औरंगाबाद परिसर – वेरूळ – अजंठा- पैठण (2) : बीबी का मकबरा आणि पाणचक्की

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
10 Dec 2011 - 12:53 pm

बिबी का मकबरा

ताज महल हा एक भव्यदिव्य मकबरा एका प्रेमी नवर्‍याने (शहजहान) आपल्या बायकोवरच्या (मुमताज) प्रेमाखातर बनवला होता. त्याची प्रतिकृती असलेला आणि त्याच्या रचनेवर बेतलेला 'बिबी का मकबरा' मात्र एका मुलाने त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे.

औरंगजेबाचा मुलगा आजमशहा याने त्याची आई, रबिया दुर्राणी उर्फ दिलरस-बानू-बेगम हीच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधला. खरंतर आजमशहाला हे स्मारक ताज महल पेक्षाही भव्यदिव्य बनवायचे होते पण औरंगजेबाने दिलेल्या 'बजेट' मधे ते शक्य झाले नाही. पण ह्या कलाकृतीची नेहमी ताज महल बरोबर तुलना झाल्यामुळे आणि ताज महल इतके भव्यदिव्य नसल्यामुळे जरा दुर्लक्षीत होउन तेवढी लोकप्रियता नाही मिळाली. ह्या 'बीबी का मकबर्‍या'ला 'दख्खनी ताज' असेही म्हटले जाते.

प्रवेशद्वारावर असलेला हा माहिती फलक. बरीच तांत्रिक माहिती दिली आहे त्याच्यावर.

प्रवेशद्वार

प्रवेशद्वारावर असलेल्या काळ्या डागांवरूनच पुरातत्व विभागचे काम आणि एकंदरीत पुराणवास्तूंबद्दलची आस्था दिसत होती. त्यामुळे आत काय बघायला मिळेल ह्याची कल्पना येत होती. बीबी का मकबरा हा का दुर्लक्षीत राहिला ह्याचे कारण दिसतेच आहे. तरी बरें इथे यायच्या रस्त्याचे फोटो नाही काढले. असो.

दुरुन डोंगर साजरे ह्याची प्रचिती देणारे हे फोटोज. लांबून काढलेल्या ह्या फोटोंमधून ह्या स्मारकाचे सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे.


हा फोटो मस्त आहे मला खुप आवडतो, मस्त सूर्यास्ताच्या रंगांच्या उधळणीच्या बॅकड्रॉपवर उडणार्‍या पक्षांचा थवा मस्त मन मोहवून गेला होता.

बिबी का मकबर्याचे सध्याचे दुर्दैवाचे दशावतार

अतिशय गलथानपणे कामे चालू आहेत. सगळी रया घालवून टाकली आहे ह्या स्मारकाच्या सौंदर्याची.

मी आणि माझी बच्चे कंपनी.

तर, असा हा सो-कॉल्ड सुंदर बीबी का मकबरा बघून पुढे निघालो पाणचक्की बघायला.

पाणचक्की:

ही पाणचक्की तंत्रज्ञानाचा एक अनोखा नमुना आहे. १० किमी अंतरावरून भूमीगत मातीच्या नळांमधून पाणी ह्या पाणचक्कीत आणून 'सायफन' पद्धातीने वर चढवून या पाण्याचा एक गतिमान प्रवाह तयार केला आहे. ह्या गतिमान प्रवाहापासून उर्जा तयार करून एक भव्य लोखंडी पंखा त्या उर्जेवर फिरवला जातो. ह्या पंख्यावर एक जाते बसवले आहे हे ह्या टर्बाईन सदृश्य पंख्यामुळे फिरते. हीच ती पाणचक्की, पाण्याच्या जोरावर फिरली जाणारी चक्की. इथे एक कृत्रिम धबधबा तयार केलेलाआहे. त्या धबधब्यामुळे इथेले वातावरण एकदम थंड असते. अगदी एअरकंडीशनरच्या कूलिंग प्रमाणे थंडगार. औरंगाबादच्या गरमागरम हवामानात हा पाण्याचा नैसर्गिक थंडावा खरंच गार करतो आपल्याला.

बाबा-शाह-मुसाफिर हे एक सुफी संत ह्या पाणचक्कीवर पीठ तयार करून एक अन्नछत्र चालवत अही एक कहाणी आहे. ह्यांचा एक दर्गा ही आहे ह्या पाणचक्कीच्या परिसरात.

