नमस्कार,
मी Advocate आदित्य रुईकर.
मला वकील म्हणून आपण सगळे ओळखताच, याव्यतिरिक्त मी अनेक विषयात दीर्घ लेखन एक छंद म्हणून गेली पाच सहा वर्षे करत आहे. त्यातील काही लेखन मी प्रसिद्ध करावे असे, मला अनेक हितचिंतकांनी व मित्रांनी वारंवार सुचवल्यामुळे मी माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध करायची ठरवली.
माझ्या या कादंबरी चे नाव आहे.... " मिशन भगीरथ" आणि त्याचे कथानक थोडक्यात असे आहे की,
'एक कॉलेज युवक, त्याला पडत असलेल्या स्वप्नांचा मागोवा घेत, पहिला नेपाळ आणि नंतर तिबेटमध्ये जाऊन पोहचतो. तिकडे त्याला कळते की, चिनी सैन्याचा एक गट भारताविरुद्ध खूप मोठे षडयंत्र रचत आहेत. 15 ऑगस्ट 2020 रोजी भारतावर खूप मोठे संकट आणण्याचा प्रयत्नात त्यांनी कामही सुरु केलं आहे. तो युवक, त्याबद्दलचे पुरावे गोळा करतो. त्याच्या मदतीला तिबेटी योद्धे आणि छोटा कैलासवर राहणाऱ्या योगींचे काही साधक येतात. ते सर्व मिळून शौर्याची पराकाष्टा करतात. देशावर येणाऱ्या महाभयंकर संकटमधून देशाला वाचवण्यासाठी हा युवक खूप धडपड करतो. देशाचे पंतप्रधान आणि लष्कर मिळून अतिशय योजनाबद्ध आणि गुप्तपणे एक मिशन राबवतात. त्या मिशनला " मिशन भगीरथ" असे संबोधले जाते. देशावर येणाऱ्या या आपत्तीचे रूपांतर यशस्वी रित्या इष्टापत्तीमध्ये करून देशाचा फायदाच घडवला जातो. मिशन भगीरथ या कादंबरीत, अडीअडचणीवर मात करून यश मिळवलेल्या व देशाला भयंकर संकटातून वाचवण्यासाठी सर्वशक्ती पणाला लाऊन काम केलेल्या एका युवकाची रोचक कथा अपणापुढे काही भागात मांडत आहे.'
धन्यवाद।
©Advocate आदित्य रुईकर.पुणे। 9823155095