चित्रपट निर्माते गजानन जागीरदर यांच्यावर बुद्धिवाद्यांनी केलेला अन्याय - प्रकरण 9

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
1 Feb 2012 - 4:00 pm

मित्र हो,

ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांच्या ब्लॉगमधील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा. विचार करावा. खालील अभिप्राय बोलका आहे.

दैनिक तरुण भारत...
...विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हे पुस्तक अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल आंधळी श्रद्धा व विश्वास बाळगणाऱ्यां लोकांनी तर वाचलेच पाहिजे. पण विज्ञान व त्याची सामाजिक बांधिलकी या विषयाची आस्था बाळगणाऱयांनीही अवश्य वाचले पाहिजे, असे आग्रहाने सांगावेसे वाटते.
- रामचंद्र रेडकर बेळगाव.
दैनिक लोकमत
...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे. हे प्रमेय विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करण्यासाठी अद्वयानंद यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञ संशोधकांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद खरोखरच स्तिमित करणारा आहे. बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल. या पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा....
....... . - शंकर सारडा

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9

चित्रपट निर्माते गजानन जागीरदर यांच्यावर बुद्धिवाद्यांनी केलेला अन्याय

लोक आपले अनुभव गुप्त का ठेवतात?

कोणतेही मत अनुभव आल्याशिवाय कोणी बनवत नाही. रुढ विज्ञानाच्या नियमात न बसणाऱ्या घटनांचा अनुभव आल्याशिवाय त्या घटना शक्य असल्याचे मत कोणी नोंदविणार नाही. निदान असे अनुभव आलेल्या जवळच्या व्यक्तिंचा परिचय तरी त्यांना असला पाहिजे असे अनुभव आलेल्या व्यक्तिंची संख्या प्रचंड असल्याशिवाय त्यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असणार नाही, हे उघड आहे. असे अनुभव आलेले लोक इतक्या मोठ्या संख्येने असतील तर आपला अनुभव जाहीर करणाऱ्यांची संख्या ही मोठी असावयास पाहिजे. पण ती तशी दिसत नाही. यावर कोणी प्रश्न विचारील. त्याला उत्तर – ‘तशी संधी त्यांना मिळत नाही’ हेच आहे. खाजगीत ते आपला अनुभव सांगत असतातच. तसा प्रसंग उद्भवला तर आपला अनुभव जाहीरपणे सांगायला मागे पुढे पहात नाहीत, असे आढळून आले आहे. त्याचे एक अलिकडील घडलेले प्रसिद्ध उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे भूतपुर्व सभापती व प्रसिद्ध विचारवंत दिवंगत वि. स. पागे यांनी आपल्याला आलेल्या एका चमत्काराच्या अनुभवाचे एका जाहीर सभेत केलेले कथन होय.
अशाच प्रकारच्या एका चमत्कारचा अनुभव प्रसिद्ध सिने-दिग्दर्शक गजानन जागीरदार यांना आपल्या जीवनात आला. आणि तो त्यांनी आपल्या ‘पाऊलखुणा’ या आत्मचरित्रात कथनाच्या ओघात सांगितला. त्याची चैतन्य देशमुख नावाच्या लेखकाने कोल्हापुरच्या पुढारी दैनिकातून ‘मरता क्या नहीं करता’ या मथळ्याच्या लेखाने जाहीर वाच्यता केली. संपादकांनी या लेखावर वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या. मात्र त्या मागवताना आपण या घटनेकडे बुद्धिवादी दृष्टीकोनातून पहात असून वाचकांनी ही तसेच पाहावे असे आवाहन केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून या घटनेची विज्ञानवादी उकल करणारा लेख मुद्दाम लिहून घेऊन प्रसिद्ध केला. दाभोळकरांचा तो लेख म्हणजे विज्ञानाच्या रुढ नियमांच्या चौकटीत ही घटना ओढूनताणून बसविण्याचा एक आडदांड प्रयत्न असून तो लिहून व प्रसिद्ध करून अनुक्रमे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पुढारीचे संपादक यांनी गजानन जागीरदारांवर घोर अन्य केला आहे. तो कसा केला आहे, हेच तेथे त्या लेखाची शास्त्रीय निकषांच्या आधारे छाननी करून दाखवून द्यायचे आहे.

