निसर्गकविता २ : प्रिय प्राजक्त

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
14 Feb 2012 - 9:46 pm

निसर्गकविता १ : झाडांच्या पानात (गीत) - http://www.misalpav.com/node/20633

प्रिय प्राजक्त:

आठवतेय तुला ?
नाजुक फुलांसवे प्रथम घेतलेला
ओंजळीतला तो गंधीत स्पर्ष

वार्‍याच्या एका झोतामध्ये
झोकुन दिलेले ते सर्वस्व

गंधाळलेल्या शुभ्र आयुष्यामध्ये
अनुभवलेल ललाटी लाल वर्चस्व

आठवतच असेन ना तुला ?

सुगंधाची बरसात होताना
ह्रद्यावर कोरले गेलेले
प्रितीचे ओथंबलेले क्षण ... आयुष्यभरासाठी ..

दंगलेल्या अतिव रजनीशी
एक गोंदलेली आठवण
एक मुर्तीमंत जाणीव... जगण्याची ...

म्हनुन म्हणते मी
तु असाच फुलत रहा
अगदी माझा नसतानाही
असाच अंगणी बहरत रहा.. फक्त माझ्यासाठी...

शृंगारशांतरसकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

14 Feb 2012 - 10:13 pm | पक पक पक

गंधाळलेल्या शुभ्र आयुष्यामध्ये

ए काय ग्रेट माणूस आहेस तु..? कसल भारी काय काय ..... कमाल आहे तुझी.

प्रचेतस's picture

14 Feb 2012 - 10:28 pm | प्रचेतस

कवि गणेशा:

आठवतेय तुला,
इकडे तिकडे यायला केलेली अ‍ॅडजस्ट्मेंट
येताना खालेल्या शंकरपाळ्या

पाण्याच्या एका लोटामध्ये
पायर्‍यांवर लोळलास तू ऐनवेळा

पुण्याच्या दुर्वांकुरामधल्या
अनुभवलेल्या त्या आम्रवेळा

आठवतच असेन ना तुला ?

पुणे गेटची भव्य सुरमई
हातभर लांबीची
फ्रुटपंच लेयरवाला.... पिण्यासाठी

दिसत नसलेल्या फोटोंची
कायमची असलेली आठवण
सतत अनिवार इच्छा..बघण्याची

म्हणून म्हणतो मी
अशाच कविता टाकत राहा.
फोटो दिसत नसता ही,
सतत तेच सांगत राहा. ..सगळ्या मिपाकरांसाठी

पक पक पक's picture

14 Feb 2012 - 10:39 pm | पक पक पक

"पुणे गेटची भव्य सुरमई"

अरे हा हे लिहायच राहुनच गेल .(ते दोघात एक मासा...५०/५० लक्शात आहे ना...) ;)

धन्यवाद वल्ली आठ्वण करुन दिल्या बद्द्ल

बाकी तुमच काव्य देखिल मस्त....(फ्रुटपंच लेयरवाला....दोघात एक चालेल का..?) ;)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Feb 2012 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा

वल्लीदा...पूर्णपणे छप्पर उडालेलं आहे...संपूर्ण विडंबनासाठी...फक्त...फक्त आणी...फक्त

गणेशा's picture

14 Feb 2012 - 11:08 pm | गणेशा

हसुन हसुन आता पोट दुखेल आता... भारी जमलय तुला..

'आम्रवेळा' शब्द जबरदस्तच..
या शब्दामुळे तुला दुर्वांकुरची एक आम्रवेळ माझ्यातर्फे.

@ पक पक पक
सुरमई मिलेगी .. सबको मिलेगी .. विथ लेयरवाला फ्रुट पंच ..

बाकी तुम्ही रिप्लाय मध्ये जी तारीफ करता ती मात्र पचायला लय जड जाते बघा

बाकी तुम्ही रिप्लाय मध्ये जी तारीफ करता ती मात्र पचायला लय जड जाते बघा

तुम्हाला आमच अस पण जड जात अन् तसं पण जड जात.. आता तुम्हीच सांगा कस कराव आम्ही.. ;)

५० फक्त's picture

15 Feb 2012 - 8:06 am | ५० फक्त

न म स का र.

मोदक's picture

16 Feb 2012 - 12:53 am | मोदक

ज ह ब ह र्‍या. :-D

अरुण मनोहर's picture

15 Feb 2012 - 4:36 am | अरुण मनोहर

वाह क्या बात है! ओंजळभर प्राजक्ताचा सुवास भरभरून घ्यावा आणि आणखीन आसुसावे तसे झाले.

कविता, विडंबन दोन्ही मस्तच !!

प्यारे१'s picture

15 Feb 2012 - 11:35 am | प्यारे१

+२४.२५

जागु's picture

15 Feb 2012 - 12:17 pm | जागु

गणेशा सुंदर कविता आहे. शेवटच्या ओळी खास आवडल्या.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Feb 2012 - 4:44 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

दंगलेल्या अतिव रजनीशी
एक गोंदलेली आठवण
एक मुर्तीमंत जाणीव... जगण्याची ...

आपले चरण पाठवून द्यावेत.

मस्त रे... मलिका छान जमून येतेय.

पुभाप्र.

प्रेरणा's picture

20 Feb 2012 - 12:13 pm | प्रेरणा

मालिकेत पुढे गुलमोहर यायला हरकत नाही. वेळ झालीच आहे त्याच्या फुलण्याची!!
कविता सुंदरच.

पैसा's picture

15 Feb 2012 - 8:18 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच सुंदर!
(वल्ली =))=)))

इन्दुसुता's picture

17 Feb 2012 - 9:05 am | इन्दुसुता

कविता आवडली खूप