() हजामांना मार्गदर्शन करता येईल का? ()

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
30 Aug 2011 - 4:29 am

हे वाड्मयचौर्य नाही, फारतर कल्पना आणि शब्द उधारीवर आणले आहेत. कुठून? करा थोडं खोदकाम.

सर्वच छोट्या मोठ्या शहरखेड्यांत हजाम अस्तित्वात आहेत. वेळोवेळी नवीन हजाम आपापली दुकानेदेखील उघडतात. (त्यातल्या काहींचा हजामपणाचा धंदा बसला. काहींनी वयोपरत्वे राजीनामा दिला. काहींनी तर पुन्हापुन्हा राजीनामा दिलेला आहे. तर काही दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. काही हजामांच्या मते आपण त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिल्लक असलेल्या) सर्वच हजामांना बिनपाण्याने सफाई करण्याची इच्छा असते. मात्र उत्साहाने काढून टाकलेल्या केसांमुळे अगर अतिबारीक केलेल्या भुवयांमुळे गिऱ्हाईकांनी तक्रार केली तर शिकाऊ हजाम निरुत्साही होतात किंवा कधीकधी चिडतातही. जुन्या हजामांना असे अनुभव काही नवीन नाहीत. पण गिऱ्हाईकांच्या अपेक्षा वेगळ्या असल्याने आणि फॅशन जगतात घडलेल्या घडामोडींबद्दल आणि जुन्या गिऱ्हाईकांच्या पूर्वानुभवांविषयी बरीच माहिती असल्याने कधी हजामांचे व गिऱ्हाईकांचे हेअर कट आणि भुवयांच्या आकारावरून वाद होतात, खटके उडतात, आणि यांचे स्वरूप तीव्र होते असे दिसते. या वादांची कारणे सर्वच चुकीची असतात असे नाही. सर्वच बरोबर असतात असेही नाही. यातील सर्व वादांची कारणे दूर करता येणे शक्यही नाही आणि गरजेचेही वाटत नाही. पण यापैकी अनेक वाद हे केवळ कर्तन कशा पद्धतीचे असावे याबद्दल स्पष्ट कल्पना नसल्यामुळे झालेल्या वादावादीतून घडलेले असतात असे लक्षात येते. म्हणून सर्वांनाच काही प्रश्न विचारत आहे. त्याची उत्तरे आपापल्या विचाराने द्यावी. या धाग्याचा उपयोग हजामाच्या दुकानातील आपापले कर्तन अधिक चांगले करून त्यातून दृष्यकलाभ्यासकांसाठी आकर्षक देखावा कसा तयार होईल यासाठी मार्गदर्शन किंवा सल्ला म्हणून करावा. गिऱ्हाईकांना जसा याचा उपयोग होईल तसा हजामांनाही आपले कर्तन सुधारण्यासाठी याचा उपयोग होईल असे वाटते. यातून जे काही कळेल ते संक्षिप्त स्वरुपात मांडण्याची जबाबदारी माझी.

काही प्रश्न मांडते, माझी विस्तृत उत्तरेही नंतर देईनच. नवीन गिऱ्हाईकांनीही सहभाग घ्यावा, परंतु जुन्या मिपाकरांकडूनही अधिक कल्पना येतील अशी आशा आहे.

१. दुकानातील कुठल्याही डोके-हातापायांवरील केसांचे कर्तन करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे?
२. चांगल्या कर्तनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी.
३. नावाजलेल्या दुकानातील कर्तन, बटा उडवणे आणि स्वतःच्या घरातील वॅक्सिंग आणि एखादा जादाचा केस उडवणे यात काय फरक आहे?
४. एका हजामाकडून करून घेतल्या जाणाऱ्या कर्तनाची वारंवारिता काय असावी?
५. फुटकळ आणि बेकार केसांचे किती प्रमाणात कर्तन व्हावं? सतत केस गलिच्छ ठेवणाऱ्यांना मिळणाऱ्या दोन चंप्यांमधलं अंतर किती असावं? चांगल्या केशकलापाला हजाम संस्थेकडून कशा प्रकारे प्रोत्साहन मिळावं? आणि
६. न रुचलेल्या केशसंभाराचे कर्तन करताना काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे का?

माझी (सध्या) संक्षिप्त उत्तरे:

१. होय. हजामांनी निदान प्रमाण फॅशनीकडे आणि केसांच्या लांबीकडे तरी थोडे लक्ष पुरवावे असे वाटते. अजागळ फॅशन करणाऱ्यांना मदतपूर्ण सूचना करण्याचा प्रयत्न हजाम संघटनेच्या मुख्य प्रवक्त्याकडून व्हावा.
२. कर्तन हे निव्वळ वाढीच केस काढून टाकण्याचे काम नसून नवीन, दिमाखदार हेअरडू घडवण्याचे काम आहे. त्या दृष्टीने हजामांच्या स्वतःच्या अशा नजरेतून/अनुभवांतून वाटलेल्या सुंदर हेअरकटची सजेशन्स देणारे, कात्र्यांची अचूक निवड करून केलेले कर्तन.
३. बराच फरक आहे. स्वतःच्या घरात कसं कर्तन होईल यावर स्वतःच कर्तक व गिऱ्हाईक असल्याने पूर्ण अधिकार असतो. दुकानात तसा तो नसतो. जे गिऱ्हाईक मिळतं ते आपलं म्हणावं लागतं. त्यातले आरोग्यपूर्ण केसांचे निवडावे व कमी आरोग्यपूर्ण केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी गिऱ्हाईकांना मदत करावी.
४. कठीण प्रश्न आहे. काही हजाम खूप कमी कर्तन करतात तर काही फार जास्त. काही एकदम बरीच कापाकापी करतात आणि काही निष्क्रीय असतात. पण जे हजाम अधिक कार्यरत आहेत अशांकडून आत्ता दिसते त्यापेक्षा बरीच अधिक कलात्मक दृष्टी असावी.
५. माझे मत कर्तनकाम फुटकळ आहे हे लक्षात येण्यासाठी हजामांच्या नेहमीच्या कंगव्यावर फार ताण येऊ नये. तसे लक्षात आल्याबरोबर चांगले केस कसे असावे याबद्दल सूचना करावी. केस गलिच्छ ठेवणाऱ्यांना मिळणाऱ्या चंप्यांमध्ये फार अंतर असू नये - एखाद दोन कर्तन/वॅक्सिंगचे अंतर असावे. चांगल्या केसांची जाहीर वाहवा व्हावी.
६. माझ्या मते नावडलेले काढून टाकणे सोपे असते, आवडलेले किंवा पोटेन्शियल असलेल्यांमधून फॅशन मॉडेल घडवताना हजामांची उदासीनता आड येते. आवडलेले सांगताना काय आवडले, आणि का आवडले हे स्पष्टपणे आणि निव्वळ 'वा छान' 'मस्त' एवढंच टाळून सांगितल्यास इतर गिऱ्हाईकांनाही पुढील फॅशन निवडीत मार्गदर्शन होते.

