डिसक्लेमर : १) सत्यकथेवर आधारित, काही पात्रांची नावे बदलली आहेत. २) कुठल्याही व्यक्तीच्या मृत्युचा तमाशा करण्याचा हेतु नाही.
पुण्यात, कोणे एके काळी, ज्या भागाला संध्याकाळ च्या वेळेला , सामान्य माणसे टाळत असायचे, तो भाग म्हणजे येरवडा, याच येरवड्याचा शेवटचा कोपरा म्हणजे येरवडा जेलच्या भिंतीला लागुन असलेली पत्र्यांची पाच-एकशे घरे असलेली वसाहत. आधी आनंदनगर आणि नंतर त्याचे नामकरण नागपुरचाळ असे झाले.
नागपुरचाळीत, किमान सतरा-अठरा तरी ' बाळ्या ' असतील, त्यामुळे प्रत्येक बाळ्या च्या नावाला आपोआपच आडनाव जोडलं जायच. तसचं या आख्ख्या झोपडपट्टीत, अल्पावधीत, एक प्रसिध्दी पावलेले कॅरक्टर म्हणजे लातुर-बाळ्या. अर्थात लातुर हे काही त्याच आडनाव नव्हत. लातुरच्या भुकंपानंतर अशीच काही वाचलेली मंडळी (जी तिथे असतानाच गरीब होती.) तिथुन निघुन आली त्यातलाच बाळ्या एक. कमी वयात भुकंपामुळे बसलेला मानसिक धक्का, अंगावर कुटंबातील सात माणसांच्या मृत्युच दुख: , भुकंपातून वाचलेल्या धाकट्या बहिणीची जबाबदारी, आणि परक्या प्रदेशात आल्यावर येणार्या अडचणी या मुळे बाळ्या जरा विक्षिप्ता सारखाच वागत असे. पण त्याला सगळ्या परिस्थितीतही मोठा आधार वाटत असे तो रोशनकाकांचा.
रोशन ! कोणे एके-काळचा दादर स्टेशनचा सर्वात स्किल्ड पाकिटमार ! पण चोर पोलीसाच्या दोन पावले पुढे असला तरी एखाद्या दिवशी पकडला जातो असे म्हणतात. त्याच प्रकारे हा ही पकडल्या गेला आणि बदली येरवड्याच्या जेलमध्ये झाली. चार वर्षाची शिक्षा भोगुन , मोकळ आकाश आणि तंबाखुची तल्लफ घालवायला नागपुरचाळीत (तेव्हाचे आनंदनगर) आला आणि इथलाच झाला . जेलमधल्या कमाईवर चहाच दुकान टाकल आणि कर्मधर्म संयोगाने कोणी ही नातेवाईक नसलेल्या रोशनचा आख्ख्या नागपुरचाळीने 'रोशनकाका' केला. त्या चहाच्या दुकानाच नंतर किराणा मार्केट झाल.
याच किराणा-मार्केट च्या बाहेर ते दोन लहान जीव, जवळ-जवळ भीक मागायच्या परिस्थितीत रोशनकाकांना दिसले तेव्हा त्यांना त्यांच्यांत उतारवयाचा आधार दिसला आणि बाळ्याचा ' लातुर-बाळ्या' झाला. बाळ्यानेही नंतर बहिणीला शिकवायचा वसा घेतला. आमच्या इथल्या पेपरवाल्याला आलेल्या अकाली अधुत्वामुळे, पेपरवाल्याची पेपरची आणि जोडीला दुधाची लाईन बाळ्याच्या हातात पडली. मेहनत करुन त्याने त्या धंद्याला अजुन बळकट केले आणि वर्ष दोन वर्षातच बाळ्या कमवायला लागला. रहायला रोशनकाकांच घर, बहिणी करिता नेताजी शाळा आणि धंद्या करिता दुधाची - पेपरची लाईन, इतक्या जिवावर एकुणच, बाळ्या वयाच्या १५ व्या वर्षीच सेटल झाला.
