(अजुन) एक अध्यात्मिक संवाद !

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
18 May 2018 - 9:31 am

वेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ
स्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा
धागा वर्गीकरण : #मीचीलाल
(संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे )
-------------

"हॅरे क्रिश्ना हॅरे क्रिश्ना क्रिश्ना क्रिश्ना हॅरे हॅरे | हॅरे रॅमा हॅरे रॅमा रॅमा रॅमा हॅरे हॅरे"
" च्यायला, इथेपण ह्यांचा तमाशा सुरु आहे का " मित्र वैतागुन बोलला . मी म्हणलो , " थांब रे जरा , बघु तरी ह्यांचे मडके किती पक्के आहे ते "
मित्र हसत हसत म्हणाला - " तुला ना साल्या नुसती बोटं घालायची हौस आहे"
" ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . आमचे गुरुदेवच म्हणालेत - बेबी माय व्होल वर्क इज टु कन्फ्युज यु . ख्यॅ ख्यॅ ख्यॅ "

-------------

" हे पुस्तक तुमच्यासाठी "
गोर्‍याटंच युवतीने नेहमीचेच टिपिकल कृत्रीम स्मितहास्य करत माझ्या हातात " भगवद्गीता अ‍ॅज इट इज" पुस्तक चिकटवले !
" थॅन्क्यु " इतकेच म्हणुन तिच्या कृत्रिमहास्याकडे आणि इतर सुंदर गोष्टींकडे जमेल तितके दुर्लक्ष करत मी चालायला लागलो .
" तुम्ही फक्त ५ डॉलर डोनेशन द्या "
" मी तुम्हाला शष्प एक पेनी सुध्दा डोनेशन देणार नाही " इति अस्मादिक ! टोन : स्वराज्य माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि मी टरफलं उचलणार नाही.
" का बरे ?"
" मी ही पुस्तक वाचलं आहे , आणि भगवद्गीतेचे ह्याच्या इतके चुकीचे इन्टर्प्रिटेशन दुसरे कोणतेही नाही असे माझे स्पष्ट मत आहे"
" व्हॉट ?"
" तसेही तुम्ही म्हणाला ना की पुस्त्क तुमच्यासाठी मग डोनेशन कसलं मागताय ? मी तुम्हाला शुन्य डॉलर डोनेशन देतो. हे घ्या"
" नो नो तुम्हाला पाच डॉलर डोनेशन द्यावे लागेल "
" सांग माझ्या **** ला"
" जस्ट ५ डॉलर्स"
" एकतर तुम्ही डोनेशन म्हणु नका , स्पष्ट किंमत म्हणा ना , खोटारडेपणा कशाला करताय"
ही सारी चर्चा ऐकुन एक काळाशुभ्र साऊदिंडीयन असा माणुस तेच खोटारडे स्मित हास्य घेवुन बोलायला आला ! आता अ‍ॅव्हरेज जरा आपल्या कलर चे झाले ! दुत्त दुत्त !
" हॅरे क्रिश्ना ! बोला सर काय काय म्हणाताय ? "
" ॐ नमो नारायणाय "
" अं ?" आव्हरेजिंग वर्स हाल्फ धक्का बसल्यासारखा अविर्भाव !
" जर तुम्ही डोनेशन म्हणयताय तर सक्ती कसली करताय ? मी देईन तितके डोनेशन घ्या ना , शुन्य डॉलर ! नाही तर सरळ स्पष्ट बोला की किंमत आहे म्हणुन "
" नाही नाही सर ते डोनेशनच आहे , पण तुम्ही द्यावे असा आमचा आग्रह आहे , आपण कुठेही पैसे ऊडवतोच कि नै " सिगारेट पिण्याचा निर्देश करत !
ते पाहुन डोकेच सटकले - भेंचो साला इथे गेल्या ३ महिन्यात सिगारेट पिली नाहीये अन हा कोण शहाणा लागुन गेला मला संस्कार शिकवणारा ?
" तुम्ही बिजिनेस मांडलाय माझ्या धर्माचा . इतके चुकीचे आणि मिसलिडींग इंटर्प्रिटेशन मी आजवर वाचले नाहीये भगवद्गीतेचे"
आता समोरच्याचा काळ्याचा सात्विकतेचा क्वोटा संपुन तामसिक क्वोटा बाहेर येवु लागला होता . गोरीटंच अजुनही अवाक ! " तुम्ही कोणताही श्लोक सांगा मला संपुर्ण पाठ आहे "
अस्मादिक - " बाबा रे मी तुझ्या पाठांतराची परिक्षा घ्यायला नाही आलो , अर्थ कळलाय की नाही ह्याची परिक्षा घेतोय , आता सांग नायं आत्मा बलहीनेन लभ्यः ह्या उपनिषदातील श्लोकाचा अर्थ काय ?" गोरी टंच अवाक +२!
" बलहीन माणसाला आत्मतत्वाचे आकलन होणार नाही "
" तुमच्या श्रीकृष्ण ह्या पुस्तकात तुमच्या महामहीमांनी ह्याचा अर्थ बलरामाच्या कृपेशिवाय ईश्वरप्राप्ती होत नाही असा काहीच्या बाही रिडिक्युलस अर्थ काढलाय , आता बोला"
" नाही नाही त्यांचेच बरोबर आहे , तुम्ही पुस्तक घेणार आहे की नाही ते बोला "
" तु ते डोनेशन हा शब्द हटव अन स्पष्ट किंमत म्हण मग बोलु . बिजनेस करतोय तर बिजनेस म्हणावे , उगाच धर्माचा अविर्भाव कशाला ?"
गोरी टंच अवाक +३ अंगावर पाल झटकल्यासारखे "ह्यांना माझ्या पेक्षा जास्त माहीत आहे , हे सांगतील"
" हो आमचा बिजनेसच आहे "
" हां आता कसं स्पष्ट बोललास , ऐक गं टवळे , हा केवळ बिजनेस आहे , ह्यांना आमच्या सनातन वैदिक हिंदु धर्माशी काही घेणे देणे नाही , अब्राहमिक धर्मातल्या जमतील तितक्या वाईट प्रथा सनातन धर्मात घुसडुन तुम्हा लोकांना रुचेल असे बिजनेस मॉडेल उभे केले आहे ह्यांनी . बाकी काही नाही"
आता मात्र टवळी बावरली अन काळ्याकडे बघायला लागली .
" हो आमचा बिजनेसच आहे - तुमच्या आत्म्याला वाचवण्याच्या . पुढच्या जन्मात तुम्हाला कुत्रा व्ह्यायचंय की मांजर ? " आता सात्विकतेचा रंग जवळपास संपत आलेला ! लगेच आम्ही आमचा लाल डबा बाहेर काढला !
" मला फरक पडत नाही , मी पुढच्या जन्माचा विचारच करत नाही . कार्पे डियाम ! मार्कस ऑरेलियस काय म्हणाला - असे जगा की जणु आजचा दिवस शेवटचा आहे! "
" मग भोगा आपल्या कर्माची फळं "
" कसली आलीत कर्माची फळं ? मी कर्मफळाची चिंता न करता कर्म करतो:

योगस्थ: कुरु कर्माणि संग त्यक्तवा धनंजय। सिद्धयसिद्धयो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते।।

आता अवाक व्ह्यायची वेळ वेळ काळ्यावर ! क्रोधातिरेकाने काही सुचेनाशी अवस्था !
गोर्‍या टंच पोरीने अलगद माझ्या हातातुन पुस्तक काढुन घेतले अन हातात एक चॉकलेट ठेवले
" धिस इज प्रसॅद फॉर यु "
" हा हा हा , मला कसला प्रसाद देतेस टवळे , मीच प्रसाद आहे ,

प्रसादे सर्व दुखानाम हानिरस्योपजायते । प्रसन्न चेतसो ह्यायुर्बुद्धि: पर्यवतिष्ठते

आता मात्र काळ्याच्या राग अनावर व्हायला लागलेला . खाऊ का गिळु असे अविर्भाव ! म्हणले अजुन जरा डिवचावे -

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः। ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ||

ह्याचा अर्थ सांगु का रे ह्या लोकांना ? बघु मग किती लोकं येताहेत तुझा बिजनेस करायला !!

आता मात्र काळ्या बिथरलाच. काहीही न बोलता फक्त " म्यॅव म्यॅव म्यॅव म्यॅव " असे करत तो दुर निघुन गेला ! मी आणि मित्र हसत राहिलो !
---------------
" यु नो व्हॉट , वी कॅन कॅचप ओव्हर अ ड्रिंक सम टाईम . आपण कधी तरी भेटुन वाईन पिवुयात का ? मी तुला कृष्ण राधेशी कशी रासक्रीडा करायचा ते समजाऊन सांगेन अगदी जयदेवाने सांगितले आहे ना गीतगोविंद मध्ये तसे -

प्रथम समागम लज्जितया, पटुचाटुशतै: अनुकूलम् |
मृदुमधुरस्मितभाषितया शिथिलीकृत जघन दुकूलम् ||

टवळीला डावा डोळा मिचकाऊन म्हणालो . अर्थात तिला शष्प काही कळले नसणार हे माहीत होते पण आपल्याला आपला लाल रंगाचा डबा संपवल्याचा आनंद !