विडंबनसमाजजीवनमानप्रकटनविचारमतचौकशीसल्लाप्रश्नोत्तरेमाहिती

प्रतिक्रिया

पंगा's picture

30 Aug 2011 - 4:34 am | पंगा

सुरुवातीचा आणि शेवटचा असे दोन्ही कंस जागच्याजागी पूर्ण केलेले असल्यामुळे, शीर्षक कोणत्याही कंसांत नाही. सबब, विडंबन म्हणून हा लेख गणता येणार नाही.

सदर लेख हा गंभीरपणे घेण्याचा असल्याने नीट वाचला पाहिजे. सबब, पुन्हा कधीतरी वाचीन म्हणतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2011 - 4:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मूळ प्रेरणेचा लेख अप्रकाशित झाल्यामुळे थोडी अडचणच झाली म्हणून असं केलं. बाकी काही नाही.

भाऊ पाटील's picture

30 Aug 2011 - 2:59 pm | भाऊ पाटील

सहमत-विडंबन म्हणून हा लेख गणता येणार नाही.
मग सलोमि म्हणुन एक क्याटेगरि बनवावी अशी सुचना.

सलोमि धागा - सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी धागा
कॄ. ह. घेणे
;)

राजेश घासकडवी's picture

30 Aug 2011 - 4:47 am | राजेश घासकडवी

लेख खूप आवडला. हजामांना या सूचनांचा निश्चितच उपयोग होईल.

अनेक समाजांमध्ये आपले केस झाकूनच ठेवण्याची प्रथा असते. किंवा कसेही वेडेवाकडे कापलेले असले तरी त्या कर्तनाबद्दल काही बोलण्याची परवानगी नसते. अशा परिस्थितीत सामान्य व्यक्तीचेच - गिऱ्हाइकांचेच - प्रश्न महत्त्वाचे असतात. अशा परिस्थितीतही सुंदर दिसण्यासाठी 'गिऱ्हाइकांना मार्गदर्शन करता येईल का?' यावरही लिहावे ही विनंती.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2011 - 6:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हजाम हे स्वतःला फॅशन व्यवसायातले जाणकार आणि उच्चभ्रू समजत असल्यामुळे या लेखाचा हजामांना किती फायदा होईल याची खात्री नाही. पण गिऱ्हाइकांना या लेखातून हजामी-कर्तन-प्रवृत्ती समजल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला तरी त्यांना फार त्रास होणार नाही अशी आशा आहे. आता तुमचा प्रश्नः

सुंदर दिसणं म्हणजे काय असा प्रश्न येऊ शकतो किंवा सुंदर दिसावं का असा प्रश्न येऊ शकतो. दृष्यकलाअभ्यास म्हणून सुंदर दिसावं असा एक प्रवाद असेल किंवा डार्विनच्या सिद्धांताचा आधार घेऊन दुसरं उत्तर देता येईल. तर डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे बोललं तर स्त्री-नामधारी-आयडीने आपल्या महान संस्कृतीमधले, परमेश्वरदत्त शालीनता, लज्जा, संकोच, मार्दव वगैरे गुण सोडून देण्याचा आरोप होईल. तर आधी परवानगी द्यावी तर मी या मुद्द्यावरून सौंदर्य का आणि कसं या चा उहापोह करेन.
दृष्यकलेबद्दल अभ्यासाच्या अभावामुळे मी फारसं बोलू शकत नाही.

अर्थात या लेखात समाजातल्या मध्यमवयीन, संसाराच्या काळजीने त्रस्त , टकलू घटकाची, जो मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे, त्यांची काहीही दखल घेतलेली नाही. याशिवाय काही विकार, औषधांनी ग्रस्त विकेशांचीही दखल घेतलेली नाही. मी त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे.

नंदन's picture

30 Aug 2011 - 4:57 am | नंदन

पाहिजेच ही केस-स्टडी :)

पाषाणभेद's picture

30 Aug 2011 - 5:43 am | पाषाणभेद

ऐ ऐ ऐ ऐ
ऐ ऐ ऐ ऐ
ढिंकचिका ढिंकचिका
ऐ ऐ ऐ ऐ
ऐ ऐ ऐ ऐ

आज एक नवा समान अर्थीशब्द गवसला.
बाकी काय बोलावे?
मनीच्या बाता: गण्या हीच एनर्जी चांगल्या कामासाठी वापरता आली असती का रे?

