ह्याआधी- दीपशिखा
दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस
दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा
दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन
दीपशिखा-४. फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना
दीपशिखा-५. विज्ञानसुता डॉ. कमला सोहोनी
दीपशिखा-६. ओफ्रा विनफ्रे- द क्वीन ऑफ ऑल मिडिया
दीपशिखा-७. डॉ.मुथ्थुलक्ष्मी रेड्डी
दीपशिखा-८. आउंग सान स्यू की
दीपशिखा-९. श्रीमती सुषमा स्वराज
दीपशिखा-१०. अवकाशकन्या- कल्पना चावला
ह्या नवरात्रात नऊ वेगवेगळी क्षेत्रे, वेगवेगळी क्षितीजे घेऊन त्यातल्या प्रभावी सौदामिनींना मानवंदना द्यायचे ठरवले. खरं तर कोणत्या नऊ स्त्रिया निवडायच्या हा मोठ्ठा प्रश्नच होता. ह्या वर्षी प्रतिपदा दोन दिवस आल्याने नऊ ऐवजी दहाजणी झाल्या. तेवढीच अधिक एक तेजोरेखा सामावता आली. पण खरोखरच इतक्या अमोज स्त्रिया आहेत ज्यांचा देशाच्या, समाजाच्या विकसीकरणात मोलाचा वाटा आहे. मग ते क्षेत्र कोणतेही असो.. समजा कोणतेही एकच क्षेत्र निवडले तरी त्यात असामान्य कार्य केलेल्या स्त्रियांवर एक लेखमाला होईल आणि तरीही त्या नऊ, दहा जणी कोण घ्यायच्या? हा प्रश्न शिल्लक राहिलच, मग ठरवलं प्रातिनिधिक स्वरुपात आपल्याला भावलेल्या काही जणी घेऊ यात. तरी गोल्डा मायर, मार्गारेट थॅचर, मेरी क्यूरी, मदर तेरेसा, डॉ.आयडा स्कडर, डॉ. व्ही.शांता, मल्लेश्वरी,मेरी कॉम, पी टी उषा.. अशा कितीतरी जणींना मला सामावून घ्यायचं होतं. पण मग क्रिकेट टीममध्ये कसं फक्त ११ जणंच खेळू शकतात, तसं झालं.
भारतातली सध्याची परिस्थिती पाहता सुषमा स्वराज, टेसी थॉमस, गुंजन सक्सेना ह्या तिघींना मला आत्ता पटलावर आणायचंच होतं, ३ ऑक्टोबर हा जर्मनी एकत्रीकरण दिवस ह्या नवरात्रातच येत होता, जर्मनीचे तुकडे झाल्यावर सोविएत सैन्याने व्यापलेल्या पूर्व जर्मनीत कम्युनिस्टांचा प्रभाव राहिला. तेथे वाढलेल्या मेर्केलबाईंनी पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनीतली तफावत पाहिली. जर्मनीच्या एकत्रीकरणात त्या खूप सक्रिय होत्या आणि ह्या नवरात्रात ३ ऑक्टोबर हा एकत्रीकरण दिवस आल्यामुळे त्यांचा समावेश लेखमालेत होणे अपरिहार्य होते. डॉ. रेड्डी आणि डॉ. कमलाबाई सोहोनी ह्यांनी ज्या काळात संशोधन केले त्यात समाजाशी, समाजातल्या विपरीत परिस्थितीशी झगडा देत, स्वतःच्या ध्येय्यापर्यंत पोहोचून पुढच्या पिढीतल्या मुलींचा मार्ग सुकर केला. स्यू कींचा त्याग आणि देशासाठीचा लढा सर्वांसमोर आणण्याची गरज वाटली, तर अरुणिमाच्या जिद्दीला सलाम करायला हवाच होता. ओफ्रा ही केवळ कलाकारच नाही तर माणूस म्हणून किती मोठी आहे हे वाचल्यावर तिची प्रतिमा मनामध्ये उंचावली आणि सध्या आपले हे 'फिल्मी सितारे' आपल्या वक्तव्यातून काय तारे तोडत आहेत हे वाचून, पाहून विरोधाभास फारच ठळकपणे दिसून आला. अवकाशातली रहस्य उलगडताना त्या अज्ञात पोकळीत विरून गेलेल्या कल्पना चावलाचा समावेश तर अपरिहार्यच होता. कल्पना कि सुनिता? गुंजन कि श्रीविद्या? हे ठरवणे फार कठिण होते, शेवटी चक्क मनातल्या मनात टॉस केला ह्या दोघी निवडताना..
