हिवाळ्यातला लदाख - सुरुवात (भाग १)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
11 Mar 2016 - 7:16 pm

1
.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिवाळ्यातला लदाख : दिल्ली वरून सुरुवात (भाग १)

हा प्रवास आमचे मित्र नीरज यांनी जानेवारी २०१३ मध्ये केला होता. हिवाळ्यामध्ये लदाख कसा दिसतो? एवढ्या थंडीत तिथले लोक राहतात कसे, जगतात कसे ? याचे सविस्तर वर्णन आणि नीरजजी यांना आलेले अनुभव या प्रवासवर्णना मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर मग करू या सुरुवात प्रवासाला...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी एक सरकारी कर्मचारी आहे. त्या नात्याने मला चार वर्ष्यातून एकदा सरकारी खर्चाने भारताच्या कोणत्याही भागामध्ये प्रवास करण्याची मुभा आहे. ह्याच खर्च्या मध्ये पूर्वे कडील भाग आणि जम्मू कश्मीर साठी विमान प्रवासखर्च मिळतो. ते यासाठी कि,पूर्वेकडील भाग आणि जम्मू कश्मीर मध्ये पर्यटनाला चालना मिळावी म्हणून. पण ह्या भागामध्ये कुणाला फारशी जायची इच्छा होत नाही. तरी पण फुकट विमान प्रवास मिळतोय, या लालसेने काही लोक तिकडे जातात.

मी विचार केला कि, जर फुकट विमान खर्च मिळतोय त का नाही लद्दाख ला जाऊन येऊ. हिवाळ्या मध्ये लद्दाख ला जाण्यासाठी एकमेव साधन म्हणे ते विमान आहे. त्यामुळे तिकडे जायची इच्छा माझ्या मना मध्ये जागृत झाली. लढाख सोडून बाकीच्या प्रांता मध्ये आपण कधीही जाऊ शकतो. परंतु लद्दाख मध्ये उन्हाळ्यातच जावे लागते. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे सगळे मार्ग बंद होतात. त्यामुळे तिकडे हिवाळ्यात कुणी जास्त फिरकत नाही. ज्याला विमान प्रवास झेपतोय तोच जाऊन येतो. त्यामुळे इंटरनेट वर पण जास्त माहिती उपलब्ध नाही. हिवाळ्यामध्ये लद्दाख कसा दिसतो हे मला माहित करून घ्यायचे होते.

माझा एक मित्र आहे. तो म्हणजे ललित भारद्वाज. एकदा माझ्यासोबत तो त्रियुण्डला आला होता. त्यावेळेसच मी त्याला ओळखले होते कि, हा "हिंडफिरा" या गटा मध्ये मोडणारा नाही. एके दिवशी बोलता बोलता त्याने मला आग्रह केला कि, चल कुठे तरी जाऊ. हि डिसेंबर २०१२ ची गोष्ट आहे. मी लगेच लद्दाखच नाव घेतलं. तो पण काही विचार न करता हा म्हणाला.

दुसर्या दिवशी डोळे उघडले. त्याने आपल्या परीने लद्दाख विषयी माहिती गोळा केली होती. त्या माहितीवरून त्याला माहित पडले कि, तिथे जानेवारी मध्ये तापमान शून्य पासून पंचवीस पर्यंत खाली जातं. त्यांनी लगेच फोन करून मला नाही म्हणून सांगितलं. पण इकडे मी जायचं हे नक्की करून टाकलं होतं. तरी हि त्याला मी खूप समजावून सांगितले कि, फक्त चार पाच कपडे जास्त घालावे लागतील. पण त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. शेवटी त्याने एकदाचे सांगून टाकले कि, मी नाही येऊ शकत तू जा. त्यावेळेस उत्तर भारता मध्ये कडाक्याची थंडी पडली होती. त्यामुळे हि थंडी सहन करून, अजून त्यापेक्षा थंड असलेल्या ठिकाणी कोण जाईल.

जेव्हा मला माहित पडले कि, आज दिल्ली चे तापमान चार डिग्री आहे आणि काल पाच डिग्री होतं. तेव्हा माझं संपूर्ण शरीर थर थर कापू लागलं. एका डिग्रीच्या फरकामुळे जर एवढी थंडी वाजत असेल तर अचानक वीस पंचवीस डिग्री चा फरक पडला तर, हे शरीर कस काय सहन करेल? मित्रांनी पण घाबरवल कि, जर तिकडे जाउन सर्दी झाली ना मग नाकातून पाणी नाही बर्फाचे गोळे पडतील.