प्रियाली's picture

30 Aug 2011 - 6:11 am | प्रियाली

१. दुकानातील कुठल्याही डोके-हातापायांवरील केसांचे कर्तन करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे?

या पातळीचा उहापोह दुकानाच्या बोर्डावर नसल्याने किंवा हजामाकडून तशी सूचना न आल्याने केस कर्तनासाठी अशी कुठलीही पातळी राखावी असा आग्रह करणे गैर वाटते

२. चांगल्या कर्तनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी.

पास. तूर्तास वेळ नाही आणि केस भादरून द्यायचा मूडही.

३. नावाजलेल्या दुकानातील कर्तन, बटा उडवणे आणि स्वतःच्या घरातील वॅक्सिंग आणि एखादा जादाचा केस उडवणे यात काय फरक आहे?

तसा फारसा फरक नाही, हजामत ही हजामतच असते. दुकानाच्या बोर्डावरही तसा फरक केलेला पाहिलेला नाही पण फरक असावा हे योग्य. मालक आणि हजामांनी याबाबत एक जाहीर निवेदन देणे योग्य ठरेल असे वाटते.

४. एका हजामाकडून करून घेतल्या जाणाऱ्या कर्तनाची वारंवारिता काय असावी?

सांगता येत नाही. तशा कोणत्याही सूचना नाहीत. कालच मी एका कर्तनालयात चार वेळा अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने कर्तन करून घेतले. या वारंवारितेवर अंकुश येणार असेल तर कळवावे.

५. फुटकळ आणि बेकार केसांचे किती प्रमाणात कर्तन व्हावं? सतत केस गलिच्छ ठेवणाऱ्यांना मिळणाऱ्या दोन चंप्यांमधलं अंतर किती असावं? चांगल्या केशकलापाला हजाम संस्थेकडून कशा प्रकारे प्रोत्साहन मिळावं? आणि

पायावरचे, हातावरचे, भुवईचे किंवा तत्सम केस किती लांबीचे असावेत ही अपेक्षा आहे? मोठ्या केसांचे कर्तन किती भागांत असावेत ही अपेक्षा आहे? पुन्हा, कर्तनालयात तशा काही सूचना नसल्याने अशी अपेक्षा करणे अयोग्य वाटते.

६. न रुचलेल्या केशसंभाराचे कर्तन करताना काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे का?

न आवडलेल्या पांढर्‍या केसांच्या जटांकडे दुर्लक्ष करावे पण दुर्लक्ष कितींदा करणार? रोज कोणी पिकवू लागले तर आता "पिकलो" हे सांगण्याचा हक्क गिर्‍हाईकांना असावा.

---------

बायदवे, साध्या कर्तनालयात केस कापायला $१२ + टीप आणि चांगल्या सलॉनमध्ये $३०+ टीप, तसेच केस रंगवून घ्यायला $७० +टीप, भुवया कोरून घ्यायला $७-८ + टीप (पुढले भाव सांगत नाही) पडत असल्याने आम्ही फुक्कट घरातच केस कापतो. ;)

मुक्तसुनीत's picture

30 Aug 2011 - 6:34 am | मुक्तसुनीत

द रिव्हेंज ऑफ द सबाल्टर्न्स ! :)

निवांत पोपट's picture

30 Aug 2011 - 8:40 am | निवांत पोपट

लेख आवडलाच.
पण बरेच हजाम, "रिकामा xxx भिंतीला तुंबड्या लावी" ह्या॑ प्रकारातले असतात.स्वतःच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या दाढीमिशांकडे लक्ष न देता आपला वस्ताय्राचा उपयोग इतरांना उगीच कूरूप करण्यात धन्यता माननारे ही हजाम असतात त्यांच्याबाबत ही काहीतरी लिहीलं असतं तर बरं झालं असतं

गवि's picture

30 Aug 2011 - 9:23 am | गवि

"हजाम" हा शब्द नुसता जातीवाचकच नव्हे तर वरुन तुच्छतादर्शकदेखील आहे. (मूळ फारसी अरबी शब्द तसा नसला तरी.. आठवा.. फारसी अरबी शब्दांचा आपल्या भाषेत निकृष्टतादर्शक वापर. संतति: अवलाद, वंशवृद्धी: पैदास, शिष्यः चेला आणि अशी असंख्य.. साभार फ्रॉम चिं.वि. जोशी.)

तो जरी लेखिकेने त्या उद्देशाने वापरला नसला तरी..

खरं तर उद्देश नसताना सहज वापरला जाणं जास्त वाईट..

उगाच वेगळे परिमाण देण्याचा उद्देश नाही. जाणवलं ते लिहिलं..

कालिन्दि मुधोळ्कर's picture

30 Aug 2011 - 10:21 am | कालिन्दि मुधोळ्कर

+१
जातिवाचक तर आहेच; शिवाय विनोदीही नाही. दर्जा वगेरे अपेक्षा तर सोडूनच द्याव्या.

आंसमा शख्स's picture

30 Aug 2011 - 10:30 am | आंसमा शख्स

+१
संपादकांनी यांना समज देण्याची वेळ आली आहे.

धागाकर्त्या लेखिकेने यापूर्वी एका लेखावर दिलेला प्रतिसाद पाहा.

http://www.misalpav.com/node/18439#comment-321334

त्यात त्यांनी * मांडून तळटीप दिली आहे की जाती - भाषेचा उल्लेख मुद्दामच टाळला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे पूर्वीचे लिखाण पाहता जातिवाचक उल्लेख करण्याची त्यांची लेखनशैली दिसून येत नाही. मला वाटते जातीवर नव्हे तर कार्यावर (not on the cast, but on the function) आधारित त्यांनी हा लेख लिहीला असावा. तसेही आपल्याकडे काही ठराविक कामे त्या त्या जातीत आलेल्या लोकांनीच करावीत असा संकेत आहे, म्हणून आपल्याला हा कार्यवाचक उल्लेख जातिवाचक उल्लेख वाटला असण्याची शक्यता आहे.

