Once Upon A Time In Yerwada !! - २

सुहास..'s picture
सुहास.. in जनातलं, मनातलं
6 Apr 2011 - 1:40 pm

http://misalpav.com/node/17366 भाग एक

डॉक्टरांनी चार-पाच दिवस वाट पाहिली आणि शेवटी त्याची मनोरुग्णालयात रवानगी झाली.

वेडेपणा आणि शहाणपण या दोहोंमध्ये प्रचंड फरक असला तरी त्या फरकाची सीमारेषा फार धुसर आहे, शहाणपणा कधी ही वेडेपणा ठरू शकतो आणि वेडेपणा कधी शहाणपणा ठरू शकतो हे कोणी ही मान्य करेल. जो आपल्याच मनुष्य-जमातीला उपद्रवी ठरत नाही, तो,सौम्य वेडेपणा , त्या मनोरुग्णालयाच्या हद्दी बाहेर असलेल्या सर्वांमध्येच असतो असे मला वाटते.तसे नसते तर ' अरे हा काय वेडा आहे काय ? ' , ' मला वाचनाचे वेड आहे ! ' , तिचे हास्य मनाला वेड लावते !! ' असे उद्गार आपल्याला कधी ही एकु आले नसते. प्रेयसी च्या तोंडून ' चल ! वेडाच आहेस ! ' हे शब्द एकले तरी मनाला गुदगुल्या करून जातात. पण बाळ्या मात्र असा सौम्य वेडा नव्हता. ठार वेडा होता तो ! फक्त त्याच्या या वेडाची व्याख्या करणे हे कठीण होते. असो..

येरवड्यातल्या मनोरुग्णालयात, दीड वर्षे बाळ्या च्या मेंदूवर वेगवेगळे प्रयोग होत राहिले, कधी झोपेच्या गोळ्या , कधी कौन्सिलिंग, कधी हिप्नॉटिझम, तर कधी (अति झाल्यावर) शॉक पण बाळ्या त्याला काही ही पॉझिटीव्ह रिस्पॉन्स देत नसे. पण एक घटना अशी घडली की हळू हळू त्याचा रिस्पॉन्स पॉझिटीव्ह यायला लागला. रोशन काका खर्चाच्या बाबतीत मागे-पुढे पहात नसत पण त्यांनी बाळ्याचा भरवसा सोडून दिला होता. त्याच्या बहिणी चा मात्र विश्वास होता की तो कधी ना कधी ठीक होईल. व्रत-वैकल्ये, गंडेरे, धागे ,दोरे यांचा ही भोळ्या आशेने वापर झाला.त्या दिवशी नेहमी प्रमाणे ती त्याला भेटायला गेली.

रक्षाबंधन चा दिवस होता तो , सायको थेरफिस्टची रूम , कोणे एकेकाळी , पोपडे पडलेल्या ,भिंतीना हिरवा रंग असावा असे वाटावी अशी ! रूम मध्ये एक टेबल - एक खुर्ची , त्यावर काही अस्ताव्यस्त कागदपत्रे , समोर एक बेंच , हात मागे बांधुन स्वता: च विक्षिप्त वाटावा असा थेरफिस्ट बेंच समोर उभा. तो आणि ती बेंचवर बसलेले, तिच्या हातात औक्षणाचं ताट. त्याच्या अंगावर मळकट पांढर्‍या रंगाचे कपडे, दाढी वित भर वाढलेली, केस पिंजारलेले, नजर आता राम राहिला नाही अशी . सर्व काही यंत्रवत, कपाळावर ची केसं मागे घे, म्हटल्यावर केस मागे, हात उचल , म्हटल्यावर हात वर . तिने राखी बांधली. मात्र ' हम्म ! आता पेढा खा ! ' असे त्या थेरफिस्टने बजावल्यावर बाळ्या च्या चेहेर्‍यावर भेसूर हास्य पसरले. मान वाकडी करून तिच्या चेहर्‍यासमोर चेहरा आणून बाळ्या बोलला.
' आधी माझे दुधा चे पैसै दे ! '
' अssssय्य्य !! पेढा खा , नाहीतर ... ' उजव्या हातात दंडुक घेऊन उभ्या असलेल्या , आडदांड शिपायांचा तेव्हढाच आडमुठा आवाज आला.त सा बाळ्याचा चेहरा, एखाद्या भिक मागणार्‍या व्यक्ती सारखा केविलवाणा झाला. त्याच्या बहिणीला हे सहन झाले नाही, तिने त्याला आयुष्याशी झगडताना पाहिले होते, पण कोणा पुढे हात पसरताना नाही . ती तिथेच धाय मोकलून रडायला लागली. स्त्री-सेविकेने तिला दंड धरुन बाहेर नेले. त्या झटापटीत ही , जाता जाता ' काळजी... घे... रे... दादा ! ' इतकेच अस्फुट शब्द तिच्या तोंडुन बाहेर पडले, आणि बाळ्याच्या निश्चल डोळ्यातून टपकन अश्रू बाहेर पडले.

