.(नेत्रपटलावरील चित्रांवेगळे)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
16 Nov 2011 - 9:04 am

शब्द म्हणजे चिह्न - जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरलं जाणारं. ते कधी पांढऱ्यावर काळ्या रेषा म्हणून येतं, तर हवेत उमटणाऱ्या ध्वनिलहरींतून जाणवतं. पण जग जाणण्यासाठी आपण केवळ शब्दच वापरत नाही. चित्रंही वापरतो. कोणीतरी म्हटलं आहे की एक चित्र हजारो शब्दांइतकं महत्त्वाचं असतं. आपण प्रत्येकच अशी चित्रं वापरतो. ती वारंवार आपल्या नेत्रपटलावर उमटत असतात. म्हणून मी यशवंत कुलकर्णी यांच्या लेखात 'शब्द' या शब्दाच्या जागी 'नेत्रपटलावरील चित्र' वापरून हा लेख लिहिलेला आहे. खरं तर त्यांचाच सल्ला वापरून मी त्यांचा लेख अधिक व्यापक केला आहे असं म्हणता येईल. काही अगदी जुजबी बदल केलेले आहेत. ते शक्य तिथे कंस इत्यादी वापरून दाखवून दिलेले आहेत.

लेखाचं शीर्षक कंसात टाकलं आहे, कारण एखादा लेख, कविता आधारभूत घेऊन नवीन लेखन केलेलं आहे हे दर्शवण्यासाठी ती प्रथा आहे. हे जर कोणाला विडंबन वाटलं तर ती जबाबदारी वाचकाची.

--------------
यु. जी. कृष्‍णूर्तींचे साहित्य वाचताना त्यांच्या रूपांतरणोत्तर आयुष्‍यात घडलेल्या एका अगदीच सूक्ष्‍म पण अत्यंत महत्त्वाच्या फरकाचा उल्लेख येत रहातो. हा अगदीच छोटासा फरक 'युजी' हा माणूस आणि बाकीचे जग यांतला कळीचा मुद्दा आहे. कदाचित आध्‍यात्माच्या वाटेवर चालून ती वाट संपवलेल्या सर्वांच्यामधला व बाकी माणसांच्या मधला तो फरक असावा; इतरांचं मला जास्त माहित नाही, पण युजींनी मात्र सतत या फरकावर जोर दिला आहे.
हा फरक म्हणजे नेत्रपटलांवरील चित्र आणि त्यातून (मनात) निर्माण होणारी प्रतिमा! युजींच्या अंतर्पटलावर नेत्रपटलांवरील चित्रांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही.

थोडक्यात जगाला जाणून घेण्‍यात किंवा जगाबद्दल समजाऊन सांगण्‍यात नेत्रपटलांवरील चित्रांवर त्यांची भिस्त नाही. अर्थात युजी आणि लोकांच्यातला संवाद हा नेत्रपटलांवरील चित्रांच्या (सहाय्यानेच) झाला आहे. पण युजींचे नेत्रपटलांवरील चित्र हे फक्त ते ज्या अवस्‍थेत आहेत तिची झलक त्यांना ऐकणारांच्या मनात उभी रहावी यासाठी मारलेले कुंचल्याचे फटकारे आहेत. पण युजी हे काही नेत्रपटलांवरील चित्रांचे फटकारे मारुन रजनीशांप्रमाणे सुंदर-सुंदर, लोभस चित्रे उभे करु शकणारे निष्‍णात चित्रकार नाहीत. युजींनी केलेला नेत्रपटलांवरील चित्रांचा वापर हा यांत्रिक आहे, तर रजनीशांनी केलेला नेत्रपटलांवरील चित्रांचा वापर हा नितांत कलात्मक आहे - त्यातून सृजनशीलता डोकावते आणि ती आ‍कर्षित करते.