टवळीने दिलेले चॉकलेट जाता जाता डस्टबीन मध्ये टाकले अन वाचवलेले ५ डॉलर मस्त वाईनहेन्स्टिफनर पिण्यात सत्कारणी लावले !

इत्यलम !

तळटीप :
१) लाल रंगाचा डबा संपला .
२) काही संवाद काल्पनिक.
३) आपल्याकडे विठ्ठलाला काळ्या म्हणले जाते!
४) उत्तरदायित्वास नका रं लागु

धर्मविनोदसामुद्रिककृष्णमुर्तीअनुभवप्रश्नोत्तरेवाद

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

18 May 2018 - 9:41 am | टवाळ कार्टा

अप्रतिम गुर्ध्येव

वीणा३'s picture

18 May 2018 - 9:56 am | वीणा३

या उपद्व्यापाबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला एक चॉकलेट. फार वात आणतात हे लोक. एकदा गीते चा पुस्तक हातात दिलं, म्हटलं नकोय, तर म्हणे देवाला नाही म्हणू नये. जाम चिवट असतात.

सतिश गावडे's picture

18 May 2018 - 11:10 am | सतिश गावडे

लय भारी ... विठ्ठल... विठ्ठल !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2018 - 11:22 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

पुंबा's picture

18 May 2018 - 11:29 am | पुंबा

वा.. वा.. वा.. तोडलंत..
आता, कुणी इस्कॉनचा उंडगा किंवा टवळी आली पिडायला तर त्यांची काशी करायला झकास मटेरियल दिलंत..
आमच्या नशीबात हे इस्कॉनवाले, आर्ट ऑफ लिव्हिंगवाले आणि अ‍ॅम्वेवाले फार. गोड बोलून जाल बिछतात..(जमला का मटारी मोड?)

अरे चांगले प्रिंटिंग अस्ते त्या गीतेचे, चित्रे पण चान चान असतात. ह्या जन्मातल्या कर्माचे फळ पुढच्या जन्मात कोणती योनी मिळते त्याचे व्हिज्युअलायझेशन पाहा नुसते. दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात. साधेसुधे नाही तर गुलाबी गुलाबी, गोंडस धश्टपुष्ट डुक्कर.
आक्खे महाभारत एलए मध्ये घडले होते असेच वाट्ते.

टवाळ कार्टा's picture

18 May 2018 - 12:17 pm | टवाळ कार्टा

पुढच्य जन्माच्या ऐवजी याच जन्मात मिळत्ते का ते पहावे ;)

प्रचेतस's picture

18 May 2018 - 1:15 pm | प्रचेतस

दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात

त्यांना खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन वाचावयास द्या.

द्या द्या, तुम्हीच वाचायला द्या.
त्यावर पण तशीच रिअलिस्टिक रिअलिस्टिक चित्रे काढायला सांगा ना गडे. ;)

तुम्ही जरा शोधायचे कष्ट घ्या ना गडे.

तिमा's picture

18 May 2018 - 3:37 pm | तिमा

डुक्कर झाल्यावर काय करतात, ते या बातमीत पहा.

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/wild-boars-attack-up-...

प्रसाद गोडबोले's picture

18 May 2018 - 6:23 pm | प्रसाद गोडबोले

खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन

>>
त्या पेक्षा हे चालेल का ? ;)
सभा पर्वातील हे दाखवु का त्यांना की युध्धीष्ठिराने कसे वराहाचे अन हरीणाचे मांस खायला घालुन १०००० ब्राह्मणांना संतुष्ट केले , आय टेल यु बेकन इज अनरेजिस्टेबल =))))

इत्युक्त्वाऽऽलिङ्ग्य वीभत्सुं विसृष्टः प्रययौ मयः'। 2-4-6 (11373)
ततः प्रवेशनं तस्यां चक्रे राजा युधिष्ठिरः।
अयुतं भोजयित्वा तु ब्राह्मणानां नराधिपः॥ 2-4-7 (11374)
साज्येन पायसेनैव मधुना मिश्रितेन च।
भक्ष्यैर्मूलैः फलैश्चैव मांसैर्वाराहहारिणैः।
कृसरेणाथ जीवन्त्या हविष्येण च सर्वशः॥ 2-4-8 (11375)
मांसप्रकारैर्विविधैः खाद्यैश्चापि तथा नृप।
चोष्यैश्च विविधै राजन्पेयैश्च बहुविस्तरैः॥ 2-4-9
कुंभकोणम इडिशन

किंव्वा ह्या इस्कॉन वाल्यांना हे दाखवु का त्यांना >>>
उद्योगपर्व यानसंधीपर्व अध्याय ५९ संजय म्हणतो :

नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
यत्र कृष्णौ च कृष्णा च सत्यभामा च भामिनी ||४||
उभौ मध्वासवक्षीबावुभौ चन्दनरूषितौ |
स्रग्विणौ वरवस्त्रौ तौ दिव्याभरणभूषितौ ||५||
अर्जुनोत्सङ्गगौ पादौ केशवस्योपलक्षये |
अर्जुनस्य च कृष्णायां सत्यायां च महात्मनः ||७||

- कृष्णार्जुनाच्या अंतःपुरात अभिमन्यु , नकुल सहदेव वगैरेंना प्रवेश नव्हता , तिथे केवळ कृष्ण सत्यभामा अर्जुन आणि द्रौपदी इतकेच लोक होते ! कृष्ण आणि अर्जुन दोघेही मध्वा ( मधु / माध्वी ) नामक सुरा पिऊन मत्त झालेले होते , त्यावेळी कृष्णाचे दोन्ही पाय अर्जुनाच्या मांडीवर होते तर अर्जुनाचा एक पाय द्रौपदीच्या मांडीवर तर दुसरा सत्यभामेच्या मांडीवर !

सत्यभामेच्या ??? आर यु किडींग मी ? इथे तर माझ्यासारख्या सनातनी माणासालाही ठसका लागला होता , इस्कॉनवाल्यांना काय होईल देव जाणे बहुतेक ९११ ला कॉल करावा लागेल =))))

टवाळ कार्टा's picture

18 May 2018 - 7:09 pm | टवाळ कार्टा

बाब्बो....एकदा सत्संग ठेव आलास की =))

माहितगार's picture

18 May 2018 - 8:37 pm | माहितगार

.

..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |

या ओळीतील शब्दांचा अर्थ कसा वाचला जातो ? आणि या ओळीच्या अर्थात नकुल सहदेवाचे नाव यात कसे अंतर्भूत होते ? मी क्लेम कॉन्टेस्ट करता नाहीए केवळ एका माहिती करून घेण्याची शंका म्हणून .

प्रसाद गोडबोले's picture

18 May 2018 - 8:55 pm | प्रसाद गोडबोले

ह्यात जरा टेक्निकल घोळ आहे .
मी उधृत केलेले श्लोक भांडारकरच्या ( BORI च्या) क्रिटिकल एडिशन मधुन कॉपी पेस्ट केलेले आहे अन अर्थ वल्ली सरांनी शेयर केलेया महाभारताच्या मराठी अनुवादतुन घेतलेलेला आहे जे की बहुतेक प्रसाद प्रकाशनाचे आहे आणि कुंभकोणम एडिशन वरुन लिहिलेले.
म्हणुन मी हाच श्लोक कुंभकोणम एडिशन मध्ये कसा दिला आहे ते पहायचा प्रयत्न केला तर सापडले नाही :( श्लोकांचे नंबर इव्हन काही काही अध्यायांचे नंबर वरखाली झालेले दिसले.
थोडक्यात काय तर बोरी ची आवृत्ती , कुंभकोणम ची आवृत्ती आणि मराठी अनुवाद ह्यात मला १-१-१ वन ऑन वर मॅपिंग साप्डले नाहीये. थोडा वेळ देवुन शोधतो आणि कुंभकोणम आवृत्ती मधील श्लोक टाकायचा प्रयत्न करतो !

