हिवाळ्यातला लदाख - सैनिकांची परेड आणि युद्ध संग्रालय (भाग ८)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
2 Apr 2016 - 6:09 pm

हिवाळ्यातला लदाख - सैनिकांची परेड आणि युद्ध संग्रालय (भाग ८)

मागील पानावरून ............
राजमहाला मध्ये कोणीच नव्हतं. राजमहाल जास्त मोठा नव्हता. राजमहाला भोवती फिरलो. तर माहित पडले कि, एक खोली बंद आहे. खोली पण खूप उंच दिसत होती. खात्री पटली कि, नक्कीच याच्या आत मध्ये ती मूर्ती असणार. तिथे कुणाला तरी विचारावे तर तिथे मी एकटाच होतो. त्या खोली ला कुलूप लावले होते. दोन तास तिथे घालवले. तेवढ्या वेळेत पण तिथे कोणीच आले नाही. नाराज होऊन परत ठिक्से ला जाण्यासाठी बस ची वाट पाहू लागलो. शे महोत्सव मुळे शे च्या पुढे जाण्यासाठी कोणतीच गाडी मिळाली नाही. शेवटी अर्ध्या तासानंतर टैक्सी पकडून परत जेल मध्ये आलो.
..........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२४ जानेवारी २०१३

आज मला खारदुंगला जायचं होतं. त्यामुळे सकाळी लवकरच उठलो. दुसरा कोणता दिवस असता तर आरामशीर उठलो असतो. विचार केला कि, आज टैक्सीनि नाही जायचं. बस नि जायचं. बस नाही मिळाली तर कोणत्याही ट्रक ला हाथ करून जायचं. खारदुंगला रस्त्यांनी खूप ट्रक धावतात. परमिट होतं माझ्याकडे.

आज परेड च्या मैदानावरती प्रजासत्ताक दिनासाठी परेडची रिहर्सल चालू होती. माझे सीआरपीएफ मधील सगळे मित्र परेड साठी तयार होत होते. विकास नि मला आग्रह केला कि, तुला २६ जानेवारीचे कार्यक्रम तर पाहता येणार नाहीत पण आमची रिहर्सल नक्की बघ. रिहर्सल दहा नंतर चालू होणार होती. मी विकासला सांगितलं कि, अकरा वाजे पर्यंत थांबू शकतो नंतर पुढे मला खारदुंगला ला जायचे आहे. विकास नि मला पुढचे तर्क वितर्क सांगून थांबण्यासाठी तयार केलंच. त्यावेळी मी खूप नाराज झालो पण काही केल्याने विकासला नाही म्हणू शकलो नाही.

मी परेड मैदानावर पोहोचलो. मैदानाच्या चारी बाजूनी लोकांची गर्दी होती. उन पडले असून सुद्धा थंडी खूप होती. हाता मध्ये हाथमौजे घालून उभा होतो. परेड मध्ये शाळेतली मुले, स्काउट, गाइड, एनसीसी कैडेट, राज्य पोलिस, आईटीबीपी, सीआरपीएफ, बीएसएफ, सैनिक आणि लामा पण होते. त्यांचे शिस्त पणे चालणे खूप आवडले. सलामी द्यायला कमिश्नर आले होते.

परेड संपायला अकरा वाजले होते. मी आता सुद्धा खारदुंगला जाऊ शकत होतो पण मन खूप उदास होते. कुठे तरी जाउन उन्हामध्ये दोन तास बसावे असे वाटत होते. त्यासाठी पिटुक गोनपा हे चांगले ठिकाण होते. पिटुक ला इंग्लिश मध्ये स्पिटुक (Spituk) असे म्हणतात. टैक्सी स्टैंड वरून एयरपोर्ट च्या दिशेने जाणारी टैक्सी पकडली आणि पिटुक साठी निघालो. योगायोगाने तीच टैक्सी होती ज्यातून मी पहिल्यांदा चिलिंग ला गेलो होतो. ड्राइवर इब्राहिम होता. कसा आहेस?यापेक्षा आमचे दुसरे बोलणे झाले नाही. चिलिंग च्या वेळेस त्याने चोविशे रुपये मागितले होते. मी त्याला बाराशे मधेच चालता केला होता.

एयरपोर्ट च्या पुढे गेल्यानंतर कैंटीन आहे. ड्राइवर ने इथूनच टैक्सी परत वळवली आणि म्हणाला कि यापुढे नाही जाऊ शकत. मी पायानेच चालत गेलो. जवळ जवळ एक किलोमीटर पुढे युद्ध संग्रहालय आहे. प्रवेश फी दहा रुपये आहे आणि फोटो काढायचे पन्नास रुपये. मी साठ रुपये देऊन तिकीट घेतलं.