एरव्ही नेत्रपटलांवरील चित्र म्हणजे काय तर, जे आपल्या आजूबाजूला अफाट विस्‍तारलं आहे आणि ज्या अफाट विस्‍ताराची एकच एक, एकसंघ, महाप्रचंड प्रतिमा आहे, त्या प्रतिमेतून फाडून काढलेल्या चिंध्‍या किंवा ती प्रतिमा उभी राहण्‍यासाठी आपण मर्त्य मानवांनी जोडलेली ठिगळे! (मानवाला फक्त मर्यादित रंग दिसतात. त्यामुळे त्याच्या नेत्रपटलांवरील चित्र अर्थातच संपूर्ण विश्व सामावायला अपुरे आहेत)
त्या महाप्रचंड प्रतिमेला उभं करण्‍यासाठी आपण जोडत असलेली नेत्रपटलांवरील चित्ररुपी ठिगळे आणि चिंध्‍या याच माणसांनी साठवलेलं लेंढार आहेत - या नेत्रपटलांवरील चित्रांच्या लेंढारातून सहज मोकळं होता येत नाही, व ही नेत्रपटलांवरील चित्ररुपी ठिगळे पाहिल्या शिवाय आपल्या मनात कसलंही चित्र उभं राहू शकत नाही.
हा नेत्रपटलांवरील चित्रप्रतिमांचा व्यापार विचारांच्या माध्‍यमातून मनातही अखंड सुरु असतो, बाहेरुनही आपल्यावर त्याचा मारा सुरु असतो आणि आपणही लोकांच्या नेत्रपटलांवर चित्रप्रतिमा फेकत असतो - थोडक्यात आपण सर्वचजण लाक्ष‍णीक अर्थाने नेत्रपटलांवरील चित्रावडंबर माजवात जगत राहणारे लोक आहेत, आपण नेत्रपटलांवरील चित्रजीव आहोत. नेत्रपटलांवरील चित्रप्रतिमांच्या ठिगळांशिवाय आपलं चालु शकत नाही. नेत्रपटलांवरील चित्रप्रतिमांची ही ठिगळे विशिष्‍ट पद्धतीने जोडणे ही झाली (चित्र)भाषा. पण मुळात नेत्रपटलांवरील चित्र म्हणजे काय त्याच्या खोलात शिरण्‍याचं कारण नाही. कारण नेत्रपटलांवरील चित्र हे फक्त चिन्ह-प्रतिमा आहेत. त्या प्रतिमांचं अस्तित्त्व हेच नेत्रपटलांवरील चित्रांचं अस्तित्व आहे. मनातून प्रतिमा पुसून टाका, नेत्रपटलांवरील चित्र पुसलं जातं. नेत्रपटलांवरील चित्राचा गळा दाबा, मनात कसलीही प्रतिमा उमटू शकत नाही. प्रात्यक्षिकासाठी कुठलाही नेत्रपटलांवरील चित्र घ्‍या. उदा. मुलगा. (तुम्ही एखाद्या मुलाकडे पहाताना) मुलगा या नेत्रपटलांवरील चित्रातून जी प्रतिमा मनात येते ती फाडून टाकली, ती नष्‍ट करुन पाहिली तर (एक विचित्र आकाराचं) निरर्थक, विनोदी नेत्रपटलांवरील चित्र शिल्लक रहातो! प्रत्येक नेत्रपटलांवरील चित्र असा मनात नष्‍ट करुन नलीफाइड, व्हॉईड केला तर हे लक्षात येऊ शकेल.

नेत्रपटलांवरील चित्रांच्या मागील (मनातील) प्रतिमा छाटून टाकून आपण तेवढ्‍यापुरतं नेत्रपटलांवरील चित्रावेगळे, नेत्रपटलांवरील चित्रमुक्त होऊ शकतो आणि याच नेत्रपटलांवरील चित्रातून निपजणार्‍या विचारांच्या वावटळींतूनही वेगळे होऊ शकतो, पण हे फक्त तेवढ्‍यापुरतंच होता येतं. विचारांचा ब्रम्हराक्षस आपण त्याच्या नेत्रपटलांवरील चित्ररुपी अपत्यांची कत्तल करुन मारुन टाकू शकत नाही.

नेत्रपटलांवरील चित्र ही आपली शेवटची मर्यादा आहे. नेत्रपटलांवरील चित्र हीच आपली अंतिम सीमारेखा आहे, आपल्यावर ओढलेलं कवच आहे. नेत्रपटलांवरील चित्रांना जर ओलांडून पुढे जाता आलं तर, नेत्रपटलांवरील चित्रावेगळं रहाता आलं तर कदाचित त्याला मुक्ती किंवा मोक्ष म्हणत असावेत. कदाचि‍त त्यामुळेच आध्‍यात्मात डोळे मिटून राहून पाहिलं जातं असावं.

(काही अज्ञानी लोकं नेत्रपटलावरील चित्रं कायमची नष्ट करण्याला आंधळं होणं म्हणतात. पण तो स्वतःला डोळस समजणाऱ्यांचा दोष असावा.)