अर्थात असे संकेत आता काही प्रमाणात तरी मोडीत निघत आहे की - जसे की एखाद्या व्यक्तीने ब्राह्मण जातीत जन्म घेतला असेल पण पुढे त्यांनी स्टील फॅब्रिकेशनचा व्यवसाय स्वीकारला तर तिची जात लोहार होईल का? नाही परंतू त्यांनी केलेले कार्य हे लोहाराचे कार्य म्हणूनच ओळखले जाणार. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जाती - जमातीत जन्म घेतलेले अनेक जण आज अध्यापक - प्राध्यापक म्हणून कार्य करीत आहेत. विद्यादानाचे कार्य ब्राह्मणांनी करावयाचे या संकेतानुसार या सर्वांची जात ब्राह्मण ठरणार आहे का?

त्याचप्रमाणे गल्लोगल्ली उघडले गेलेले सलून, ब्युटीपार्लर्स, इत्यादी त्या जातीत जन्मलेल्या लोकांकडूनच चालविले जात आहेत असे नव्हे.

तरीही धागाकर्तीचे पूर्वलेखन पाहिले असता या लेखनाला जातिवाचक न समजता कार्यवाचक समजायला हवे.

बरं. मी जातीपेक्षा जास्त तुच्छतेचा उल्लेख केला होता. शिवाय उद्देश नसताना नकळत शब्द वापरला जाणं हे जास्त वाईट वाटतं असंही मला जाणवलेलं लिहिलं.

बाकी भलती कलाटणी मिळावी असा उद्देश नाही. लेखिकेने जातिवाचक अशा उद्देशाने तो उल्लेख केलेला नाही, त्यांचा तसा स्वभाव नाही, हा उल्लेख व्यवसायवाचकच आहे याची अगदी शंभर टक्के खात्री आहे.

यावरून आता जातीविषयी वाद नको..

विजुभाऊ's picture

30 Aug 2011 - 2:39 pm | विजुभाऊ

आठवा.. फारसी अरबी शब्दांचा आपल्या भाषेत निकृष्टतादर्शक वापर. संतति: अवलाद, वंशवृद्धी: पैदास, शिष्यः चेला आणि अशी असंख्य.. साभार फ्रॉम चिं.वि. जोशी.)

बरोबर. असे आणखीन काही शब्द वापरतो आपण उदा : वकुब ( मूळ अर्थ शिक्षण) ,दुकान, हुशार
याला अपवाद हौसः मूळ शब्द "हवस "

बाकी हजामांचा आणि त्यांच्या व्यवसायाचा उत्तम उहापोह केला आहे. लेखाकाचा अभ्यास दांडगा आहे.
पुण्यातील हजाम आणि ठाण्यासह मुंबैतील हजाम यांच्या दुकानावरील पाट्या यावर थोडा प्रकाश टाकावा
तसेच काही हजाम त्यांची स्पेश्यालिटी म्हणून समोरील एकच बट कापतात आणि इतर चार पाच बटांपैकी कोणती कापली तर बरे दिलेस असे गिर्‍हाईकालाच विचारतात.
अर्थात जुनी गिर्‍हाईकेही तितकीच हुशार असल्याने तीच हजामाना स्वतःच्या तसेच हजामाच्या डोक्याचा गोटा करुन देतात.

अगदी "हौस"च्या बाबतीतही पहा:

हवस या मूळ अर्थाने तो वापरला जात नाही. हा वेगळा भाग झाला. पण "आवड" (छंद म्हणा किंवा अन्य काही.. जशी कपड्यांची वगैरे) या ऐवजी तिला अमुकची हौस आहे, असं म्हणताना "आवड" पेक्षा काहीसा निकृष्ट टोन येतोच.

दागिन्यांची हौस आहे असं असूयेने किंवा "इतर" कोणाबाबतीत जास्त बोललं जातं (सून वगैरे) पण स्वतः किंवा स्वतःच्या मुलीविषयी मात्र दागिन्यांची "आवड" आहे असंच म्हटलं जात असावं.

मूळ धाग्याशी या एकूण उहापोहाचा काही संबंध नाही. अवांतर झाले. क्षमस्व.

