विखुरलेला चंद्र - २

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
2 Oct 2012 - 12:49 pm

मस्त धुकं होत त्या रात्री
दुधाळलेल्या रंगाची वस्त्रे अंगावर लेवून तू आलीस..
शुभ्र मोगर्‍याचा गजरा केसात माळून
मोगरा लगेच धुक्याशी सलगी दाखवत त्याला बिलगला
त्या क्षणावर फक्त तुझा आणि तुझाच हक्क होता
------
त्या सुगंधी धुक्यात आपण असे होतो
जणू आजूबाजूला उगवलेली दोन रोपटी...
एक तुळस आणि एक.....
तुझ्या कर्णफुलांवर दोन दोन मंजीर्‍या होत्या..
गोजीरवाण्या.. तुझ्याचं सारख्या...
------
तू बोलत होतीस
जणू आपल्या खट्याळ ओठांनी चांद्रप्रकाश शिंपून
गूढ कोलाज चितारत होतीस
तिकडे चंद्र चूर चूर होत होता
चंद्र आणि धरती मध्ये पण काही ओढ असते कां गं?
-------
चूर चूर चंद्राचे चांद्रकण
मी परत एक एक करून गोळा करु लागलो
-------
या धक्क्यातून मी सावरलोही नव्हतो..
अन् तू बोलता बोलता त्याच सुगंधी धुक्यावर पाय ठेवून निघालीस...
तिला जावे लागणार हे तिलाही माहीत होते...
ति थांबली नाही अन् मीही अडवू शकलो नाही
तेवढे गोळा केलेले चांद्रकण घेऊन जा..
विखुरलेल्या चंद्राची आठवण म्हणून...

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०२/१०/२०१२)

शृंगारकरुणकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

स्पा's picture

2 Oct 2012 - 2:02 pm | स्पा

क्लास.

@तू बोलत होतीस
जणू आपल्या खट्याळ ओठांनी चांद्रप्रकाश शिंपून
गूढ कोलाज चितारत होतीस
तिकडे चंद्र चूर चूर होत होत@@@@

एक नम्बर..:)

मिसळलेला काव्यप्रेमी साहेब, अतिशय सुंदर कविता.
स्पा साहेब म्हणतात तस , एक नंबर

प्रशांत's picture

10 Oct 2012 - 1:12 pm | प्रशांत

अतिशय सुंदर कविता.

सुधीर's picture

2 Oct 2012 - 6:52 pm | सुधीर

छान आहे. पण पहिली खूपच सुंदर वाटली. विखुरलेल्या चंद्रावरल्या पुढल्या कविंतांसाठी अनेकोनेक शुभेच्छा!

जाई.'s picture

2 Oct 2012 - 8:53 pm | जाई.

ठीक

ज्ञानराम's picture

6 Oct 2012 - 11:59 am | ज्ञानराम

छानुस्का......

तात्यांची आठवण आली कारे बाबा?
बाकी काव्यमाल्लीका छानच आहे.

गोमटेश पाटिल's picture

10 Oct 2012 - 1:06 pm | गोमटेश पाटिल

kavitene madhech ghetaleli kalatani ruchali nahi pan shevatchya kadvyamadhali hrudayasparshi bhavana hur-hur lavun geli....

सुहास..'s picture

11 Oct 2012 - 1:46 pm | सुहास..

मस्त !!

शेवट सुंगधावर पाय देवून ई. विषेश आवडले :)

इन्दुसुता's picture

14 Oct 2012 - 9:52 pm | इन्दुसुता

विखुरलेले चांद्रकण चटका देऊन गेले ( म्हणून आवडले म्हणवत नाही )!!

फिझा's picture

16 Oct 2012 - 3:05 am | फिझा

कवित मस्त आहे ...!!!