झाडांच्या पानात
वेलींच्या फुलात
पाउस दाटुन आला
रिमझिम सरीत
भिजल्या मातीत
आठव देवुन गेला ||२||
वार्याचा पदर
नभीची चादर
चिंबन करीत आला
ओंजळ भरुनी
मेघात न्हाऊनी
ओटीत घालुनी गेला ||१||
बरसली ती..
झिरपली ती ..
मल्हार वेल्हाळ आला
थेंबांची आरती
पानांची पालखी
आंदण देवुन गेला ||२||
भिजल्या मनात
सजल्या रानात
केशर शिंपित आला
झाडांची झावळी
स्पर्शाने सोहळी
ओलेती करुन गेला ||२||
स्वप्नांच्या चाहुली
मिठीत साउली
वसंत शिंपत आला
कशाला आवरु
मनाला सावरु
माझ्यात गुंतुन गेला ||२||
झाडांच्या पानात
वेलींच्या फुलात
पाउस दाटुन आला
रिमझिम सरीत
भिजल्या मातीत
आठव देवुन गेला
---- शब्दमेघ ( निसर्गकविता १: झाडांच्या पानात)
गाण्याचे/कवितेचे नाव : झाडांच्या पानात
अल्बमः ये ना तू सख्या ...
प्रतिक्रिया
7 Feb 2012 - 6:24 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर!!
7 Feb 2012 - 7:01 pm | मयुरपिंपळे
मस्त मस्त मस्त
8 Feb 2012 - 1:18 pm | पक पक पक
ते मस्तच आहेत हो...पण तुमचा घाणा का ठंडावला आहे ....? ;)..?
9 Feb 2012 - 10:39 pm | मयुरपिंपळे
गपे पक पक
9 Feb 2012 - 11:04 pm | प्रचेतस
घाणा सुरु झालेला धुरावाटे जाणवतोय.
10 Feb 2012 - 10:39 pm | पक पक पक
:crazy:
घाणा ठंडावल्याची जाणिव खुप उशिरा झालेली दिस्त्ये. ;)
जिलब्या तळायला चुकुन तेलाएवजी रॉकेल ओतले कि काय..? :crazy:
7 Feb 2012 - 7:28 pm | लीलाधर
खुपच मस्त आणि जबरदस्तच
रिमझिम सरीत
भिजल्या मातीत
आठव देवुन गेला
7 Feb 2012 - 7:48 pm | मी-सौरभ
:)
7 Feb 2012 - 8:55 pm | प्रास
आयला गणेशा, ही तर एखाद्या हायकू सारखी तीनोळी झालीय रे!
आता ही खरंच हायकू आहे का नाही याची आपनेको फिकिर कायकू? ;-)
आपल्याला पाऊस आवडतो नि पावसाने केलेली सगळी कामंही आवडतात, आता हे जे काही आहे ते तुझं पावसावरचं काव्यदेखिल आपल्याला आवडलंय भौ....! :-)
बाकी ते नंबरींग असं काही खास कारणाने केलंय का रे? मध्येच ॥१॥ आणि मध्येच पुन्हा पुन्हा ॥२॥? तेवढं काही कळलं नै...
7 Feb 2012 - 9:25 pm | गणेशा
सर्वांचे प्रथम धन्यवाद !
@ प्रास भाऊ :
अव ती खाली लिंक दिलीया , तिच्यात ते कडवे २ दा म्हंटले आहे म्हणुन ||2||
बाकी खास असे काही नाही ..
आता ती लिंक ऐकली नाहि असे म्हणु नका.. नाहि तर गीतगुंजन कडे पाठ फिरावल्या जाईन.
7 Feb 2012 - 8:58 pm | जाई.
सुरेख
शेवटच कडव छान जमलय
7 Feb 2012 - 9:48 pm | प्रचेतस
तुझे हे गाणे ऐकलेले आहेच रे. आज त्याचे बोलही पुन्हा एकदा वाचायला मिळाले. मस्त, ताजेतवाने पावसात भिजल्यासारखे वाटले.
7 Feb 2012 - 10:06 pm | पैसा
एकदम पहिल्या पावसासारखी कविता! फक्त ती गाण्याची लिंक दिसत नाहीये. काय गडबड आहे बघ जरा.
7 Feb 2012 - 10:11 pm | गणेशा
jayshreeganesha.blogspot.com
मला दिसत आहे ..
7 Feb 2012 - 10:20 pm | पैसा
लिंक तुझ्या ब्लॉगवर जातेय, पण तिथे प्लेयर नाहीये, एक पांढरा चौकोनच आहे.
7 Feb 2012 - 10:23 pm | प्रचेतस
+१
सहमत आहे
7 Feb 2012 - 10:27 pm | गणेशा
आता, माझ्या येथे ब्लॉक आहेत ब्लॉग्स.
आणि कसे तरी ते गाणे मी मागे मित्राकडुन तेथे लावुन घेतले होते.
आता मला तसा प्लेयर नाहि देता येइचा, तेथे गाणे नसेन तर.