त्यामुळे मग साहजिकच बाकीच्यांना मनात असूनही नाइलाजाने सामावता आले नाही, पण त्यांच्याबद्दल परत कधीतरी..
एकदा वाटलं, बर्याच जणांना ठाऊक असलेली माहितीच परत काय टंकायची? शिवाय आंतरजालावर सगळी माहिती उपलब्ध असतेच की.. मग मी आणि वेगळं ते काय लिहिणार? पण मग जसं वाचन करत गेले तसं लक्षात आलं की प्रसिध्द, परिचित व्यक्तिंबद्दल सुध्दा आपल्याला खूपदा वरवरची माहिती असते. काहींचे असामान्यत्व तर सोडा त्यांची ओळखच नसते. काही कालाच्या पडद्याआड विस्मृतीत गेलेल्या असतात. म्हणून मग दिनेशने मागे लागून,लागून ही लेखमाला करायला लावली.
सर्वांना सामावता येणार नव्हतेच म्हणून मग कृतज्ञता म्हणून पहिल्या भागात अशा काही सौदामिनींचे फोटोचे एक कोलाज टाकले होते, त्यातल्या कित्येक जणी आपल्याला माहित नाहीत. ह्या लेखमालेतल्याही काही जणी माहित होत्या, काहींबद्दल ऐकले होते तर काही जणी ह्या लेखमालेमुळे समजल्या. आज समारोप करताना त्यांचे कोलाज टाकते आहे. आता ह्या बायका कोण? असा प्रश्न तरी नक्कीच पडणार नाही.
आपण सर्वांनी ह्या मालिकेचे स्वागत केलेत, प्रतिसाद, खरडी, व्य. नि तून लेखमाला आवडते आहे हे सांगत राहिलात, सर्वांना मनापासून धन्यवाद. लेखांमधल्या त्रुटींकडे लक्ष वेधून दिलेत. तांत्रिक आणि टंकनचूका लक्षात आणून दिल्यात, याकरताही मनापासून धन्यवाद.
प्रतिक्रिया
11 Oct 2016 - 12:57 am | रुपी
खूप सुंदर होती ही लेखमाला! खूप खूप धन्यवाद.
11 Oct 2016 - 1:00 am | पिलीयन रायडर
+११
सहमत! ह्या लेखमालेसाठी धन्यवाद!
11 Oct 2016 - 1:00 am | शलभ
सुंदर लेखमाला..
11 Oct 2016 - 1:22 am | पद्मावति
या सुंदर लेखमालेसाठी धन्यवाद स्वाती.
11 Oct 2016 - 3:09 am | रेवती
महिलांची निवड करणे खरेच अवघड होते. पण ज्यांची तू केलीस त्यामागील विचार आवडला. लेख(क)माला आवडली.
11 Oct 2016 - 3:23 am | स्पार्टाकस
लेखमाला सुंदर होती याबद्द्ल काही वादच नाही, परंतु केवळ दहाच स्त्रियांची निवड केल्यामुळे अनेक जणींचं कर्तृत्व सर्वांसमोर येण्यापासून वंचित राहीलं असं वाटलं.
11 Oct 2016 - 5:49 am | एस
अतिशय सुंदर लेखमाला. ही लेखमाला अशीच पुढे चालू ठेवता आली तर? त्यासाठी नवरात्रच हवं असं नाही. दर आठवड्याला एक लेख प्रसिद्ध करत राहिलो तर अशा अनेक दीपशिखांची ओळख मिपाला होईल, असे सुचवतो. याकामी अजूनही सदस्य योगदान देऊ शकतील कदाचित.
16 Oct 2016 - 7:51 pm | पैसा
सहमत आहे. +१०००
11 Oct 2016 - 8:33 am | यशोधरा
अतिशय सुरेख लेखमाला होती स्वातीताई! तु लिहिलेसही उत्तम.
लेखामागे काही विचार आहे हे जाणवत होते.
आता पुढे काय विषय घेऊन लिहिणार? वाट बघते.
11 Oct 2016 - 9:02 am | अभ्या..
छान लेखमाला. मला टेसी थॉमस यांच्यावरचे पुष्प खूप आवडले.
कला व क्रीडा यातील एखादी तरी दिपशिखा असती तर (ऑप्रा सोडून) अधिक आवडले असते.
11 Oct 2016 - 11:18 am | बोका-ए-आझम
एस यांच्या सूचनेचा विचार व्हायला हरकत नाही. त्यामुळे या मालिकेत न आलेल्या स्त्रियांच्या कर्तृत्वाबद्दलही माहिती मिळेल.
