विखुरलेला चंद्र

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
30 Sep 2012 - 12:02 pm

त्या खिडकीच्या काचेमागे एक चंद्र अडकलाय
अन् काचेवर काजळी..
तिथेच आम्ही तिघे होतो
ती होती, माझा एकटेपणा होता आणि हो, मी पण होतो
असं वाटत होतं, जणू काही समुद्राच्या तळाशी एक बुडलेला दुसरा समुद्र पडलाय...
पण आपण सगळे एकमेकांचे नक्की कोण होतो?
--------
चंद्राच्या काही काही मागण्या अगदी विचित्र असतात
एक तर त्याच्याबरोबर सगळी रात्र जागावे लागते
आणि रात्रभर जागूनही बोललेले चालत नाही त्याला
असचं एकदा त्याने तुला जागवले होते
त्याचा डाग अजुनही अंगावर वागवतो आहे तो
--------
तिला माहीत होते तिला जावेच लागेल
ति थांबली नाही अन् मीही अडवू शकलो नाही
किनार्‍यापासून पाण्यावर दुरवर चंद्र प्रकाशाचे एक शेपूट पसरले होते
समुद्र आणि चंद्र दोघे मिळून झुलणार्‍या तारकांना
अजूनच झोके देत होते..
जणू चंद्रच विखरुन पाण्यावर आपले चांद्रकण पसरत होता
त्यातले काही कण गोळा करुन घेतले
म्ह्टले, तेवढे घेऊन जा
विखुरलेल्या चंद्राची आठवण म्हणून...
--------
जातांना असे वळून पाहीलेस..
जणू सगळाच्या सगळा समुद्र एका नजरेत बांधून, गुंडाळून
घेऊन निघाली होतीस...
तेवढे चांद्रकण घेऊन जा
विखुरलेल्या चंद्राची आठवण म्हणून...

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
( ३०/०९/२०१२)

करुणशांतरसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानराम's picture

30 Sep 2012 - 12:06 pm | ज्ञानराम

"जणू काही समुद्राच्या तळाशी एक बुडलेला दुसरा समुद्र पडला

किनार्‍यापासून पाण्यावर दुरवर चंद्र प्रकाशाचे एक शेपूट पसरले होते
समुद्र आणि चंद्र दोघे मिळून झुलणार्‍या तारकांना
अजूनच झोके देत होते..

जातांना असे वळून पाहीलेस..
जणू सगळाच्या सगळा समुद्र एका नजरेत बांधून, गुंडाळून
घेऊन निघाली होतीस...
तेवढे चांद्रकण घेऊन जा
विखुरलेल्या चंद्राची आठवण म्हणून..."

विशेष आवडले . खुपच सुंदर ... अप्रतिम काव्य रचना .. मस्तच..

श्रावण मोडक's picture

30 Sep 2012 - 12:07 pm | श्रावण मोडक

शेवट एक स्वतंत्र कविताच आहे. :-)

सुहास..'s picture

30 Sep 2012 - 12:38 pm | सुहास..

लय भारी रे मित्रा !

शेवटच कडव खरच खास !

पुन्हा पुन्हा वाचावी अशी झालीय..

चाणक्य's picture

30 Sep 2012 - 2:25 pm | चाणक्य

झालीये. फुल आवडली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2012 - 2:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

कवितानागेश's picture

30 Sep 2012 - 4:02 pm | कवितानागेश

अतिशय सुंदर. :)

सुधीर's picture

30 Sep 2012 - 4:19 pm | सुधीर

आवडली कविता.

किसन शिंदे's picture

30 Sep 2012 - 4:28 pm | किसन शिंदे

अप्रतिम कविता!!

होतात कुठे इतके दिस?

तिमा's picture

30 Sep 2012 - 4:40 pm | तिमा

तरल उत्कट कविता.
अशा प्रेमकविता व्हायला आधी स्वतःचा 'गेम' व्हावा लागतो. तेवढंही कुठलं आमच्या नशिबात.

निरन्जन वहालेकर's picture

30 Sep 2012 - 6:14 pm | निरन्जन वहालेकर

अतिशय सुन्दर ! ! अप्रतिम ! ! !

इन्दुसुता's picture

30 Sep 2012 - 6:55 pm | इन्दुसुता

अतिशय सुंदर. कविता फार आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Sep 2012 - 7:17 pm | अत्रुप्त आत्मा

जाई.'s picture

30 Sep 2012 - 8:41 pm | जाई.

शेवटच कडव छान जमलय

पैसा's picture

30 Sep 2012 - 9:34 pm | पैसा

फार छान झालीय कविता!

स्पा's picture

1 Oct 2012 - 12:50 pm | स्पा

आहाच..
मिक्या तुझा क्लास वेगळाच आहे रे..
फुल टाईम कवी हो लेका
किती सुंदर झालीये
"विखुरलेला चंद्र".. मस्तच कल्पना
पुन्हा पुन्हा वाचावी अशी झालीये रे..

फक्त मिकाच्याच कविता मला कळतात, अस वाटायला लागलंय :)

यशोधरा's picture

2 Oct 2012 - 9:06 am | यशोधरा

सुरेख.

मस्त कलंदर's picture

2 Oct 2012 - 12:03 pm | मस्त कलंदर

कविता आवडली.. विशेषत: शेवटलं कडवं. ती एक स्वतंत्र कविता होऊ शकते या श्रामोंच्या मताशी सहमत.

सहज's picture

2 Oct 2012 - 12:22 pm | सहज

गुलझार-मेरा कुछ सामान- एकसौ सोल चांद की राते वगैरे वगैरे आठवले..

असो करुण रस आहे असे वाटल्याने कविता नाही आवडली.

गोमटेश पाटिल's picture

10 Oct 2012 - 1:12 pm | गोमटेश पाटिल

dusarya bhagapeksha khupach chaan aahe...

मृत्युन्जय's picture

10 Oct 2012 - 1:21 pm | मृत्युन्जय

खुप सुंदर आहे रे मिका. लैच भारी कविता केलीस की. :)

फिझा's picture

16 Oct 2012 - 3:09 am | फिझा

कविता आवडली.!!!