त्या प्रकरणातील महत्वाच्या बाबी:-
 पाऊलखुणा आत्मचरित्रातील संबंधित भाग पुर्ण उद्घृत करीत आहे.
 जागीरदारंची एका चमत्काराची ‘पाऊलखूण’
 मंत्रातंत्रावर विश्वास ठेवायचा का?
 ‘अंधश्रद्धा विनाशाय’ पुस्तकातील प्रकरणातील उल्लेख
 या घटनेतील मुख्य प्रसंग
 दाभोळकरांच्या हवेतील वावड्या
 जागीरदारांनी परमेश्वराचे आभार का मानले?
 संभवनयती सिद्धाताविषय़ीचे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे घोर अज्ञान
 डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे संमोहन-प्रक्रिये विषयीचे अज्ञान व मिथ्याकथन
 जेंव्हा सर्व युक्तिवाद संपतात
 आमचेही एक लाख रुपयांचे आव्हान आहे, स्वीकारा!
 हे घ्या पं. शर्मांच्या बाजूने पुरावे.
 खुर्चीच्या चमत्कारासारखा आणखी एक चमत्कार
 वाचकांच्या प्रतिक्रिया

हे प्रकरण विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार यांच्यावर बुद्धिवाद्यांनी केलेला अन्याय इथे वाचा

मांडणीसंस्कृतीसमाजविचारसंदर्भमाहितीआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

राजघराणं's picture

1 Feb 2012 - 4:40 pm | राजघराणं

प्रासादिक लेखन. एकेक शब्द वाचला. प्रत्येक वाक्य वाचले. अहाहा ! ओहोहो !!
मूर्ख बुद्धीवादी लोक असल्या प्रासादिक अनुभवांना भास , विभ्रम असे विचित्र शब्द वापारतात

बुद्धिवाद्यांना अक्कल असते काय ? लेखात म्हट्ल्याप्रमाणे ते अन्यायी, अज्ञानी, मिथ्याकथी (खोटारडे), हवेत वावड्या उडवणारे असतात

ज्यांना अनुभव येतात तेच खरे सात्विक......... आणी इतर लोक सात्विक नसल्याने त्यांना अनुभव येउच शकत नाहीत , त्यामुळे आमचे म्हणणे खोटे ठरूच शकत नाही. हाय का नाइ गंम्म्त!

चरसी, बेवडे आणी मनोरुग्णांचे अनुभव देखील पुढे आले पाहिजेत. त्यांनाही अनेक अनुभव येतात.
या लोकांना संधी मिळत नाही कारण त्यांत पुरेसे साधुत्व नसते.

आपला संधीसाधू

स्पा's picture

1 Feb 2012 - 4:44 pm | स्पा

उघडशील? उघडशील? परत असले धागे?

प्यारे१'s picture

1 Feb 2012 - 5:01 pm | प्यारे१

माझ्या वतीने पण.... ;)

प्रास's picture

2 Feb 2012 - 1:45 pm | प्रास

मी हे प्रकरण पूर्ण वाचलं.

डॉ. नरेन्द्र दाभोळकर 'बदमाश' आणि त्याबरोबरच 'ढोंगी' नि 'लुच्चे'सुद्धा आहेत असंच मला वाटू लागलंय.

राजघराणं's picture

2 Feb 2012 - 5:22 pm | राजघराणं

दाभोळकर बदमाश' आणि त्याबरोबरच 'ढोंगी' नि 'लुच्चे'सुद्धा असतील तर काही सज्जन पापभिरू माणसांची यादी :

१) पंढरपुरात गोरगरीब जनतेला विषेश माया देणारे बडवे.
२) नाडी आणी हस्तरेखातज्ञ
३) सत्य साइ बाबा
४ नित्यानंद स्वामी

प्रचेतस's picture

2 Feb 2012 - 10:40 pm | प्रचेतस

अहो राजघराणं, इतकं शिरेसली नका हो घेऊ. प्रासभाऊंनी उपहासानं लिहिलय ते.

