निसर्गकविता ४: पाऊस

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
11 Jun 2012 - 5:22 pm

निसर्गकविता १ : झाडांच्या पानात (With Mp3 song) - http://www.misalpav.com/node/20633
निसर्गकविता २ : प्रिय प्राजक्त - http://www.misalpav.com/node/20703
निसर्गकविता ३: कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... http://www.misalpav.com/node/21061

अलवार सर पावसाची
वार्‍यासंगे बिलगती
नाजुक कोरीव पात्यांवर
घन कोवळे ओथंबती

पवना माय खळाळती
फुललेल्या घरभिंती
हळुवार टपोर्‍या थेंबांची
किनार्‍यावर गस्त चालती

ओल्या-हिरव्या रस्त्यांवरती
पाऊले रिमझीम पडती
गंधाळलेल्या मातीमधुनी
प्रेमाची पाखरण होती

दूर विंचुकाट्यावरी
ओलेती नजर विसावती
ओघळलेल्या स्वप्नचांदण्यास
मन अलगद वेचती

-- शब्दमेघ (निसर्गकविता : १० जून २०१२)

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Jun 2012 - 5:53 pm | प्रचेतस

मस्त रे गणेशा.
बर्‍याच दिवसानी लिहिता झालास.

जाई.'s picture

12 Jun 2012 - 10:37 am | जाई.

छान आहे कविता.
आवडली

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Jun 2012 - 10:42 am | मिसळलेला काव्यप्रेमी

पवना माय खळाळती
फुललेल्या घरभिंती
हळुवार टपोर्‍या थेंबांची
किनार्‍यावर गस्त चालती

व्वाह!! मस्तचं..
आवडली.

जागु's picture

12 Jun 2012 - 11:21 am | जागु

सुंदर कविता.