सौ. सुलक्षणा बाळाराम धिवार हे कुरूप व्यक्तीमत्व दोन कारणांनी संपुर्ण नागपुरचाळीला ठावुक होते, एक म्हणजे ती अंगणवाडीची शिक्षीका 'सुलाताई' होती ,दुसर कारण म्हणजे ताईची आणि तिच्या सासुची दररोज ची खडाजंगी !! पहिल्या गल्लीतील्या डाव्या कोपर्यातुन, संध्याकाळी सातच्या सुमारास, बायकांचा भांडणाचा आवाज वाढायला लागला की लहान पोर-सोर देखील समजुन जायची की आजही रात्री नवाच्या सुमारापर्यंत कान पवित्र होणार. भांडणाच मुळ कारण होतं की सुलाताईचा नवरा , एक वर्षाच पोरं तिच्या पदरात टाकुन, दुसरीबरोबर पळुन गेला होता. त्यानंतर सासुचा संभाळ करुन ही सासु समाधानी नव्हती आणि एक दिवस सुलाताईंच्या सहनशक्ती चा बांध फुटला...
बाळ्या नेहमी प्रमाणे संध्याकाळी ' बिल वसुली ' करुन परतला. तसा हा दररोजचा प्रोग्राम ! एकदा घरी आला की घराच्या मागच्या बाजुला असलेल्या लोखंडी ड्र्म मधुन पाणी घेवुन हात पाय धुवायचे, चहा घ्यायचा आणी रोशनकाकांच्या राशन दुकानात पडेल ती मदत करायची. पण त्या दिवशी जेव्हा तो ड्र्म पर्यंत जायला निघाला तेव्हा त्याला एक जोरदार किंकाळी ऐकु आली. धावत जाऊन पाहिल तर एक पाच फुटाचा जळता देह त्याचा अंगावर धावुन आल्यासारखा आला. त्याच्या पर्यंत पोहोचायचा आधीच तो देह कोसळला . बाळ्या चा हात ड्र्म पर्यंत जाईपर्यंत पर्यंत त्या देहाचा कोळसा झाला होता.
भेदरलेला बाळ्या पळत जाउन सुलाताईच्या घरात बघतो तो तिथे दिड वर्षाच पोर केव्हाच जळुन खाक झाल होतं. सासु थरथरत एका कोपर्यात उभी होती. बाळ्या तेथेच बेहोश होवुन पडला. दोन तासाने जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो इस्पितळात होता.पण डोके मात्र प्रचंड जड झाले होते. समोर उभे असलेले रोशनकाका धुसर दिसले आणि पुन्हा बाळ्या निद्रिस्त झाला.त्याचे दोन दिवस त्याच अवस्थेत गेले. दोन दिवसांनी जेव्हा त्याला नीटपणे जाग आली तेव्हा तो बाळ्यासारखाच नव्हता च मुळी .
त्याने रोशनकाकांना, बहिणीला, इतर सर्वांना ओळखले. पण सगळी गफलत !! रोशन काकांना डॉक्टर, बहिणीला रोशन काका, डॉक्टर ला नर्स आणि असे सर्वच घोटाळे !! त्यात बोलता-बोलता अचानक " हे sssss !! जळाली !! जळाली !! जsssssळाली !! " असे म्हणायचा. डोळे विचीत्रपणे फिरवायचा. डॉक्टरांनी चार-पाच दिवस वाट पाहिली आणि शेवटी त्याची मनोरुग्णालयात रवानगी झाली.
क्रमश......
प्रतिक्रिया
22 Mar 2011 - 4:15 pm | VINODBANKHELE
काय लिहु?
सुन्न्न्न्न्न्न्न
22 Mar 2011 - 4:17 pm | परिकथेतील राजकुमार
......
22 Mar 2011 - 4:17 pm | टारझन
.
22 Mar 2011 - 4:18 pm | गणपा
:(
काटा आला रे शेवटी.
22 Mar 2011 - 4:19 pm | सविता००१
बापरे........
22 Mar 2011 - 4:19 pm | सहज
जाळ आहे. धग लागली...
वाचतोय..
22 Mar 2011 - 4:21 pm | Pearl
खरच सुन्न :-(
वाचवतं नाही. कोणी थांबवू शकेल का हे सगळं :( [I mean अशा घटना घडणं]
22 Mar 2011 - 4:23 pm | गवि
याच एरियात पूर्वी राहिल्यामुळे अगदी खर्या बॅकग्राउंडसकट उभं राहिलं डोळ्यासमोर वाचताना.
