http://misalpav.com/node/17366 भाग एक
http://misalpav.com/node/17540 भाग दोन.
पण रि-हॅबिलिटिशन्च्या निमित्ताने ती देखील ती ही बाळ्यासारखीच हळू-हळू नॉर्मल होत होती आणि .......
आणि ..आणि बाळ्याकडे आकृष्ट ही .
अगदी पहिल्यांदा जेव्हा थेरपिस्ट च्या रूमबाहेर त्या दोघांत नजरा-नजर झाली , तेव्हा तिची नजर तिथेच अडकली . बाळ्याची नजर, त्या ठिकाणी सर्वसामान्यपणे आढळणारी वासनेने बरबटलेली नव्हती. किंवा तिच्या दृष्टिकोनातून, तिथे तिच्यावर पडण्यार्या नजरांमध्ये, पावित्र्याचे मोजमाप करणे कमी पडत असावे.तरीही स्त्रियांकडे असणारा सहावा सेन्स तिला हे सांगे की ती ही नजर नाही. रि-हॅबलिटिशन च्या कार्यक्रमातल्या भेटी-गाठी त ती दोघं अजुन जवळ आली. बाळ्याला ही तिच्या अस्तित्वाची, स्वतःच्या तारुण्याची आणि त्या जवळीकतेची जाणिव होत होती. पण तो तिला घाबरे , तिच्याविषयी बोलताना स्टाफ निगेटिव्ह बोलत असे. जास्त जवळीक नको असे त्याला वाटे, आधी इथून बाहेर पडू यात असे ही त्याला वाटे. मध्यंतरी एका शनिवारी बाळ्या ला रोशन काका भेटून गेले.
त्या दिवशी रोशन काका शिवाय ही काही मंडळी बाळ्याला भेटायला आली होती. त्यात नागपुरचाळीतील पोरांचा समावेश होता. ज्या पोराबरोबर गोट्या,कवड्या आणि गल्ली क्रिकेट खेळणे, नदीला जाउन मासे पकडणे, विहीरीत पोहणे हे सगळे केले, त्यांना पाहुन बाळ्या मनोमन सुखावला. जुन्या आठवणीत न्हावुन निघाला. बोलता-बोलता सुलाताईंचा उल्लेख झाला पण यावेळी बाळ्या डगमगला नाही, त्याच्यात नीट होण्याची लक्षणे पुरेपूर दिसत होती. सुलाताई च्या सासुबाईना जेल झालेली ही कळली .जाताना पोरांनी नुकतेच आलेले नागपुरचाळीतील लॅन्ड-लाईन नंबर्स , कोर्टाच्या तारखांचे डिटेल्स, थोडे फार पैसे, कपडे , ज्याला जी जी काही मदत करता येत होती ती सर्व काही केली.
त्या शनिवारी कार्यक्रम नव्हता. मात्र रविवारच्या कार्यक्रमात पुन्हा सुनंदा शी गाठ झाली.तिच्या वागण्यात ,नेहमी आढळणारा, वेडेपणाशी जवळीक साधणारा, विक्षिप्तपणा नव्हता. ती बाळ्याकडे चोरट्या नजरेने वारंवार पहात होती. जेवताना आवर्जून बोलत होती. तिने नेहमी अस्ताव्यस्त दिसणारे तिचे व्यक्तीमत्व सावरून घेतले होते. गोरापान रंग, पिंगट डोळे, थोडेसे उचलेले नाक, उभट चेहरा,काळेभोर केस, कमनीय बांधा आणि त्यावर तिचे ते चोरटे बघणे बाळ्याला घायाळ करुन जात होते.कार्यक्रमात काही पुस्तकांचा ही समावेश असे, त्या दिवशी ही होता. असेच एक पुस्तक संध्याकाळी जाताना बाळ्या सोबत घेवुन गेला आणि त्याबरोबर एक आश्चर्य ही.त्याच्या हातात ते पुस्तक सुनंदा ने दिले होते. आणि त्यात चिठ्ठी होती.
चिठ्ठी !! प्रेम-पत्र च ते. आधी लिहीलेली तिची कथा , तिच्यावर बेतलेली . ती वाचून बाळ्याच्या अंगावर काटा आला पण त्याच वेळी चिठ्ठीत तिच्या त्याच्या विषयीच्या भावना वाचून बाळ्या आधी अचंबित आणि त्यानंतर रोमांचित झाला.पहिल्या प्रेमाची हुरहूर मनात दाटली.शहराच्या आडोश्याला, हिरव्या गर्द झाडीत, चोविस तास कडेकोट पहारा असलेल्या मनोरुग्णालयात शरीराला बंदिस्त करता येऊ शकते पण मनाला नाही. बाळ्याच्या मनाला ही चंचलता ग्रासली. तिसर्या दिवशी त्याने प्रेमाची कबुली देवून टाकली. त्या मनोरुग्णालयाच्या भिंतीत त्यांची प्रेमकथा फुलत होती. प्रेम-पत्रे पास होत होती. कित्येक युगे मनात दबून राहिलेल्या भावना बाहेर पडत होत्या.