येरवडा मनोरुग्नालया भोवती आज जरी इमारतीं ची गर्दी झालेली असली तरी, त्या काळी ते एक जंगल होते. एका बाजुला येरवडा जेल , जेल आणि मेंटल क्वार्टर्स ची तुरळक वसाहत, तर दुसर्‍या बाजुने मेंटल कॉर्नर (आता चे पंचशील नगर ! ) थोडी शी दुर असेना पण नागपुरचाळ !! मनोरुग्नालयाच्या आणि तरुंगाच्या संरचनेत फारसा फरक नाही. आतील कर्मचारी पोलीस नसले तरी वागणुक मात्र तशीच, जेल मधील कैदी आणि मनोरुग्णालयातील रुग्ण कर्मचार्‍यांसाठी सारखेच .पण त्या तिथे काम करणारा ३/४ कामगार-वर्ग हा जवळपासच्या भागात रहात असल्याने, बाळ्या विषयी जवळ-पास सर्वांनाच एक प्रकारचा 'सॉफ्ट कॉर्नर ' होता. त्याला मिळणारा स्टाफ कडुन मिळणारा सपोर्ट आणि वरील प्रसंग घडल्यानंतर बाळ्याच्या वागणुकीत सुधार होत होता.

मनोरुग्णालयाला त्या काळी स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळा असा भाग होता, पण त्याला सीमारेषेच्या नावाखाली फक्त एक २० फुटी फेन्सींग होती.फेन्सींग पासुन दीड-एकशे फुटांवर दोन्ही बाजुला, चार वेगवेगळ्या इमारतीं होत्या. त्यातील पहिला आणि दुसरा मजला ठार वेड्यांकरिता राखीव असे. साधे मनोरुग्ण तळमजल्यावरुन एकमेकांना पाहु शकत होते, पण एकमेकांशी बोलणे मात्र होत नसे कारण त्या फेन्सींग ला चिकटुन शिपाई उभे असत, तरी ही स्त्री-रुग्ण आणि पुरुष रुग्ण एकमेकांच्या दोन ठिकाणी भेटु शकत होते. एक म्हणजे सायकोथेरफिस्ट च्या खोलीत एका ठराविक कालावधी ने होणारी चाचपणी आणि दुसरे म्हणजे शनीवारी -रवीवारीचे रि-हॅबलिटिशन चे कार्यक्रम. आणि अशाच एक कार्यक्रमात बाळ्याची सुनंदा शी गाठ पडली.

सुनंदा ! वयाच्या पंधराव्या वर्षी गॅंग-रेप्ड, त्यातल्या एका ला हिने जागेवरच संपविले. तेव्हापासुन तीन वर्षे मनोरुग्णालयात, धड बोलता येत नव्हत की काही सांगता येत नव्हत.पण पुरुष दिसला की झटका यायचा. झटका, या शब्दाचा अर्थ सार्थक करणारा झटका, एखादी स्त्री, जी थोडीफार दिसायला पुरुषी असली तरी हिच्या कचाट्यातुन वाचत नसे. पण रि-हॅबिलिटिशन्च्या निमीत्ताने ती देखील ती ही बाळ्यासारखीच हळु-हळु नॉर्मल होत होती आणि .......

क्रमश...

समाजजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

पैसा's picture

6 Apr 2011 - 1:46 pm | पैसा

वाचतेय...

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Apr 2011 - 1:50 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचतोय!

मृगनयनी's picture

6 Apr 2011 - 2:00 pm | मृगनयनी

माझं तर वाचून पण झालं! :)

माझे ही वाचुन झाले . सत्यकथा असल्याने थोडी भावनिक झालर आहे . रोमहर्षक !
पुढे वाचण्यास उत्सुक ..