तरी पण जानेवारीत लद्दाखला जायचं मनात बसलं होतं. मला बघायचा होतं कि, एवढ्या थंडीत तिथले लोक कसे जगतात? कस काय गोठलेल्या नदीवर लोक येउन जाउन करतात? कस काय तिथे आपले सैनिक पहारा देतात?
डॉक्टर करण बरोबर माझे बोलणे झाले त्यांनी तेथील २ लोकांचे नंबर दिले. तो मागच्या जानेवारीत लेह ला गेला होता तेव्हा तिथे काही लोकांबरोबर ओळख झाली होती.

घरी या विषयावर बोलणे झाले तर माहित पडले कि, नात्यातला विकास तेथे राहतो. विकास सीआरपीएफ मध्ये आहे आणि लेह मध्ये त्याची पोस्टिंग आहे. विकास बरोबर माझे बोलणे झाले. त्यामुळे आता माझा राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न सुटला होता.

खर तर लोक लेह आणि लद्दाख ला वेगवेगळं मानतात. पण खरी माहिती अशी कि, जम्मू कश्मीर राज्याचे भौगोलिक नुसार तीन भाग आहेत - जम्मू, कश्मीर आणि लद्दाख. जम्मू क्षेत्रा मध्ये जवाहर सुरंग च्या आधीचा भाग येतो आणि यामध्ये कठुआ, साम्बा, जम्मू, ऊधमपुर, डोडा, किश्तवाड, राजौरी, रियासी इतके जिल्हे येतात. कश्मीर क्षेत्रा मध्ये जवाहर सुरंग च्या नंतरचा भाग येतो आणि यामध्ये अनन्तनाग, श्रीनगर, बडगाम, बारामूला, कुपवाडा इ. जिल्हे येतात. आता राहिलं लद्दाख, श्रीनगर- लेह मार्गावर सोनमर्ग च्या थोडे पुढे जोजिला घाट पार केल्यानंतर लद्दाख क्षेत्र सुरु होतं आणि यामध्ये कारगिल आणि लेह या जिल्ह्यांचा समावेश आहे. पण आपल्या सर्व साधारण बोलचाली मध्ये "लेह आणि लद्दाख" म्हटलं जात. लेह आणि लद्दाख हे वेगवेगळे नाहीत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माझा पहिला विमान प्रवास:

मी अजून पर्यंत कधी विमान प्रवास केला नव्हता. त्यामुळे मनामध्ये कुठे तरी साधारण भीती होती. त्यामुळे मला असं वाटत होतं कि, या विमान प्रवासा मध्ये कुणी तरी जोडीदार मिळावा. छत्तीसगढ वरून प्रकाश यादव आणि गुजरात वरून जगदीश नि यायची इच्छा दाखवली होती. यादव साहेबाची इच्छा होती कि, एक ते दोन दिवस लेह ला थांबून परत यायचे होते. तर जगदीश साहेबांची इच्छा होती कि, ते मला पूर्ण यात्रे मध्ये साथ देणार होते.

जेव्हा मी विमानाची तिकिटांची ऑनलाइन बुकिंग केली आणि त्या ई-टिकटावर कुठे हि सीट नम्बर लिहिलेला नव्हता तेव्हा मनात धाकधूक सुरु झाली. आता पर्यंत फक्त ट्रेननीच प्रवास केला होता. त्यामुळे डोक्यात आले कि,वेटिंग चालू असेल. त्यामुळे सीट मिळाली नसेल. माहिती नव्हतं कि, निघण्याच्या वेळे पर्यंत सीट कन्फर्म होईल कि नाय होईल.

मित्रान बरोबर जेव्हा बोललो तेव्हा हे सगळं समजलं. यात्रेच्या दिवशी काउंटर वरून बोर्डिंग पास मिळतो. त्यावरती सीट नम्बर लिहिलेला असतो. त्याच बरोबर एकाने सुचवले कि, काउंटर वर सांग कि खिडकी जवळची सीट पाहिजे.