बाळ्याच्या सुटकेची शेवटची पायरी पार पडली. मनोरुग्णालयातून प्रायमरी रिलीजसाठी कोर्टाकडे अर्ज पाठविण्यात आला.कोर्ट-ऑर्डर्स, थेरपिस्टचे रिपोर्टींग आणि शेवटची रिलीज प्रोसेस याला जास्तीत जास्त सात दिवस लागणार होते. या सात दिवसामध्ये बाळ्या ला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली ती म्हणजे सुनंदाची फायनल चाचपणी पॉझिटिव्ह आली. ती ही या नरकातुन सुटणार होती. आणि त्या रविवारी तसा अर्ज कोर्टाकडे जाण्याची संमती मिळाली. तिला गार्डियन नसल्याने , स्वता थेरफिस्ट ने सोमवारी अर्ज पाठविण्याचे ठरले.
मंगळवारी पहाटे बाळ्याला सोडणार होते. आणि त्यानंतर महिना पंधरा दिवसांनी सुनंदा.रविवारी आलेल्या चिठ्ठीने रोमांचित झालेला बाळ्या सोमवारी संध्याकाळी तिच्या अंतिम भेटीसाठी अधीर झाला. जायच्या आधी कसेही करुन भेट असे सुनंदा च्या चिठ्ठीत लिहीले होते.आता कार्यक्रम नाही, थेरपिस्ट ची भेट नाही, मग भेटायचे कसे ? आतल्या एका वार्डब्वॉय ला त्याने विश्वासात घेवुन विचारुन घेतले. त्याने सांगीतलेला इलाज असा होता.पहाटे चार च्या सुमारास वार्डन बदलतात तेव्हा साधारण अर्धा तास फेन्सिंग मोकळे असते, त्या अर्ध्या तासात समोरच्या स्त्री वार्डात माणुस जावुन येवु शकतो, फक्त फेन्सीग पार करतान काळजी घ्यायची की टॉवरची फिरती सर्च लाइट अंगावर पडु नये त्याची , त्यानंतर झाडांच्या आडोश्याने त्या रुमपर्यंत जाता येते.
बस्स !! बाळ्याने ठरविले के हे करायचे, दिवसाच्या लख्ख प्रकाशात दिसणारे जग आणि रात्रीच्या काळोखात दिसणारे जग यातील फरकापासुन अज्ञभिन्न असलेला बाळ्याने येरवडा जेलच्या साडेतीन च्या ठोक्याला त्याची खोली सोडली. वार्डब्वॉय ने दिलेली माहीती बरोबर होती, फेन्सिग ला कोणी नव्हते. पण तिच्या खोली शेजारच्या खोलीत, त्याच्यापासुन विस-एक फुट अंतरावर असलेल्या, खिडकीच्या प्रकाशात त्याला दोन-तीन सावल्या दिसल्या, बहुधा शिफ्ट बदलीला आलेल्या स्त्री-सेविका कपडे बदलत असाव्यात.तिच्या खोलीतही त्याला दोन सावल्या दिसल्या. तीच्या खोलीत गेले तीन आठवडे ती एकटीच आहे हे त्याला माहीत होते. थोडासा चकित झालेला बाळ्या पुढे सरसावतो, तोच खुद्द सुनंदा खिड़कीसमोर उभी राहिली.
ती खिडकीत उभी होती. एखाद्या सुंदरश्या अर्धाकृती शिल्पा सारखी ! तिने डोळे घट्ट मिटुन घेतले होते. शुभ्र चंद्रप्रकाशात तिचा गोरापान चेहरा अजुन उजळून निघाला होता.हळुवार वाहणारा वार्यामुळे तिच्या बटा चेहर्यावर रुळत होत्या. त्यामुळे ती अजुन च मोहक दिसत होती. तो मळवटलेला हिरव्या-पांढर्या रंगाचा कुर्ता तिच्या खालीवर होणार्या छातीचा उभार लपवु शकत नव्हता. भारावलेला बाळ्या ते दृश्य मनोमन साठवत होता. अचानक काहीशी चाहूल लागल्याने बाळ्या तिथून सटकला.
