औरंगाबाद परिसर - वेरूळ - अजंठा- पैठण (1) : देवगिरी किल्ला

सोत्रि's picture
सोत्रि in कलादालन
11 Nov 2011 - 3:29 pm

दिवाळीच्या सुट्टीत काय करायचे असे मुलांना विचारले. मोठा मुलगा म्हणाला कुतुबमिनार आणि ताजमहाल बघायचाय. पण आता असे घोड्यावर बसुन रेल्वे बूकिंग शक्य नव्हते. मग सहज त्याला म्हटले तुला मिनी ताजमहाल आणी मिनी कुतुबमिनार बघायचा का? तो एकदम चकितच झाला आणी म्हणाला म्ह्णजे काय? लगेच गुगलबाबाच्या चित्र विभागाला साकडे घातले आणि त्याला बिबी का मकबराची आणि चाँद मिनारची चित्रे दाखवली. ती चित्रे बघुन तो पडलाच. असं कसं काय शक्य आहे असे विचारून त्याने भंडावून सोडले. त्याला म्हटले जायचे का बघायला तर तो म्हणाला जाउया. मग जरा सिरीयस होउन औरंगाबाद परिसर - वेरूळ - अजंठा- पैठण अशी एक 'हिस्टॉरिकल टूर' प्लान केली आणि धमाल एन्जॉय केली.

सर्वप्रथम पोहोचलो देवगिरी किल्ल्यावर. देवगिरी म्हणजे 'देवतांचा पर्वत'. पुढे महंमद-बीन-तुघलक ह्याने त्याचे दौलताबाद असे नामांतर केले.

यादव राजवंशाने ह्या किल्ल्याचे निर्माण केले. ह्या काळात यादव साम्राज्य समृद्धी आणि उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर होते. त्याची खबर अलाउद्दिन खिलजीला लागली आणि त्याने देवगिरीवर हल्ला केला. हा मुस्लिमांचा दक्षिणेवरचा पहिला हल्ला. हा हल्ला धरून एकून 3 हल्ले झाले देवगिरीवर. त्यात अनुक्रमे रामदेवराय, शंकरदेव आणि हरपालदेव ह्यांचा पराभव होउन देवगिरीवर मुस्लिम शासन सुरू झाले. एके काळी काही काळ ह्या किल्ल्याने भारताची राजधानी व्हायचा मानही मिरवलाय. पेशवाईतील 2 वर्षे सोडता हा किल्ला आणि आजुबाजुचा प्रदेश पुर्णकाळ मुस्लिम शासकांच्या ताब्यात होता.

ह्या किल्ल्याची रचना इतकी अभेद्य केलीय की हा किल्ला अपराजित आहे. ह्यावर जो कब्जा मिळवला गेला तो फक्त कपट कारस्थानं आणि फंदफितुरीने.

देवगिरी किल्ल्याचे प्रवेशद्वार

हत्तींच्या धडकेपासुन संरक्षणासाठी लावलेले महाकाय खिळे

ह्या किल्ल्यामधे बरेच दरवाजे आहेत आणी त्यांच्या दिशा आणी त्यांच्यामधली अंतरे अशा प्रकारे ठेवली आहेत की शत्रुला हल्ला करणे आणि रणनीती ठरवणे एकदम अशक्य होउन जावे.

आत आल्यावर दिसणारे काही बुरुज

मुख्य महादरवाज्यातुन आत आल्यावर बर्याच तोफा मांडुन ठेवल्या आहेत.

भारतमाता मंदिर
आतमधे एक मंदिर आहे जे यादवकालीन जैन मंदिर होते. तेथे कुतबुद्दीन खिलजी ने मस्जिद बनवली. जेव्हा 1948 साली हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले तेव्हा त्या तिथे भारतमातेची मुर्ती स्थापन केली आणी ते ठिकाण भारतमाता मंदिर म्हणुन प्रसिद्धीस आले.
त्या मंदिराच्या प्रांगणातील काही कोरीव खांब

चाँद मिनार
भारतमाता मंदिराजवळ एक मोठा 3 मजली मिनार आहे. हे मंदिर तोडुन तिथे मस्जिद बांधली असल्यामुळे अहमदशहा बहामनीने हा उत्तुंग मिनार त्यावेळेच्या मशिदीजवळ बांधला. दिल्लीच्या कुतुबमिनार नंतर उंच मिनारांमधे ह्या 3 मजली चाँद मिनारचा दुसरा क्रमांक लागतो.