फोटोग्राफीचा छंद / आवड आहे.. आणि फोटोग्राफीची हौस आहे यात दुसर्‍या प्रकारच्या उल्लेखात कॅज्युअल , अमॅचर सेन्स येतो. (फार बुवा हौस.. अशा अर्थाचा..)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2011 - 8:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> "हजाम" हा शब्द नुसता जातीवाचकच नव्हे तर वरुन तुच्छतादर्शकदेखील आहे. <<
होय. साधारणतः शिवी म्हणूनही इतर अनेक शब्द वापरले जातात, चांडाळ, कसाई, हे जातिवाचक आहेत. शिवीतून तुच्छता दर्शवली जाते हे मी वेगळं सांगायला नको.
कधी कधी शिवी देऊनही अपमान होत नाही, आणि कधी शिव्या न देताही, संसदीय शब्दांमधे अपमान/अवमान करता येतो. एकेकाळी मिपाच्या मुखपृष्ठावर रोजच्या रोज दिसणार्‍या बायड्या या अवमानदर्शक होत्या असं माझं मत आहे. पण माझ्या मित्राला मी पाठीत धपाटा घालून "काय रे हजामा, माझा फोन का घेत नव्हतास? कुठे भिंतीला तुंबड्या लावत फिरत होतास?" असं शिवी घालत म्हणणं अपमानकारक, तुच्छतादर्शक आणि सेक्सिस्टही नाही.
---
तर कधी कधी काय होतं की काही गोष्टींचे देव बनवले जातात; कुणाकडून मुद्दाम म्हणा, चुकीने म्हणा किंवा काही. देव म्हटलं की श्रद्धा आली आणि श्रद्धा आली की प्रकाशकाका म्हणतात त्याप्रमाणे चिकीत्सा करणं अमान्य होतं. त्याच वेळी इतर काही लोकं निरीश्वरवादी असतात, ते सगळ्याच गोष्टींची चिकीत्सा करतात; अगदी "अमक्या गोष्टीला देव का म्हणता, ती गोष्टही मर्त्यच आहे की!" वगैरे म्हटलं की देवभक्त, श्रद्धाळू लोकांना ते आवडत नाही. न आवडणंही मान्यच आहे, पण त्यामुळे निरीश्वरवाद्यांच्या विचारांच्या आदानप्रदानावर गदा आली की मग सिनिसिझमचा, विनोदाचा आसरा घ्यावा लागतो, चिमटे, बोचकारे काढावेसे वाटतात. हुकुमशहांना विनोदाचं वावडं का? या लेखातल्या काही उतार्‍यांची आठवण झाली:
पण खरं तर विनोदांमुळे सामाजिक/राजकीय उलथापालथ होत नाही. इतकी ताकद खरं तर त्यांच्यात नसतेच. त्यांना अभिव्यक्त होण्यापासून रोखण्यानं काही हशील होत असेल, तर ते एवढंच की ही अभिव्यक्ती रोखणाऱ्याची दमनशक्ती आणि नियंत्रणपिपासू (कंट्रोल फ्रीक) वृत्ती यांचं त्यातून प्रदर्शन होतं. त्यांचे त्या दमनाच्या समर्थनार्थ दिले जाणारे सर्व युक्तिवाद हे अंतिमत: खोटे आणि काहीसे बावळटदेखील ठरतात.

या विनोदांचं अस्तित्त्वही क्षणिकच असतं, आहे आणि असणार. विसंगती दाखवणं एवढंच काम मला करायचं होतं, जे माझ्या मते झालेलं आहे.
---
असो. हे फार बौद्धीक वगैरे झालं. जुनी खोड ... जातच नाही.

सविता, म्हटलं तर काहीच संदर्भ नाहीये, उगाच गंमतीसाठी गंमत. म्हटलं तर वर दिलेलं स्पष्टीकरण लागू आहे.
>> अदितीतै, तुम्ही बाकी बरंच चांगलं लिहू शकता, का उगाच अशा लेखांवरती वेळ आणि शक्ती वाया घालवता? <<
स्वस्त आणि मस्तची चव जास्त छान लागते ना. घरच्या भाजीपोळीला कोपर्‍यावरच्या दुकानातल्या पावभाजीची चव कशी येणार? :-D
ही टीका मी सकारात्मकतेनेच घेतली आहे. चांगलं लिहायला खूप वेळ लागतो, तेवढा वेळ खर्च करून काही लिहेन तेव्हा तुमच्या नजरेखालून ते नक्की जाईल याची काळजी घेईनच.

आत्मशून्य's picture

6 Sep 2011 - 12:20 am | आत्मशून्य

एकेकाळी मिपाच्या मुखपृष्ठावर रोजच्या रोज दिसणार्‍या बायड्या या अवमानदर्शक होत्या असं माझं मत आहे.

मत व्यक्त केलत ? वाचून आनंद झाला आता त्या अवमान दर्शक होत्या, असं तूमचं मत का आहे याचे स्पश्टीकरण इस्कटून द्या. बाकी चालूदे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Sep 2011 - 12:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चांगलं लिहायला खूप वेळ लागतो; जेव्हा तेवढा वेळ खर्च करून या विषयावर लिहेन तेव्हा ते तुमच्या नजरेखालून जाईल याची काळजी घेईन. तोपर्यंत संदर्भ म्हणून तुम्ही 'बाईमाणूस' (लेखिका - करूणा गोखले), 'द सेकंड सेक्स' (लेखिका - सिमोन द बोव्वार), असं काही वाचन सुरू करू शकता.

आजचे विचारमंथनः
काही मत व्यक्त न करणं हे ही एकप्रकारे मतप्रदर्शनच असतं, चर्चेला फाटा दिला तरी सरळसरळ अवमानकारक असणार्‍या धाग्यांवर कात्री न चालवणं ही पण अभिव्यक्तीच असते आणि वचनं देऊन कृती न करणं ही पण एकप्रकारची कृतीच असते.

अवांतरः "चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी त्यांच्या माताभगिनींची 'अशी' चित्रं काढली असती का" या प्रश्नाचा विचार करता असा एक उगाच प्रश्न पडला, असे प्रश्न विचारणारे, मुखपृष्ठावर एकेकाळी दिसणार्‍या बायड्यांच्या आणि तत्सम चित्रांमधे आपल्या माता-भगिनींचा विचार करू शकतात का?

आत्मशून्य's picture

6 Sep 2011 - 10:32 am | आत्मशून्य

सर्वात महत्वाचं : 'बाईमाणूस' (लेखिका - करूणा गोखले) व 'द सेकंड सेक्स' (लेखिका - सिमोन द बोव्वार), अवश्य वाचल्या जाइल.