पाणचक्कीला पोहोचे पर्यंत खुपच काळोख झाला होता. त्यामुळे फोटो आले पण ते इथे टाकण्यासारखे नाही आलेत. :( पण एक व्हिडीओ घेतलाय ह्या पाणचक्कीचा.

क्रमश: (पुढे-> वेरूळ)

इतिहासप्रवासछायाचित्रणमाहितीसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

मानस्'s picture

10 Dec 2011 - 1:12 pm | मानस्

बिबी का मकबरा संगमरवरापासून बनवलाय का हो?
खरचं खूपच वाईट अवस्था झालीये याची...
त्यामानाने कर्नाटकात अश्या पुराणवास्तुंची खूपच चांगल्या प्रकारे काळजी घेतात (उदा. विजापूर्,हम्पी,म्हैसूर)

सुहास झेले's picture

10 Dec 2011 - 1:22 pm | सुहास झेले

अतिशय वाईट अवस्था दिसतेय बीबी का मकबऱ्याची...

अजुन बघायचा योग आला नाही, आणि काय माहित जेव्हा बघायचा योग येईल तेव्हा काय अवस्था असेल त्याची.... बाकी पाणचक्की मस्त :) :)

पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत :)

चिंतामणी's picture

10 Dec 2011 - 1:27 pm | चिंतामणी

पहील्या भागाची लिंक टाक वरती.

काही फोटोत लाईट कमी वाटतो.

फोटोशॉपमधे प्रोसेस करून बघीतलेस का?

पक पक पक's picture

10 Dec 2011 - 3:08 pm | पक पक पक

बच्चे कंपनि बरोबर काढलेला फोटो छान आला आहे... आपणास कोठेतरी पाहिल्या सारखे वाटते..आपण कोठे राह्ता..?

सोत्रि's picture

10 Dec 2011 - 5:32 pm | सोत्रि

माझ्या खरडवहीतच बघितले असेल, तिथे माझा फोटो आहे ;)

- (फेमस) सोकाजी

पक पक पक's picture

11 Dec 2011 - 4:12 pm | पक पक पक

हसण्यावरुनच वाटल मला ,तुम्हि पुण्याचे असणार..........

मिनी-ताजमहाल अशी ख्याती असलेला बिबीका मकबरा पाहण्याचा योग अजुन आला नाही.

दुरावस्था झाली असली तरी आता प्रशासन्/पुरातत्व खात्याला जाग आलेली दिसतेय.
चिल्लर पार्टी सोबतचा फोटु ही छान.

पाणचक्की हापीसातुन दिसत नाही. घरुन पहावी लागेल.

वेरूळची वाट पहात आहे.

प्रभाकर पेठकर's picture

10 Dec 2011 - 6:54 pm | प्रभाकर पेठकर

पाणचक्की हापीसातुन दिसत नाही. घरुन पहावी लागेल.

हो, आता मधे बर्‍याच उंच इमारती आणि झाडी झाली आहे. घर, पाणचक्कीच्या जवळ आहे का? ...........ह.घ्या.

प्रभाकर पेठकर's picture

10 Dec 2011 - 6:50 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर छायाचित्र आणि वर्णन.

पाणचक्कीही सुंदर आहे. एकदा हे सर्व प्रत्यक्ष बघावयास जायला हवे.

वास्तुची ताजमहालशी तुलना अप्रस्तुत वाटते. दोन्ही वास्तूंच्या सौंदर्यात खुप फरक आहे. दुसरे असे की शहाजहान - मुमताज पेक्षा (मुलगा) आझमशहा - (आई) दिलरस-बानू-बेगम ही जोडीही इतिहासात कमी प्रसिद्ध आहे. हेही एखादे, वास्तु कमी प्रसिद्ध आणि दुर्लक्षित असण्यचे, कारण असावे.

पाषाणभेद's picture

11 Dec 2011 - 9:33 am | पाषाणभेद

>>> वास्तुची ताजमहालशी तुलना अप्रस्तुत वाटते. दोन्ही वास्तूंच्या सौंदर्यात खुप फरक आहे. दुसरे असे की शहाजहान - मुमताज पेक्षा (मुलगा) आझमशहा - (आई) दिलरस-बानू-बेगम ही जोडीही इतिहासात कमी प्रसिद्ध आहे. हेही एखादे, वास्तु कमी प्रसिद्ध आणि दुर्लक्षित असण्यचे, कारण असावे.

आपले म्हणणे खरे आहे. एकदम पटले.

:( :( :(
सगळीकडे हे असंच आहे.
मी मोजून २ वेळा बिबी का मकबरा पाहिला असेल. त्यातल्या एकदा आपल्या विलासरावसोबत गेलो होतो.

