हिवाळ्यातला लदाख - खारदुंगलाचं परमिट आणि शे गोनपा (भाग ७)
मागील पानावरून ............
एक गोष्ट मनात सारखी टोचायला लागली कि, परवापासून इथे खालीच बसलो आहे. काल तर दिवस भर जेल च्या बाहेर पडलोच नाही. जेल मधून खारदुंग ला स्पष्टपणे दिसतो. मग का नाही खारदुंगला ला जाउन यावं? मी जर काल परमिट घेतलं असतं तर आज खारदुंगला पार करून नुब्रा घाटी ला गेलो असतो दोन दिवसा साठी. जिथे दोन कूबडाचे ऊंट पाहायला मिळाले असते. उद्या २३ तारीख आहे. उद्या दुपार पर्यंट परमिट मिळेल. २४ ला फक्त खारदुंगला पर्यंतच जाऊ शकतो. उद्या खारदुंगला ला जायचं घेणार आणि माहिती करून घेणार कि सकाळी किती वाजता तिकडे बस जाते.
..........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२३ जानेवारी २०१३
खारदुंगला जायची इच्छा जेल मध्ये सगळ्यांना सांगितली होती. युसुफ साहेबानी तर, तू परमिटची चिंता करू नको, असे सांगितले. तुला सीआरपीएफ कडून परमिट दिलं जाइल आणि कागदपत्र पण लागणार नाहीत. नंतर मात्र सीआरपीएफ कडून परमिट नाही मिळाल. आता मलाच जिल्हा कमिश्नर च्या कार्यालायातून परमिट बनवून घ्यायचं होतं.
विकास बरोबर परेडला जाणार्या बस मध्ये बसून परेड ग्राउंडवर पोहोचलो. इथे २६ जानेवारीसाठी तयारी म्हणून रोज दोन तीन तास परेड घेतली जात होती. परेड मध्ये आपले सैनिक, भारत तिब्बत चे पोलिस, सीआरपीएफ, राज्य पोलिस, एनसीसी इ. सहभागी होते. परेड मैदानच्याच बाजूला जिल्हा कमिश्नरचं कार्यालय आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत घुसल्यावर डाव्या बाजूलाच ऑफिस आहे. इथे खारदुंगला साठी परमिट बनत. तिथे गेल्यावर त्यांनी मला सांगितलं कि, कोणत्यापण फोटो-झेरोक्स च्या दुकानात जाउन इंडिया फार्म विकत घेऊन ये. त्याच बरोबर ओळख पत्राची झेरोक्स कॉपी पण घेऊन ये.
खूप लांब गेल्यावर एका ठिकाणी एक फोटो-झेरोक्सच दुकान भेटलं. लगेच तिथे इंडिया फार्म मिळाला. ओळख पत्राच्या झेरोक्स कॉपी घेऊन डीसी ऑफिसला पोहोचलो. ते म्हणाले कि,एक प्रार्थना पत्र लिहून दे कि, मला खारदुंगला ला जायचं आहे. इकडे मी प्रार्थना पत्र लिहित होतो. तिकडे इंडिया फार्म वर शिक्का आणि सह्या पण झाल्या. परमिट तयार झालं होतं. आता उद्या २४ जानेवारीला तिकडे जाणार.
नंतर खाली बस स्थानका वरती पोहोचलो. विचार होता कि, आज शे आणि ठिक्से गोनपा बघण्याचा. तिथे गेल्यावर लगेच शे साठी बस मिळाली. वीस रुपये लागले शे ला जाण्यासाठी. बस जेल च्या समोरूनच निघून पुढे गेली. शे गोनपा मध्ये आज पूजा चालली होती. खूप लोकं आले होते. जशी काय यात्राच भरली होती. समोर मांडव घातला होता. त्याच्या समोर लोक बसली होती. लद्दाखी भाषा मध्ये धर्मगुरू प्रवचन करत होते. मला माहित होतं कि, शे गोनपा मध्ये बुद्धाची खूप मोठी मूर्ति आहे. ती मूर्ती पहायची मला इच्छा होती. याविषयी एकाला विचारले तर त्याने सांगितले कि, मूर्ती जुन्या गोनपा मध्ये आहे. इथे नाही. जुना गोणपा इथून एक किलोमीटर लांब आहे.