अवांतर : बाकी तो सभापर्वातील श्लोक बोरीच्या आवृत्तीत नाहीये , कुंभकोणमच्या आवृत्तीत आहे हे ही नमुद करतो ह्या निमित्ताने !
आणि ह्याच्याही पुढे जाऊन हे सारे संस्कृत लिटरेचर संस्कृत डॉक्युमेन्ट्स . ऑर्ग वरील संदर्भाने लिहिलेले आहे , ते मुळ प्रकाशित आवृत्ती सारखेच असेल असा अंदाज आहे , खात्री नाही . मी फक्त मराठी अनुवाद वाचल्या असल्याने तेवढेच खात्रीने सांगु शकतो :)

माहितगार's picture

18 May 2018 - 9:22 pm | माहितगार

या दुव्यावर दिलेल्या हिंदी अनुवादात नकुल सहदेवाचा उल्लेख आहे आणि आपणास मराठी अनुवादातही सापडला म्हणता म्हणजे तो तसा कोणत्यातरी आवृत्तीत असावा.

माहितगार's picture

18 May 2018 - 11:40 pm | माहितगार
माहितगार's picture

18 May 2018 - 9:24 pm | माहितगार

संपादक कृ. एक पेक्षा अधिक आलेले पोस्टीन्ग हटवावे. अनेक आभार

माहितगार's picture

19 May 2018 - 12:05 am | माहितगार

इंग्रजी अनुवादात nor the Twins असा आहे. न यमौ तं देशम यातील कशाचा अर्थ Twins असा होतो का ?

अर्धवटराव's picture

19 May 2018 - 12:11 am | अर्धवटराव

प्रथमा विभक्ती द्विवचनातला "यमौ" हाच एक शब्द वाटतो.

विविध आवृत्त्यांत अध्यायांचे नंबर वरखाली होतात त्यामुळे हे संदर्भ शोधणे बरेच जिकीरीचे जाते. मात्र मुख्यत्वे बोरी प्रत रेफर करावी. किमान १० व्या शतकानंतरची भर त्यात नाही हे खात्रीने सांगता येते.

प्रचेतस's picture

19 May 2018 - 9:00 am | प्रचेतस

..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |

यमौ-यमल-जुळे असा अर्थ आहे तो.

येथे नकुल सहदेव हे शब्द वापरले नसून जुळे ह्या अर्थी घेतल्या गेला आहे.

माहितगार's picture

19 May 2018 - 9:49 am | माहितगार

माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक आभार . इथे या शोध दुव्यावर महाभारतात यमौ शब्द येणारे श्लोक एकत्र दिसतील, ते पाहून यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ?

कारण टेक्निकली कौरव हे त्यांचे आपापसातले जुळे भाऊ आहेत , ‘तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत ? 'तुमच्या देशातील अभिमान (गर्व या अर्थाने) आणि जुळे कौरव यांना प्रवेश नाही', असा तर अर्थ होत नाही ?

प्रचेतस's picture

19 May 2018 - 10:29 am | प्रचेतस

यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ?

ते शोधणे किचकट आणि वेळखाऊ आहे. आख्खं महाभारत उपमांनी भरलेलं आहे त्यामुळे कोणता शब्द कुठे वापरला जाईल किंवा कोणत्या शब्दाचा अर्थ दुसर्‍या वाक्याच्या अनुषंगाने कसा बदलला जातो हे सांगणे अवघड आहे.

तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत

मूळात शब्द देशमभियान्ति असा आहे. देशम अभियन्ति. ह्याचा अर्थ देशाचा अभिमान असा नसून देश (प्रदेश) आणि अभियान (जाणे) अशा अर्थी आहे. म्हणजे " ह्या प्रदेशी (ह्या ठिकाणी) जाण्यास" असा अर्थ होतो.

माहितगार's picture

19 May 2018 - 11:01 am | माहितगार

यन्तव्य चा http://spokensanskrit.org वर to be restrained or checked or controlled असा आहे, मी अभियन्ति अर्थ जाण्यापासून थांबवणे असा घेतला.

* मी देशम अभियन्ति. चे देशाचा अभिमान करत नाहीए ; नैवाभिमन्युर - न एव अभिमन्युर चा अर्थ (गर्व या अर्थाने) अभिमान असू शकतो का ? म्हणजे अर्जून पुत्र अभिमन्यूचा इथे संबम्धच नसेल, असे काही ? गर्व आणि कौरव यांना प्रवेश नाही .
* अन्यथा अंतःपूरातील प्रवेशाला असलेल्या मर्यादेचा उल्लेख करताना, देश या व्यापक सज्ञेचे प्रयोजन लक्षात येत नाही .

* जरा परंपरा मोड ऑन केल्या सारखे वाटेल पण , अर्जूनाचा एक पाय द्रौपदी साठी आणि एक सत्याच्या दिशेने आहे , आणि म्हणून कृष्णाचे पाय (समर्थन) अर्जूनाच्या दिशेने आहे ; असे काही रुपक असेल तर वर मी म्हणतो तसे गर्व आणि कौरवांना , कृष्ण , अर्जून , द्रौपदी आणि सत्यभामामहाभाच्या अंतःपूरात म्हणजे मनात प्रवेश नाही' असे काहीसे रुपक जरासे ताणल्या सारखे होतेय , ' परंपरा मोड ऑफ . अर्थात हा सर्व तर्क यमौ हा शब्द कौरवांसाठी महाभारतात इतर श्लोकात येत असेल तरच लागू पडेल. यमौ हा शब्द इतरत्र मुख्यत्वे नकुल-सहदेव या अर्थाने येत असेल तर परंपरा मोड मधला तर्क पूर्णच ढासळेल.

प्रचेतस's picture

19 May 2018 - 11:11 am | प्रचेतस

नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |

तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात.

न एव: अभिमन्यु: यमौ तं देशम अभियान्ति वै

अभिमन्यु आणि जुळे देखील ह्या स्थानी जाउ शकत नाहीत.

आता मात्र उत्तरदायित्वास नकार लागू.

माहितगार's picture

19 May 2018 - 11:22 am | माहितगार

:)) मान्य देश शब्द कदाचित स्थान या अर्थाने येऊ शकेल; पण जुळे म्हणजे नकुल आणि सहदेवच कसे ठरवणार ? या संदर्भा नुसार महाभारतात जुळ्यांच्या किमान सात जोड्या आहेत.

अभिमन्यु कदाचित वयाने लहान म्हणून समजता येते, पण नकुल आणि सहदेवालाच नाही असे सांगण्याचा उद्देश्य काय असावा ? कारण नकुल सहदेव असा विशीष्ट उल्लेख करण्या एवढेही लहान नसावेत , पांडव बंधू मध्ये माझ्या समजानुसार दोन दोन वर्षाचे अंतर होते, सदर संवाद होतोय तो पर्यंत पांडवांची वये नकुल सहदेवासह पुरेशी मोठी असावित.

माहितगार's picture

19 May 2018 - 11:26 am | माहितगार

तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात.

=)) परंपरा मोड ऑनः तुम्हाला तो व्यास आणि गणपती संवाद ठाऊक आहे ना ! परंपरा मोड ऑफ :))

गणामास्तर's picture

19 May 2018 - 12:38 pm | गणामास्तर

काय ठरलं मग शेवटी? कोण होते ते जुळे?
बाकी आम्हाला पण सांगा की व्यास आणि गणपतीचा संवाद.

माहितगार's picture

19 May 2018 - 12:57 pm | माहितगार

व्यास गणेश संवाद

महाभारतातला मूळ संदर्भ जाणकारांनी द्यावा.

राघव's picture

18 May 2018 - 12:11 pm | राघव

मस्त! :-)

मलाही एक असाच भेटला होता.. थोडा वेळ सुद्धा काहीही वेगळं ऐकून घ्यायची यांची तयारी नसते. उगाच पिडतात.. म्हटले मलाही वेळ आहे.. मीच पिडतो तुला.. नंतर शिव्याशापांची लाखोली वाहत गेला.. मजा आली.

बाकी तुमच्याएवढा माझा अभ्यास नाही.. त्यामुळे संस्कृत श्लोक तोंडावर फेकून मारता आले नाहीत. आता जरा करावा म्हणतो! :-)

सस्नेह's picture

18 May 2018 - 12:17 pm | सस्नेह

हॅरे रॅम, हॅरे क्रिश्ना =))

शाली's picture

18 May 2018 - 1:22 pm | शाली

जाम भारी.
कल्पना करत होतो "तुमचा संवाद ऐकायला तिथे हजर असतो तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळता आले असते"
मस्तच. आवडले एकदम.

मिपावाल्यांशी नाद नाही करयचा.

यशोधरा's picture

18 May 2018 - 6:13 pm | यशोधरा

लैच भारी!!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 May 2018 - 6:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

हे इस्कॉनवाले भलते त्रास देतात कधी कधी.
पुण्यात खडी मशीन जवळ एक इस्कॉनचे देउळ आहे. तिकडे संध्याकाळी प्रसाद म्हणुन मिळणारी खिचडी फारच स्वादिष्ट असते.
ती खाण्यासाठी बर्‍याच वेळा या लोकांना सहन करावे लागते.
पैजारबुवा,

प्रचेतस's picture

18 May 2018 - 6:23 pm | प्रचेतस

दुत्त दुत्त....!
असं चावतात व्हय इस्कॉनवाल्या लोकांना??
सत्यनारायण भगवान तुमचा मोबाईल हरवून टाकेल.