11 Oct 2016 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेखमाला !
नवरात्रीच्या निमित्ताने सुरुवात केलेली लेखमाला त्याच कारणाने संपवायलाच पाहिजे असे नाही ! :) अजून बर्याच दीपशिखा जग प्रकाशमान करून गेल्या व आजही तेवत आहेत, त्यांचीही माहिती वाचायला आवडेल.
11 Oct 2016 - 1:28 pm | संजय पाटिल
सगळे लेख वाचले, आवडले.
अजुन आले तर निश्चीतच आवडतील..
11 Oct 2016 - 2:20 pm | सस्नेह
संस्मरणीय लेखमाला !
सर्व दीपशिखांना मानवंदना !!
11 Oct 2016 - 2:33 pm | वरुण मोहिते
अशीच लेखमाला चालू राहिली तर कित्येकांची ओळख होईल. मिपा सदस्य हि काही भर घालतील .
11 Oct 2016 - 5:10 pm | इशा१२३
फार सुंदर लेखमाला!
11 Oct 2016 - 5:10 pm | इशा१२३
फार सुंदर लेखमाला!
11 Oct 2016 - 10:49 pm | उल्का
रोज उत्कन्ठेने आज कोण म्हणुन बघणे होत होते.
उद्या नक्की मिस्णार.
मी मागे म्हण्जे एक वर्षापुर्वी इन्ग्रजी मध्ये जुडि फ्रेटर विषयी लिहिले होते. इतके सविस्तर नाही पण थोडक्यात ओळख करुन दिली होती. त्याची आठवण झाली. :)
11 Oct 2016 - 10:57 pm | स्वाती दिनेश
करून इथे लिही मि पा वर.. बाकीच्यांनीही आवडी व सवडीप्रमाणे भर घालायला हरकत नाही, :)
त्यामुळे मग साहजिकच बाकीच्यांना मनात असूनही नाइलाजाने सामावता आले नाही, पण त्यांच्याबद्दल परत कधीतरी..
@एस व त्याला अनुमोदन देणार्या सर्वांना, ज्यांना ह्या लेखमालेत (संख्येअभावी) सामावता आले नाही पण लिहायचे होते अशांबद्दल पुढे मी लिहिन,
स्वाती
12 Oct 2016 - 8:13 pm | उल्का
स्वातीताई, मी प्रयत्न करेन पण तुझ्याइतकं ओघवत्या शैलीत जमेल की नाही ही खरंच शंका आहे. नाही जमलं तर मात्र तूच लिही. :)
11 Oct 2016 - 11:42 pm | सतिश गावडे
या लेखमालेसाठी धन्यवाद. खुपच सुंदर लेखमाला होती.
12 Oct 2016 - 7:39 pm | आनंदयात्री
लेखमाला अतिशय माहितीपूर्ण होती. प्रत्येक लेख आवडला. धन्यवाद.
12 Oct 2016 - 9:54 pm | अनिरुद्ध.वैद्य
ही लेखमालिका खूप माहितीपूर्ण अन सुरेख होती.
धन्यवाद!
12 Oct 2016 - 11:50 pm | अभिजीत अवलिया
४ लेख वाचले. उर्वरित देखील वाचले जातील. उत्तम उपक्रम.
14 Oct 2016 - 1:44 am | ट्रेड मार्क
थोडक्यात पण छान माहिती सांगितलीत. लेखमालेतल्या काही दीपशिखांबद्दल जास्त माहिती मिळवायला पाहिजे असं वाटतंय. तसेच अजून बऱ्याच दीपशिखांबद्दल तुम्ही लिहाल असं आश्वासन दिलंय त्यामुळे ते वाचण्यास उत्सुक आहे.
भट्टीतून तावून सुलाखून निघाल्यावरच झळाळी येते हे सत्यच आहे. अडचणी सगळ्यांनाच येतात पण काही लोक नुसता त्यांचा सामनाच करत नाहीत तर त्यांचा लॉन्चिंग पॅड म्हणून वापर करून भरारी घेतात.
सर्व दीपशीखांना सलाम.
14 Oct 2016 - 8:43 am | यशोधरा
सत्य वचन!
14 Oct 2016 - 10:47 am | स्वीट टॉकर
लेखमाला संपल्यामुळे वाईट वाटलं. मात्र अगदी रोज तुम्हाला लिहिणं शक्य नसेल तरी हळुहळु लिहीत राहिलात तर आम्हाला वाचायला आवडेलच.
15 Oct 2016 - 5:45 pm | शिद
खूपच छान व माहितीपूर्ण लेखमाला.
माझी पत्नीदेखील प्रत्येक लेख आवर्जून वाचत होती आणि तिचं देखील हेच मत आहे. :)
धन्यवाद.