तुकाराम होणे

देवदत्त परुळेकर's picture
देवदत्त परुळेकर in जे न देखे रवी...
7 Mar 2015 - 6:45 am

आज तुकाराम बीज. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी
विनम्र अभिवादन.
तुकाराम होणे

विठ्ठल होणे सोपे आहे
कठीण तुकाराम होणे
मंबाजीची काठी खाणे
त्याचे हात कुरवाळणे

कठीण दुष्काळ सोसणे
रोखे इंद्रायणी बुडविणे
गोदाम जनात लुटविणे
आपुले दिवाळे काढणे

कठीण भंडारी एकांत
सोयरे वनचरा होणे
अंगी वृक्षवल्ली हो‌ऊन
डो‌ई पाखरू बसणे

कठीण दैवासी हासणे
आ‌ई बाप गमावणे
पत्नी पुत्रा अग्नी देणे
विठो चरणी विसावणे

कठीण भजनाचा नाद
किर्तनी ब्रह्मीभूत काया
नाम धरुनिया कंठी
देवा ऋणी करुनी ठेणे

कठिण जनांसी उपदेश
नाठाळाचे माथी काठी
गाथा इंद्रायणी बुडविणे
जन गंगेत तारणे

कठीण पालखी त्यागणे
नजराणा माघारी झाडणे
इंद्रियांचा स्वामी होणे
गोसावीपण उपभोगणे

- देवदत्त परुळेकर मो.९४२२०५५२२१

भावकविताविठ्ठलशांतरससंस्कृतीधर्मइतिहासकवितामुक्तक

प्रतिक्रिया

खंडेराव's picture

7 Mar 2015 - 7:00 am | खंडेराव

छान कविता..

अत्रुप्त आत्मा's picture

7 Mar 2015 - 11:23 am | अत्रुप्त आत्मा

छान मांडणि!

धर्मराजमुटके's picture

7 Mar 2015 - 7:29 pm | धर्मराजमुटके

सुंदर ! तुकाराम होणे किंवा एकंदरीच जगतात वंदनिय होणे सोपे नाही.
तुकाराम होण्याची पात्रता असणार्‍या बीजाला हवी अंगभूत चिकाटी. त्याचबरोबर प्रतिकूल माती, प्रतिकूल हवा. अशी बीजे प्रतिकूल परिस्थितीतच बहरतात.
मात्र बरीच तुकाराम बीजे पुरेसी चिवट नसल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत रुजतच नाहीत. जी रुजतात ती पुर्णपणे अंकुरतच नाहीत. जी अंकुरतात त्यावर इतर विचारांचे कलम केले जाते. शिवाजी जन्मावा पण दुसर्‍याच्या घरात अशी एक म्हण होती. पण आता ती देखील काळाच्या महिम्यात धुसर होत जाईल हळूहळू. त्यामुळे तुम्हाला (आणि आम्हाला) आवडणारा तुकाराम पुन्हा होणे नाही. भारतीय मन वर्तमानापेक्षा भुतकाळातच रमू पाहते ते बहुतेक याचमुळे.

टीप : कवीने उल्लेखिलेली तुकाराम बीज आणि मी उल्लेखीलेले बीज हे संपुर्णपणे वेगवेगळे आहेत याची जाणीव मला आहे. नाहितर उगीच याल 'ये पीएसपीओ जानता नही !' म्हणत. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Mar 2015 - 7:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कविता !

मदनबाण's picture

8 Mar 2015 - 9:32 am | मदनबाण

सुंदर !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupana Bhi Nahin Aata... { Baazigar }

चुकलामाकला's picture

8 Mar 2015 - 10:43 pm | चुकलामाकला

वाह!

ज्योति अळवणी's picture

9 Mar 2015 - 9:24 am | ज्योति अळवणी

सुंदर