प्रसाद गोडबोले's picture

18 May 2018 - 6:48 pm | प्रसाद गोडबोले

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !

आम्ही सहस्त्रार्जुनाचा मंत्र म्हणुन आमचा मोबाईल परत मिळवु :
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !

पण तसेही आमच्यावर परशुरामाची कृपा आहे , नवीनच मोबाईल देईल तो आम्हाला =))))

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2018 - 8:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2018 - 8:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचा चेहराच तसा असावा म्हणून इस्कॉनवाले तुमच्या मागे लागतात. ;) (हघ्या) आमाला लय वेळा दिसले एनवायसीमध्ये सबवेच्या स्टेशन्सवर पण एकदाही आमच्या मागे लागण्याचे धाडस केले नाही !!! =)) =)) =))

असे अनुभव अजून लिहा. असे हजरजबाबी संवाद वाचायला मजा येते... आम्हाला बर्‍याचदा असे वेळ निघून गेल्यावर सुचते :( ;) :)

चित्रगुप्त's picture

18 May 2018 - 9:25 pm | चित्रगुप्त

भारी अनुभव. एकदोनदा यांचेशी गाठ पडली होती तेंव्हा मी पण अशीच मजा केली होती. अत्यंत ठोंबे लोक असतात असाच अनुभव येतो.
त्या 'गीता जशी आहे तशी' पुस्तकाला हल्लीचे आधुनिक इंग्रजी शाळांमधून शिकलेले, संस्कृत वा मातृभाषेचा गंध नसलेले गिर्‍हाईक हमखास मिळतात असे बघितले आहे. मुद्दाम 'जशी आहे तशी' या शीर्षकावरूनच शंका आली होती की काहीतरी चालूगिरी असणार. वाचल्यावर स्पष्टच झाले. उदाहरणार्थ 'निष्काम कर्म' चा त्यांनी दिलेला अर्थ बघा : 'प्रमाणित' गुरूने सांगितलेले कोणतेही काम करणे म्हणजे 'निष्काम कर्म'. आता 'प्रमाणित गुरू' कोण हे तर उघडच आहे. निव्वळ धंदेबाजी. यांच्यातल्या कुणी भ्रमनिरास झालेल्याने यांचे बिंग फोडले पाहिजे. अर्थात अश्या बाबतीत जिवाचा धोकाही असतोच म्हणा.
एक मात्र आहे. त्यांच्याकडे खाण्याचे पदार्थ चांगले मिळतात... निदान मी काही वर्षांपूर्वी खाल्ले होते तेंव्हातरी.

नाखु's picture

18 May 2018 - 11:10 pm | नाखु

भारी

सत्यनारायण अख्खं जहाज गायब करत असल्याने चिल्लर मोबाईल गायब करणार नाही.

गोड (बोल्या )प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती

न वाचता वाचाल नाखु

हायला! तुम्ही फारच हजरजबाबी आहात!

मदनबाण's picture

19 May 2018 - 9:16 am | मदनबाण

अवांतर :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]

प्रसाद गोडबोले's picture

19 May 2018 - 10:01 am | प्रसाद गोडबोले

कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी !
मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे !

भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज ! त्या ला सोबत म्हणुन श्रीमदाद्यशंकराचार्यह्यांचे गीताभाष्य , त्या खालोखाल ज्ञानेश्वरी , ते समजायला किचकट वाटले तर रामकृष्ण मिशन ची संदर्भ पुस्तके हाच क्रम योग्य आहे !
गीतारहस्य अप्रतिम पण सर्वसामान्य सश्रध्द भाविकांना कंफ्युज करते म्हणौन टाळलेलेच उत्त म किंवा हाती घेतलेच तर अगदी साधनेच्या हुच्च अवस्थेत !
राजकारणात जायचे असेल तर विनोबांची गीताई आणि सोबत "युनोहु" सहस्त्रनामे फ्री ! ( हा यु नो हु ची सहत्रनामे हा काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर व्य नि करावा , ओपन फोरमवर लिहायची भीती वाटते . अत्यंत्य धक्कादायक प्रकार आहे हा . एक दांभिक माणुस शहामृगासारखे जमीनीत किती खोलवर मुंडके खुपसु शकतो ह्याचे क्लासिक उदाहरण !)

बाकी ओशोची प्रवचने, योगी अरविंदांची प्रवचने , सी.राजगोपालचारी वगैरे वगैरे ऐकुन आहे पण एका ज्ञानेश्वरी नंतर कशाचीही गरज पडत नाही !

अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही , अभ्या म्हणाला तसे चित्रे भारी असतात त्यांची आणि जेवणही =))))

माहितगार's picture

19 May 2018 - 10:18 am | माहितगार

हरे रामा हरे कृष्णा पंथावरील वरील मुख्य प्रभाव भागवताचा आहे का ? (आणि म्हणून अंधश्रद्धा प्रभाव अधिक , असे काही आहे का ? ) भागवत परंपरेबद्दल माझा परिचय मर्यादित असल्यामुळे चूभूदेघे ( अपूर्ण ज्ञानीसाठी डिस्क्लेमर : या चर्चेचा भागवतजींशी काही संबंध नाही )

अवांतर : सहसा अन्धश्रद्धेस जनाश्रय मिळतो तेवढा रॅशनल मांडणींना मिळत नाही

भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज !

आगदी सहमत.

मदनबाण's picture

19 May 2018 - 11:26 am | मदनबाण

कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी !
म्हणुनच मी अवांतर असे लिहले आहे.

मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे !
असं असेल तर ते चूकच आहे.

अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही
हे तुमचे व्यक्तिगत मत आहे, माझे नाही.

खुलासा :- माझा आणि इस्कॉनचा कुठलाही संबंध नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी मला नक्कीच आवडतात ! जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव.

असो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]

गणामास्तर's picture

19 May 2018 - 12:36 pm | गणामास्तर

जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव.
अगदी सहमत.
आमच्या इथल्या इस्कॉन मंदिरात जाम प्रेक्षणीय गरबा भरतो नवरात्रात, ते फार चांगलं आहे.

प्रसाद गोडबोले's picture

19 May 2018 - 8:34 pm | प्रसाद गोडबोले

साला चिंचवड मध्ये होतो ३ वर्ष तेव्हा सांगतलं नाहीस .

आपले पुलं कसं म्हणाले की ह्या कुत्रे वाल्यांचे कौतुक ऐकुन इतका वीट आला की कुत्राचे कुतुक कसे करु नये हे दाखवण्या साठी शेवटी मीच कुत्रा पाळला =))
तसे काहीसे मी म्हणतो की ह्यांच्या खोटारडेपणा दाखवण्यासाठी आता मीच इस्कॉन जॉईन करतो , आम के आम गुठलियों के भी दाम ;)

हिरव्या देशातला गरबा अजुन चांगला असेल अशी अपेक्षा आहे ;)

नाखु's picture

19 May 2018 - 11:06 pm | नाखु

आल्यावर आश्रम काढायच्या बोलीवर पाठिंबा दिला आहे
(पेढ्या-बत्ताश्याच दुकान माझं राहीलच)
गावडे सरांकडे पुस्तके आणि सीडींची जबाबदारी आहे

पोप पंपावरील भांडवली नाखु

गामा पैलवान's picture

20 May 2018 - 1:53 am | गामा पैलवान

मार्कस,

खिल्ली कोणाची उडवावी हा तात्विक प्रश्न आहे. एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही.

मी तुमच्या जागी असतो तर वेगळ्या प्रकारे संवाद साधला असता. पण, अर्थात तुमचा तुमच्या पद्धतीने संवाद साधण्याचा अधिकार मान्य.

आ.न.,
-गा.पै.

प्रसाद गोडबोले's picture

20 May 2018 - 3:06 am | प्रसाद गोडबोले

नमस्कार गा पै !

आपली अन्य धाग्यावरील मते वाचली आहेत आणि आपले बरेचसे विचार जुळतात असा माझा एक तर्क झालेला आहे . आपल्या मताचा आदरच आहे :)

एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही.

इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो .

अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ?

बाकी रहता राहिला मुद्दा देवाच्या नावावर धंदा करणार्‍यांचा ! मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे . च्यायला असली माणसे मलाच कशी भेटतात देव जाणे ! भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. " आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते ! धर्माच्या नावावर डोंबार्‍या सारखा तमाशा मांडुन भोळ्या भाबड्या भाविकांकडुन पैसे उकळाणारे एक महाभाग ही मी ओळखुन आहे !