चिनी महल
एके काळी ह्या महालाच्या भिंती चिनी मातीच्या नक्षीकामानी अलंकृत केल्या होत्या. ह्या महालाचा कारागृह म्हणुन वापर केला जात असे. औरंगजेबाने ह्या महालात संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई आणि पुत्र शाहुराजे ह्यांना कैद करून ठेवले होते अशी वंदता आहे.

मेंढा तोफ
चिनी महालापासुन जवळच एका बुरुजावर ही मेंढा तोफ आहे. चारही दिशांना फिरू शकणार्‍या ह्या तोफेला मागच्या बाजुला मेंढ्याचे तोंड आहे त्यामुळे ह्या तोफेला मेंढा तोफ असे नाव पडले. मुस्लिम शासक हिला 'तोप किला शिकन' म्हणजे 'किल्ला तोडणारी तोफ' म्हणत. ह्या तोफेवर ही तोफ तयार करणार्‍याचे आणि औरंगजेबाचे नाव कोरले आहे.

ह्या तोफेच्या तोंडावर कुराणातील एक वचन कोरले आहे.

खंदक
मेंढा तोफेच्या बुरुजावरून पुर्ण किल्ल्याचे दर्शन करता येते. आणी किल्ल्यात जाण्याच्या मार्गात एक मोठा खंदक आहे. ह्या खंदकात दोन स्तर आहेत. ह्या दोन्ही स्तरांमधे पाणी भरलेले असायचे. नेहमीच्या वेळी फक्त खालचा स्तर भरून पाणी असायचे. त्याने किल्ल्यात जा-ये करण्यासाठी असलेला पुल उघड असायचा. हल्ल्याच्या वेळी पाणी दुसर्‍या स्तरात सोडले जायचे जेणेकरून पुल पाण्याखाली जाउन शत्रु खंदकात पडून खंदकातील मगरींच्या भक्षस्थानी पडायचा. ह्या खंदकातील भिंती विशिष्ट पद्धतीने बांधल्या होत्या ज्याने त्यावर शिडी लावणे अशक्य होते.

अंधारी/ भुलभुलय्या
हा भुलभुलय्या ह्या किल्ल्याच्या अभेद्य रचनेचा कळस आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठीचा हा मार्ग आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी हा भुलभुलय्या पार करावा लागतो. ह्याचे प्रवेशद्वार एखाद्या गुहेसारखे आहे. आणि हा पुर्ण मार्ग एकदम अंधारी आहे. अक्षरश: काळोख. काहीही दिसत नाही. भुलभुलय्या अशासाठी म्हणतात की हा पुर्ण मार्ग वर्तुळाकार जिन्याने बनलेला आहे. पायरी पायरी मधील अंतर विषम आहे. एक पायरी एकदम उंच तर एक पायरी एकदम लहान.
शत्रुला उल्लु बनवण्याची फुल तजवीज आहे इथे. हवा आणि प्रकाश येण्यासाठी काही झरोके आहेत. त्यात शत्रुने प्रवेश केला रे केला की तो डायरेक्ट खंदकात पोहोचलाच पाहिजे अशी सोय केलेली आहे. शत्रु जरा विचार करत थांबला की वरून दगडांचा मारा करायला छुप्या जागा बनवलेल्या आहेत.

बारादरी
सध्याला ह्या किल्ल्यावर चांगल्या स्थितीत असणरी ही एकच वास्तु आहे. शहाजहानने बनवलेला हा महाल अष्टकोनी आहे. ह्याच्या बाहेरच्या बाजुला 12 कमानी आहेत त्याने ह्याचे नाव बारादरी असे पडले.

बारादरीवरून पुर्ण किल्ल्याचे आणी आजुबाजुच्या परिसराचे सुंदर असे विहंगम दृश्य दिसते.

