आम्ही तेव्हा झोपडपट्टीत राहायचो, रेल्वेच्या जागेत अतिक्रमण झालेली अठरापगड जातींच्या सरमिसळीची गोधडी. एक मोठा निळा फडका आणि बाकीचे छोटे छोटे रंगीबिरंगी ठिगळ असलेली. शहराच्या आजूबाजूच्या शेकडो गावांतून इथे दोन-चार, दोन-चार करत आलेली, मोलमजुरी, हमालीचं काम करणारी बिर्हाडं. आवसेला न चुकता डडंग-डंग...चिक...डडंड-डंग....डडंग-डंग...चिक...डडंड-डंग करत येणारा स्वच्छ कपड्यातला, अगदी वारकरी वाटणारा मांग. परिसरात मेलेली जनावर ओढायचं, त्यांचं कातडं काढून विकायचं काम करणारे महार, कुठे कोणाच्या घरी धुणी-भांडी करणार्या बाया, दोन-तीन बकर्या घेऊन चरायला जाणारी अल्पवयीन बालकं, घराच्या लिंपणासाठी कायम चुन्याची माती शोधत असणार्या मुली. जयंत्या-महानिर्वाणाच्या दिवशी वाजणारे भयाण आवाजातले भोंगे, कुणाच्या पाचव्या वाढदिवशी अमक्यामामाने 'चिरंजी सिद्दार्त'ला सपरेम भ्येट दिलेले २ रुपये - अमेरिकेने युगांडाला मदत केल्याच्या थाटात - कोकलून कोकलून सांगणारे अनाउंसर. कुठे कुठे वीज पोचली होती. पण बराच भाग घासलेटच्या दिव्यांवर रात्रीचा अंधार गडद करत असे. शहरात, अगदी झोपडपट्टीच्या सीमारेषेपासून पुढे सूखवस्तूंची वसाहत सुरु होत होती. तिथे सगळा झगमगाट असे. त्या सीमारेषेवरच आमचं घर होतं. रेल्वेची जागा आहे असे ठणकावून सांगणारा मोठा दगड, आमच्या घराच्या अंगणाच्या एका कोपर्यात रुतलेला होता. रेल्वेची अतिक्रमित जागेची, पर्यायाने त्या दोन किमी आडव्या पसरलेल्या गोधडीची किनार, व आमच्या घराच्या अंगणाची सीमा दाखवणारा तो दगड कालांतराने जमीनीखाली गेला. भक्तांना दृष्टांत द्यायला देवाचे दगड वर येतात. आम्हाला अभय द्यायला तो दगड खाली पुरला गेला.
आमचं घर, कुडाचं, पक्कं नाही. पण हवेशीर. झोपडी नाही. मोठ्या बल्ल्यांनी मजबूत बांधलेले, मातीने लिपलेल्या जाड भिंती असलेलं दहा-बाय दहा च्या दोन खोल्या असलेलं... उंच व मजबूत होतं, प्रशस्त नव्हतं, गरजेपुरतं. जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट. पण झोपडपट्ट्यांमधे नसलेल्या अनेक गोष्टी आमच्या घरात होत्या. काही दिवस अंधारात, व स्टोव्हवर स्वयंपाक केल्यावर अण्णांनी खटपट करून वीज कनेक्शन व गॅस सिलेंडर कनेक्शन मिळवलं. थोडे पैसे घालून दारात बोअर मारून, हातपंप वाली कमनीय बांधा असलेली हिरवी जलदेवता उभी केली. आमच्या घरासमोर कुठलीही झोपडी नव्हती, निदान सुरुवातीचे अनेक वर्षे. दूर नजर जाईल इतपर्यंत मोकळे मैदान होते. सुखवस्तूंची वसाहत डाव्या बाजूला. उजव्या बाजुला सरकारी खात्याची जमीन. एकुण ८-१० वर्षाच्या मुलासाठी तो आजच्या काळातला स्वर्गच होता.