असो. लोकांचे व्यवसाय स्वातंत्र्य म्हणुन मला जाऊन दे म्हणतो , भोळ्याभाबड्या सश्रध्द भाविकांशी जमेल तितके खंडन मंडन करायचे टाळतो , पण एक सनातनी म्हणुन मला आचार्यांच्या चित्रपटातील हा संवाद आठवत रहातो

" स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || "

:(

माहितगार's picture

20 May 2018 - 5:21 pm | माहितगार

नेहमी प्रमाणेच फक्त ईश्वर च सनातन असू शकतो , त्यामुळे इतर कुणाही चराचराच्या सनातनतेवर एकाधिकार सांगण्याबद्दल मी साशंक असतो. त्यामुळे अमुकच पद्धतीने ईश्वर प्रमाण मानावा अशा कोणत्याही व्यक्ती, समूह पंथ धर्माच्या अत्याग्रहा बद्दल साशंकता वाटते .

धर्माचा बाजार मांडणे आणि इतर सर्व व्यवहार थांबवून कर्मकांडात गुंतणे या गोष्टी आजू बाजूच्या लोकांना तिटकारा आणतात . मला इथे ओव्हर सेलिंग करून वैताग आणणारे सेल्स एजन्ट , इंशुरन्स विकण्यासाठी अनेक इन्शुरन्स कंपन्यांची एजन्ट अथवा गळेपडू टेली मार्केटिंग असे सर्व आठवते . आपणही त्यांच्याच क्षेत्रातील जाणते असलो तर कधी कधी आपण समोरच्या एजन्ट शी वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या बाजू मांडून पहाता असतो अर्थात प्रथम स्तरावरील प्रतिनिधींशी वाद घालून काही उपयोग नसतो याची आपणास कल्पना असते.

या निमित्ताने आपण नास्तिक अथवा मूर्तिपूजा विरोधक नसलो तरी त्यांच्याही नकारात्मक कृतींचे समर्थन ना करताही त्यांचाही वैताग जरासा समजून घेण्यास इतपत जागा ठेवली पाहिजे कि , आपली श्रद्धा , कर्मकांड आणि मूर्तिपूजा इतरांची मते नकारात्मक बनावेत एवढी वैताग आणणारी असू नयेत अशी स्वतःपुरती काळजी घ्यावी. त्याच वेळी आपला स्वतः”चा आणि आपल्या समूहाचा श्रद्धा कर्मकांडे अथवा मूर्तिपूजा करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचेही ठणकावून सांगितले पाहिजे .

या निमित्ताने १९व्या शतका पर्यंत घरोघर पोहोचून विविध श्रद्धा अंध श्रद्धा पोटी चंदा गोळाकरून पौरोहित्य करून उदार निर्वाह करणारी मंडळी महात्मा ज्योतिबा फुले साराख्यान खुपणे अंशतः: समजून घेता आले पाहिजे किंवा त्या आधीच्या काळी घरोघरचा एका मुलगा अगदी लहान वयात संन्यासी अथवा भिख्खू बनवल्याने त्याचा समाजावर पडू शकणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन अशा वेळी सामाजिक बॅक क्लॅश येऊ शकतो (प्राचीन चीन मधला उल्लेख करतोय ) हे लक्षात घेतले पाहिजे . इथे मुद्याची गोष्ट हि कि कालानुरूप आणि सामाजिक गरजानुरूप सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत . ( मी दुसऱ्या टोकाच्या आततायी नास्तिकता अथवा मूर्ती भंजन प्रवृत्तीचे समर्थन हि करता नाहीये)

सामाजिक सुधारणा आणि त्या दिशेने पावले उचल्याचे समर्थन करताना, विविध व्यक्ती स्वातंत्र्याच्या शक्यतोवर आड येऊन नयेत जसे व्यवसाय अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य च्या आड येऊ नयेत याची काळजी घेणे नितांत गरजेचे असावे.

मार्कस यांनी धागा लेखात दिलेल्या उदाहरणात प्रचारकाला त्याचे पुस्तक त्याच्या पद्धतीने विकण्याचे अथवा श्रद्धेचा त्याच्या पद्धतीने प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे . आणि अशा प्रसारकाने संवाद साधल्यावर त्याचे खंडन अथवा प्रतिवाद करावा वाटला तर त्याचे स्वातंत्र्य श्रोत्यास असते ज्याचा मार्कस यांनी उपयोग केला .

अर्थात तत्वज्ञान हे कुणीही परिपूर्ण नसलेले फार मोठे क्षेत्र आहे; जे उभ्या उभ्याच्या चर्चेतून धागा लेखकाचा उद्देश साधला जातो का या बद्दल मात्र साशंकता वाटली . एखाद्या ग्रंथा बद्दल जसे इथे अमुक ग्रंथाच्या अनुवादाचे बद्दल साशंकता होती तर ती पॉईंट बाय पॉईंट तुलना करून उपलब्ध करणे नुसते खिल्ली उडवण्या पेक्षा कदाचित अधिक प्रभावी रिस्पॉन्स राहू शकले असता का अशी एका शंका येऊन गेली .

बेसिकली भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीचं प्रसार करण्यात खरे अभ्यासक पुढाकार घेता नाहीत त्यामुळे पुरेसे दर्जा ना ठेवणाऱ्यांना संधी मिळते का असे वाटून गेले . त्यामुळे खिल्ली करणे खुपले नाही पण भारतीय संस्कृतीची योग्य बाजू पुरेशा अभ्यासू आणि प्रभावीपणे परदेशात मांडल्या जात नाहीत या बद्दल खेद वाटला असे या निमित्ताने नमुद करावेसे वाटले. असो

उत्तम खंडन. विवेचन आवडले. मलाही असा कोणी चावायला आला तर मीही त्याला सोडत नाही. श्रद्धा वेगळी आणि श्रद्धेच्या नावाखाली चालणारा धंदा वेगळा.

नाखु's picture

20 May 2018 - 9:29 am | नाखु

शेवटचं अवतरण लाजवाब,हजार टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली आहे

उघडा डोळे बघा आनंदाने व श्रद्धेने नाखु पांढरपेशा

गामा पैलवान's picture

20 May 2018 - 2:56 pm | गामा पैलवान

मार्कस,

तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. मला काय वाटलं ते लिहितो.

१.

इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो .

हे माझ्या नजरेतनं सुटलं. त्याबद्दल क्षमस्व.

२.

अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ?

खंडनमंडन मतांचं होतं. त्याकरिता समान पातळीचे विद्वान लागतात. अशा जाणत्यांत रीतसर वादविवाद होतात. तुम्ही जाणते आहात परंतु ते दोघे नाहीत.

३.

मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे .

मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी आजिबात तिटकारा नाही. सनातन धर्म सांभाळून हवा तेव्हढा बाजार मांडा.

काळूगोरीचा आगम (=अॅप्रोच) चुकीचा आहे. प्रस्तुत प्रसंगातनं त्याची दुरुस्ती (=करेक्शन) झालेलं दिसंत नाही. दुरुस्ती तुमच्यासारख्या जाणकारांनी करावी. अशी अपेक्षा मी बाळगावी का, हा वेगळा प्रश्न आहे.

४.

भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. "

हा बाजार नव्हे. ही दरोडेखोरी आहे.

५.

आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते !

अशा वेळेस गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा आग्रह धरावा म्हणून सुचवेन. मी जे पैसे देतोय त्याचा अध्यात्मिक कारणासाठीच विनियोग व्हायला हवा, हे ठामपणे मांडता यायला हवं. कदाचित तुम्ही तसं करीत असालही.

६.

" स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || "

कर्तव्याची जाण वगळता बाकी सर्व शिथिल पडलेलं खपून जावं.

असो.

पश्चातबुद्धीने सांगतो की, मी तुमच्या जागी असतो तर सरळ गीता नाकारली असती. म्हणालो असतो की गीता ही एका थोर क्षत्रियाने दुसऱ्या महापराक्रमी क्षत्रियास भर रणांगणात सांगितलेली आहे. मी क्षत्रिय नाही व मी थोरही नाही. सध्या युद्ध चालू नाही व मी किंकर्तव्यविमूढही नाही. सबब गीता मला लागू पडंत नाही. हे सांगितल्यावर पुढे म्हणालो असतो की :

"I don't want to shake your faith, but you need to introspect a bit. Why you are doing this seva? Is this your sadhana? If yes, how can it be performed more effectively? If this isn't your sadhana, perhaps this is the time you move onto another type of seva/sadhana! I wish you would discuss these points with other seekers. Stick to the one who gives you a satisfactory answer."

आ.न.,
-गा.पै.