अत्त्युच्च शिखर
हा ह्या किल्ल्यावरील अत्त्युच्च बुरुज. इथे एक मोठी तोफ आहे जीचे नाव आहे दुर्गा तोफ. इथे पोहोचे पर्यंत आपली फॅ फॅ होते, तर एवढी वजनदार आणि भव्य तोफ इथे कशी आणली असेल वाटून उगाच जीव दडपून जातो.

एवढ्या टोकावर गड चढून गेलो त्याचा हा घ्या पुरावा. :)

क्रमश: (पुढे-> बिबी का मकबरा)

मौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

छान ओळख करुन दिली आहे त्या परीसराची... फोटोंची रेलचेल आवडली :)
बघूया यकु कधी घेऊन जातोय ते. ;)

बघूया यकु कधी घेऊन जातोय ते.

अरे ये की लेका.. कधीही ये..
आम्ही खास इंदूरहून संभाजीनगराकडे कूच करू म्हणे तुला हा भाग दाखवायला..
सोकाजी, बाकी हिरण्य रिसॉर्ट्ला गेला होतात की नाही? किल्ल्याजवळच्या घाटातल्या दरीत आहे.

विलासराव's picture

12 Nov 2011 - 10:46 am | विलासराव

>>>सोकाजी, बाकी हिरण्य रिसॉर्ट्ला गेला होतात की नाही? किल्ल्याजवळच्या घाटातल्या दरीत आहे.

मस्त रिसॉर्ट आहे हे. यकुंनीच सुचवले होते. रहायला टेंटही आहेत तिथे.
1

हे भद्रा मारुती मंदीरः
2

3

बाकीचे फोटो इथे पहाता येतीलः
https://picasaweb.google.com/106420187666958293433/SHEGAON_AJANTHAWERUL

स्वैर परी's picture

11 Nov 2011 - 4:01 pm | स्वैर परी

बर्याचदा इथे जाण्याचा प्लॅन होतो, पण काही कारणास्तव नाही जमलय, जावच लागणार असे दिसतय एकंदर. बाकि तुमची फोटो एकदाम झ्याक जमलेत.
सहलीमध्ये काढलेले सहज फोटो आणि गूगल वर शोधुन काढलेले त्याच जागेचे फोटो यात केवढे अंतर असते नाही. आपण सहलीत काढलेले फोटोशी समोरची व्यक्ती जास्त रिलेट करु शकते अस मला वाटते. उदाहरणार्थ, तुम्ही काढलेल्या चाँद मिनार चा फोटो, फार मोहक नसला, तरी क्षणात तिथे जाउन आल्यसारखे वाटले! :)

छान माहिती+फोटो. :)
हा लेख तुला आधी वाचायला द्यायला पाहिजे होता.
http://divyamarathi7.bhaskar.com/article/MAH-attar-market-aurangabad-217...

सोका.. मस्त फोटो रे.. दीड वर्षापूर्वी मी पण ह्याच पट्टयात फिरून आलो होतो..

चला या धाग्यातुन का होईना पण देवगिरी किल्ल्याचे दर्शन झाले. :)

दादा कोंडके's picture

12 Nov 2011 - 12:48 am | दादा कोंडके

छान फोटु आणि वर्णन सुद्धा!

वाह..

शाळेच्या ट्रिपची आठवण आणलीत.. तो भूलभुलैय्या.. तोफ... सगळं सगळं कालपरवा बघितलंय असं वाटलं..

मस्त फोटो आणि माहिती हो...

परिकथेतील राजकुमार's picture

11 Nov 2011 - 4:39 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय माहितीपूर्ण लेखमाला.

फटू अतिशय सुरेख आहेत, विशेषतः दरवाजाचा फटू. स्क्रोल करताना तो दरवाजा आणि खिळे मोठे होत अंगावर पडत आहेत असे वाटते.

बाकी तोफेच्या तोंडी गेल्यामूळे लेखमाला 'क्रमशः' झाली असावी काय ?

+१
आधी लक्षात आल नाही.तुमची कॉमेंट वाचून तसं करून बघितलं.भारी वाटतंय.

भारी वाटतंय.