वीज, पाणी आल्याने आम्ही खूप फेमस झालो. आमच्या हापशी-हातपंपावरून लोक रोज पाणी भरायला लागले, अतिशय गोड आणि दर्जेदार पाणी होतं. तिथे आजुबाजूला दोन-तीन हापशा होत्या. त्यातली एक आमची. हिचं पाणी, आमचा स्वभाव दोन्ही गोड. सकाळ-संध्याकाळ नुसती रीघ असायची. गर्दी फार व्हायला लागली, २४ तास. मग एका कुटुंबाकडून, पाणी भरायचे, आम्ही दहा रुपये महिना प्रमाणे पैसे घ्यायला लागलो. आमच्या घरातून वीज नसलेल्या झोपड्यांमधे वीज दिली गेली. आजूबाजूच्या किमान साठ-सत्तर घरांमधे आमच्या घरातून वीज दिली जात होती. एक तर घर चांगले सात-आठशे फुटांवर होते. इतक्या लांब वीज वाहून नेणे, त्यांच्या वायरी सांभाळणे, बरेच उद्योग होते. पैसे मिळायचे पण त्यापेक्षा महत्त्वाचे आपण ज्या लोकांमधे राहतो त्यांना कशी का होईना आपल्यातर्फे थोडी मदत होत होती. असून असून लोकांकडे एखादा बल्ब, टेबल-फॅन असायचा. वीस-पंचवीस रुपये महिना. नंतर हळूहळू सरकारी निर्बंध शिथिल होऊन राजमान्यता मिळाल्यावर सगळ्यांकडे स्वतःचे वीज कनेक्शन आले. वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी आमच्याही घरचे फ्युज नेहमी उडायला लागले होते. एकदा तर सगली वायरींग जळली. तो धंदा आम्ही बंद केला.
परिस्थिती फिरते. जिथे फुले वेचली तिथे गोवर्याही वेचायची वेळ आमच्यावरही आलीच, पुढे आम्हालाही काही दिवस दुसर्यांचे कडून महिना पन्नास-शंभर रुपये देऊन वीज घेऊन राहावे लागले. सतत उपसा होऊन आमची जलदेवता रुष्ट झाली. कपडे धुण्याइतकेही चांगले पाणी तिच्यातून मिळत नव्हते. आम्हाला दुसर्यांच्या हापशांवर जाऊन दहा रुपये महिन्यानी पाणी भरायला लागले.
आम्ही त्याठिकाणी राहिलो उणीपुरी १२ वर्षे. घर, आणि परिस्थिती मोडकळीस आली. बहिण वयात यायला लागली तेव्हा तिथे थांबणं चुकीचं वाटू लागलं. अण्णांनी ज्या परिस्थितीत हे स्वतःचं घर मिळवलं होतं ती परिस्थिती सतत आठवून त्यांना ते विकायचे नव्हते. आम्ही हट्टाला पेटलो होतो. स्वत:च्या मोठ्या घरातून टीन-पत्र्याच्या दिडशे फुटाच्या भाड्याच्या खोलीत जाणे त्यांच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हते. इथल्या आलेल्या किमतीत चांगल्या वस्तीत घर घेणे शक्यच नव्हते. आमच्या सततच्या धोशाने वडिलांना ते घर विकणे भाग पडले. ते घरही नंतर बरेच ढेपाळले होते.
ती झोपडपट्टी आणि तिथल्या बारा वर्षांनी खूप अनुभव दिले. आठवले तसे लिहितो. पण फार जास्त नाही लिहिणार. काही अजूनही आठवणारे.... असेच मनावर परिणाम करून गेलेले. काही लोक, काही वस्तू, काही घटना.... झोपडपट्टीतले दिवस.
क्रमशः
(सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. प्रथम प्रकाशनः मिसळपाव.कॉम. दिनांकः २२ ऑक्टोबर २०१५)
प्रतिक्रिया
4 May 2016 - 11:48 pm | ट्रेड मार्क
अतिक्रमण केलेल्या सरकारी जागेचे तुम्ही पैसे दिले होते होय. हे नवीनच आहे. विकत घेतली होती का भाडं भरत होतात? कोणाला पैसे देत होतात ते? सरकारला का एखाद्या सरकारी नोकराला का तिथल्या गुंडाला?
मी कुठे डोकं चालवायचं हे पण तुम्ही सांगणार का? एक तर सरकारी जमीन, वीज पाणी वापरलं वर त्यावर पैसेपण मिळवले आणि त्यावर मला धमकी पण देताय. घाबरलो बरं का मी.
इतर धाग्यांवर प्रामाणिकपणाचा डंका पिटता.
तुम्हीच वर म्हणलात जे आहे ते मान्य करतो. मग आता कशाला त्रास होतोय?
पुढचे भाग येऊस्तोवर थांबू म्हणताय, तर थांबतो.
4 May 2016 - 11:55 pm | तर्राट जोकर
स्कोअर सेटलिंग करण्यावर तुम्ही उतरलात ह्यातंच काय ते आलं.