शब्दबम्बाळ's picture

21 May 2018 - 11:14 am | शब्दबम्बाळ

अध्यात्मिक गोष्टींमध्ये खासकरून कुठला श्लोक काय सांगतो आणि कोण त्याचा काय अर्थ काढतो यात अजून तरी फार रस नसल्याने लेख कसा झाला वगैरे लिहू शकत नाही, पण लेख "Casual Racism" ने भरलेला आहे हे मात्र सतत दिसत राहिले!

Denial हा Casual Racism चा आधारच असतो तो शेवटी टीप म्हणून दिलेला दिसला.
"३) आपल्याकडे विठ्ठलाला काळ्या म्हणले जाते!"

माफ करा पण विठ्ठलाला असे संबोधून बोलताना मी ऐकलेले नाही, कदाचित तसे लोक भेटले नसतील. पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का)
तसेच एखाद्याला 'माकड' असे म्हणून हनुमानाची उपमा देत होतो असे सांगता येईल का?

अर्थात हा संपूर्ण लेख लाल रंगावर असल्याने काळा रंग विनोदनिर्मितीला वापरण्यात गैर वाटले नसावे.

असो हा संपूर्ण प्रतिसाद तसा वरच्या चर्चेला अवांतरच आहे पण वाटले म्हणून लिहिले.
img

गामा पैलवान's picture

21 May 2018 - 12:07 pm | गामा पैलवान

माहितगार, मलातरी इथे कसलाही रेसिझम दिसला नाही.
आ.न.,
-गा.पै.

गणामास्तर's picture

21 May 2018 - 1:34 pm | गणामास्तर

अच्छा. .शब्दबम्बाळ हा माहितगारांचा आयडी आहे होय.
इतके मोठे प्रतिसाद बघून वाटलंच होतं तसं.

शब्दबम्बाळ's picture

21 May 2018 - 2:11 pm | शब्दबम्बाळ

आपला काहीतरी गैरसमज झालाय, श्रीगुरुजी! :)

गणामास्तर's picture

21 May 2018 - 4:03 pm | गणामास्तर

मग हे नीट पण सांगता आलं असतं की, शिव्या द्यायची काहीचं गरज नव्हती :)

माहितगार's picture

21 May 2018 - 8:38 pm | माहितगार

@ गणामास्तर, आपण खरेच मास्तर आहात का ? (हा व्यक्तिलक्ष्य तर्क दोष आहे; म्हणजे मुद्दा सोडून मांडणी करणार्‍या व्यक्तिवर घसरणे- कोण कोणाचा डुआयडी आहे हे मोजण्यात हकनाक डोके लावणे म्हणजे विचाराला विचाराने उत्तर देण्यात कमी पडणे होय) . मी तसा सरळ सरळ उघडपणे डु आय डी स्वातंत्र्याचा तात्विक समर्थक आहे त्या संदर्भाने माझा धागा लेख / चर्चा मागे येऊन गेली असावी ; त्यामुळे डू आय डी असण्यात नैतिक दृष्ट्या गैर काही नाही . पण जे डु आय डि आपले नाही ते स्विकारण्याने माहित नसलेली अनावश्यक कायदेशीर जोखीम वाढू शकते तशी ती वाढू नये म्हणून शब्द बंबाळ हे माझे डु आय डी नाही हे म्हणण्याची औपचारीकता पूर्ण करतो )

आता आपण खरेच मास्तर असता तर -म्हणजे आपण मराठीचे तरी मास्तर नसणार असा विश्वास होतोय - शब्द बंबाळ आणि माझ्या लेखनात महत्वपूर्ण फरक चटकन कळला असता . दुसरे मी आधीच टोपण नावाने वावरतो, कठोर चिकित्सा केल्या तरी त्या सहसा मिपा धोरणात बसत असल्यामुळे माझे सदस्य खाते जाईल मग म्हणून अजून एक हवे असा काही प्रकार नाही. सगळ्या दिशांच्या निसटत्या बाजू मांडायला सहसा हा एक आयडि मला पूरला आहे.

मिपा मालक आणि संपादका शपथ खरे सांगतो :) मला एक डु आयडि तात्विक कारणाने हवा आहे, कारण मी डु आयडी ंचा समर्थक आहे . मी डु आयडि समर्थनाचा धागा काढला तेव्हा डु आय डी काढण्याचा प्रयत्न नेमक्या त्या वेळी मिपा तांत्रिक अडचणीत आल्याने फसला होता. :) मिपाच्या तांत्रिक अडचणी कमी होणे गरजेचे आहे हे ह्या निमीत्ताने नमुद करावेसे वाटते. साधा डु आय डी काढणे डु आयडीच्या तात्विक समर्थकांनाही जमू नये हे बरोबर नव्हे :))

गणामास्तर's picture

22 May 2018 - 12:36 pm | गणामास्तर

वेळेअभावी पूर्ण प्रतिसाद वाचू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व.
सुलभ मराठीत दोन वाक्यात सार सांगितलेत तर कृपा होईल.

गणा जेवण कर
टेन्शन घेऊ नको

प्रसाद गोडबोले's picture

22 May 2018 - 8:06 pm | प्रसाद गोडबोले

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

मला वाटतंय की माहीतगारांनी सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर घेतला आहे , वल्ल्या ची खेचुन झाली , माझी उलटतपासणी झाली , मास्तर ची परीक्षा झाली , आता तुझा नंबर आहे अभ्या =))))

( @माहीतगार , हलके घ्या , टेक इट लाईटली ;) )

माहितगार's picture

22 May 2018 - 9:18 pm | माहितगार

पहिली गोष्ट अभ्यारावांना (त्यांच्यासाठी सध्या आपल्याकडे काय नाय) तसे रेंज मध्ये चटकन येत नाहीत -रच्याकने असतात-, आताही बाहेर दिसताहेत आणि या पेक्षा रोचक विषय तुम्हाला व्यनितून विचारायचा आहे.

...सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर

सनावृता काय असते ? परंपरावादी म्हणत असाल तर एक प्रतिसाद सोडला तर बाकी प्रतिसादात मीच परंपरावादी मोडांना ऑन ऑफ करत होतो आणि शब्दबंबाळांनी छिद्रान्वेषण केले नसते तर तुमच्यासगट परंपरावादी गट चक्क 'थोडासा पुरोगामी हो जाय' चे गाणे गात होता. ) गापै मात्र परंपरा बाळगून राहीले .

माहितगार's picture

22 May 2018 - 6:13 pm | माहितगार

ट्विटर वापरुया! दोनच शब्दात झाले, दुसरे वाक्य कुठून आणू ?, म्हणजे म्हणता येईल झाली ब्वॉ गणामास्तरांची इच्छा पूर्ण !!

गामा पैलवान's picture

21 May 2018 - 6:22 pm | गामा पैलवान

वरील संदेश माहितगार यांना उद्देशून नसून शब्दबम्बाळ यांच्या रोखाने आहे. चुकीबद्दल क्षमस्व.

-गा.पै.

प्रसाद गोडबोले's picture

21 May 2018 - 8:42 pm | प्रसाद गोडबोले

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !

आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार !

त्यामुळे पास !

माहितगार's picture

21 May 2018 - 9:06 pm | माहितगार

@ मार्कस , शब्द बंबाळ हे माझे खाते नाही, पण तुम्ही पण गा.पैं सारखे चुकत अथवा गणा मास्तरांसारखे मुकत ते माझे डु आयडि खाते समजून शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत ? मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे.

( खरा डिसक्लेमर : शब्द बंबाळ माझे खाते नाही .)

प्रसाद गोडबोले's picture

21 May 2018 - 9:37 pm | प्रसाद गोडबोले

शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत

>>>>
त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ? समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही . मागे एकदा अशाच चर्चेत मी उत्तर , संदर्भासहित अभंग दिल्यावर सरते शेवटी "तुम्ही स्वतःला ह्या संतांच्या लेव्हलचे समजता ककाय?" असा प्रतिप्रश्न आला ! आता बोला ! ह्यांना म्हणजे उत्तर नाही दिले तर तुम्ही चुकीचे , अन उत्तर दिले तरीही तुम्ही चुकीचेच !

मग कशाला वेळ वाया घालवा? ह्यांना ह्यांची घटपटा करु द्या , आपण अलिप्त राहु

बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥

मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे.

तुमच्या बहुतांश प्रश्नांना उत्तरे दिली आहेत , अर्थात जिथे तुम्ही मुळ संस्कृत श्लोक अन त्याचा असा किंव्वा तसा अर्थ काढत येईल का अशी चर्चा सुरु केलीत तेव्हा मी थांबलो . आप्लयातील कोणीच पुर्णवेळ संशोधक नाही, केवळ आवड आहे , हौस आहे म्हणुन आपण महाभारत , गीता , वगैरे वाचतो. पुढे मागे कधी , रीटायर्ड झाल्यावर झोकुन देवुन संशोधन कराय्ला सुरुवात केली तर सविस्तर लिहिन किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P

प्रचेतस's picture

21 May 2018 - 9:58 pm | प्रचेतस

तुम्ही सध्या हिरव्या देशात असल्याने तुम्हास मंडालेऐवजी ग्वाटेनामो बे मध्ये जायची जास्त संधी आहे :)

प्रसाद गोडबोले's picture

21 May 2018 - 11:44 pm | प्रसाद गोडबोले

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

तिथे मग बायबल वाचायचे :
Dear Warden; You were right. Salvation lies within !!