काय भारी वाटतंय ?
सोक्या तोफेच्या तोंडी दिला गेला ही कल्पना की दरवाजा आणि खिळे अंगावर येत आहेत ही कल्पना? ;)

- (पराने तोफेच्या तोंडी दिलेला) सोकाजी

अस मस्त खिळ्यांचा पाऊस पडतोय अस वाटत...

वपाडाव's picture

11 Nov 2011 - 4:40 pm | वपाडाव

काय झ्याक ठिकाण निवडलं हो साहेब !!!
बाकी, इथे गेलाच होतास तर भद्रा मारुती अन औरंगजेबाची कबर वेग्रे पाहिलीस की नाही ????
फटु कडक...

भद्रा मारुती अन औरंगजेबाची कबर बघितली तर!
पण का कोण जाणे इथले फोटो नीट नाही आले :(

- (भद्रा मारुतीचे फोटो न आल्याची हूरहूर दाटलेला) सोकाजी

भद्रा मारुती अन औरंगजेबाची कबर बघितली तर!
पण का कोण जाणे इथले फोटो नीट नाही आले :(

- (भद्रा मारुतीचे फोटो न आल्याची हूरहूर दाटलेला) सोकाजी

सुहास झेले's picture

11 Nov 2011 - 4:43 pm | सुहास झेले

व्वा व्वा.. मस्त आहेत फटू.

कधी पासून जायचं जायचं म्हणतोय, पण योग जुळून येत नाही आहेत :(

मोहनराव's picture

11 Nov 2011 - 4:45 pm | मोहनराव

मी २ वर्षापुर्वी हा पट्टा फिरुन आलेलो आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने निदान एकदातरी ही स्थाने पाहिलीच पाहिजेत!!

(पर्यटनवेडा) मोहन.

जे.पी.मॉर्गन's picture

11 Nov 2011 - 5:17 pm | जे.पी.मॉर्गन

मस्त आहेत फटू. बर्‍याच दिवसांपासून प्लॅन करतोय अजंठा, वेरूळ, घृष्णेश्वर, देवगिरी आणि पैठण फिरायचा. तुमचा पूर्ण रिपोर्ट आला की रजा टाकतो :)

येऊद्या पटकन
जे पी

मृत्युन्जय's picture

11 Nov 2011 - 5:31 pm | मृत्युन्जय

अजंठा वेरुळ कधी टाकताय मग आता? तिथेही जायचे आहेच. कार्यबाहुल्यामुळे जाणे होत नाही (लिहायला कसले भारी वाटते ना हे कार्य बाहुल्य वगैरे?) :)

चित्रा's picture

11 Nov 2011 - 5:45 pm | चित्रा

धन्यवाद.

लहानपणी औरंगाबादेला गेल्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
बिवी का मकबरा तेव्हा नावामुळेच पाहण्याची इच्छा होती.

चेतन सुभाष गुगळे's picture

11 Nov 2011 - 5:45 pm | चेतन सुभाष गुगळे

एकूणच सुटी छान घालवलीत म्हणायची तर. छायाचित्रे उत्तमच. मी १९९० साली जाऊन आलो होतो. तेव्हा चांद मिनारच्या आतमध्ये थेट वर पर्यंत जाऊन देत असत. अजुनही जाऊन देतात का?

बाकी पणचक्की वगैरे पाहिलीत की नाही?

आता वर जाउ देत नाहीत आणि आतही जाउ देत नाहीत :(

- (चांद मिनारच्या आत ना गेलेला) सोकाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2011 - 5:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो छान आले आहेत.

-दिलीप बिरुटे

किचेन's picture

11 Nov 2011 - 5:59 pm | किचेन

भारीच! सगले फोटो मस्तच आलेत.इथे पूर्वी कधी गेले नसल्याने एकदा जाऊन यावच अस वाटायला लागलाय.
बाकी किल्याचा पारीसार वैगैरे एकदम स्वस्च दिसतोय.कोठेही पाण्याच्या बाटल्या आणि फाटलेल्या करिबग नाहीयेत.
छान काळजी घेतलीये किल्ल्याची.

आत्ताच कोकणाच्या धाग्याची वाचनखूण साठवली.
या धाग्यातही व्यवस्थित माहिती दिली असल्याने वाचनखूण साठवावी लागणार.
फोटू छान आलेत.