नागपूर चाळ भागात रहायला भाड्याच्या खोल्या शोधल्याचे दिवस आठवले.
काटा आणणारं लिखाण.
वाचतोय, वाट पाहातो.
22 Mar 2011 - 4:23 pm | sneharani
सुन्न.....!!
वाचतेय!
22 Mar 2011 - 4:29 pm | स्पा
आयला मस्त कादंबरी हातात पडली ,
त्यात सुहासने ती लिहायची मनावर घेतली ,
आणि पहिल्याच भागात तुफान पकड ..
काय खरा नाय ब्वाबा....
सुहाश्या मोठे मोठे भाग टाकत जा....
आणि परासारखी "भन्नाट" शेंडी लावू नका म्हणजे मिळवली
22 Mar 2011 - 4:33 pm | मनीषा
घरगुती भांडणाचा शेवट इतका भयंकर ?
सुलाताई आणि तिच्या लहानग्याचा अंत खरच करुणास्पद .
पुढचा भाग वाचायचा आहे ...
22 Mar 2011 - 4:44 pm | टुकुल
.......
22 Mar 2011 - 4:53 pm | गणेशा
शहारा आणणारे लिखान ..
क्रमशः म्हणजे आजुन काय असे होउन राहिले आहे भाऊ.
बाकी येरवडा भागातील हा परिचीत भाग असल्याने आनखिनच चित्र डोळ्यासमोर तरळुन गेली ते वेगळेच ..
22 Mar 2011 - 5:12 pm | मन१
पुढचा भाग येउद्यात.
आपलाच
मनोबा.
22 Mar 2011 - 5:14 pm | मराठे
... :(
22 Mar 2011 - 5:35 pm | ५० फक्त
पुनरागमनायच , स्वागत पुन्हा एकदा आणि धन्यवाद लिहितं झाल्याबद्दल.
अतिशय छान सुरुवात झाली आहे, अशा घटना मनावर आणि मेंदुवर फार भयानक परिणाम करुन जातात.
22 Mar 2011 - 5:43 pm | इंटरनेटस्नेही
.
22 Mar 2011 - 5:44 pm | प्रशांत
<.><.><.><.><.><<.>
22 Mar 2011 - 5:46 pm | खादाड अमिता
.....
22 Mar 2011 - 6:07 pm | प्रसन्न केसकर
बाळ्याच्या मनोविश्वाचे काय झाले असेल?
जळुन मृत्यु वगैरे बोलायला, ऐकायला, वाचायला, फारसे काही वाटत नाही पण मृत्युच्या सर्वात भयानक रुपांपैकी एक ते असते. मी मी म्हणणारे पोलिस, रेस्क्यु वर्कर्स, अगदी डेड हाऊसमधले कर्मचारीपण जळालेल्या, बुडालेल्या बॉड्या पहायला कचरतात. अन इथे तर बाळ्याने आख्खी जिवंत बाई धडाधड पेटुन मरताना पाहिली. अन कहर म्हणजे ती बाई एकटी नाही जळाली, बरोबर तिचं बाळ पण!
दुष्मनावर पण असं काही पहायची वेळ येऊ नये.
अन एव्हढं सगळं पहाण्यावरच बाळ्याच्या नशीबाचे भोग नक्कीच संपलेले नसणार. मेंटलला गेला म्हणजे उरला सुरला माणुस संपणारच. मेंटल अन जेल, दोन्हीमधे एक साम्य असतं. तिथं पाऊल टाकता क्षणीच माणसाचं आयुष्य संपतं. उरतं ते फक्त त्याचं सजीव प्रेत.
22 Mar 2011 - 11:09 pm | शिल्पा ब
असेच म्हणेन
22 Mar 2011 - 6:42 pm | निनाद मुक्काम प...
सुरवात चांगली आहे .
कांदबरी दीर्घ असू दे .
पु ले शु
22 Mar 2011 - 6:46 pm | वपाडाव
त्याची काय अवस्था होणार काय म्हैत?
पु. भा. टा. त. वा. ना. :(
22 Mar 2011 - 7:05 pm | श्रावण मोडक
पूर्ण झाल्यावर प्रतिसाद. नीट लिही. बैठक मार. :)
22 Mar 2011 - 10:52 pm | मराठमोळा
हे कदाचित असच चालायचं.