माहितगार's picture

21 May 2018 - 10:10 pm | माहितगार

...किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P

तुम्हाला रिटायरमेंटनंतर -जो जे वांछील तो ते लाहो- मंडालेचा प्रवास घडो ही दुत्त दुत्त शुभेच्छा .

@ गणा मात्तर , मार्कस भाऊ डू आयडि फंडा स्विकारुन नाही राह्यले , त्यांना विश्वास देऊन बघा बरे जरासा .

शब्दबम्बाळ's picture

21 May 2018 - 10:47 pm | शब्दबम्बाळ

खी खी खी (उगाचच!)
तर महोदय तुमच्या दोन्ही प्रतिसादांवर एकत्रित लिहितो.

आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार !

एक तर मी अभंगांचे संदर्भ मागितले नाहीत, त्याशिवाय मराठी नीट वाचले असते तर माझे वाक्य दिसले असते जिथे मी विठ्ठलाला कुठेतरी 'तसे' म्हटले असेल असे गृहीत धरून "पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का)" हा प्रश्न विचारलेला दिसला असता.
याशिवाय मला नुसता छिद्रान्वेषीपणा करायचा आहे हा निष्कर्ष आपण कोणती विद्वत्ता वापरून काढलात? मला काय करायचं आहे ते मी ठरवू शकतो आपण तिथेही लाल रंग ओतण्याची गरज वाटत नाही.

समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही

ह्या लोकांचे म्हणजे कोणाचे हो? हा आयडी एकवचनी आहे हे तुम्हाला कळत असेल अशी अपेक्षा आहे. इथे देखील जनरलायझेशन करून हे असले प्रश्न विचारणारे लोक कसे दुत्त असतात हे सिद्ध करायचे आहे का? :P

तुमच्या लेखात काळ्या बिथरला, काळ्याचा राग अनावर झाला अशा पद्धतीची वाक्य आहेत कि नाहीत? ती वाक्य एखाद्याची रंगावरून खिल्ली उडवायला वापरली आहेत कि नाहीत असा सरळ सोप्पा मुद्दा आहे माझा!
तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय?

आता तुमचा मुख्य मुद्दा किंवा आक्षेप म्हणूया

त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ?

इस्कॉन वाले व्यापाराचं करतात आणि त्यावर मला काही आक्षेप असावा असे मला वाटत नाही. ते जबरदस्तीने पुस्तके माथी मारत नाहीत किंवा प्रसाद विकत घ्याच म्हणून सांगत नाहीत. ज्याला इच्छा आहे त्याने ते करावे!
आणि तुम्ही केलेल्या वरच्या संभाषणातून त्यांचा व्यावर बंद झाला कि सनातन का आणि कुठला धर्म त्याबद्दल समोरच्याच्या शंका दूर झाल्या?
फक्त #मीचीलाल हाच उद्देश असेल तर तो मात्र सफल झाला असेल.

मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो पण स्वतः वरून गाडी दुसऱ्याच्या रंग/रूपावर आली होती म्हणून प्रतिसाद दिला.
असो, चालू देत...

प्रसाद गोडबोले's picture

21 May 2018 - 11:39 pm | प्रसाद गोडबोले

नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे !

सदर व्यक्ती मी काहीही खुस्पट काढले नसताना मला चावायला येते , एक तद्दन बोगस पुस्तक धर्माच्या नावाखाली माझ्या गळ्यात मारु पहाते , शिवाय ते विकत घेतले नाही तर पुढच्या जन्मी कुत्रा मांजर होशील असे धार्मिक दहशतवाद पसरवते ( टिपिकल पुजा घातली नाही तर तुमची बोट बुडेल टाईप ), इतक्या सार्‍या गोष्टी सोडुन तुम्हाला त्याला काळ्या का म्हणलो हे जर दिसत असेल तर त्याला छिद्रान्वेषीपणा च म्हणावे लागेल . असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही ! सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती
उगाच अतिसहिष्णुता दाखुन धार्मिक दहशतवाद्यांना लादेनजीं म्हणणार्‍यांच्या संप्रदायातील मी नाही .

तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय?

कारण त्यात काही चुकीचे नाहीयेच , असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे ! तुकोबांनी मंबाजी सालोमालो सारख्या व्यापार्‍यांना कसले झोडपुन काढले आहे हे मी दाखवायची गरज नाही !
तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥

मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो

अत्यंत योग्य निर्णय !
अभिनंदन आणि शुभेच्छा !

चित्रगुप्त's picture

22 May 2018 - 4:07 am | चित्रगुप्त

असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे

सत्य वचन.... त्याबरोबरच जाहिरातबाजी करून आरोग्याला अहितकर पिझाकोकादि खाद्यपदार्थांची चटक लोकांना - विशषतः लहान मुलांना लावणारे, खरी गरज नसतानाही बायपास वा तत्सम सर्जर्‍या करणारे आणि जन्मभर औषधांचे झेंगट मागे लावून देणारे, फळे भाज्या वगैरेंना विषारी रंग, फवारे मारणारे, निरमा वगैरेंपासून दूध बनवून विकणारे, फुकट आहे असे भासवून वाट्सपादी व्यसनांच्या जाळ्यात करोडो लोकांना ओढणारे, अमूक डे तमूक डे असले नवनवीन प्रकार प्रसृत करून गिफ्टा खपवणारे आणि असे नाना क्षेत्रात नानाविध उपद्व्याप करणारे .... कुणा कुणाला झोडपुन काढायचे, प्रत्येक व्यक्तीला 'नाना पाटेकर' बनावे लागेल. तरी आपल्याला जमेल तेवढे करावे हेही खरे.
.

शब्दबम्बाळ's picture

24 May 2018 - 12:52 am | शब्दबम्बाळ

मला इथे प्रतिसाद द्यायचा नव्हता पण ते छिद्रान्वेषण वाचून वाचून म्हटलं जरा लिहुयाच!
माझे सविस्तर मत मी इथे एक धागा काढून दिले आहे.

नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे !

अभिनंदन! एक डिबेट पाहून अख्खा समूह ओळखलंत कि तुम्ही, मस्तच!

पुढचा प्रतिसाद लिहिण्याआधी काही गोष्टी नमूद करतो.
१. माझी प्रतिक्रिया लेखावर होती, त्यातल्या वाक्यांवर होती. लेखकावर मी आक्षेप घेतला नव्हता. पण तरीही तुम्ही प्रतिसाद देताना "वैयक्तिक टिप्पणीवरून" सुरुवात केली. आणि माझ्यावर तशाच टिप्पण्या पुढच्या प्रतिसादात सुरु ठेवल्यात! त्याने मला काही फरक पडत नसला तरी चर्चेचे बेसिक नियम आपल्याला कितपत माहित आहेत जा प्रश्न पडला. (समोरच्याचे जनरलायझेशन करणे हाच उद्देश असला तर मग असो)
२. आधीच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही विठ्ठलाला काळ्या म्हणतात आणि म्हणून कोणाला काळ्या म्हणणे गैर नाही अशा अर्थाने समर्थन करत होतात. मात्र या प्रतिसादात

असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही !

असे म्हणालात. म्हणजे किमान तुम्ही खिल्ली उडवण्यासाठी शब्दरचनेचा वापर केलात हे तरी मान्य आहे म्हणायचं!

त्यापुढे जाऊन तुम्ही म्हणता

सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती

म्हणजेच तो गोरा असता तर त्याच्या रंगाचा वापर करून खिल्ली उडवण्याऐवजी इतर काही टोपण नाव देऊन खिल्ली उडवावी लागली असती असेच का?
तसे असेल तर हेच माझ्या आक्षेपाचे मूळ कारण होते हे कदाचित तुम्ही समजू शकाल. एखाद्याला जर "काळ्याचा राग अनावर झाला" असे म्हटले कि त्याची खिल्ली उडवल्यासारखी होते मग ते तसे लिहायलाच पाहिजे का?