दिवाळीची सुट्टी सार्थकी लागली तुमची, मस्त आले आहेत फोटो. आणि तुझा फोटो तर सगळ्यात मस्त. तिथं जाउन आल्याचा पुरावा म्हणुन तिथल्या दगडावर चुन्यानं नाव न लिहिता फोटो काढुन ठेवलास याबद्दल धन्यवाद.

लहान असताना बाबांबरोबर गेलो होतो, अशा ठिकाणी गेलं की माझ्या बाबांचा हरितात्या व्हायचा. त्यात ते इतिहासाचे शिक्षक मग काय मजा यायची.

सोकात्रि, आठवणी जागवल्याबद्दल खुप आभार. पुढच्या सुट्टीत पोराला घेउन जाईन, अजुन त्याला दुश्मनी म्हणजे काय शिकवलं नाही आणि दुश्मनी काय हे कळाल्याशिवाय दुश्मनापासुन संरक्षणासाठी काय काय करुन ठेवलंय याचं महत्व् कळणार नाही.

फोटो आणि माहिती मस्तच. एक ऐकीव माहिती. ती सर्वात वरच्या बुरुजावरची तोफ चढवण्यासाठी बुरुजाच्या कडेला रहाटाला असतात तश्या चक्री लावल्या होत्या व पलिकड्च्या बाजुने हत्तीनी ओढुन ती तोफ वर घेतली गेली असं म्हणलं जातं.

मस्त कलंदर's picture

11 Nov 2011 - 8:28 pm | मस्त कलंदर

फोटो आणि वर्णन दोन्ही छान!!
हे सर्व कधी पाहायला मिळेल याच्या प्रतिक्षेत.. :-(

रेवती's picture

11 Nov 2011 - 9:01 pm | रेवती

त्यात काय अवघड आहे काकू?;)
पतीदेवांना सांगा की!
"राया मला देवगिरी दावा की, राया मला......"
अशी गाणी म्हणून बघा.;)
पाभे तर तुम्हाला चांगलीशी लावणीही तयार करून देतील.
द्याल ना हो पाभे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2011 - 9:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत. :)

-दिलीप बिरुटे

मस्त कलंदर's picture

11 Nov 2011 - 10:48 pm | मस्त कलंदर

त्याने नेलं असतं तर असं म्हणायची वेळच आली नसती ना. फक्त भद्रा मारूतीला एकदा नेऊन आणलंय त्याने.

जाता जाता: मी आणि काकू, हूं; कभ्भी नहीं!!

सोत्रि's picture

12 Nov 2011 - 2:10 am | सोत्रि

मी आणि काकू, हूं; कभ्भी नहीं!!

हे तुमचे स्वगत आहे की तुमचे हे असे म्हणतात,कुठे एकत्र जायचे असल्यास? ;) (ह.घे.)

- (हलकट) सोकाजी

मस्त कलंदर's picture

12 Nov 2011 - 10:09 pm | मस्त कलंदर

आता आज्जीलोक काकू म्हणायला लागल्यावर असं म्हणायला होणारच ना!! ;-)

अवांतराबद्दल काही मी काही बोलायची गरज नाही इतकं उत्तर पुरेसं आहे. :-)

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2011 - 11:13 am | परिकथेतील राजकुमार

त्याने नेलं असतं तर असं म्हणायची वेळच आली नसती ना. फक्त भद्रा मारूतीला एकदा नेऊन आणलंय त्याने.

=)) =))
त्याच्यामागे कारण आहे.

भूत पिशाच निकट नहीं आवे,महावीर जब नाम सुनावें. ;)

पाषाणभेद's picture

12 Nov 2011 - 2:00 am | पाषाणभेद

अगदीच देवगीरीचा किल्ला नाही पण "इश्काच्या किल्याची मी किल्लेदारीण" असली लावणी मी या आधीच लिहीलेली आहे. संकोचभयास्तव मी ती प्रकाशीत केली नाही परंतु आपल्या येथील 'भावड्या' या आयडी च्या मागणीस्तव मी त्याला दिलेली होती. देवगीरीच्या किल्यात ज्या ज्या गोष्टी आहेत ते ते वर्णन त्या लावणीत आलेले आहे.
अर्थातच 'देवगीरी' ह्याच किल्याला ध्यानात घेवून जरी ती लावणी लिहीली गेली नसली तरी थोड्याफार शब्दात फेरबदल करून ती या संदर्भात ती लागू होवू शकते.