पाहतो मी नंतर
असो .. गाणे ऐकायला वाचण्यापेक्षा जास्त छान होते, संगितामुळे खुप शोभा वाढली होती ..
ट्राय करतो
7 Feb 2012 - 10:44 pm | अन्या दातार
कविता मस्तच आहे. मलाही तिथे ब्लॉगवर फक्त पांढरा चौकोन दिसतोय.
इतके दिवस प्रितीचं झुळझुळ पाणी माहिती होते, आता या संगिता आणि शोभा कुठुन आल्या ब्वा?? ;)
8 Feb 2012 - 1:09 am | ५० फक्त
आवरा, अशी एक स्माईली हवी होती इथं, कॉलिंग भटजी...
8 Feb 2012 - 11:12 am | विसोबा खेचर
सुंदर..
8 Feb 2012 - 11:24 am | जागु
खुप सुंदर झाली आहे कविता.
8 Feb 2012 - 11:45 am | चैतन्य दीक्षित
कविता मस्त.
>चिंबन करीत आला
यातला चिंबन हा शब्द थोडा खटकला.
पाऊस नभीची चादर चिंब करीत आला, असेच म्हणायचे आहे ना?
8 Feb 2012 - 1:09 pm | पक पक पक
गणेशा,
तुला सरस्वती प्रसन्न आहे का रे..? काय मस्त लिहीतोस तु , खुप मस्त वाट्त वाचायला.मिपा वरील काही ठराविक आवड्णार्या कविं पैकी तु नं.एक आहेस.... :)
(आपला दोघात एक मासा नक्की ना...?) ;)
8 Feb 2012 - 8:28 pm | मी-सौरभ
अन् पुणे गेट ला गेलात तर 'फ्रुट पंच' पण मिळू शकेल ;)
8 Feb 2012 - 9:09 pm | प्रचेतस
तो पण लेयरवाला.
8 Feb 2012 - 1:19 pm | नगरीनिरंजन
आवडली.
8 Feb 2012 - 1:34 pm | गणेशा
सर्वांचे मनापासुन आभार ...
तरीही गाणे देण्याचा प्रयत्न नक्की करीन ..
@ चैतन्य ,
शब्द थोडा फार खटकत असेलच असे वाटते आहे.
चिंबन करीत आला.
या ओळीतुन पाउस आठवणींसोबत चिंब भिजत /भिजवत वार्याचा पदरावर झुलत नभाच्या पंखाखाली बागडत आला असा अर्थ अपेक्षित होता.
@ पक पक पक
येव्हद्या स्तुतीची सवय नसल्याने, कसे तरी झाले एकदम..
तरीही मनापासुन धन्यवाद
8 Feb 2012 - 1:46 pm | पक पक पक
येव्हद्या स्तुतीची सवय नसल्याने, कसे तरी झाले एकदम..
अस काय ते..? आता सवय करुन घ्यायला हवी तुम्हाला ..आम्ही खरच मनापासुन प्रतिसाद दिला आहे त्यामुळे कसेतरी व्हायचे काही कारण नाही..
(ते माशाच तेवढ लक्शात ठेवा..) :)
8 Feb 2012 - 2:14 pm | स्पा
अप्रतिम....
आवडल्या गेली आहे
अभिनंदन गणेशा भाऊ
(सुरमयी फिक्स आता) ;)
8 Feb 2012 - 2:24 pm | पक पक पक
(सुरमयी फिक्स आता)
त्ये आमच ठरल आहे.....५०/५०
8 Feb 2012 - 2:25 pm | पक पक पक
(सुरमयी फिक्स आता)
त्ये आमच ठरल आहे.....५०/५० :crazy:
8 Feb 2012 - 2:40 pm | इरसाल
सुन्दर्,सुरेख आणी अप्रतिम.
8 Feb 2012 - 3:16 pm | वपाडाव
ही कविता वाचते वेळी "मी रात टाकली" हे गाणं सारखं आठौत होतं...
त्यातली एक चाल गणेशाच्या कवितेला बसते, त्या ओळी अशा-
'हिरव्या रानात, हिरव्या पानात, सावळ सावर चालती'
8 Feb 2012 - 9:39 pm | प्रचेतस
आमचा परममित्र कविवर्य गणेशाच्या या वरील कवितेचा आस्वाद येथे घ्या.
9 Feb 2012 - 12:14 pm | अत्रुप्त आत्मा
आम्चे कडून सदर काव्यास
9 Feb 2012 - 1:09 pm | श्यामल
व्वा सुंदर ! नादखुळी कविता आणि नादमय गीत संगीत ! दोन्ही आवडले.
मी गीत ऐकत होते. मुलाच्या कानावर पडले आणि त्याने ते लगेच डाऊनलोड करुन स्वतःच्या फोल्डरमध्ये सेव्ह केले. त्यालाही आवडले.
9 Feb 2012 - 1:57 pm | गणेशा
सर्वांना मनापासुन धन्यवाद !
वल्ली आणि संपादक मंडळाचे खुप आभार .
10 Feb 2012 - 4:32 pm | मयुरपिंपळे
ह्या गाण्यामुळे तुमचा मी fan झालो आहे. अप्रतीम आहे हे ...