आज DoF ची माहिती करून घेऊ. खालील आकृतीत ab ची प्रतिमा cd येथे पडली आहे. (कॅमेर्यातील फ़िल्म किंवा ccd) आपण पाहिले की
ab शेजारील e आणि f या मधील वस्तूंच्या प्रतिमा जरी cd येथे थोड्या हललेल्या असतील तरी त्या आपणास शार्प वाटतात. (दृष्टीभ्रम.) या e-f
अंतराला म्हणावयाचे DoF. नेहमी a-e हे अंतर a-f या अंतरापेक्षा जास्त असते.
DoF जास्त पाहिजे असेल तर
(१) फ़ोकल लेंथ कमी करा. १०० एमेम्ची लेन्स वापरावयाच्या ऐवजी ५० एमेम ची लेन्स वापरलीत तर DoF जास्त मिळेल.
(२) ab-cd हे अंतर वाढवा. १० फूटा ऐवजी १५ फूटावर फ़ोकस केलेत तर DoF वाढेल
(३) अपर्चर नंबर वाढवा. (अपर्चर आकार कमी करा.) f4च्या ऐवजी f8 ने फोटो काढलात तर DoF वाढेल.
DoF कशाकरिता वाढवावयाचा ? फोटोतील सगळ्या वस्तू शार्प दिसाव्यात म्हणून. ठीक. एवढी माहिती मागेच पाहिली होती.
गणिताची हौस असलेल्या लोकांनी आपले काम सोपे व्हावे म्हणून सारण्या केल्या. म्हणजे तुम्ही फ़ोकल लेंथ, अपर्चर व अंतर याचे कोणतेही कॉंम्बिनेशन तुम्ही केलेत तरीही DoF तुम्हाला सारिणीमध्ये मिळते. उदा. २० फूटावर फ़ोकस केले, अपर्चर ४ होते फ़ोकल लेंथ ५० एमेम होती तर DoF १५ ते ५० फूट. त्याच फ़ोकल लेंथने, त्याच अंतरावर ८ अपर्चरने फोटो काढला तर DoF होईल १२ ते ७० फूट. (उदा. फक्त सारिणी काय सांगते ते कळण्याकरता ) Hyperfocal distance ची सारिणी आहे. मागील वेळी आपण मित्र व ताजमहाल यांचा फोटो काढणार होतो. मित्र १० फूटावर व ताजमहाल ८० फूटावर (infinity) असेल आणि सारिणी सांगत असेल की HD १५ फूट आहे तर तेथे, मित्राच्या मागे ५ फूट, फ़ोकस करा. आता DoF असेल ७-ते १०० फूट. म्हणजे मित्र व ताजमहाल दोन्हीही शार्प दिसतील. ab येथे मित्र, g -c हायपरफोकल अंतर व मागे दूर अंतरावर ताजमहाल. दोन्ही शार्प.
आता तुम्हा आम्हाला याचा काही उपयोग आहे कां ? माझ्या मते नाही. आपण खिशात टेबल ठेऊन, अंतर मोजून, फोटो काढत नाही.( Proffessional Industrial Photograffers हे करतात.) आणि म्हणूनच मागे ह्या सारण्या दिल्या नव्हत्या. वरील १,२,३ लक्षात ठेवा, फोटो काढा. आणि हीच गोष्ट मी फोटो देण्याची. मी वापरलेले अपर्चर,अंतर व फ़ोकल लेंथ तुम्ही वापरणार नाही तर अशा फोटोंचा तुम्हाला काय उपयोग ? त्या ऐवजी एकच फोटो निरनिराळे बदल करून काढा व स्वत:च बघा. नंतर डिलिट करा. वाटले तर मिपावर प्रसिद्ध करा. सारिणींचा उपयोग करणे सोपे आहे; जर कुणाला अडचण वाटली तर विचारा. पुढचा भाग उद्या.
शरद
प्रतिक्रिया
9 Mar 2011 - 2:53 pm | सहज
उपयुक्त माहिती.
धन्यवाद.
9 Mar 2011 - 3:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
उपयुक्त माहिती. सराव करायला सुरूवात करत आहे.
9 Mar 2011 - 3:12 pm | प्रचेतस
वाचनखूण साठवत आहेच.
21 Mar 2011 - 11:28 am | यशोधरा
सापडला हा भाग. वाचनखूण साठवली आहे.
धन्यवाद.