दोन खोल्यामध्ये मिळून लदाख विषयी खूप सारी माहिती आहे. लदाख मधील वेग वेगळ्या जातीची लोक, त्यांच्या वेशभूषा, जंगलातील प्राणी, झाडे झुडपे, वेग वेगळ्या मोनेस्ट्री तसेच हेमिस, फ्यांग, ठिक्से, लिकिर, लामायुरु, पिटुक याविषयी पण माहिती दिली गेलेली आहे.
बाकीच्या विभाग मध्ये लदाख चा इतिहास, सैनिकांची माहिती, हत्यारे यांचा मोठा संग्रह आहे. कारगिल युद्धाच्या वेळी पर्वताच्या उंचावरील ठिकाणे तोलोलिंग, टाइगर हिल यांचे माहिती आणि नकाशे पण आहेत. सियाचिन गैलरी मध्ये सियाचिन ग्लेशियर विषयी माहिती आहे. त्यामध्ये तेथील सैनिकांचे राहणीमान, त्यांची वेशभूषा, हत्यारे इ विषयी माहिती आहे.

सिमेरेषेवरती पाकिस्तानी सैनिका बरोबर खटके उडतच असतात. त्यावेळी एखादा पाकिस्तानी सैनिक मारला गेल्यास त्याच्याकडील हत्यारे, डायरी, ओळखपत्रे काढून घेतली जातात. अशीच काही डायरीची पाने इथे संग्रलायामध्ये पहावयास मिळाली. यामध्ये एका पानावर अल्ला साठी प्रार्थना केलेली होती कि,
“बिस्मिल्लाह रहमाने रहीम
दुआये दुश्मन के मिसाइल, रॉकेट, बम्ब, गोला और हर किस्म के हथियार को रफासुत हाफिज रहे।
या अल्लाह ताला बलाल ओ पी में १०० साल के लिये दुश्मन के हथियार से हाफिज रखें, आमीन।
या अल्लाह मदद... या अल्लाह मदद... या अल्लाह मदद... या अल्लाह मदद...
या अल्ला ताला खैर करे...
या वक्त के इमाम नूरे मौला साये करम सौ साल के लिये बलाल ओ पी में हर दुश्मन के हथियार से हाफिज रखे।
या अल्लाह ताला हम सब तेरे निगाह में हैं हमें अपना अपना मिले।
बलाल ओ पी दुश्मन के हर हथियार से हमें हाफिज रखे, आमीन सुम्मा अली।”

बलाल ओपी हे एक सैनिकांचा अड्डा आहे. त्याशिवाय जनरल जोरावर सिंह याचा लद्दाख अभियान याविषयी सुद्धा माहिती आहे. कश्मीरचा राजा गुलाब सिंह यांच्या सेने मध्ये जोरावर सिंह होते. सन १८३५ च्या सुरुवातीला जोरावर सिंह यांनी पहिल लद्दाखी अभियानाला सुरुवात केली. हे अभियान श्रीनगर, कारगिल च्या रस्त्याकरिता बनवलं होतं. जोरावर सिहानी १८३७ आणि १८३९ मध्ये सुद्धा अभियान चालवलं. त्यामुळेच लदाख हा भारताचा भाग झाला. १९६२ मध्ये जेव्हा चीन नि आक्रमण केलं होतं. तेव्हा चीनी सैनिक गुवाहाटी पर्यंत येउन पोहोचले होते. पण लदाख मध्ये असं नाही झालं. तरी पण चीन नि भारताच्या खूप मोठ्या भागावरती कब्जा केला. संग्रहालयातून बाहेर पडून पिटुक साठी निघालो.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्षणचित्रे :

जेल मधे


विकास परेड साठी तैयार


परेड चे ठीकान


निरीक्षण


लाम्ब शान्ति स्तूप दिसतोय


संग्रलायामध्ये एका जातीच्या लोकांची वेशभूषा - हि जात धा आणि हनु गावामध्ये राहते. हि शुद्ध आर्य रक्त असणारी जात आहे.


सियाचिन मधिल सैनिकान्चि वेशभूषा


एका पाकिस्तानी सैनिकाचे पे बुक आणि ओळ्ख पत्र


एका पाकिस्तानी सैनिकाने अल्ला ला केलेलि प्रार्थना


संग्रहालयाचा प्रवेश दरवाजा

--------------------------------------------------------------(क्रमशः)-------------------------------------------------------------

मागील भागात जाण्यासाठी...
.....पुढील भागात जाण्यासाठी

प्रतिक्रिया

एस's picture

2 Apr 2016 - 9:58 pm | एस

छान भटकंती.

अजया's picture

3 Apr 2016 - 11:57 am | अजया

पुभाप्र

रणजित चितळे's picture

4 Apr 2016 - 12:02 pm | रणजित चितळे

छायाचित्र छान. मस्त. माहिती छान

जगप्रवासी's picture

6 Apr 2016 - 3:04 pm | जगप्रवासी

हा ही भाग मस्त

पैसा's picture

12 Apr 2016 - 7:49 pm | पैसा

हा भागही आवडला.