बाकी इस्कॉनवाल्याची आणि लादेनची तुलना, वगैरे तर म्हणजे काय बोलणार! :D

उपयोजक's picture

22 May 2018 - 12:15 am | उपयोजक

इस्काॅन की सच्चाई जानिए
=====================
दुनिया में सिर्फ हिन्दू ही बेबकूफ बनाए जाते हैं और सताए भी जाते है । दुर्भाग्य से इनका रहने का एक ही ठिकाना है भारत । और वो भी मुसलमान , ईसाई , कम्युनिस्ट और सेक्युलर हिन्दू के कब्जे में है । शुद्ध हिन्दू जो आर्य है और सामान्य हिन्दू सभी दुःखी है । देखिए अमेरिका हिन्दुओं को कैसे बेबकूफ बनाकर लूट रहा है । यह लेख आपकी आँखें खोल देंगी । कृपया हिन्दुओं के हित में इसे शेयर करें ॥

ISKCON का अर्थ है :---- International Society of Krishna Consiousness ।

एक अमेरिकन संस्था है जिसने अनेक देश मे कृष्ण भगवान के मंदिर खोले हुए हैं और ये मंदिर अमेरिका की कमाई के सबसे बड़े साधन है क्योंकि इन मंदिरों पर इनकम टैक्स भी नही है !

ये संस्था लोगों की अंधभक्ति का फ़ायदा उठाकर खरबों डॉलर इन मंदिरों में आनेवाले चढ़ावे के माध्यम से अमेरिका ट्रान्सफर कर देती है और दुर्भाग्य से इस लुटेरी ISKCON संस्था के सबसे ज्यादा मंदिर भारत मे हैं !

आपको जानकर आष्चर्य होगा कि अमेरिका की कोलगेट कंपनी एक साल मे जितना जितना शुद्ध लाभ अमेरिका भेजती है उससे 3 गुना ज्यादा अकेले बैंगलोर का ISKCON मंदिर भारत का पैसा अमेरिका भेज देता है !

बैंगलोर से बड़ा मंदिर दिल्ली मे है और दिल्ली से बड़ा मंदिर मुंबई मे है और उससे भी बड़ा मंदिर मथुरा मे हो गया है भगवान कृष्ण की छाती पर और वहां धुआंधार चढ़ावा आता है !

कृपया ISKCON और इस तरह की सभी लुटेरी संस्थाओं का प्रबल विरोध करके देश को लुटने से बचाने मे अपना अमूल्य सहयोग दें !

मन्दिरों मे दान देने वाले हिन्दू भाई बहन सुप्रीम कोर्ट की ये न्यूज़ पढ़ें...आप सोचते हैं कि मन्दिरों मे दिया हुआ दान, पैसा, सोना इत्यादि हिन्दू धर्म के उत्थान के लिए काम आ रहा है और आपको पुन्य मिल रहा है तो आप निश्चित ही बड़े भोले हैं !

कर्नाटक सरकार के मंदिर एवं पर्यटन विभाग (राजस्व) द्वारा प्राप्त जानकारी के अनुसार 1997 से 2002 तक पांच साल मे कर्नाटक Congress सरकार को राज्य मे स्थित मंदिरों से चढ़ावे मे 391 करोड़ की रकम प्राप्त हुई, जिसे निम्न मदों मे खर्च किया गया :

मुस्लिम मदरसा उत्थान एवं हज मक्का मदिना सब्सिडी, विमान टिकट - 180 करोड़ (यानि 46%)

ईसाई चर्च को अनुदान (To convert poor Hindus into Christian) - 44 करोड़ (यानि 11.2%)

मंदिर खर्च एवं रखरखाव - 84 करोड़ (यानि 21.4%)

अन्य - 83 करोड़ (यानि 21.2%)

ये तो सिर्फ एक राज्य का हिसाब है, हर रोज हजारों करोड़ों रुपया / सोना दान होता है और ये सब हिन्दुओं को पता ही नही चल पता है !

भगवद गीता मे भगवान ने बताया है कि दान देते वक्त अपने विवेक और बुद्धि से दान दें, ताकि वह समाज/देश की भलाई मे इस्तेमाल हो, नही तो दानी पाप का भागीदार है !

हिन्दुओं के पैसों से, हिन्दुओं के ही विनाश का षड़यंत्र ६० साल से चल रहा है और यह सच्चाई हिन्दुओं को पता ही नही...!!

कृपया अधिक से अधिक शेयर करें ताकि लोग जागरूक हो सकें ।

टवाळ कार्टा's picture

22 May 2018 - 10:33 am | टवाळ कार्टा

तुम्हाला काय वाटते

गोविंदा गोविंदा गोविंदा'ज् गार्डन

शुद्ध सात्विक शाकाहारी जेवणासाठी अवश्य भेट द्या.

मोष्टंं र्‍हेवर्‍हंड पोपशाश्त्री =))

स्वधर्म's picture

24 May 2018 - 4:11 pm | स्वधर्म

लेख वाचला. नेमकं काय खटकलं? कसा धंदा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न अाहे. दिलेल्या पैशाला डोनेशन म्हणावे का किंमत हे विकणारा स्वत:च्या मर्जीने ठरवतो. तुंम्हाला या दुकानात पटलं नाही, तर दुसर्या दुकानात घ्या.

माहितगार's picture

24 May 2018 - 5:02 pm | माहितगार

...नेमकं काय खटकलं?..

माझ्या अंदाजाने

१) प्रसार करणार्‍या व्यक्ती आणि प्रसारीत केला जाणारा ग्रंथ धागा लेखकाच्या विश्वासाशी संबंधीत असल्यामुळे प्रसारीत करणार्‍या व्यक्तीचे आणि ग्रंथातील माहिती किमान दर्जास प्रात्प असावी असा धागा लेखकाचा आग्रह दिसतो.

२) विकल्या प्रसारीत केल्या जात असलेल्या ग्रंथातील अनुवादात त्रुटी / दिशाभूल असल्याचा आणि असे त्रुटीयुक्त साहित्य प्रसारित होऊ नये असा धागा लेखकाचा विश्वास असणे .

३) अशा तर्‍हेचे व्यावसायिकरणाबद्दल (जे कदाचित फसवणूकीच्या जवळ पोहोचते) सदर धागा लेखक साशंकीत असणे . डोनेशन हे सहसा व्हॉलुंटरी असते , डोनेशनचे कंपल्शन करणे धागा लेखकास खटकले असावे .

( डिसक्लेमर : मी धागा लेखक नाही )

स्वधर्म's picture

24 May 2018 - 7:02 pm | स्वधर्म

पण तुंम्ही ‘श्रध्दा’ हा शब्द मुद्दाम टाळून ‘विश्वास’ हा शब्द वापरलाय का, एवढेच विचारतो.

होय, धागालेखावरुन प्रथमदर्शनी किमान विश्वासाचा स्तर अधिक स्पष्ट पणे दृष्य वाटला (शेवटी कयासच), स्तराची लेव्हल श्रद्धेची आहे का हे धागा लेखकाने सांगणे श्रेयस्कर असावे.

प्रसाद गोडबोले's picture

24 May 2018 - 8:12 pm | प्रसाद गोडबोले

येस.

तीनही मुद्द्यांना संपुर्ण अनुमोदन ! पण त्यातही विशेषकरुन शेवटचा मुदा जास्त महत्वाचा ! सदर प्रचारक व्यक्तीने डोनेशन देण्याविषयी सक्ती केली नसती तर कदाचित पुढील संवाद झालाच नसता !

बाकी विस्वास अन श्रध्दा ह्या शब्दच्छलात मला पडाय्चहे नाही , ज्याला जे मानयचे आहे ते माना , ज्यावर विश्वास ठेवाय्चाय , ज्यावर श्रध्दा ठेवाय्ची आहे ते ठेवा. स्वतंत्र देश आहे , फर्स्ट अमेन्डमेन्ट आहे ! माझी कशालाच हरकत नाही !

पण "जशी आहे तशी " हा असला टॅग लाऊन तुम्ही स्वतःचे मार्केटिंग करत असाल तर " ते तसे नाहीयेच , मुळ संस्कृत श्लोक तसे त्या अर्थाचे नाहीयेत , शंकराचार्यांचे भाष्य , ज्ञानेश्वरी , गीतारहस्य काहीच त्या अर्थाचे नाहीये , तुम्ही केवळ तुमच्या बिजनेस मॉडेलला सोयीस्कर अर्थ लाऊन धंदा करत आहात " हे दाखवुन देणे मला महत्वाचे वाटते !

आधीही मला अन्य धर्माच्या लोकांनी "त्यांचाच धर्म कसा श्रेष्ठ" हे प्रतिपादन करणारे ग्रंथ दिले आहेत , पण कोणीही डोनेशनची सक्ती केली नाही की " आम्ही म्हणतो हेच खरे" असा अविर्भाव दाखवलेला नाही त्यामुळे त्यांच्याशी माझा वादविवाद झाला नाही :)

माहितगार's picture

24 May 2018 - 10:09 pm | माहितगार

मार्कस, त्यांच्यासाठी 'सत्य गीता' नावाची पूजा पाठ तुम्ही चालू कराच !