5 May 2016 - 12:11 am | ट्रेड मार्क
मी स्कोअर कार्ड वापरत नाही त्यामुळे मी कोणाविरुद्ध किती स्कोअर केला आणि माझ्याविरुद्ध कोणी किती स्कोअर केला ह्याची पण नोंद ठेवत नाही.
मी जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो नक्की काय आहे ते. त्या दुसर्या धाग्यावर तुम्ही जेव्हा म्हणालात की देशाचे कुठल्याही प्रकारे नुकसान करणाऱ्याला शासन झाले पाहिजे तेव्हा तुमचा अभिमान वाटला होता समस्त मिपाकरांना (माझ्यासकट). पण इथे मात्र जे तुम्ही सांगताय ते देशाचे नुकसान कसे नाही ह्याची संगती लावण्याचा प्रयत्न करत होतो. पण जर का तुम्हाला अडचणीचे वाटत असेल तर राहुदे. पुढच्या लेखांमधून मी समजून घ्यायचा प्रयत्न करीन. त्यावर काही प्रश्न उद्भवले तर विचारायला हरकत नसावी तुमची अशी अशा करतो.
5 May 2016 - 12:26 am | तर्राट जोकर
नको साळसूदपणाचा आव आणायला. गरज नाही त्याची. जे अजून पुढे यायचे आहे त्याचे अंदाज लावणे त्याचीही आवश्यकता नाही. आले की समजेलच. तसेच टोनही कळतो तुमच्या प्रतिसादांचा. तुम्ही आधीच्या प्रतिसादात जे प्रश्न विचारलेत त्याबद्दल तर मी कित्येक महिने आधीच्या प्रतिसादात लिहिले आहेच. इथे तुम्ही जाब विचारल्यासारखे प्रश्न मांडत आहात, ज्याची तुम्हाला काय गरज आहे तुमचं तुम्हाला माहिती. बाकी मला काही अडचणीचे आहे किंवा नाही हे तुम्हीच परस्पर कसे ठरवता? गंमत आहे बॉ.
शहाजोगपणा कळतो हो. वेड पांघरुन पेडगावला जाणारे छप्पन पाहिलेत. नवल नाही वाटत आजकाल. आधीच्या प्रतिसादांमधे कैक वेळा लिहिले आहे. की पुढच्या भागांमधे डिटेल्स येतील. तरी तेच तेच खोचकपणे विचारणे ह्यात तुमचाच स्वभाव दिसत आहे.
दुसरे असे की, ज्या उद्देशाने ही लेखमाला लिहायला घेतली तो उद्देश इतका गढुळ करुन टाकलाय आता लोकांनी की बास रे बास. सगळे त्या मोकळ्या जागेभोवती घिरट्या घालत आहेत. असो. जैसी जिसकी सोच.
"शांतता कोर्ट चालू आहे" ची आठवण झाली.
5 May 2016 - 1:53 am | ट्रेड मार्क
याच लेखातील कितीतरी प्रतिसाद तुमच्या उत्तरांच्या प्रतीक्षेत पडून आहेत गेले ६ महिने. जास्त प्रश्न विचारत नाही उगाच पुढचा भाग उशिरा टाकण्याबद्दल मला दोषी धरलं जाईल. मी तुम्हाला हे प्रश्न अडचणीचे आहेत असं विधान अजिबात केलं नाही. मी म्हणतोय की तुम्हाला अडचणीचे वाटत असेल तर राहू दे. नसेल वाटत तर उत्तर दिलेत तरी चालेल. थोडक्यात तुमच्यावर आहे.
पुढे काय असेल याचा अंदाज लावायला पण बंदी करताय तुम्ही आता. कमाल आहे.
थोडे स्पष्टीकरण
आता कुठलंही पांघरून न घेता सरळ सांगतो. झोपडपट्टी म्हणलं की बहुतेक वाचकांच्या डोळ्यासमोर मुंबईतील बकाल झोपडपट्टी येते. ज्यात फार तर ५०-१०० फूट जागा (जरा जास्तच सांगतोय का?), पाणी नाही, विजेचं चोरून कनेक्शन, उघडी गटारं, घाण वास, रात्रीचे विविध उद्योग, गुंडागर्दी या गोष्टी येतात.