असाच एक प्रकार आठवला. अॅक्सीडंट नंतर नवरा स्वतःच्या बायकोला मोठी बहीण समजुन वागत होता कित्येक वर्ष. मग शेवटी त्याने गळफास घेतला वेडाच्या भरात. बिचार्या मुलीचं काय? वय २८ वर्षे. काय करावं अशा पोरीनं?
घटना घडत असतात, नेहमीच.. आपणही लोकांपेक्षा वेगळे नाही अशी जेव्हा जाणीव होते तेव्हा क्षणभरासाठी थरकाप उडतो. पण आयुष्य असंच चालतं कदचित.
22 Mar 2011 - 11:37 pm | विनायक बेलापुरे
नि:शब्द .............
22 Mar 2011 - 11:44 pm | नंदन
...
23 Mar 2011 - 12:02 am | प्राजु
बापरे..! पुढे काय झालं??
23 Mar 2011 - 1:03 am | आनंदयात्री
ह्म्म. काही कटु आठवणी जाग्या झाल्या.
लिहलं आहेस खतरनाक, गोष्ट नक्की पुर्ण कर.
23 Mar 2011 - 1:13 am | पुष्करिणी
अरे बापरे ,
भीती वाटतेय वाचतानासुद्धा...
23 Mar 2011 - 1:33 am | मेघवेडा
पूर्ण कर रे लवकर.
23 Mar 2011 - 5:21 am | निकिता_निल
बापरे. भंयकर घटना आहे. पुढे काय होते?
23 Mar 2011 - 11:11 am | नारयन लेले
रोज सकाळी वर्तमान पत्र हातात पड्ले की आशाच बातम्या वाचण्यात येतात.
हे आसेच चालणार.
विनित
23 Mar 2011 - 11:20 am | स्पंदना
सुहास लिहिते झाल्या बद्दल धन्स!!
पण वाचवत नाही आहे. बहिण आहे ना त्याला? तीच काय?
23 Mar 2011 - 12:12 pm | छोटा डॉन
जास्त क्रमशः नसावे आणि अशीच बैठक जमावी हीच अपेक्षा.
वाचतो आहे.
- छोटा डॉन
23 Mar 2011 - 1:59 pm | चिगो
खुप खतरा लिहीतोयस भाऊ... सुन्न झालोय.
पु भा प्र.
23 Mar 2011 - 2:35 pm | RUPALI POYEKAR
पु भा प्र.
23 Mar 2011 - 3:49 pm | मिंटी
.
23 Mar 2011 - 10:57 pm | रश्मि दाते
बापरे,पुढचा भाग लवकर टाक
23 Mar 2011 - 11:15 pm | पिवळा डांबिस
चांगलं उतरतंय चित्रण!
अजून येऊ दे...
25 Mar 2011 - 4:31 pm | llपुण्याचे पेशवेll
भयानक. पुढे काय झालं हे वाचण्याची उत्सुकता. दुर्दैव त्याला नुसतंच इस्पितळात पाठवून थांबलं नसेल. (बाकीचांनी लॉ ऑफ रँडमनेस वर लेख लिहीत बसावे वेळ जात नसेल तेव्हा )
*
26 Mar 2011 - 2:33 pm | प्राजक्ता पवार
:(
30 Mar 2011 - 4:27 pm | शित्रेउमेश
खतरनाक....मी अजुन त्या धक्क्यातून बाहेर नाही आलो..
एक तर तो बिचारा आधिच भूकंपाच्या धक्क्यतून सावरायचा प्रयत्न करतोय, आणि हे काय लिहुन ठेवलय त्याच्या नशिबात ??? काय होईल पुढे ??? आणि त्याच्या बहिणीच काय होणार ????
पुढच्या भागाची वाट बघतोय...
30 Mar 2011 - 4:58 pm | निखिल देशपांडे
लवकर पुर्ण कर
31 Mar 2011 - 1:26 am | अप्पा जोगळेकर
पुढच्या भागाची वाट पाहात आहे.
31 Mar 2011 - 9:23 am | प्यारे१
पु भा प्र.
सुन्न
-प्यारे.