१५ जानेवारी - यात्रेच्या एक दिवस आधी यादव आणि जगदीश नि फोन करून सांगितलं कि आम्ही नाही येणार. त्यांनी नाही म्हटल्यावर माझे मन नाराज झाले. मला मुख्य समस्या होती ती विमान प्रवासाची. हे दोघे असते तर अजून धीर आला असता. पण त्यांनी नाही म्हंटल्यावर मी एकटा पडलो.
तिकिटावर लिहिलं होतं कि, फ्लाइट च्या दोन तास आधी विमानतळावर यावे लागेल. कारण सुरक्षा तपासणी आणि इतर कामांना वेळ मिळावा म्हणून. फ्लाइट ची वेळ हि सकाळची साडे सहा ची होती. त्यामुळे मला सकाळी साडे चार वाजता जावे लागणार होते. मी राहतो पूर्व दिल्लीच्या यमुना नदीच्या पडयाल शास्त्री पार्क मध्ये आणि विमानतळ हे पश्चिम दक्षिण असून ते एका कोपऱ्यामध्ये आहे. त्यामुळे कमीत कमी एक तास तरी जायला लागणार. शेवटी ठरवलं कि, पहाटे जाण्या पेक्षा रात्रीच निघूया. त्यामुळे अकरा किंवा बारा वाजता जायचं नक्की केलं.

कश्मीरी गेट पासून विमानतळावर जाण्यासाठी वातानुकुलीत बस धावतात. पण त्यावेळेस एयरपोर्ट मेट्रो बन्द होती. ज्यावेळेस मी विचारलं कि, विमानतळाच तिकीट द्या तर तो कंडक्टर म्हणाला कि, डोमेस्टिक कि इंटरनेशनल !!
मला कुठे लंडनची फ्लाइट पकडायची होती. मी लगेच म्हटलं,"डोमेस्टिक."
त्यांनी ७५ रुपयेच तिकीट दिलं. इंटरनेशनलच तिकीट १०० रुपये होतं.

डोमेस्टिक विमानतळावर उतरलो. आत गेल्यावर एका मुलाला विचारलं कि, "भाई, सुबह लेह वाली फ्लाइट कहां से मिलेगी?"
त्याने विचारलं कि, कोणती फ्लाइट आहे.
मी म्हटलं. एयर इंडिया.
तो म्हणाला कि, "वो तो टर्मिनल थ्री से मिलती है."
माझं डोकंच सटकला. आता हे टर्मिनल थ्री कुठे आलं. डोमेस्टिक आणि इंटरनेशनल तर माहित होतं पण हे टर्मिनल थ्री कळत नव्हतं. शेवटी परत विचारल्यावर त्या मुलानेच सांगितलं कि, समोरून तुम्हाला बस मिळेल.

बस वाल्यांनी इंटरनेशनल एयरपोर्ट ला उतरवलं. यालाच टर्मिनल थ्री म्हणतात. इथून अन्तर्राष्ट्रीय विमाने उडतात. पण काही भारतातीलच डोमेस्टिक विमाने पण इथून उडतात. एयर इंडिया ची सगळी विमाने इथूनच उडतात. मध्यरात्र उलटून गेली तरी इथे खूप गर्दी होती. एकाला विचारलं कि, एयर इंडिया ची फ्लाइट कुठून उडते तर त्याने समोर हातानी इशारा केलं आणि मी तिकडे गेलो. तिथे कोणीच नव्हते जास्त करून होटल वाले, टैक्सी वाले आणि प्रवासी होते. तिथून पुढे समोर गेलो तर पाटी लावली होती कि, "प्रस्थान".

मग मी याच ‘प्रस्थान’ लिहिलेल्या पाटी खालून सरळ चालू लागलो. शेवटी किती तरी वळणे घेऊन आणि शिड्या पार करून सुरक्षा अधिकार्यापाशी पोहोचलो.
दारावरती थांबलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याने माझे तिकीट पाहिले आणि म्हणाला कि, "यह फ्लाइट तो सुबह साढे छह बजे है, अभी क्या करोगे आगे जाकर? जाओ, चार बजे के बाद आना."

आता साडे बारा वाजले होते. म्हणजे मला जवळ जवळ चार तास बाहेर काढायचे होते. रेलवे स्टेशन असते तर तिथेच पसरलो असतो पण इथे लाज वाटत होती. मला टोयलेटला आली होती म्हणून त्याच्या शोधात लांब समोर शौचालयजवळ गेलो. शौचालय च्या जवळ नवीन दुकानाचे काम चालू होते. इथेच विमानतळावरचे साफसफाई कामगार झोपले होते. तिथे मला चांगली जागा मिळाली. टोयलेट वरून आल्यानंतर चार वाजेपर्यंत चांगली झोप काढली.