त्या लावणीत आक्षेपार्ह काही नाही पण आधीच आमची इमेज चांगली नसल्याने आम्ही ती येथे डकवणार नाही. खरोखर पुरूषांचेच जे आयडी आहेत त्यांना 'मागणी तसा पुरवठा' या उक्तीनुसार आम्ही ती रचना त्यांना पुरवू शकतो.

मनापासून धन्यवाद.

अरे हो, मुळ धाग्यावर प्रतिक्रीया द्यायची राह्यलीय म्हणून प्रतिसाद नविन करतोयः
फोटो अन वर्णन छान आहे. पण सोका तुम्ही गाईड घेतला होता काय? कारण किल्यातले बरेच डिटेल्स आलेले नाहीत. जसे त्या चाँद मिनारच्या समोर एक मोठा हौद आहे. त्यात रंगीत पाणी टाकून रंगपंचमी व्ह्यायची किंवा सुरूवातीला घोडे बांधायच्या पागा आहेत ते किंवा एक छोटेसे भोक आहे त्यात शत्रू सैन्याचा सैनिक पहिल्यांदा डोके घालायचा अन मग त्याचे डोके उडवले जायचे ते. अन हो ते भारतमातेचे मंदिर आताच्या काळातले आहे. ('भारतमाता' ही देवी 'संतोषीमाता' देवीसारखीच आहे.)

नाही गाईड नव्हता घेतला. :(
माझे वडिल ईतिहास शिकवायचे आणि ते बरोबर होते त्यामुळेच एवढी (तरी) माहिती मला मिळाली :)

- (ईतिहासप्रेमी) सोकाजी

अवांतर: तुमच्या लावणीची रचना व्यनी करा.

पाषाणभेद's picture

12 Nov 2011 - 2:47 am | पाषाणभेद

एक सांगायचे राहिले. पुर्वी त्या मिनारावर जावू द्यायचे. आता तसे करू देत नाही. लहाणपणी मी गेलोय वरती दुसर्‍या की तिसर्‍या मजल्यापर्यंत.
लावणी व्यनी केली आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Nov 2011 - 8:45 pm | अत्रुप्त आत्मा

देवगिरीचा किल्ला भयंकर उंच आहे...असे लहानपणी कधीतरी ऐकले होते...आणी आमच्या शेजारचा एक मुलगा जाउन आल्यावर पाय सुजले म्हणुन पायाला पट्ट्या बांधुन बसला होता. तरीही कधी जाय्ला मिळाले तर अधीच आपण पट्ट्या बांधुन चढवे,असा सूप्त विचार मनी बाळगुन आहे...म्हणजे पायला होणरा अपाय टळेल...पण तरीही तुंम्ही फोटो व महीतीच्य माध्यमातुन करुन दिलेले दर्शन घेऊन ''काहीही झाले तरी जाणरच'' असा विचार मनात बाळगतो.... मेंढा तोफ सा-भार दाखवल्याबद्दल आभार... ;-)

पैसा's picture

11 Nov 2011 - 9:22 pm | पैसा

एकदम आवडले!

मिहिर's picture

11 Nov 2011 - 10:10 pm | मिहिर

छान फोटो.

ह्या काळात यादव साम्राज्य समृद्धी आणि उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर होते. त्याची खबर अलाउद्दिन खिलजीला लागली आणि त्याने देवगिरीवर हल्ला केला.

हे वाचून खुदकन हसू आले. अहो, तो खिलजी काय कोणते साम्राज्य उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर आहे, हे बघून हल्ला करायचा का?

किल्ल्याचा सर्वांत वरचा भाग जनार्दनपंताच्या पादुका असल्याचे आठवते. त्याचा काहीच उल्लेख नाही दिसला.

तो खिलजी काय कोणते साम्राज्य उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर आहे, हे बघून हल्ला करायचा का?

