(अजुन) एक अध्यात्मिक संवाद !

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
18 May 2018 - 9:31 am

वेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ
स्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा
धागा वर्गीकरण : #मीचीलाल
(संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे )
-------------

"हॅरे क्रिश्ना हॅरे क्रिश्ना क्रिश्ना क्रिश्ना हॅरे हॅरे | हॅरे रॅमा हॅरे रॅमा रॅमा रॅमा हॅरे हॅरे"
" च्यायला, इथेपण ह्यांचा तमाशा सुरु आहे का " मित्र वैतागुन बोलला . मी म्हणलो , " थांब रे जरा , बघु तरी ह्यांचे मडके किती पक्के आहे ते "
मित्र हसत हसत म्हणाला - " तुला ना साल्या नुसती बोटं घालायची हौस आहे"
" ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . आमचे गुरुदेवच म्हणालेत - बेबी माय व्होल वर्क इज टु कन्फ्युज यु . ख्यॅ ख्यॅ ख्यॅ "

-------------

" हे पुस्तक तुमच्यासाठी "
गोर्‍याटंच युवतीने नेहमीचेच टिपिकल कृत्रीम स्मितहास्य करत माझ्या हातात " भगवद्गीता अ‍ॅज इट इज" पुस्तक चिकटवले !
" थॅन्क्यु " इतकेच म्हणुन तिच्या कृत्रिमहास्याकडे आणि इतर सुंदर गोष्टींकडे जमेल तितके दुर्लक्ष करत मी चालायला लागलो .
" तुम्ही फक्त ५ डॉलर डोनेशन द्या "
" मी तुम्हाला शष्प एक पेनी सुध्दा डोनेशन देणार नाही " इति अस्मादिक ! टोन : स्वराज्य माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि मी टरफलं उचलणार नाही.
" का बरे ?"
" मी ही पुस्तक वाचलं आहे , आणि भगवद्गीतेचे ह्याच्या इतके चुकीचे इन्टर्प्रिटेशन दुसरे कोणतेही नाही असे माझे स्पष्ट मत आहे"
" व्हॉट ?"
" तसेही तुम्ही म्हणाला ना की पुस्त्क तुमच्यासाठी मग डोनेशन कसलं मागताय ? मी तुम्हाला शुन्य डॉलर डोनेशन देतो. हे घ्या"
" नो नो तुम्हाला पाच डॉलर डोनेशन द्यावे लागेल "
" सांग माझ्या **** ला"
" जस्ट ५ डॉलर्स"
" एकतर तुम्ही डोनेशन म्हणु नका , स्पष्ट किंमत म्हणा ना , खोटारडेपणा कशाला करताय"
ही सारी चर्चा ऐकुन एक काळाशुभ्र साऊदिंडीयन असा माणुस तेच खोटारडे स्मित हास्य घेवुन बोलायला आला ! आता अ‍ॅव्हरेज जरा आपल्या कलर चे झाले ! दुत्त दुत्त !
" हॅरे क्रिश्ना ! बोला सर काय काय म्हणाताय ? "
" ॐ नमो नारायणाय "
" अं ?" आव्हरेजिंग वर्स हाल्फ धक्का बसल्यासारखा अविर्भाव !
" जर तुम्ही डोनेशन म्हणयताय तर सक्ती कसली करताय ? मी देईन तितके डोनेशन घ्या ना , शुन्य डॉलर ! नाही तर सरळ स्पष्ट बोला की किंमत आहे म्हणुन "
" नाही नाही सर ते डोनेशनच आहे , पण तुम्ही द्यावे असा आमचा आग्रह आहे , आपण कुठेही पैसे ऊडवतोच कि नै " सिगारेट पिण्याचा निर्देश करत !
ते पाहुन डोकेच सटकले - भेंचो साला इथे गेल्या ३ महिन्यात सिगारेट पिली नाहीये अन हा कोण शहाणा लागुन गेला मला संस्कार शिकवणारा ?
" तुम्ही बिजिनेस मांडलाय माझ्या धर्माचा . इतके चुकीचे आणि मिसलिडींग इंटर्प्रिटेशन मी आजवर वाचले नाहीये भगवद्गीतेचे"
आता समोरच्याचा काळ्याचा सात्विकतेचा क्वोटा संपुन तामसिक क्वोटा बाहेर येवु लागला होता . गोरीटंच अजुनही अवाक ! " तुम्ही कोणताही श्लोक सांगा मला संपुर्ण पाठ आहे "
अस्मादिक - " बाबा रे मी तुझ्या पाठांतराची परिक्षा घ्यायला नाही आलो , अर्थ कळलाय की नाही ह्याची परिक्षा घेतोय , आता सांग नायं आत्मा बलहीनेन लभ्यः ह्या उपनिषदातील श्लोकाचा अर्थ काय ?" गोरी टंच अवाक +२!
" बलहीन माणसाला आत्मतत्वाचे आकलन होणार नाही "
" तुमच्या श्रीकृष्ण ह्या पुस्तकात तुमच्या महामहीमांनी ह्याचा अर्थ बलरामाच्या कृपेशिवाय ईश्वरप्राप्ती होत नाही असा काहीच्या बाही रिडिक्युलस अर्थ काढलाय , आता बोला"
" नाही नाही त्यांचेच बरोबर आहे , तुम्ही पुस्तक घेणार आहे की नाही ते बोला "
" तु ते डोनेशन हा शब्द हटव अन स्पष्ट किंमत म्हण मग बोलु . बिजनेस करतोय तर बिजनेस म्हणावे , उगाच धर्माचा अविर्भाव कशाला ?"
गोरी टंच अवाक +३ अंगावर पाल झटकल्यासारखे "ह्यांना माझ्या पेक्षा जास्त माहीत आहे , हे सांगतील"
" हो आमचा बिजनेसच आहे "
" हां आता कसं स्पष्ट बोललास , ऐक गं टवळे , हा केवळ बिजनेस आहे , ह्यांना आमच्या सनातन वैदिक हिंदु धर्माशी काही घेणे देणे नाही , अब्राहमिक धर्मातल्या जमतील तितक्या वाईट प्रथा सनातन धर्मात घुसडुन तुम्हा लोकांना रुचेल असे बिजनेस मॉडेल उभे केले आहे ह्यांनी . बाकी काही नाही"
आता मात्र टवळी बावरली अन काळ्याकडे बघायला लागली .
" हो आमचा बिजनेसच आहे - तुमच्या आत्म्याला वाचवण्याच्या . पुढच्या जन्मात तुम्हाला कुत्रा व्ह्यायचंय की मांजर ? " आता सात्विकतेचा रंग जवळपास संपत आलेला ! लगेच आम्ही आमचा लाल डबा बाहेर काढला !
" मला फरक पडत नाही , मी पुढच्या जन्माचा विचारच करत नाही . कार्पे डियाम ! मार्कस ऑरेलियस काय म्हणाला - असे जगा की जणु आजचा दिवस शेवटचा आहे! "
" मग भोगा आपल्या कर्माची फळं "
" कसली आलीत कर्माची फळं ? मी कर्मफळाची चिंता न करता कर्म करतो:

योगस्थ: कुरु कर्माणि संग त्यक्तवा धनंजय। सिद्धयसिद्धयो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते।।

आता अवाक व्ह्यायची वेळ वेळ काळ्यावर ! क्रोधातिरेकाने काही सुचेनाशी अवस्था !
गोर्‍या टंच पोरीने अलगद माझ्या हातातुन पुस्तक काढुन घेतले अन हातात एक चॉकलेट ठेवले
" धिस इज प्रसॅद फॉर यु "
" हा हा हा , मला कसला प्रसाद देतेस टवळे , मीच प्रसाद आहे ,

प्रसादे सर्व दुखानाम हानिरस्योपजायते । प्रसन्न चेतसो ह्यायुर्बुद्धि: पर्यवतिष्ठते

आता मात्र काळ्याच्या राग अनावर व्हायला लागलेला . खाऊ का गिळु असे अविर्भाव ! म्हणले अजुन जरा डिवचावे -

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः। ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ||

ह्याचा अर्थ सांगु का रे ह्या लोकांना ? बघु मग किती लोकं येताहेत तुझा बिजनेस करायला !!

आता मात्र काळ्या बिथरलाच. काहीही न बोलता फक्त " म्यॅव म्यॅव म्यॅव म्यॅव " असे करत तो दुर निघुन गेला ! मी आणि मित्र हसत राहिलो !
---------------
" यु नो व्हॉट , वी कॅन कॅचप ओव्हर अ ड्रिंक सम टाईम . आपण कधी तरी भेटुन वाईन पिवुयात का ? मी तुला कृष्ण राधेशी कशी रासक्रीडा करायचा ते समजाऊन सांगेन अगदी जयदेवाने सांगितले आहे ना गीतगोविंद मध्ये तसे -

प्रथम समागम लज्जितया, पटुचाटुशतै: अनुकूलम् |
मृदुमधुरस्मितभाषितया शिथिलीकृत जघन दुकूलम् ||

टवळीला डावा डोळा मिचकाऊन म्हणालो . अर्थात तिला शष्प काही कळले नसणार हे माहीत होते पण आपल्याला आपला लाल रंगाचा डबा संपवल्याचा आनंद !