उद्याचं विचारमंथनः :- पण, कसं आहे मी जर आज कोणत्याही कारणासाठी स्टड वॉकला पाठींबा जाहीर केला तर मग उद्या जॉनचे टोपलेस(अथवा न्यूड) फटू प्रसिध्द झाले तर मी गळे काढणं चूकच नाहीका ? उठसूट माता भगीनी गाठणे विचारवंतांची जूनी खोडच आहे तरीही त्याअनूशंगाने इथे वाक्य घूसडणं म्हणजे आपण आपल्या लाडक्या जॉनच्या टोपलेस फटूत आपल्या वडील व भावाचा विचार करू शकता काय असेच विचारणे का म्हणू नये ?

आपल्या लाडक्या जॉनच्या टोपलेस फटूत आपल्या वडील व भावाचा विचार करू शकता काय असेच विचारणे का म्हणू नये ?

:)

आत्मशून्य..मी नेहमीच तुमचे विविध विषयांवरचे प्रतिसाद वाचतो.

बिनतोड मुद्दे मांडण्याच्या बाबतीत तुम्हाला मानलं राव..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Sep 2011 - 7:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विसंगती, विरोधाभास, उपहास वगैरे गोष्टींच्या शिकवण्या मिपावर चालवल्या पाहिजेत का? किंवा अशा प्रकारच्या प्रतिसादांना 'हा उपहासात्मक प्रतिसाद आहे' असा काही टॅग लावावा का?

आत्मशून्य's picture

6 Sep 2011 - 9:17 pm | आत्मशून्य

जाउद्या हो, झालं गेलं गंगेला मिळालं, कशाला त्यांच बोलण आपल्या मनाला टोचून घेताय ?

Nile's picture

6 Sep 2011 - 9:37 pm | Nile

गविंचा प्रतिसाद वाचून पडलोच! गविंकडून तरी अपेक्षा फार जास्त होत्या आणि आहेत. असो.

अदितीताईंचा वरचा प्रतिसाद न वाचता फक्त आत्मशून्यला त्याच्या त्या एका ओळीसाठी आणि त्याच्या यापूर्वीच्या अनेक धाग्यांवरच्या पप्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर ती जनरलाईज्ड कॉमेंट होती ..
याउपर इथे उपहास उपरोध वगैरे समजण्याइतका तपशीलवार उद्देशही यापप्रतिक्रियेपुरता नव्हता.

तरीही कोणी काही चुकीचे समजले असल्यास क्षमस्व.

.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Sep 2011 - 9:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गवि, हा आख्खा धागाच विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी काढला आहे तर एका प्रतिसादाचं काय घेता? पण तुम्ही मूळ धागा वाचला नसेल तर कदाचित उपहास आणि विसंगती समजणार नाही हे मान्य आहे.
इकडेतिकडे जिथे कुठे जॉन अब्राहमचे फोटो मी चिकटवले आहेत ते का हे तुम्हाला सांगायचीही वेळ येत असेल तर ... अपेक्षाभंग झाला एवढंच सध्या म्हणावंसं वाटत आहे.

----
सध्याची प्रस्तावित स्वाक्षरी:
चिल्लर लोकांची बाजू घेणे गैर नाही पण थिल्लर लोकांची बाजू घेताना दहादा विचार करावा. -- ॥जै भयालीदेवी प्रसन्न

आत्मशून्य's picture

9 Sep 2011 - 11:14 pm | आत्मशून्य

अवांतर :- गविंचा स्पश्ट प्रतीसाद डोक्यावरून जाउन लोकांच जे धडपडणं वगैरे झाले ते पाहून अंमळ मौज वाटली. कारण ते म्हणजे आम्ही न धडपडता उभं राहू शकतो हे दाखवायचे प्रयत्न असतातच मूळात विनोदी.

अप्पा जोगळेकर's picture

10 Sep 2011 - 12:37 am | अप्पा जोगळेकर

कारण ते म्हणजे आम्ही न धडपडता उभं राहू शकतो हे दाखवायचे प्रयत्न
खीक. हे जाम आवडलंय.

बॅटमॅन's picture

27 Apr 2013 - 11:31 pm | बॅटमॅन

एकेकाळी मिपाच्या मुखपृष्ठावर रोजच्या रोज दिसणार्‍या बायड्या या अवमानदर्शक होत्या असं माझं मत आहे. पण माझ्या मित्राला मी पाठीत धपाटा घालून "काय रे हजामा, माझा फोन का घेत नव्हतास? कुठे भिंतीला तुंबड्या लावत फिरत होतास?" असं शिवी घालत म्हणणं अपमानकारक, तुच्छतादर्शक आणि सेक्सिस्टही नाही.

तत्वतः दोहोंमध्ये काय फरक आहे?

कुणाला काय अपमानकारक वाटेल याचा काही नेम नसतो. मग अपमानांची रिएटिव्ह लेजिटिमसी कशाच्या आधारावर ठरवणार?

समाजात सध्या चलती असलेल्या जाणिवांच्या आधारे अपमान किती लागेल हे फारतर ठरवता येईल, पण अमुक गोष्ट तेवढी अपमानकारक आणि तमुक नाही हे वरील उदाहरणाद्वारे आजिबात स्पष्ट होत नाही. विशेषतः घेतलेल्या उदाहरणांसंदर्भात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Apr 2013 - 9:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तत्वतः दोहोंमध्ये काय फरक आहे?

एकेकाळी मिसळपावच्या मुखपृष्ठावर असणार्‍या बायड्या, आज मिसळपाववर हिरीरीने लिखाण करणार्‍या किती लोकांनी पाहिलेल्या आहेत याचा सर्व्हेच करावा लागेल. त्या बायड्यांबद्दल नवीन काही प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍यांना, मत असणार्‍यांना मी फार जास्त सांगण्यापेक्षा दृष्यकलांचे गुर्जी (दोन) यांच्या एका संबंधित प्रतिसादाकडेच पाठवते.