चार वाजता उठून परत त्याच दरवाज्याजवळ गेलो. तिकीट आणि ओळखपत्र दाखवल्यावर त्यांनी आत सोडले. त्या सुरक्षा अधिकार्यालाच विचारले होते कि माझी फ्लाइट एयर इंडिया ची आहे. आता पुढे कुठे जाऊ. त्याने इशारा करून सांगितलं कि ते बघ एयर इंडियाच काउनटर...तिकडे जा!!
पुढे गेल्यावर एयर इंडिया चे भरपूर काउंटर होते. त्यातल्या एका काउंटर वर जाऊन पोहोचलो. काउंटर वर एक बाई बसली होती. तिला मी आपले ई-टिकट दिलं. तिनं कॉम्पुटर वर पटापट बटने दाबली आणि मला ‘बोर्डिंग पास’ दिला. त्यावर सीट नम्बर लिहिला होता - 16 C.
मला मित्रांनी सांगितलं होतं कि बोर्डिंग पास बनवायच्या वेळेस सांग कि, खिडकी जवळची जागा पाहिजे. तेव्हाच तुला ती भेटेल. पण मला माहित नव्हते कि याच काउन्तर वरती बोर्डिंग पास मिळतो आणि ते खिडकी जवळच्या जागेचे इथेच सांगावे लागते. त्यामुळे जेव्हा हातात "बोर्डिंग पास" आला तेव्हा त्यावर सीट नंबर होता 16 C म्हणजे खिडकी पासून दूर. चला पुढच्या यात्रे साठी धडा तर मिळाला.

पुढे गेल्यावर अजून एक सुरक्षा दरवाजा लागला. इथे माझ्या बैग वरती सिक्योरिटी चेक चा शिक्का लागला. अजून पाच हि वाजले नव्हते कि मी पूर्ण पणे विमानात बसण्यासाठी सज्ज झालो होतो. तरी पण एका वेटिंग रूम मध्ये आम्हाला थांबवले. तिथे एका बाजूला काही स्क्रीन होत्या. त्यावर विमान उडण्याची वेळ, दरवाजे उघडण्याची वेळ आणि बन्द होण्याची वेळ दिसत होती. दोन ते तीन विमाने चार तास उशिराने चालली होती. हे बघून खूप आनंद झाला नाहीतर हा ‘कलंक’ आमच्या ट्रेन वरतीच मारला जातो किंवा लादला जातो.

दुसर्या बाजूला एक टीवी लावला होतं त्यावर बातम्या येत होत्या. त्या इंग्लिश मध्ये होत्या, त्यामुळे त्या माझ्या डोक्यावरून जात होत्या. माझ्या समोरच्या सोफ्यावरती एक लद्दाखी जोडपं बसलं होतं. त्यांच्या बरोबर थोडंच बोलणं झालं. त्यांना सांगितले कि मी पण लेह ला चाललोय.

आणि हे काय ? इंडियन एयरलाइंस च एक विमान चक्क थोइसला चालल आहे. थोइस हे लेह च्या पुढे खारदूंगला पार करून नुब्रा घाटी मध्ये सियाचिन ग्लेशियर च्या खूप जवळ आहे. खारदूंगला आणि नुब्रा जाण्यासाठी परमिटची आवश्यकता लागते. मग एक गोष्ट क्लियर आहे कि, थोइस ला विना परमिट जाऊ नाही शकत. मग हे परमिट विमान उडण्याच्या आधी काढावे लागते कि थोइस ला पोहोचल्या नंतर ? माझ्या मते थोइस मधेच ‘परमिट ऑन एराइवल’ ची सुविधा मिळत असेल.

पावणे सहा वाजता आजूबाजूच्या स्क्रीन वर दाखवू लागले कि लेहला जाणाऱ्या फ्लाइट चे दरवाजे उघडले आहेत. मग आम्ही कोणताही वेळ वाया न घालवता विमानात जाउन बसलो. विमान आतून आपल्या ट्रेन च्या एसी चेयरकार सारखा वाटत होतं. पण ट्रेन मध्ये खिडक्या मोठ मोठ्या असतात. इथे मात्र छोट छोट्या होत्या.