ती खिडकीत उभी होती. एखाद्या सुंदरश्या अर्धाकृती शिल्पा सारखी ! तिने डोळे घट्ट मिटुन घेतले होते. शुभ्र चंद्रप्रकाशात तिचा गोरापान चेहरा अजुनच उजळुन निघाला होता...................अचानक तिने आपले घट्ट मिटलेले डोळे उघडले. अपराध्या सारखे आपल्या हाताकडे पाहिले, शेजारच्या लोखंडी खाटेचा एक टेकु तिच्या हातात होता, त्यावरून रक्त खाली ठिपकत होते.तिचा हातही रक्ताळलेला होता. तिच्या उजव्या बाजूला फरशीवर, अर्ध नग्नावस्थेत ,छिन्नविछिन्न झालेला , मृतदेह पडला होता.......
क्रमश..
प्रतिक्रिया
28 Apr 2011 - 3:05 pm | साबु
-१
28 Apr 2011 - 3:08 pm | नगरीनिरंजन
आता काय आणि?
28 Apr 2011 - 3:08 pm | बिपिन कार्यकर्ते
.
28 Apr 2011 - 3:11 pm | गणेशा
मनोरुग्नालयातली प्रेम कहानी खुपच छान लिहिली आहे.. वाचक ही त्या भिंती .. तेथील माणसांची स्थीती हे सगळे विसरुन फक्त तो आणि सुनंदा यांवरच खिळलेले ... पुढील थोडीफार स्टोरी मनात निर्मान झालेली .. आधी बाळ्या सुटणार मग थोद्या दिवसापर्यंतची त्याची तगमग ..
पण शेवटच्या पॅरेग्राफने पुन्हा नविनच वळन दिले आहे ..
आता पुन्हा उत्कंठा वाढायला लावली तुम्ही ..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...
असेच लिहित रहा ... वाचत आहे ...
28 Apr 2011 - 3:14 pm | llपुण्याचे पेशवेll
ओह्हो..
पुढचे भाग फटाफट लिही रे.
28 Apr 2011 - 3:15 pm | sneharani
उत्कंठा लागलीये....!लिहा पुढचा भाग पटकन!
28 Apr 2011 - 3:15 pm | किसन शिंदे
आई गं!
काय हा शेवट.. ..तिची चाचणी तर पॉसिटीव झाली होती ना?
28 Apr 2011 - 3:19 pm | ५० फक्त
मस्त रे छान रंगवली आहेस, येउ दे अजुन
28 Apr 2011 - 3:37 pm | श्रावण मोडक
!
28 Apr 2011 - 4:04 pm | प्यारे१
!
28 Apr 2011 - 3:47 pm | परिकथेतील राजकुमार
उत्कंठा....
28 Apr 2011 - 4:05 pm | गवि
उत्कंठा....
+१
दोन भागांतली ग्याप कमी करावी.
28 Apr 2011 - 5:10 pm | टारझन
वर्धक
28 Apr 2011 - 4:10 pm | गणपा
वाचतोय......
28 Apr 2011 - 5:08 pm | चिगो
उत्कंठावर्धक... येकदम थ्रिलर लिवतोय भाऊ..
ग्यापा कमी माराव्या ही इनंती...
28 Apr 2011 - 6:11 pm | प्रभो
वाचतोय.. वाश्या ग्याप कमी घे बे..
28 Apr 2011 - 7:18 pm | पैसा
सुहास, आणखी असे किती धक्के देणार आहेस?
29 Apr 2011 - 4:54 am | पिंगू
सुहाश्या नेमका उत्कंठा वाढली असताना क्रमश: टाकल्याबद्दल निषेध..
- पिंगू
29 Apr 2011 - 7:41 am | शिल्पा ब
पटापटा पुढचे भाग टाक. हा भाग कितीतरी दिवसांनी आला.
29 Apr 2011 - 10:29 am | मनराव
मस्त जमली आहे भट्टी.........चालूद्यात............वाचतोय............
29 Apr 2011 - 11:57 pm | मराठमोळा
आणखी एक क्रमश:.....
30 Apr 2011 - 12:28 pm | मृत्युन्जय
वाचतोय.
30 Apr 2011 - 7:54 pm | रश्मि दाते
कायरे हे!!!!!!!
आणी पुढचे भाग लवकर टाक
3 May 2011 - 8:03 am | स्पंदना
असा एन्ड जवळ येतो अस वाटत होत ...तोवर ..
चालु द्या . आम्ही काय ? वाचवणारे तुम्ही अन वाचणारे आम्ही.
निदान पुढचा भाग लवकर येउद्या .