मग पायानेच एक किलोमीटर चालत गेलो. रस्ता उताराचा होता. लेह ला जाणार्या रासात्यावरूनच चालत गेलो. शे पैलेस चा एक बोर्ड दिसला. १६५० मध्ये देल्दन नामग्याल नि बनवलं होतं. याच डोंगरावरती शाक्यमुनि बुद्ध ची तीन मजल्या एवढी उंच मूर्ती आहे. राजमहालाच्या आतून होऊन मी या डोंगराच्या वरच्या ठिकाणी पोहोचलो.
राजमहालाच्या मागून एक रस्ता जाताना दिसला. हि जागा एकदम निर्मनुष्य होती. सगळे जण एक किलोमीटर वर असणाऱ्या गोणपा मध्ये भाग घेण्यासाठी गेले होते. काही ठिकाणी मातीचे किल्ले पाहायला मिळाले. इथे पाउस नसल्याने मातीचे घरे बांधली जातात.
बर्फानी तर कधीच साथ सोडली नाही. इथे पण पडलेल्या बर्फामुळे मला दुसर्या ठिकाणी जाता आले नाही. मग खाली उतरलो. बर्फा वर पायाचे निशाण बनले होते. बर्फ पडून चार दिवस झाले होते. त्यावरून समझले कि इथे जास्त करून कोणी येत नही. परत राजमहाला मध्ये आलो. पण मला ती बुद्धाची उंच मूर्ती कुठेच दिसली नाही. ती मूर्ती वरती असती तर मला दिसली असती. खालून हि दिसत नव्हती. मग विचार केला कि राजमहालाच्या आत तर नाही?
राजमहाला मध्ये कोणीच नव्हतं. राजमहाल जास्त मोठा नव्हता. राजमहाला भोवती फिरलो. तर माहित पडले कि, एक खोली बंद आहे. खोली पण खूप उंच दिसत होती. खात्री पटली कि, नक्कीच याच्या आत मध्ये ती मूर्ती असणार. तिथे कुणाला तरी विचारावे तर तिथे मी एकटाच होतो. त्या खोली ला कुलूप लावले होते. दोन तास तिथे घालवले. तेवढ्या वेळेत पण तिथे कोणीच आले नाही. नाराज होऊन परत ठिक्से ला जाण्यासाठी बस ची वाट पाहू लागलो. शे महोत्सव मुळे शे च्या पुढे जाण्यासाठी कोणतीच गाडी मिळाली नाही. शेवटी अर्ध्या तासानंतर टैक्सी पकडून परत जेल मध्ये आलो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्षणचित्रे :
प्रवचन करताना धर्मगुरू
खूप वाईट वाटले असे दृश्य पाहून. देवा ने लडाखी लोकांना सगळेच कमी दिले आहे. प्राण वायू सुद्धा.
शे पैलेस
बर्फा मुळे इथे जाता नाहि आले
शे पैलेस वरुन दिसनारा नजारा
शे पैलेस वरुन दिसनार यात्रेच ठिकान. थेथुनच मि आलो होतो.
पड्के किल्ले
शे वरुन ठिक्से गोन्पा . जो ५ किलोमितर आहे.
--------------------------------------------------------------(क्रमशः)-------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
31 Mar 2016 - 1:34 pm | एस
लडाखला एकदातरी जायचंय ही इच्छा प्रबळ होत जाते ही लेखमाला वाचून. हिवाळ्यात तिथे हिमबिबट्यांचं दर्शन होत असेल का?
1 Apr 2016 - 12:41 am | डॉ सुहास म्हात्रे
लडाखला एकदातरी जायचंय ही इच्छा प्रबळ होत जाते ही लेखमाला वाचून.
+१००
हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात असं दोनदा जावे असे वाटते... दोन्ही मोसमांचे वेगळेच सौंदर्य आहे तेथे !
1 Apr 2016 - 6:52 am | यशोधरा
मिपा ट्रेकट्टा करु!
12 Apr 2016 - 7:51 pm | पैसा
मस्त!