टवळीने दिलेले चॉकलेट जाता जाता डस्टबीन मध्ये टाकले अन वाचवलेले ५ डॉलर मस्त वाईनहेन्स्टिफनर पिण्यात सत्कारणी लावले !

इत्यलम !

तळटीप :
१) लाल रंगाचा डबा संपला .
२) काही संवाद काल्पनिक.
३) आपल्याकडे विठ्ठलाला काळ्या म्हणले जाते!
४) उत्तरदायित्वास नका रं लागु

धर्मविनोदसामुद्रिककृष्णमुर्तीअनुभवप्रश्नोत्तरेवाद

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

25 May 2018 - 12:00 am | प्रसाद गोडबोले

सत्य गीता वगैरे माहीत नाही , पण सत्यनारायणाची पुजा ईशावास्योपनिषदाच्या पठणाने आणि प्रवचनाने रिप्लेस करावी असे मी आधीही अन्यत्र सुचवले होते . पण सत्यनारायणाची कथा वाचायला ऐकायला अन समजायला अक्कल लागत नाही , ईशावास्योपनिषदावर प्रवचन द्यायला आणि ते समजुन घ्यायला अक्कल लागते . शिवाय लोकांनाही १०० रुपये दक्षिणा दिली की १००० रुपायचे प्रॉफिट करुन देणारा देव हवा आहे , जो मुळातच काही करत नाही , सार्‍यापासुनच अलिप्त आहे असला देव नकोय, तस्मात ह्याबाबतीत काही होणे अशक्यच दिसते ! :(

अवांतर : बाकी ह्या सुचनेवरुन बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या . माझ्या लहानपणी आमच्या आजोबांचा गीता अभ्यास मंडळ नावाचा समुह होता, अनेक क्षेत्रातले अनेक आजोबा त्या गटात होते, दर एकादशीला गीता , सहस्त्रनाम , आचार्यांची स्तोत्रे असे पारायण आणि चर्चा असायची तब्बल ३ -४ तास चालयचा तो कार्यक्रम.
( आणि नंतर एकादशी अन दुप्पट खाशी असे म्हणतात त्या टाईपची मेजवानी :) आम्हाला त्याचेच कौतुक , कारण बाकी काही कळायचेच नाही ! )
गीता जयंतीला गीतापठणाच्या स्पर्धा व्हायच्या त्यात हे सारे आजोबा परीक्षक असायचे !
एकेक करत आजोबा गळत गेले , हळु हळु गीतापठणही बंद झाले , आता फक्त अभ्यंकर आजोबा आहेत , त्यांना भेटलो की आजही नानांचा नातु , गीता अभ्यास मंडळ अशीच ओळख करुन देतो . नुसत्या आठवणीने डोळ्यात पाणी येते , माझ्या . त्यांच्या नाही , ते स्थितप्रज्ञ झालेत... केव्हाच ! ते फक्त असो , चालायंचच इतकंच म्हणतात अन गालातल्या गालात हसतात .
असो.
" एषः वैदिको धर्म: | सः च उपनिषत्परः | इदानिं तत्सर्वं शिथिलायते || "

माहितगार's picture

24 May 2018 - 7:49 pm | माहितगार

कुणाला काय आवडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

मान्य

जर सावळ्या रंगामुळे एखाद्या मुलीच्या लग्नाला अडचण येत असेल ....

सामाजिक अधोगतीचे लक्षण आहे.

...तत्सम उत्पादनांच्या ...खप यात काही खटकण्यासारखं

निश्चितपणे साईड इफेक्ट नसतील तर वस्तु वापरली जाण्यात हरकत नाही , पण जाहीरातीतून उजळ रंग म्हणजेच चांगला ही भावना निर्माण करणे स्पृहनिय नसावे.

माहितगार's picture

24 May 2018 - 8:17 pm | माहितगार

सॉरी प्रतिसाद चुकीच्या धाग्यावर आला , संपादकांनी या धाग्यातून वगळण्यास हरकत नाही.

