. इथूनच चादर ट्रेक सुरु होतो.


पूर्ण पणे गोठलेली जांस्कर नदी


परत चिलिंग मध्ये

--------------------------------------------------------------(क्रमशः)-------------------------------------------------------------

मागील भागात जाण्यासाठी...

.....पुढील भागात जाण्यासाठी

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

17 Mar 2016 - 10:54 pm | यशोधरा

वाचते आहे..

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2016 - 1:47 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे सफर ! पुभाप्र.

एस's picture

18 Mar 2016 - 8:21 am | एस

रौद्रभीषण तरीही सुंदर भाग आहे हा सर्व! पुभाप्र.

प्रचेतस's picture

18 Mar 2016 - 9:25 am | प्रचेतस

पांढराशुभ्र.

पैसा's picture

18 Mar 2016 - 12:12 pm | पैसा

अतिशय सुरेख! नीरज चे मूळ लिखाण खूप ताकदीचे दिसते आहे. अनुवादही अगदी गुंगवून ठेवणारा होत आहे. फोटो खासच!

अनुवादातला हिंदी लहेजा आवडतो वाचायला.फोटो शुभ्र काही जीवघेणे म्हणतात तसे आहेत!
पुभाप्र

नीलमोहर's picture

18 Mar 2016 - 12:31 pm | नीलमोहर

फोटो आणि वर्णन मस्त..

भुमी's picture

18 Mar 2016 - 9:21 pm | भुमी

सुंदर फोटो,छान वर्णन.

सूड's picture

18 Mar 2016 - 9:41 pm | सूड

वाचतोय

वेल्लाभट's picture

18 Mar 2016 - 10:12 pm | वेल्लाभट

आरारा!