तुमच्या लेखात काही वाक्य अशी आहेत की ज्यावरून परिस्थिती एकदम विरुद्ध आहे असं वाटतंय. हजार बाराशे चौ फूट मध्ये झोपडी, ती सुद्धा चांगलं बांधकाम असलेली, हे माझ्यासारखा मुंबईत राहिलेला मनुष्य कल्पनेत सुद्धा आणू शकत नाही.
इतर काही वाक्यांमुळे वाटतं की दुसरीकडे राहणे शक्य असून तुम्ही इथे रहायचात कारण जागा(?) वीज पाणी ई गोष्टी फुकट होत्या. विदा. १. खटपट करून वीज कनेक्शन व गॅस सिलेंडर कनेक्शन मिळवलं. थोडे पैसे घालून दारात बोअर मारून, हातपंप वाली कमनीय बांधा असलेली हिरवी जलदेवता उभी केली. २. एकदा तर सगली वायरींग जळली. तो धंदा आम्ही बंद केला. ३. परिस्थिती फिरते. जिथे फुले वेचली तिथे गोवर्याही वेचायची वेळ आमच्यावरही आलीच. ४. आम्ही त्याठिकाणी राहिलो उणीपुरी १२ वर्षे. घर, आणि परिस्थिती मोडकळीस आली. ई ई.
असो.ही माझी समजूत झाली आणि कदाचित इतरही काही सदस्यांचीपण (प्रतिसादांवरून तसं वाटतंय). चुकीचीही असेल. परिस्थिती कोणाची कशी असते हे सांगता येत नाही. तुमचा लिहिण्याचा उद्देश मला वाटला तसा नक्कीच नसावा.
वर एके ठिकाणी म्हणल्याप्रमाणे आमच्या चाळीखालीच झोपडपट्टी होती. तेथील लोकांनी केलेली वीज चोरी, पाणी चोरी, रात्रीचे उद्योग ई मुळे झालेले त्रास आठवले. बाकी काही नाही. जैसी जिसकी सोच हे खरंच आहे. पण तुम्ही लिहित रहा. पुलेशु.
5 May 2016 - 2:07 am | तर्राट जोकर
हम्म्म्म, धन्यवाद.
ही मुंबईतली झोपडपट्टी नाही हे स्पष्ट केलंय आधीच. "हजार बाराशे फूट जागा" वाचून हाडाच्या मुंबईकरांची चलबिचल झाली हे माहित आहे. त्याबद्दलही प्रतिसादांमधे नीट विवेचन केलंय. आता इतके प्रतिसाद दिलेले की मी परत तुम्हाला त्या सगळ्यांची लिंक नाही देऊ शकत. जमत असेल तर वाचून घ्या. आणि खरंच प्रश्न विचारायचे थांबाल तर पुढच्या कथनाचा योग्य आस्वाद घेता येईल. अंदाज बांधून उपयोग नाही.
4 May 2016 - 9:21 pm | ईश्वरसर्वसाक्षी
उनकु छोडो मिया...हम लोगा कबसे किरकिरि कर्रेले है यारो कब लिखोगे २ रा भाग.
4 May 2016 - 9:27 pm | तर्राट जोकर
आयेगा जल्दी. इष्टार्ट करता अबी.
5 May 2016 - 2:02 am | वैभव जाधव
माझ्या मते जेव्हा जमिनीचे भाव अगदी च बाद होते, लोक जाताजाता एखाद्या ला दोन खोल्या राहायला द्यायचे तेव्हाच्या काळात अनधिकृत वस्त्या हळू हळू उभ्या होणं हे सामान्य होतं. पारशी लोकांचे दक्षिण मुंबई मधले बंगले असो, राव रेड्डी लोकांच्या आंध्रा मधल्या जमिनी असोत, अनेक पाटलांच्या पच्चिम महाराष्ट्रातल्या जमिनी असोत किंवा कोकणातल्या अनेक वाड्या असोत, एकतर कवडी मोलानं , काही कर्ज आणि त्यावर चं भरमसाट व्याज किंवा 'तशाच' घेतल्या गेल्या आहेत.
त्यामुळं 'आतातरी' कलकलाट न करता तर्राट जोकर ने फुडची चाल खेळावी ही णम्र ईनंती ह्याठिकानी मी करीत आहे.
(न खेळल्यास होनाऱ्या परीनामांना आणि दिल्या जानाऱ्या श्या ना आमी जबाबदार नाही!)
5 May 2016 - 2:08 am | तर्राट जोकर
=)) =))
6 May 2016 - 6:35 pm | लालगरूड
નિપક્ષ લેખ