गामा पैलवान's picture

24 May 2018 - 9:54 pm | गामा पैलवान

मार्कस ऑरेलियस,

पण "जशी आहे तशी " हा असला टॅग लाऊन तुम्ही स्वतःचे मार्केटिंग करत असाल तर " ते तसे नाहीयेच , मुळ संस्कृत श्लोक तसे त्या अर्थाचे नाहीयेत , शंकराचार्यांचे भाष्य , ज्ञानेश्वरी , गीतारहस्य काहीच त्या अर्थाचे नाहीये , तुम्ही केवळ तुमच्या बिजनेस मॉडेलला सोयीस्कर अर्थ लाऊन धंदा करत आहात " हे दाखवुन देणे मला महत्वाचे वाटते !

हे बरोबरे. पण हा वादविवाद काळूगोरी दंपतीशी घालणं कितपत उचित? तुमचा वाद घालयचा अधिकार अबाधित आहे. पण या दोघांची आकलनक्षमता तुमच्याइतकी नाही. तुम्ही कधी हा मुद्दा इस्कॉनमधल्या जाणकाराशी चर्चिला आहे काय? असल्यास चर्चा वाचायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

प्रसाद गोडबोले's picture

24 May 2018 - 11:31 pm | प्रसाद गोडबोले

तुम्ही कधी हा मुद्दा इस्कॉनमधल्या जाणकाराशी चर्चिला आहे काय?

नाही. तसा योग आलेला नाही अजुनतरी.

अवांतरः पण तरीही इस्कॉनवाल्यांचा प्रतिसाद काय असणार ह्याचा सर्वसाधारण अंदाज आहे. ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली त्या सरांचा इस्कॉनवाल्यांशी एक भारी संवाद झाला. सर माझ्यासारखे कट्टर सनातनी नाहीत , बहुतांश सामान्य सश्रध्द हिंदु भाविकांसारखे आहेत ! "आपल्या कृष्णाचा कार्यक्रम " म्हणुन ते अत्यंत आनंदाने इस्कॉनच्या कार्यक्रमाला गेले होते. तिथे महामंत्राचा जप चालु झाल्यावर सरही आनंदाने म्हणाय्ला लागले -
हरे रामा हरे रामा रामा रामा हरे हरे | हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे ||

तर त्यांना इस्कॉनवाल्यानी थांबवले आणि म्हणाले "हे चुकीचे आहे , हा मंत्र असा म्हणा :
हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे | हरे रामा हरे रामा रामा रामा हरे हरे ||

मग सर म्हणाले - " मुळ मंत्र तर मी म्हणला तसा आहे , आधी रामाचा अवतार झाला म्हणुन आधी रामा नंतर कृष्णा ! माऊलींनीही "राम कृष्ण हरि " असाच मंत्र सांगितलाय आणि तसेही अखंड नामस्मरण करताना काय आधी काय नंतर ?"

त्यावर इस्कॉनवाले म्हणाले की " तसं नाही , तुमचं म्हणणे चुकीचे आहे , राम केवळ अंशावतार आहे , केवळ श्रीकृष्णच पुर्णावतार आहे , म्हणुन रामापेक्षा श्रीकृष्ण श्रेष्ठ आहे म्हणुन त्याचे नाव आधी घेतले पाहिजे "

आता ह्या असल्या स्वमतांधतेपुढे काय बोलणार? हे म्हणजे अगदी शांततेचा धर्मात द ओन्ली , किंव्वा द लास्ट वगैरे म्हणतात तसे काहीसे झाले =)))) सरांनी इस्कॉनला कोपरापासुन दंडवत करुन कायमचा "रामराम" ठोकला !

इथे माझा एक मित्र म्हणतो तसे - अब्राहमिक धर्मातल्या जितक्या म्हणुन वाईट गोष्टी आहेत त्यांचे हिंदुधर्मात भगवद्गीतेत मिश्रण करुन बनवेला संप्रदाय म्हणजे इस्कॉन !

अब्राहमिक धर्मातल्या जितक्या म्हणुन वाईट गोष्टी आहेत त्यांचे हिंदुधर्मात भगवद्गीतेत मिश्रण करुन बनवेला संप्रदाय म्हणजे इस्कॉन !

वाक्य ओव्हर संप्लिफाईड वाटतय.प्रसाराची पद्धत अंशतः घेतली असेलही. पण ततवज्ञानाच्या दृष्टीने इंग्रजी विकिपीडियातील उल्लेखानुसार अचिन्त्यभेदाभेद आणि बंगाली वैष्णव मत आणि परंपराहे त्यांचे फिलॉसॉफीकल कॉर्नर स्टोन असावेत.