१. नाड्या आणि नाडी महर्षींची भलावण
२. अंधश्रद्धांना खतपाणी घालणे व डॉ. नरेन्द्र दाभोळकर कसे चुकीचे आहेत ह्याचे एकांगी पुरावे देत राहाणे

एवढेच करतात वाटतं तुम्ही?

आयुष्यातली सगळी करण्यासारखी कामे संपली?

शशिकांत ओक's picture

2 Feb 2012 - 10:48 pm | शशिकांत ओक

मित्रांनो,
जर गळतग्यांनी काही त्रुटी दाखवल्या असतील तर आपल्याला गळतग्यांच्या विचारात काय त्रुटी आहेत ते कळवा.
त्यात अंधश्रद्धाना खतपाण्याचा प्रश्न कुठे येतो.

रामपुरी's picture

3 Feb 2012 - 12:01 am | रामपुरी

सरकारी नोकराला निवृत्तीनंतर काय काम असणार? अर्थात आधी तरी कुठे काम असतं म्हणा. आयुष्यभर पदाचा गैरवापर करून हाताखालच्या लोकांना खाजगी कामाला जुंपायचं, स्वतःची तुंबडी भरायची (तुरळक अपवाद सोडून) मग निवृत्तीनंतर सरकारी कृपेने पेन्शन घेता घेता असली कामंच सुचणार की.
बाकी असल्या फालतू पुस्तकातल्या टुकार युक्तीवादाला कोण उत्तर देत बसणार?

रामपुरी साहेब, क्रुपया वैयक्तिक टिका टाळा ही विनंती.

शशिकांत ओक's picture

8 Feb 2012 - 1:05 pm | शशिकांत ओक

या ठिकाणी नाडीग्रंथांचे प्रयोजन येथे नव्हते पण काहींना त्याची आठवण आलेली आहे म्हणून.. आयुष्यात इतकेसे काम केले तरी खूप आहे.

"गणिताने व तर्काने शक्य नाही"

मित्रांनो,
खरे तर नाडीवरील अनेक प्रश्नांची उत्तरे पुर्वीच माझ्या पुस्तकातून दिली गेली आहेत. या तऱ्हेच्या फोरमवरील माझे लेखन फक्त नाडी ग्रंथांची तोंड ओळख करून देण्यापुरते आहे. म्हणून कदाचित ते त्रोटक वाटत असावे. असो.
समजा मी आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर तुम्ही मी म्हणतो तसे अभ्यास कार्य करायला तयार आहात काय? कारण मी उत्तर दिले की त्यातून पुन्हा फाटेफोडू प्रश्न उत्पन्न होणार काऱण नाडी ग्रंथांच्या कार्यामधे अनेक अशा बाबी आहेत की त्यांची उकल नुसत्या धाग्यांच्या प्रतिसादातून होऊ शकत नाही.
तरीही आपल्या समाधानासाठी उत्तरे देत आहे. त्याउत्तरातून "असे असणे गणिताने व तर्काने शक्य नाही" असा ग्रह होतो. म्हणून मला "अनुभव न घेता ते ठोकरून द्यावे लागते" असा साधारण विचारांचा तोंडवळा असतो. त्यासाठी उत्तरे जरी तर्काच्या विपरीत आली तरीही चिकाटी धरून अभ्यासकार्य करायला कोणी पुढे येणार काय? निदान सुरवातीला मिपाकरांची तयारी हे काय?
आम्ही नुकतीच एक कार्यशाळा नाडीग्रंथांवर घेतली होती. त्यामधे अनेक नाडीग्रंथांचा अनुभव घेतलेल्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यामधे उदघाटनाच्या वेळी उपस्थितांच्या ओळखी करून दिल्या गेल्या. त्याला यू ट्यूबवर येथे सादर केले गेले आहे. पुढील अन्य भाग जसेजसे हाती येतील तसे सादर केले जातील. असो.
माझी उत्तरे लाल रंगात
आपले (गविंनी विचारलेले) प्रश्न -

मी माझे (आणि इतर अनेकांचे) प्रश्न (मनापासून सांगतो, की खोचक, तिरकस वाटत नसलेले प्रश्न) मी खाली पुन्हा लिहितो.