संस्कृतीधर्मसमाजजीवनमानमौजमजाप्रकटनविचारलेखमतवादआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

16 Nov 2011 - 10:41 am | पैसा

ही फक्त पोच. समजून घ्यायचा प्रयत्न करतेय.

नेत्रपटलांवरील चित्र हा शब्द 'शब्द' अभिव्यक्तीचा समानार्थी होऊ शकत नाही.
*In the beginning there was 'word' असं एक वाक्य बायबलमध्ये आहे, त्यावरुन 'वर्ड' चा काय तो अर्थ घ्या.
नेत्रपटलांवरील चित्र हा शब्द 'केवळ तुमच्या डोळ्यांना ते तसं दिसतंय, खरं ते तसं नाहीच' असं सांगण्यासाठी इथे वापरला आहे, तो वापर फसला आहे कारण 'शब्द' अभिव्यक्तीत 'नेत्रपटलांवरील चित्र' हा शब्दच काय, मर्त्य मानव** करु शकणारे समस्त शब्द येतात.

(*म्हणजे सृष्टीनिर्मितीपूर्वी शब्द होता. अर्थात खरीच सृष्टीनिर्मिती कुणी केलीय, कुणी केलीयच का वगैरे प्रश्नांचे अंतिम उत्तर बायबलमध्ये आहे असं म्हणायचं नाही.)
** (राजेश घासवकड्वी हे मानव आहेत, त्या अर्थी ते मर्त्य आहेत ;-) )

राजेश घासकडवी's picture

16 Nov 2011 - 5:53 pm | राजेश घासकडवी

In the beginning there was 'word' असं एक वाक्य बायबलमध्ये आहे, त्यावरुन 'वर्ड' चा काय तो अर्थ घ्या.

बायबलमधला वर्ड हा खूपच व्यापक (आणि धूसर) अर्थाने आहे.

The word for “word” here is “logos”, the Greek word for the indwelling logic, or rational order of things. But it also refers to and translated the figure of “Wisdom” from the Hebrew scriptures.
...And the Word was made flesh, and dwelt among us, (and we beheld his glory, the glory as of the only begotten of the Father,) full of grace and truth.

तुमच्या मूळ लेखात तुम्ही 'शब्द' हा शब्द सर्वसाधारण अर्थानेच वापरलेला दिसतो.

नेत्रपटलांवरील चित्र हा शब्द 'शब्द' अभिव्यक्तीचा समानार्थी होऊ शकत नाही.

असहमत.
- नेत्रपटलांवरील चित्रं शब्दांप्रमाणेच मनुष्यनिर्मित आहेत.
- खऱ्या जगाचं ती शब्दांप्रमाणेच अपूर्ण प्रातिनिधित्व करतात. (आपल्याला एकाच कोनातून दिसतं, रंग सगळे दिसत नाहीत इत्यादी)
- शब्दांना जशा मर्यादा असतात तशाच नेत्रपटलावरील चित्रांना मर्यादा असतात. म्हणून तर दृष्टीभ्रम होऊ शकतात.
- ती चित्रं 'वापरून' आपण अंतर्पटलावर प्रतिमा निर्माण करतो. डोळे बंद केले म्हणून या प्रतिमा येणं थांबत नाही.
- ती चित्रं ही चिह्नं असतात. सर्वसाधारणपणे सर्वच लोक त्या चिह्नांचा अर्थ पुरेसा सारखा लावतात.

नेत्रपटलांवरील चित्र हा शब्द 'केवळ तुमच्या डोळ्यांना ते तसं दिसतंय, खरं ते तसं नाहीच' असं सांगण्यासाठी इथे वापरला आहे, तो वापर फसला आहे कारण 'शब्द' अभिव्यक्तीत 'नेत्रपटलांवरील चित्र' हा शब्दच काय, मर्त्य मानव** करु शकणारे समस्त शब्द येतात.

- हा केवळ 'शब्द' या शब्दाच्या जागी ठेवलेला कुठचातरी वाटेल तो शब्द नाही. यातून डोळ्यांना दिसतंय ते खरं नाही, असंही सांगण्याचा प्रयत्न नाही. वर लिहिल्याप्रमाणे ती चित्रं आणि शब्द हे एकच भूमिका बजावतात. काहीसं नौदळ आणि हवाई दळासारखं. माध्यम वेगळं पण ध्येय एकच.

