विखुरलेला चंद्र - १
विखुरलेला चंद्र - २
त्या रात्री चंद्रही जरा उशीराच उठला
शिकार्यात तुझ्या समोर बसून
मोहवणार्या धुक्यातून फिरतांना
जणू आरश्यासमोर बसलो होतो
-----
हे विधिलिखित कां योगायोग?
-----
तुझ्या त्या डायरीतून
तू एक एक दु:खपान
वाचतही होतीस फाडतही होतीस
माझ्या डोळ्यातून चार थेंब ओघळले
अगदी ठरल्यासारखे, ठरविल्यासारखे..
------
काळाने एका विचित्र वळणावर आणून दगा दिला
शिकार्याचे वल्हे पाण्यात छोटुल्या लाटा पसरवत होते
आणि सरणारा काळ हृदयात घण घण वाजत होता
अगदी ठरल्यासारखे, ठरविल्यासारखे..
------
पाण्यावर दूरवर पानेच पाने तरंगत होती
घरंगळत ती पाने त्या पाण्यातल्या चंद्रावर
जाऊन आदळली... आणि
खळ्ळकन आवाज झाला
------
हे ही विधिलिखित कां योगायोग?
------
मी इतकचं म्ह्टलं,
तेवढे चांद्रकण घेऊन जा
त्या विखुरलेल्या चंद्राची आठवण म्हणून...
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२९/१२/२०१२)
प्रतिक्रिया
30 Dec 2012 - 5:58 pm | कवितानागेश
२/१० नंतर डायरेक्ट ३०/१२.
आपल्यावर 'कारणे दाखवा' नोटीस का बजावल्या जाउ नये, याचे कारणे दाखवा! ;)
पुढच्याच भागवर या भागाबद्दलची प्रतिक्रिया मिळेल, कितीही छान लिहिलेले असले तरी. :)
31 Dec 2012 - 11:34 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सपशेल माघार घेण्यात येत आहे.
उजव्या कानावर डावा हात व डाव्या कानावर उजवा हात ठेवून माफी मागतो.
30 Dec 2012 - 6:33 pm | अत्रुप्त आत्मा
मधे बराच वेळ गेलेला असला,तरी करंट कंटिन्यू राहिलेला असल्यामुळे... ;-) लाइक इट :-)
30 Dec 2012 - 8:15 pm | पैसा
सगळा उशीर माफ!
31 Dec 2012 - 3:55 pm | गवि
क्या बात, क्या बात, क्या बात...
मिका = उत्कृष्ट दर्जाची काव्यं हे समीकरण प्रत्येक क्रिएशनसोबत आणखी घट्ट होत चाललंय..
31 Dec 2012 - 5:15 pm | सूड
>>मिका = उत्कृष्ट दर्जाची काव्यं हे समीकरण प्रत्येक क्रिएशनसोबत आणखी घट्ट होत चाललंय.
प्रचंड सहमत !!