अनेक नाडीकेंद्रे आहेत. पूर्वी जन्मलेल्या, सध्या जिवंत आणि पुढे येणार्‍या प्रत्येकाची नाडी तिथे आहे. असे मी म्हणत नाही म्हणजे अब्जावधी नोंदी असणार. आपण आपल्या जवळच्या नाडीकेंद्रात (समजा महाराष्ट्रात अशी ८० आहेत) जाऊन ती शोधू शकतो. (जशी आत्मशून्य यांना पुण्यात मिळाली) आपण शोधू शकता

म्हणजे सर्वच्या सर्व माहिती (पत्रे / नाड्या) सर्व केंद्रात रिप्लिकेट केलेल्या असतात का? नाही.

प्रत्येकाची पट्टी प्रत्येक केंद्रात....म्हणजे अनेक अब्ज गुणिले शेकडो केंद्रे इतक्या पट्ट्या कितीही पातळ बनवल्या तरी तेवढी ताडाची झाडे असतील का आणि तितकी रिप्लिकेशन कशी झाली स्टोरेज स्पेस कशी उपलब्ध झाली.

गोडाऊनसारखे असते का केंद्र ? नाही

प्राथमिक पातळीचे प्रश्न आहेत. सर्वांनाच उत्तरे वाचायला आवडतील. मला एकट्यालाच नव्हे. तेव्हा नेमकी उत्तरे काय आहेत हे सांगावे (इथेच..) ही विनंती..

आपण हे प्रश्न उपस्थित केले याबद्दल धन्यवाद. यानंतर अभ्यास कार्यात आपण मिपाकरांनी असाच प्रतिसाद दिलात तर आणखी आनंद होईल.

हा खूप जुना संदर्भ असला तरी तुम्ही आता उत्तर दिलं म्हणून धन्यवाद.

या धाग्यावर आणखी मतप्रदर्शन करण्याची इच्छा नव्हती पण तुमच्या वरील उत्तरात खालील पॅरा आहे:

अनेक नाडीकेंद्रे आहेत. पूर्वी जन्मलेल्या, सध्या जिवंत आणि पुढे येणार्‍या प्रत्येकाची नाडी तिथे आहे. असे मी म्हणत नाही म्हणजे अब्जावधी नोंदी असणार. आपण आपल्या जवळच्या नाडीकेंद्रात (समजा महाराष्ट्रात अशी ८० आहेत) जाऊन ती शोधू शकतो. (जशी आत्मशून्य यांना पुण्यात मिळाली) आपण शोधू शकता

पैकी "असे मी म्हणत नाही" ही तुमची टिप्पणी आहे. ती लाल करायची राहिल्याने माझ्या मूळ प्रश्नाच्या वाक्यरचनेविषयी गोंधळ होतोय, म्हणून हे दर्शवून देतोय. बाकी सर्व ठीक.

अनेक नाडीकेंद्रे आहेत. पूर्वी जन्मलेल्या, सध्या जिवंत आणि पुढे येणार्‍या प्रत्येकाची नाडी तिथे आहे. ---- असे मी म्हणत नाही (इति ओकसाहेब)
---
म्हणजे अब्जावधी नोंदी असणार. आपण आपल्या जवळच्या नाडीकेंद्रात (समजा महाराष्ट्रात अशी ८० आहेत) जाऊन ती शोधू शकतो. (जशी आत्मशून्य यांना पुण्यात मिळाली) आपण शोधू शकता

शशिकांत ओक's picture

12 Feb 2012 - 5:18 pm | शशिकांत ओक

गवि,
पूर्वी जन्मलेल्या, सध्या जिवंत आणि पुढे येणार्‍या प्रत्येकाची नाडी तिथे आहे. ---- असे मी म्हणत नाही (इति ओकसाहेब)

दुरुस्ती बद्दल धन्यवाद. बाकी सगळे ठीक.

आशु जोग's picture

2 Feb 2012 - 8:46 pm | आशु जोग

ज्याला त्याला आपले दुकान चालण्याची चिन्ता
नाव फक्त कुणाचं तरी घ्यायचं !