या लेखात मी धनंजयने म्हटल्याप्रमाणे कांद्याची आणखीन एक साल सोललेली आहे. शब्दही नको, चित्रही नको, स्पर्शही नको... इत्यादी. हे सगळं जाऊनही कुठेतरी आपण त्यापलिकडे वेगळे शिल्लक राहू असा तुमचा विश्वास असेल तर तुमची याला हरकत नसावी. प्रश्न असा आहे की तुमची किती सालं सोलायची तयारी आहे?

नगरीनिरंजन's picture

16 Nov 2011 - 8:14 pm | नगरीनिरंजन

>>नेत्रपटलांवरील चित्रं शब्दांप्रमाणेच मनुष्यनिर्मित आहेत.

या वाक्याशी असहमत. मी मराठीतून बघतो, इतर कोणी इंग्रजीतून बघतो असा प्रकार नसतो. शब्द आणि पर्यायाने भाषा मनुष्यनिर्मित आहेत म्हणून अनेक आहेत. नेत्रपटलावर चित्र उमटण्याची क्रिया नैसर्गिक आहे, मनुष्यनिर्मित नाही. त्या प्रतिमेला नाव द्यायची प्रक्रिया मात्र मनुष्यनिर्मित आहे. (एकदा उमटलेली चित्रं साठवून पुन्हा आठवणे म्हणजे निर्मिती नव्हे.)
बाकी आपल्या डोळ्यांनी संपूर्ण सत्यच दिसत नाही याच्याशी सहमत आहे आणि नेत्रपटलावर चित्र उमटले तरी त्या चित्रासाठीचा शब्द किंवा विचार मनात न उमटणे हे ध्येय असू शकते.
शब्द,दृष्य, गंध, स्पर्श नको असे म्हणणे म्हणजे वेगवेगळ्या साली काढणे नसून मनात त्यांची प्रतिक्रिया म्हणून विचार न उमटणे आणि तरीही उरणारे आपले अस्तित्व अनुभवणे अशी एकच साल काढली जातेय असं मला वाटतंय. या सगळ्या संवेदना नको म्हणून ज्ञानेंद्रियं बंद केली पण विचार चालूच ठेवले तर आठवणीतल्या संवेदना उरतातच.

तुमच्या मूळ लेखात तुम्ही 'शब्द' हा शब्द सर्वसाधारण अर्थानेच वापरलेला दिसतो

सर्वसाधारण आणि व्यापक कसेही म्हटले तरी शब्दाचा संबंध सगळीकडे तितक्याच परिणामकारकपणे येतो.

नेत्रपटलांवरील चित्रं शब्दांप्रमाणेच मनुष्यनिर्मित आहेत.
- खऱ्या जगाचं ती शब्दांप्रमाणेच अपूर्ण प्रातिनिधित्व करतात. (आपल्याला एकाच कोनातून दिसतं, रंग सगळे दिसत नाहीत इत्यादी)
- शब्दांना जशा मर्यादा असतात तशाच नेत्रपटलावरील चित्रांना मर्यादा असतात. म्हणून तर दृष्टीभ्रम होऊ शकतात.
- ती चित्रं 'वापरून' आपण अंतर्पटलावर प्रतिमा निर्माण करतो. डोळे बंद केले म्हणून या प्रतिमा येणं थांबत नाही.
- ती चित्रं ही चिह्नं असतात. सर्वसाधारणपणे सर्वच लोक त्या चिह्नांचा अर्थ पुरेसा सारखा लावतात

असहमतीची ही कारणं पटली. पण ही कारणं वाचल्यानंतर तुम्ही केलेल्या शब्दबदलाचे काही प्रयोजन रहात नाही.

हे सगळं जाऊनही कुठेतरी आपण त्यापलिकडे वेगळे शिल्लक राहू असा तुमचा विश्वास असेल तर तुमची याला हरकत नसावी.

आपण शब्दावेगळे शिल्लक रहात नाही असं ऐकून आहे. शिल्लक रहात नाही याचा अर्थ आता ज्या मर्यादांसह आहोत तसे रहात नाही.

प्रश्न असा आहे की तुमची किती सालं सोलायची तयारी आहे?

माझी सालं सोलायची भरपूर तयारी आहे, पण ती मी माझ्या पुरती सोलतो म्हणे.

विजुभाऊ's picture

17 Nov 2011 - 2:58 pm | विजुभाऊ

व्यापक धूसर आणि हळवे: मुमुक्षू