उगाच कोण कशाला एवढ्या लांब माहिती नसताना आणि मुख्य म्हणजे पैसा नसताना तडमडायला येईल :)

किल्ल्याचा सर्वांत वरचा भाग जनार्दनपंताच्या पादुका असल्याचे आठवते.

आहेत, सर्वात वरच्या भागात जनार्दनपंताच्या पादुका आहेत. पण वर जाइपर्यंत जीव गेला होता आणी फोटो काढायची शक्तीही नव्हती. खरेतर आता तुमचा प्रतिसाद वाचून खुप वाइट वाटते आहे फोटो न काढल्याबद्दल आणि न लिहिल्याबद्दल :(

- (जनार्दनपंतांची मनापासुन माफी मागणारा) सोकाजी :(

पूनम ब's picture

12 Nov 2011 - 1:41 am | पूनम ब

एकदम मस्त आहेत फोटो :)

आता पुढच्या अ‍ॅड्वेंचरसाठी तयात व्हा.. बाकी किल्लाच्या प्रतिमा छानच टिपल्या आहेत.

- पिंगू

प्रचेतस's picture

12 Nov 2011 - 9:39 am | प्रचेतस

सुरेख वर्णन आणि अप्रतिम फोटो.

यादव राजवंशाने ह्या किल्ल्याचे निर्माण केले.

देवगिरीचे निर्माण राष्ट्रकूटांनी केले आहे. निदान अंधारी आणि खंदकाचे काम तर राष्ट्रकूट राजवटीतच झाले आहे. नंतरच्या तटबंदी आणि काही बांधकामे यादवकाळात झाली आहेत.

वेरूळ लेण्यांच्या निर्मितीकाळाच्या आसपासच या किंवा त्याआधी ह्या किला बांधण्यात आला असावा. देवगिरीच्या भक्कम पाठिंब्याशिवाय या लेण्यांची निर्मित्ती तशी अशक्य वाटते.

सोत्रि's picture

12 Nov 2011 - 11:02 am | सोत्रि

देवगिरीचे निर्माण राष्ट्रकूटांनी केले आहे

वेरूळची कैलास लेणी घडवून घेणार्‍या राष्ट्रकूट राजानेच देवगिरी किल्ल्याची निर्मिती केली असाही एक 'स्कूल ऑफ थॉट' आहे.

देवगिरीबाबतचा लिखित इतिहास मात्र यादव काळापासुन उपलब्द्ध आहे.
असे एका सरकारी कागद पत्रात कुठे तरी वाचले होते.

- (पास होण्याइतपतच इतिहास शिकलेला) सोकाजी

प्यारे१'s picture

12 Nov 2011 - 12:26 pm | प्यारे१

मस्त रे मस्त....!
आम्ही पण गेलेलो म्हटलं मागच्या दिवाळीत. एवढा काय भाव खायची गरज नाही ब्रं.... ;)
घृष्णेश्वराला गेलेलात काय?

स्मिता.'s picture

12 Nov 2011 - 10:58 pm | स्मिता.

देवगिरी किल्ल्याचे वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले. शेवटचा फोटोही नोटीस केला ;)

प्राथमिक शाळेत असताना १ दिवसाकरता औरंगाबादला सहल गेली होती. पण त्यावेळी आम्हाला किल्ला दुरूनच दाखवला. या धाग्यामुळे तो जवळून बघायला मिळाला. बिबीका मकबरा पाहिला होता पण आता काही आठवत नाही. त्यामुळे पुढच्या धाग्याच्या प्रतिक्षेत.

प्रभाकर पेठकर's picture

13 Nov 2011 - 7:53 pm | प्रभाकर पेठकर

सर्व छायाचित्रे आणि वर्णन मस्तच आहे.

मला मधे मधे काळ्या चौकोनात पांढर्‍या रंगाचे उद्गारचिन्ह दिसते आहे. ते कशासाठी आहे?

मला मधे मधे काळ्या चौकोनात पांढर्‍या रंगाचे उद्गारचिन्ह दिसते आहे. ते कशासाठी आहे?

फोटोंचा थोडा घोळ झाला आहे, सं.मं. मदतीचे साकडे घातले आहे.

- ('घोळ'कर) सोकाजी

सोक्या, फोटु जरा पिकावर असतील तर फोल्डरचे सेटींग बघ रे, किंवा फोटु दुसर्‍या फोल्डरमधे हलवले असतील तरी असा घोळ होवु शकतो असे वाटते.