माझंही!!
सुहास.. लवकर लिहि रे बाबा!

उत्कृष्ट...

ग्याप कमी घ्यावी ही विनंती.

स्मिता.'s picture

12 Apr 2011 - 7:20 pm | स्मिता.

कथा चांगलीये. वाचून मन सुन्न होतं.
पण जरा गॅप कमी घेतला तर बरं होईल... आधीच्या भागाशी पटकन लिंक लागत नाही.

RUPALI POYEKAR's picture

6 Apr 2011 - 2:04 pm | RUPALI POYEKAR

पुढील भाग लवकर येउदेत

गणपा's picture

6 Apr 2011 - 2:17 pm | गणपा

भारी रे... पुभाप्र.

दीप्स's picture

6 Apr 2011 - 2:25 pm | दीप्स

कथा छान आहे. नविन कथानक लवकर येउ दया. वाट पाहत आहोत.

निवेदिता-ताई's picture

6 Apr 2011 - 2:27 pm | निवेदिता-ताई

छान ...छान

:)

परिकथेतील राजकुमार's picture

6 Apr 2011 - 3:19 pm | परिकथेतील राजकुमार

कथा अंमळ पुढे सरकायला वेळ घेत आहे का ?

हा भाग प्रमाणिकपणे सांगायचे तर टि.व्ही. वरच्या मालिकेसारखा वाटला. मागच्या भागातली कथा फक्त दोन ओळी पुढे सरकली आहे :( आजुबाजुचे वर्णनच उगाच जास्ती आल्यासारखे वाटतय.

अर्थात 'प्रत्येक वाचकाची आवड वेगळी असते' आणि 'वाचकांनी लेखकाला काय आणि कसे लिहायचे हे सांगु नये' ह्या नियमांचा पूर्ण आदर राखुन वरिल विचारणा केली आहे.

श्रावण मोडक's picture

6 Apr 2011 - 4:11 pm | श्रावण मोडक

कथनाची प्रकृती पाहता हे थोडे आजूबाजूचे वर्णन आवश्यक आहे. तुकड्यातील लेखन-वाचनातून ते अवांतर वाटण्याची शक्यता असते. कदाचित तसेच येथेही होईल असे एकूण कथेची प्रकृती पाहता वाटते.

असुर's picture

6 Apr 2011 - 3:38 pm | असुर

फार तुकडे नको जोडू बे!!! लवकर लवकर लिहून मोकळा कर बघ!! च्यायला, सुहास लिहीतो ते वाचायची हौसही आहे आणि वाचवतही नाही..

--असुर

कुंदन's picture

6 Apr 2011 - 5:22 pm | कुंदन

>> सुहास लिहीतो ते वाचायची हौसही आहे आणि वाचवतही नाही..
असेच म्हणतो...

नगरीनिरंजन's picture

6 Apr 2011 - 8:42 pm | नगरीनिरंजन

असेच म्हणतो. पटापट लिहून मोकळं कर आम्हाला भावा.

स्पंदना's picture

7 Apr 2011 - 4:20 am | स्पंदना

होय! जरा लवकर अन जास्त लिहा ना! खरतर वाचवत माही .पण आता वाचायलाच पाहिजे नाही का?

sneharani's picture

6 Apr 2011 - 3:41 pm | sneharani

मस्त! पुढचा भाग पटकन लिहा!

शित्रेउमेश's picture

6 Apr 2011 - 4:57 pm | शित्रेउमेश

अप्रतिम....
छान रंगवलाय हा भाग ....
पुढचा भाग लवकर येऊ दे.... उत्कंठा लागलिये, पुढे काय होईल याची....

मनराव's picture

6 Apr 2011 - 6:45 pm | मनराव

वाचत आहे......

येउद्या सुहास,

आता कुठं रंग चढतो आहे, बाकी गेल्या काही महिन्यात याच ठिकाणावरची अजुन एक कथामालिका वाचली आहे, त्यामुळं ही ठिकाणं डोक्यात पक्कं घर करुन बसली आहेत आता.

तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.

मराठमोळा's picture

6 Apr 2011 - 10:11 pm | मराठमोळा

वाचतो आहे रे..

ग्राऊंड रिअ‍ॅलिटी किती वेगळी असते हे समजतय...

येउ दे पुढचा भाग..

आनंदयात्री's picture

7 Apr 2011 - 4:22 am | आनंदयात्री

छान रे सुहाश्या !!