बॅटमॅन's picture

28 Apr 2013 - 10:53 am | बॅटमॅन

त्या बायड्या आणि उल्लेखिलेल्या शिव्यांत काय फरक आहे हे सांगावे. बायड्या आक्षेपार्ह असतील तर शिव्या का नाहीत? निव्वळ बायड्या दृश्य स्वरूपात दिसतात म्हणून आक्षेपार्ह आणि शिव्यांचं तसं नाही असं आहे का काही? त्या कलाकाराची शिल्पे आणि बायड्या यांच्यातील साम्यविरोधाबद्द्ल काही म्हण्णे नाही.

मूकवाचक's picture

30 Aug 2011 - 11:08 am | मूकवाचक

.

इंटरनेटस्नेही's picture

30 Aug 2011 - 9:38 am | इंटरनेटस्नेही

अपेक्षित कृती, डोळे पाणावले!

आंसमा शख्स's picture

30 Aug 2011 - 9:49 am | आंसमा शख्स

मुळ प्रस्ताव आमच्या वाचनात आला होता. तो प्रस्ताव चांगला होता.
मात्र हे हीन पातळीवरचे लेखन आहे. (विडंबनही म्हणवत नाही!) पाळलेले चार भाट जमून टाळ्या वाजवायला लागले की, कुणा फालतू लेखिकेलाही आपण फार थोर विनोदी विडंबनकार आहोत असे वाटू लागते. सदर लेख आणि खालील प्रतिसाद त्याचाच नमुना आहे.

संपादकांना विनंती:
कडवट वाटला तरी कृपया हा प्रतिसाद काढू नये. कारण स्पष्ट बोलणे आवश्यक झाले आहे.

गणेशा's picture

30 Aug 2011 - 2:37 pm | गणेशा

.

सावत्या's picture

2 May 2013 - 4:27 pm | सावत्या

१००% सहमत !!!!

पुर्वी नानाचा "गुलाम ए मुस्तफा" नावाचा बकवास चित्रपट आला होता
त्या धर्तीवर "हजाम ए मुस्तफा" नावाचा चित्रपट काढता येईल. :-)

आदिती तै तुम्ही पटकथा लिहु शकता!!!!!

सावत्या

कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी लिहीलेला लेख!

फारसा रेफरन्स लागला नाही... आणि तितका इंटरेस्टिंग न वाटल्याने पुर्ण वाचला पण नाही.

अदितीतै, तुम्ही बाकी बरंच चांगलं लिहू शकता, का उगाच अशा लेखांवरती वेळ आणि शक्ती वाया घालवता?

नावातकायआहे's picture

30 Aug 2011 - 2:56 pm | नावातकायआहे

>> अदितीतै, तुम्ही बाकी बरंच चांगलं लिहू शकता, का उगाच अशा लेखांवरती वेळ आणि शक्ती वाया घालवता?

इरसाल's picture

30 Aug 2011 - 4:18 pm | इरसाल

१. दुकानातील कुठल्याही डोके-हातापायांवरील केसांचे कर्तन करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे?
हो. ते एका किमान पातळीचे असावेत. असे पाहण्यात आले आहे कि काही हजाम मेंढ्या, डुकरे गेलाबाजार याक चे हि केशकर्तनाचा प्रयत्न करतात.म्हणून किमान "मनुष्य" हि पातळी ठेवावी.
२. चांगल्या कर्तनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी.
चांगले केशकर्तन म्हणजे पुढचा मागचा आरसा बघितल्यावर टकलूला देखील " टकलावर अजून रुळते अदृश्य लांबशी शेंडी" वाटायला पाहिजे.
३. नावाजलेल्या दुकानातील कर्तन, बटा उडवणे आणि स्वतःच्या घरातील वॅक्सिंग आणि एखादा जादाचा केस उडवणे यात काय फरक आहे?
हो आहे. दुकानातील काम साचेबद्ध असते. वापरलेल्या प्रसाधानंबाबत खात्री नसते.तसेच सलज्जांना अंग उघडे टाकून दुकानात काम करून घ्यायला लाज वाटते.
४. एका हजामाकडून करून घेतल्या जाणाऱ्या कर्तनाची वारंवारिता काय असावी?
महिन्यात दोन वेळा अथवा व्यक्तीनुसार प्रमाण ठरवावे. नाहीतर वाढले कि जा हजामाकडे...वाढले कि जा हजामाकडे.
५. फुटकळ आणि बेकार केसांचे किती प्रमाणात कर्तन व्हावं? सतत केस गलिच्छ ठेवणाऱ्यांना मिळणाऱ्या दोन चंप्यांमधलं अंतर किती असावं? चांगल्या केशकलापाला हजाम संस्थेकडून कशा प्रकारे प्रोत्साहन मिळावं?
फुटकळ आणि बेकार केसांचे कर्तन रोज करावे.जसे कि नाकातील, ओठावरील अन्यथा चार चौघात शोभा होवू शकते.गलिच्छ केश वाहकाला अगदी रोज चंपी मिळाली तरी हरकत नसावी.
आणि चांगल्या केशकलापाला शतकी मुद्रा देवून प्रोत्साहन द्यावे.
६. न रुचलेल्या केशसंभाराचे कर्तन करताना काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे का?
देवाने १८० अंश वळून बघण्यासाठी मान दिलेली आहे.न रुचलेले केशसंभार पाहू नयेत.

मूळ लेखापेक्षा इरसाल यांचा प्रतिसाद
रंजक वाटला !