तरी ती कारंजी सुरु दिसत आहेत. आधी तर ती सुद्धा बंद होती.

फोटो आणि वर्णन छान
शाळेच्या औरंगाबाद सहलीची आठवण झाली

प्रचेतस's picture

11 Dec 2011 - 9:51 am | प्रचेतस

मस्त फोटो आणि वर्णन.
औरंगाबादेस लवकरच जायचा विचार आहे. देवगिरी, वेरूळ, अजिंठा पाहायला. तेव्हा हे पण बघेनच.
बाकी पितळखोरे, औरंगाबदेची लेणी पाहिलीत का?

पक पक पक's picture

11 Dec 2011 - 4:14 pm | पक पक पक

शुद्धलेखन साहेब शुद्धलेखन.........

सोत्रि's picture

11 Dec 2011 - 11:53 am | सोत्रि

पितळखोरे, औरंगाबदेची लेणी नाही बघितली :(

जरा पळापळच झाली ह्या ट्रीपला. अ‍ॅक्चुअली पैठण करायला नको होते. त्या धरणावर काहीही बघायला नाही हे तिथे गेल्यावर कळले आणि दिवस फुकट गेला.

- (भ्रमंती करणारा भटक्या) सोकाजी

विवेकखोत's picture

12 Dec 2011 - 12:00 pm | विवेकखोत

वाद उकरायचा म्हणून नाही पण तुमी जर कबर नीट बघितली असेल तर त्यावर एक लोखंडी सळई (महादेव चं पिंडी वर गळती लावायला असते तशी ) आहे . विचार काळजी पूर्व केलात तर मला काय सांगायचे ते तुमाला कळेल बाकी वादादित मुद्दा असल्या मुळे सरळ विधान करू शकत नाही.

फोटो मस्त आलेत ओ सोकाजीराव, मज्जा केलेली दिसते आहे.

आशु जोग's picture

11 Dec 2011 - 8:33 pm | आशु जोग

लखनौला इमामवाडा आणि छोटा इमामवाडा नावाच्या वास्तू आहेत.

यातील छोटा इमामवाडा ही ताजमहालसारखीच वाटणारी आहे.

(या धाग्यातील फोटोंवरून आठवलं)

हरिकथा's picture

11 Dec 2011 - 10:29 pm | हरिकथा

सोकाजीराव महोदय,
तुम्ही स्थानमाहात्म्य वर्णन उत्तम प्रकारे करता. तुमचे छायाचित्रणही सुंदर आहे.
आता श्रीक्षेत्र पैठणच्या दर्शन आणि वर्णनाच्या प्रतिक्षेत.
(तीर्थयात्री)

विवेकखोत's picture

12 Dec 2011 - 11:28 am | विवेकखोत

औरंगाबाद मध्ये बीबी का मकबरा हि तशी बऱ्या पैकी दुर्लक्षित वस्तू २००३ च्या काळात मी औरंगाबाद ला होतो त्या काळी सुद्धा डाग डूजी चे काम सुरु होते ते आजतागायत चालू आहे. निकृष्ट दर्जाची डागडुजी होते. तसे औरंगाबाद परिसरात पाणचक्की, वेरूळ चे घृषनेश्वर मंदिर व लेण्या , अजिंठा, देवगिरी किल्ला आणि खुलताबाद चा झोपलेला मारुती या काही गोष्टी बघण्या सारख्या आहेत पण ती जपण्यात शासन उदासीन दिसते. खरतर एवढा ऐतिहासिक ढेवा लाभलेला आहे . ५२ जुने दरवाजे (त्या पैकी ४-५ व्यवस्थित आहेत ) बाकी बरेच मोडकळीस आले आहेत. विद्यापीठात असलेल्या लेण्या अजून बरेच काही आहे बघण्या सारखे. तेथून जवळ १०० कि मी वर राजूर चे गणपती चे जुने पेशवेकालीन सुप्रसिद्ध मंदिर बऱ्याच लोकांना माहित पण नसेल पेशव्यांची जुनी घंटा त्या काळाचे प्रतिक आहे तिथे जवळ पास २० फुटी तर कळश आहे मंदिराचा. पण काय हि माहिती लोकांना कधी कळो देव जाने. या आमचा मराठवाडा पण खूप छान आहे बघायला ते मी माझ्या मित्रांना नेहमी सांगतो तुमाला पण सांगतो वेळ असेल तर जरूर भेट द्या सर्व मी. पा. वासी