जेव्हा माहित पडले कि, माझी सीट खिडकी पासून जास्त लांब आहे. तेव्हा डोकंच खराब झालं. माझ्या सीट वरती एक माणूस बसला होता.
मी त्याला विचारले कि, " भाई, आपकी सीट कौन सी है."
तर म्हणाला कि पन्द्रह बी. सोळा सी पेक्षा खिडकी पासून जवळ पंधरा बी होती.
म्हणून मी काही नाही बोललो उलट त्यांना मी आणि त्यांनी मला धन्यवाद दिलं.
त्यांच्या घरातले बाकीचे सर्व सदस्य सोला सी च्या आसपासच बसले होते. त्यामुळे त्यांनी माझ्या बरोबर सिटाची अदला बदली केली.

मी काल पासून काहीच खाल्ले नव्हते. माहित होतं कि विमानामध्ये फुकट खायला प्यायला भेटणार आहे. जेव्हा नाश्ता समोर आला तेव्हा भूख कमी व्हायची तर अजूनच वाढली.
पंधरा मिनट पण लागली नाही कि हरियाणा पार करून हिमाचलच्या डोंगरावरती पोहोचायला आणि लगेच कुल्लू पार करून रोहतांग पार करून हिमालयात घुसलो. इथे इंचा इंचा वरती बर्फाचं साम्राज्य होतं. याच दरम्यान मला फोटो काढायला चान्स भेटला नाही. परत येताना प्रयत्न करील जास्तीच जास्त फोटो काढायचा.
जेव्हा हिमालय पार होऊन विमान लद्दाख च्या पर्वतावरती उडू लागलं. तेव्हा बर्फाचे प्रमाण खूप कमी होऊन उघडे बोगडे पर्वत दिसू लागले होते.
--------------------------------------------------------------(क्रमशः)-------------------------------------------------------------

पुढील भागात जाण्यासाठी...

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Mar 2016 - 8:06 pm | प्रचेतस

जबरदस्त सुरवात.
गोठलेलं लडाख बघायची फार इच्छा आहे.
धन्यवाद निरज आणि राजकुमार ह्या लेखमालेबद्दल. ही पण रंगतदार होणार ह्यात शंका नाही.

वा, वा, पुन्हा एकदा हिमालयाचं दर्शन..

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Mar 2016 - 8:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

हिवाळ्यातले लडाख बघायचं आहे... सुरुवात छान झाली आहे. पुढील वर्णन आणि फोटोंची प्रतिक्षा आहे !

एस's picture

11 Mar 2016 - 9:23 pm | एस

पुभालटा!

मार्गी's picture

11 Mar 2016 - 10:14 pm | मार्गी

चांगलय, पण मूळ हिंदी ब्लॉग्जची असंख्य पारायणे केल्यामुळे हे वाचताना तितकी मजा येत नाहीय. . . नीरज जाट माझे सायकल गुरू! त्यांना दंडवत!

पुभाप्र!

दिपक.कुवेत's picture

12 Mar 2016 - 12:08 pm | दिपक.कुवेत

बर्फाच्छादित लडाख बघायची फार ईच्छा आहे. मस्त सुरवात. मागे निरज यांनी केलेले सायकल स्वारी वरही प्रतिक्रिया द्यायच्या राहून गेल्या पण सगळे भाग वाचून काढले. अप्रतिम आणि कडक सॅल्यूट. आणि तुमच्या मार्फत हे आमच्या पर्यंत पोचत आहेत त्यासाठि खुप खुप धन्यवाद. पटापट पुढिल भाग टाका आता.

खूप आवडलं या साध्यासुध्या अवलियाचे मनोगत.तुम्ही ते समोर आणताय म्हणून तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत.या निरज जाटना एकदा दंडवत घालायला हवा आहे!

आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद !!

पैसा's picture

12 Mar 2016 - 10:45 pm | पैसा

रंगतदार सुरुवात!

जगप्रवासी's picture

14 Mar 2016 - 3:41 pm | जगप्रवासी

हा माणूस वेडा आहे का? सायकलीने लदाख फिरतो काय आणि आता चक्क थंडीत… साष्टांग दंडवत.
आणि राजकुमार तुमचे खूप धन्यवाद की तुमच्यामुळे आम्हाला त्यांची भ्रमणगाथा वाचायला भेटतेय.

अनुप ढेरे's picture

14 Mar 2016 - 3:58 pm | अनुप ढेरे

रोचक!

गणेशा's picture

9 May 2016 - 6:19 pm | गणेशा

मस्त सुरुवात ..

मी आज सुरवात केली आहे वाचायला .. आता शेवटाला रिप्लाय देतो जेंव्हा वाचीन तेंव्हाच