अविनाशकुलकर्णी's picture

30 Aug 2011 - 8:34 pm | अविनाशकुलकर्णी

हजाम च्या ऐवजेी बार्बर शब्द वापरला असता तर चालले असते का??????

जर त्यांनी बार्बर हा शब्द वापरला असता तर मग कुलकर्णी तुम्ही त्यांना,
"क्या बिल्लू, तु आजकल हजामगिरी छोडके हलवाईगिरी (जलेबी) बिझनेस शुरु किया है क्या? "
हा प्रश्न विचारणार होता काय....

स्पष्टपणे लेखन बकवास आहे हे सांगणारे टीकात्मक प्रतिसाद आले आहेत.
आता लेखन फार बौद्धिक असल्याचा आव आणू नका! लेखन फालतूच आहे.
उलट हीन दर्जाचे लेखन केले आहे, हे स्वतःशी मान्य केले तर बोळा निघेल. पुढील लेखनाची दिशा सापडेल. प्रतिक्रियात्म लेखनातून लेखकपण घडत नाही हे लक्षात घ्या.

आणि 'फार आवडले ' म्हणणारे हरभर्‍याच्या झाडावर चढवतात म्हणून आपण चढून बसायचे असते असे नाही. ते चार घट़का मजा घेतील आणि जातील!

खुदा तुम्हाला चांगली बुद्धी देवो आणि तुमच्या हातून चांगले लेखन घडो!

परिकथेतील राजकुमार's picture

6 Sep 2011 - 2:46 pm | परिकथेतील राजकुमार

आता लेखन फार बौद्धिक असल्याचा आव आणू नका! लेखन फालतूच आहे.
उलट हीन दर्जाचे लेखन केले आहे, हे स्वतःशी मान्य केले तर बोळा निघेल. पुढील लेखनाची दिशा सापडेल. प्रतिक्रियात्म लेखनातून लेखकपण घडत नाही हे लक्षात घ्या.

शब्दा शब्दाशी प्रचंड सहमत आहे.

कृपया अदिती ह्यांनी ह्यापुढे :-

१)धर्मांतर
२)संघ
३)मिपावरील लिंगभेद आणि धार्मिक भेद

ह्यासारख्या बौद्धिक आणि प्रतिक्रियात्मक लेखनाकडे वळावे.

सर्वात आधी अदिती ह्यांनी हे लेखन उडवावे, व 'लेखन काढले. तसदी बद्दल क्षमस्व असे लेखन येथे येणार नाही याची काळजी घेईन.' अशी माफी मागावी.

येवढे करुनही त्यांना योग्य दिशा न सापडल्यास त्यांनी आंसमा शख्स ह्यांच्या लेखनाचा थोडा अभ्यास करावा व स्वतः मधील उणिवा दूर कराव्यात.

आंसमा शख्स ह्यांच्यासारखे टिकाकार उलट नविन बौद्धिक लेखक घडवण्यात मोलाचा वाटा उचलत असतात. त्यांच्या बोलण्याचे वाईट न वाटून घेता उलट त्यांच्याकडून आंतरजालावर लिखाण कसे असावे ह्याचे धडे गिरवले जायला हवेत असे वाटते.

पूर्वी यांचे छोट प्रतिसाद येत तोवर ठीक होतं.

आता म्हणजे...

Nile's picture

6 Sep 2011 - 3:36 am | Nile

उगी उगी हं, रडू नका! अरे यांना डोळे पूसायला लेडिज रूमाल द्या रे कोणीतरी.

आशु जोग's picture

9 Sep 2011 - 10:14 pm | आशु जोग

ते काही नाही निले
तू घेत बस या अत्तराचा सुगंध

क्रेमर's picture

6 Sep 2011 - 7:12 am | क्रेमर

हजामांना सिमेट्रीचा सेन्स उत्तम असतो. शशि कपुरच्या एका चित्रपटात हजामाला लॉटरी लागल्यानंतर तो स्वतःचा व्यवसाय लपवून अभिजन होण्याचा प्रयत्न करतो. राम नगरकरांच्या दुकानात मी तीन-चार वेळा केस कापले होते. असे सर्व विसंगत आठवून गेले.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Sep 2011 - 7:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिक्रिया आवडली.

(शशी कपूरच्या चित्रपटातली होऊ घातलेली अभिजन) अदिती

कवितानागेश's picture

6 Sep 2011 - 3:31 pm | कवितानागेश

अदितीतै, तुम्ही असेच गोड गोड छोट छोट प्रतिसाद देत रहा बरे! ;)

सुधीर मुतालीक's picture

30 Apr 2013 - 6:47 pm | सुधीर मुतालीक

व्वा, मस्त, सुंदर, अवास्तव, मजा आली !!

प्रसाद१९७१'s picture

2 May 2013 - 3:52 pm | प्रसाद१९७१

संपादित

पिलीयन रायडर's picture

2 May 2013 - 3:59 pm | पिलीयन रायडर

प्रत्येक धागा उघडल्यावर काही ना काही प्रतिसाद द्यायलाच पाहि़जे असाही काही नियम नाहीये..
मला हा धागा फार आवडलाय अशातला भाग नाही पण मी तुमचा प्रतिसाद वाचला होता.. आणि तो उडणार हे ही तेव्हाच कळालं.. कारण तो होताही तेवढा वैयक्तीक..
स्तुतीच करावि असा नियम नाहीये पण लिहीताना भाषा सांभाळावी असा नियम आहे..

पिलीयन रायडर's picture

2 May 2013 - 4:05 pm | पिलीयन रायडर

आणि तुम्ही तावातावाने अजुन काही लिहिण्या आधी...

५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल.

हे येथे वाचायला मिळेल.. मिसळपावचे आधिकारीक धोरण