निसर्गकविता १ : झाडांच्या पानात (With Mp3 song) - http://www.misalpav.com/node/20633
निसर्गकविता २ : प्रिय प्राजक्त - http://www.misalpav.com/node/20703
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
भरारल रान सारं, गंधाळली माती
गच्च ओल शिवार.. फुललेली कांती
हिरव्या पात्यावर,. मोत्यांची नक्षी
पांढर्याफटुक ढगांची रेशमी दुलई
काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
बांधावर उभी कोवळी रानजाई
नटलेल्या सृष्टीवर आभाळाची प्रिती
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
भरारल रान सारं, गंधाळली माती ||
गर्द झिम्माड रानात.. टिफण चालती..
सर्जा-राजाच्या पायामधी भिंगरी फिरती
औंदाच्या पावसात बांधणार मी चारभिंती
घराच्या छप्पराला स्वप्न टांगली कौलांची
------------- शब्दमेघ (कविता पुनःप्रकाशित)
प्रतिक्रिया
19 Mar 2012 - 6:43 pm | चौकटराजा
आपली कविता वाचून पावसाळ्यातील वर्षाविहाराची ( उन्हाळ्यातील वर्षाविहार कसा असतो हो ....? हा प्रश्न अतृप्त आत्मा यांचा येण्या साठी मुद्दाम ही जागा केली आहे...... त्याना कोणी सांगू नका हं ) आठवण झाली.त्यातील एकेका फ्रेमचा पुनःप्रत्यय मस्त येतो. पहिल्या कडव्याची शेवटची ओळ व शेवटच्या कडव्यातील शेवटची ओळ यांचे यमक तोडण्याचे काही खास कारण ?
19 Mar 2012 - 8:12 pm | गणेशा
धन्यवाद चौकट राजा जी!
खरे तर पहिली दोन कडवी ही शेतकर्याच्या मनाने टिपलेले चित्र आहे, आणि शेवट त्याला काय वाटते ते.
ज्या प्रमाणे पहिल्या निसर्गकवितेत प्रेमिका आपला सखा येणार आहे तेंव्हाचे गीत आहे,
दूसर्या कवितेत पतीच्या निधनानंतर ही प्राजक्ताच्या झाडाशी बोलुन शृंगार आठवणारी नायिका आहे,
तसेच या निसर्गकवितेत शेतकर्याची भावना दाखवली आहे. ( पण ही कविता आधी लिहिलेली आहे.. आजकाल लिहिण्याला भावना नाहि तर शब्द चिकटले जात असल्याने नविन काही लिहित नाहिये)
त्यामुळे निसर्गकविता + माणसाचे मन हे कवितेत दाखवण्याचा एक छोटा प्रयत्न .
आणि एक ते मावळ लिहिल्यामुळे सांगतो, कवितेत आलेले वर्णन हे कोरीगडास पावसात आपल्याच मिपाकरांबरोबर गेलो होतो तेंव्हाचेच आहे.
19 Mar 2012 - 8:26 pm | हारुन शेख
अजून कविता वाचायला आवडतील. चौकट राजा म्हणतो तसे यमक जुळून आले असते तर काव्य अनुभव अजून गहिरा झाला असता. तरीपण मनात चित्र रेखाटणारी प्रेक्षणीय कविता लिहिलीय त्याबद्दल अभिनंदन !
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
19 Mar 2012 - 9:24 pm | चौकटराजा
कविला पर्याय सुचवित रहाणे हा त्याच्या सृजनशीलतेचा अधिक्षेप असतो. यास्तव प्रथम माफी मागतो.
आता पर्याय यमकासह
गच्च ओल शिवार.. फुललेली कांती
हिरव्या पात्यावर,. दाणेदार मोती
औंदाच्या पावसात बांधणार चारभिंती
घराच्या छप्पराला स्वप्ने सांगाती
19 Mar 2012 - 10:06 pm | गणेशा
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
भरारल रान सारं, गंधाळली माती
गच्च ओल शिवार.. फुललेली कांती
हिरव्या पात्यावर,. नक्षीदार मोती
पांढर्याफटुक ढगांची रेशमी दुलई
काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
बांधावर उभी कोवळी रानजाई
नटलेल्या सृष्टीवर आभाळाची प्रिती
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
भरारल रान सारं, गंधाळली माती ||
गर्द झिम्माड रानात.. टिफण चालती..
सर्जा-राजाच्या पायामधी भिंगरी फिरती
औंदाच्या पावसात बांधणार चारभिंती
घराच्या छप्पराला स्वप्ने सांगाती.
-----------
कविता सांपादन करता येत नसल्याने येथे पुन्हा दिली आहे.
@ चौकट राजा :
धन्यवाद मनापासुन. आता कविता आनखिन छान वाटते आहे.
आणि एक माफी वगैरे मागु नका.. हक्काने बोला एक मित्र बनुन, आवडेलच.
19 Mar 2012 - 10:53 pm | प्रचेतस
सुंदर.
परत ही कविता वाचून् फारच छान वाटले.
कोरीगडाच्या त्या झिम्माड आठवणी

तुझ्या कवितेसाठी एक समर्पक फोटो-कोथळीगडाच्या वाटेवर-

20 Mar 2012 - 9:44 am | चौकटराजा
वल्ली , फ्रेम चा उल्ल्लेख झाल्यावर लगेच फ्रेम अवतरल्या की ! धन्यवाद !
मला अर्धवट उन, ओला रस्ता व राखाळलेले आकाश हा नेचरचा मूड निळाशार आकाशा पेक्शा जास्त आवड्तो. दुसरे चित्र तसेच आहे.
20 Mar 2012 - 9:45 am | चौकटराजा
वल्ली , फ्रेम चा उल्ल्लेख झाल्यावर लगेच फ्रेम अवतरल्या की ! धन्यवाद !
मला अर्धवट उन, ओला रस्ता व राखाळलेले आकाश हा नेचरचा मूड निळाशार आकाशा पेक्शा जास्त आवड्तो. दुसरे चित्र तसेच आहे.
20 Mar 2012 - 3:15 pm | जागु
वाह. कडाक्याच्या उन्हाळ्यात कविता वाचून वर्षाऋतूच आगमन झाल्यासारख वाटल.