>>चेहेर्‍यावर भेसूर हास्य पसरले. मान वाकडी करून तिच्या चेहर्‍यासमोर चेहरा आणून बाळ्या बोलला.
' आधी माझे दुधा चे पैसै दे ! '

काळजात चर्र झाले..
इतका उशिर लाउ नकोस पुढचा भाग टाकायला, मागचे रेफरंस धुसर होतात.

चांगल लिहित आहेस,

--टुकुल

शिल्पा ब's picture

7 Apr 2011 - 6:42 am | शिल्पा ब

छान लिहिलंय...पटापट भाग टाकत चल.

नंदन's picture

7 Apr 2011 - 10:25 am | नंदन

वाचतो आहे मालक, पु. भा. प्र.

प्रसन्न केसकर's picture

8 Apr 2011 - 1:46 pm | प्रसन्न केसकर

जेल, मेंटल हॉस्पीटल... एक वेगळंच जग असतं ते, पाताळच जणु. नकोशी झालेल्या जितीजागत्या माणसांची नजरेआड विल्हेवाट लावणारी कचराकुंडी, स्मशान, कब्रस्तान - काय वाटेल ते म्हणलं तरी आशय तोच.
शहाणपण आणि वेडेपण यातली सीमारेशा खुपच धुसर असते. खरंतर अनेक मनोविकृतीमध्ये उपचारासाठी अ‍ॅडमिट करण्याचीच गरज नसते. पण नकोश्या झालेल्या माणसांना नाहिसं करण्याचा सोपा मार्ग म्हणजे आधी त्यांना खुप सतवायचं. यावर प्रतिक्रिया म्हणुन माणसं एकतर गुमसुम होतात किंवा खुप अ‍ॅग्रेसिव्ह तरी. मग अश्या माणसांना कोर्टात नेऊन १३ नंबरची केस करायची अन मेंटलमधे ढकलायचं तपासणीच्या नावाखाली. उरलेलं काम आपोआप होतं.
तिथं काम करणारे कर्मचारी सगळेच नसतात वाईट पण त्यांच्यावर पण एव्हढा तणाव असतो की ते पण सतत शहाणपण्-वेडेपणाच्या सीमेवर असतात असं अनेकदा वाटतं मला. मग हे तणावग्रस्त कर्मचारी कधीकधी पेशंटवर उट्टे काढतात. इतर पेशंट वेडाच्या भरात काय काय करु शकतात ते वेग़ळंच.
पुर्वी क्राईम रिपोर्टिंग करत असताना दिवसातला बराच काळ ससुन हॉस्पीटलमधे ओपीडी मधे घालवायचो. तिथं दर अमावस्या पौर्णिमेला किमान पाच सात डोक्याला गंभीर जखमा असलेलल्या मेंटल पेशंटच्या केसेस यायच्या आणि त्यातला एखादा/ एखादी तरी गचकायची. दरवेळेस ठरलेल्या कहाण्या - वेडाच्या भरात डोके आपटुन घेतले नाहीतर पाय घसरुन पडला/ पडली. अन प्रत्येक केस पहाताना मनात एक शंकेची पाल चुकचुकायची. नंतर अश्या बर्‍याच पेशंटशी गप्पा मारायला सुरुवात केली अन लक्षात आले की मनात आलेली शंका अगदीच चुकीची नसावी असे समजायला बरीच जागा आहे.
विषय मस्त घेऊन लिहितो आहेस सुहास. जरा अनुभव परत जगुन पहा. लिखाण अजुन रंगेल.

शिल्पा ब's picture

12 Apr 2011 - 10:34 am | शिल्पा ब

अरे बापरे!!! असे अमानुष लोकही आपल्याच आजुबाजुला असतात :(

लौकर टाक बे पुढले भाग.. गविशी सहमत आहे.. जास्त गॅप घेऊ नकोस.. पुभाप्र

चिगो's picture

8 Apr 2011 - 3:03 pm | चिगो

पण पुढचे भाग थोडे लौकर टाक, दोस्ता...

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Apr 2011 - 10:28 am | llपुण्याचे पेशवेll

उत्सुकता वाढली आहे. थोडा मोठा भाग टाकला असता तरी चालला असता. असो, पुढचा भाग टाका जरा मोठा. सुहाश्या तुझ्यामुळे हे कधीच प्रकाशात न आलेलं जग पहायला मिळालें.