मला मधे मधे काळ्या चौकोनात पांढर्‍या रंगाचे उद्गारचिन्ह दिसते आहे. ते कशासाठी आहे?

त्या फोटोंच्या लिंका गंडल्या असाव्यात असे वाटते....

सोत्रि's picture

14 Nov 2011 - 11:45 am | सोत्रि

हो असेच झाले आहे. पण आता मिपावर स्वसंपादन करता येत नाहीयेय. :(
काही संपादकांना व्यनी पाठवला आहे बदल करण्याबद्दल.

- ( :( ) सोकाजी

पैसा's picture

14 Nov 2011 - 7:45 pm | पैसा

अशी अर्धवट माहिती काय देताय? पिकासावर कोणता फोल्डर आहे, तो शेअर केलाय का, नीट सांगा की जरा!

सोत्रि's picture

15 Nov 2011 - 10:43 am | सोत्रि

धन्यवाद!

- (आभारी) सोकाजी

पैसा's picture

15 Nov 2011 - 10:45 am | पैसा

दुरुस्ती तुम्हीच केलीत, मी फक्त कॉपी पेस्ट केलं!

आशु जोग's picture

13 Nov 2011 - 8:45 pm | आशु जोग

या परीसराचे फोटो पाहून बरे वाटले

अन्यथा ट्रेकींग वा भटकंती म्हणजे काही ठराविक किल्ल्यांबद्दलच ऐकायला मिळते

पुन्हा एकदा इकडे जाऊन यावे अशी इच्छा निर्माण झाली आहे

आत्मशून्य's picture

14 Nov 2011 - 6:05 am | आत्मशून्य

.

पद्मश्री चित्रे's picture

14 Nov 2011 - 9:56 am | पद्मश्री चित्रे

गेल्या दिवाळीत आम्ही पण इथेच गेलो होतो.. (पण देवगिरिवर शेवट्पर्यन्त नव्हते गेले..)फोटो मस्त आहेत.. लोणार ला गेला होतात का? जरा दूर आहे, पण अतिशय छान

मला तरी दुरुस्ती जमली नाही.

प्रभाकर पेठकर's picture

15 Nov 2011 - 10:57 am | प्रभाकर पेठकर

व्वा.... आता सर्व छायाचित्रे मस्त दिसत आहेत. धन्यवाद.

शेवटचे, तोफेचा आवाज 'कान देऊन' ऐकतानाचे, छायाचित्र खासच आहे.

गार्गी_नचिकेत's picture

15 Nov 2011 - 4:58 pm | गार्गी_नचिकेत

फोटो आणि वर्णन दोन्हिही छान आहे. औरंगाबाद जवळच तासाभरच्या अंतरावर (गाडीने) "म्हैसमाळ" नावाची जागा आहे.
येथे एक बालाजी चे छानसे मंदिर आणि छोटे तळे आहे. येथूनच सुर्योदय-सुर्यास्त पण छान दिसतो.

वपाडाव's picture

15 Nov 2011 - 5:39 pm | वपाडाव

म्हैसमाळ = एकदम छान जागा आहे ही... खास करुन युगुलांकरिता.... कालेजातुन निघुन एका तासात वर अन २ तास तिथे घालवुन एका तासात परत.....पलीकडील टोकावरुन दिसणारी कडा पण सुंदर....

सोत्रि's picture

15 Nov 2011 - 5:58 pm | सोत्रि

खास करुन युगुलांकरिता

आपला काय अनुभव?
'विशालकाय वडाचं झाड' तिथलच का? ;)

- (माळावरचा पण म्हशीच्या नव्हे) सोकाजी

आशु जोग's picture

10 Jan 2012 - 12:33 am | आशु जोग

देवगिरी किल्ल्याच्या 'आर्किटेक्चरची' काही माहिती कुठल्या पुस्तकात मिळेल का !

फिरोझ रानडे यांची अशा प्रकारची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

देवगिरी, जंजिरा लखनौचा इमाम बाडा यांच्या आर्किटेक्चरची माहिती मिळाल्यास आवडेल.