आकाशात चंद्र कधीचा डोक्यावर आला होता. घड्याळात १२ चा ठोका वाजूनही गेला होता. ती कधीची हातात फोन घेऊन आकाशाकडे वेड्यागत बघत बसली होती. फोन करावा की न करावा या विचारात! आज त्याचा बर्थ डे!
मागच्या वर्षी ती होस्टेलच्या गेट वरून उडी टाकून त्याच्या रूमवर गेली होती. फुल भारी plan होता तो! सगळा ग्रुप जमला होता. मग खूप धमाल केली होती. अशाच एका क्षणी हसता हसता त्याने अचानक तिला I love you म्हटलं होतं. त्याचं सगळंच धक्कादायक आणि अनपेक्षित. कधी काय करेल याचा नेम नाही. हीच spontaneity तिला भावली होती. आणि ती काय लाजली होती! त्यावर तो म्हटला होता, This is the best gift I have ever got! किती मस्त वाटलं होतं तेव्हा! पुढच्या बर्थडेचे प्लॅन्स ही तिच्या मनात तेव्हाच सुरु झाले होते. आणि आज मात्र ती झोपाळ्यावर एकटीच बसली होती. मागच्या एका वर्षात पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. त्यांच्या भांडणानंतर तिने ग्रुपशी फारसे संबंधच ठेवले नव्हते.
आता एवढे जागलेच आहोत तर फोन करूयाच ह्या निर्णयाप्रत ती आली आणि तिने फोन लावला. सात-आठ रिंग्ज वाजल्या. जाऊ दे आता फोन कट करुया अशा विचारात असतानाच पलिकडून आवाज आला.
"हॅलो"
किती दिवसांनी ऐकला ह्याचा आवाज! खोल गंभीर आणि झोपेचा अॅडेड फ्लेवर! ती चटकन भानावर म्हणाली,
"हॅलो"
तिच्या हॅलोवर त्याची नेहमीची कमेंट ठरलेलीच. तू हॅलोच असं म्हणतेस की समोरचा राँग नंबर लागला तरी तासभर बोलत बसेल.
"हॅपी बर्थडे!"
"थँक्स! बट हू इज धिस?"
हू इज धिस??? नंबरदेखील डिलीट केलाय का ह्याने? आणि आवाज सुद्धा ओळखला नाही?! ह्याला नेहमीच लोकांना आयुष्यातून हाकलायची घाई असते. ती राँग नंबर पुटपुटली आणि फोन कधी कट झाला ते कळलंच नाही. He has moved on. There is no point in hanging on to someone who doesn't want you in their life. ह्या मैत्रीणी सांगून सांगून थकलेल्या गोष्टी एकदमच लक्षात आल्या होत्या. सगळं स्वच्छ झालं होतं. आज तिला खूप दिवसांनी शांत झोप लागणार होती.
प्रतिक्रिया
19 May 2016 - 9:00 pm | प्रचेतस
भारीच लिहिलंय की.
19 May 2016 - 9:05 pm | जव्हेरगंज
नेमकं आणि क्लास!
आज तिला खूप दिवसांनी शांत झोप लागणार होती.
नाही हो,
उलट आज तिचे डोळे खाडकन उघडले होते.
19 May 2016 - 9:09 pm | जव्हेरगंज
पैलाच लेख आहे की तुमचा!!
वा वा वा,
भारी लिवनार तुम्ही!
शुभेच्छा!!!
20 May 2016 - 10:23 pm | हर्मायनी
हो. पहिलाच प्रयत्न! धन्यवाद!
तिला शांत झोप लागणार होती कारण तिला क्लोजर (मराठीत काय म्हणतात?) मिळालं.
19 May 2016 - 9:21 pm | स्पा
बिचार्याकडे तृ कॉलर अप्लिकेशन नसावे :(
19 May 2016 - 9:58 pm | नीळा
आमचे येथे जखमी ह्रुदयावर टाके घालुन मीळतील
-Time
19 May 2016 - 9:58 pm | नीळा
आमचे येथे जखमी ह्रुदयावर टाके घालुन मीळतील
-Time
19 May 2016 - 11:15 pm | रातराणी
अर्र्र. डोक्याला शॉट. :( थोडक्यात नेमकं लिहिलंय.
19 May 2016 - 11:51 pm | अभ्या..
परफेक्ट अगदी.
There is no point in hanging on to someone who doesn't want you in their life.
19 May 2016 - 11:54 pm | बोका-ए-आझम
पण क्रमशः आहे का?
20 May 2016 - 10:26 pm | हर्मायनी
क्रमशः सध्यातरी नाही.
20 May 2016 - 5:55 am | तुषार काळभोर
मेलोड्रामाचं न करता थोडक्यात आटोपलं ते बरं केलं.
_पैलवान नागेश्वर नागशक्ती
22 May 2016 - 3:00 pm | उगा काहितरीच
हाहाहाहा !
20 May 2016 - 8:37 am | अजया
थोडक्या शब्दात नेमकं लिहुन गेलात!
20 May 2016 - 8:37 am | अजया
थोडक्या शब्दात नेमकं लिहुन गेलात!
20 May 2016 - 9:03 am | नाखु
कथानायिकेसाठी एक गाणे
20 May 2016 - 10:30 pm | हर्मायनी
वाह्! गाणं एकदम परफेक्ट!
20 May 2016 - 11:10 am | संजय पाटिल
बरोबर... राँग नंबरच नहितर काय..
20 May 2016 - 11:45 am | अनुप ढेरे
छानच!
20 May 2016 - 12:06 pm | समीरसूर
खूप छान लिहिले आहे!
असे कधीच कुणाचेच होऊ नये अशी ईच्छा!
20 May 2016 - 12:07 pm | mahesh d
spontaneously said love shall go this way only.. nothing wrong in it,
20 May 2016 - 1:43 pm | मराठी कथालेखक
छान...
पण हे नाही पटलं
नायिका हळवी वाटतेय, बरेच दिवस तिने प्रेम मनात जपलंय..निदान एका क्षणात तरी सावरणार नाहीच.. पुन्हा एकदा मनसोक्त रडून घेईल..
.. अर्थात ज्याच त्याचं मत.
20 May 2016 - 2:04 pm | स्मिता.
थोडक्यात कथानायिकेची मनस्थिती खूप छान मांडलिये. मात्र त्या रात्री तिला शांत झोप लागणार हे पटत नाही :)
20 May 2016 - 3:18 pm | सिरुसेरि
छान लिहिले आहे .
--मागच्या वर्षी ती होस्टेलच्या गेट वरून उडी टाकून त्याच्या रूमवर गेली होती. फुल भारी plan होता तो!--
अर्चीसारखीच बिनधास्त दिसते आहे .
20 May 2016 - 3:23 pm | पद्मावति
खूप छान लिहिलंय.
20 May 2016 - 4:07 pm | वपाडाव
पण थोडं पुढ घेउन गेलात तरी चालेल...
20 May 2016 - 10:48 pm | हर्मायनी
सर्वांना धन्यवाद! पहिलाच प्रयत्न आहे. जरा बिचकतच पोस्ट केली कथा. पण तुमच्या प्रतिक्रियांमुळे खूप छान वाटलं.
ती झोपण्यआधी रडली नक्कीच असेल. पण तिला शांत झोप लागणार होती कारण तिला क्लोजर मिळालं. ती अजूनही त्याच्यामधेच अडकून पडली होती. She was hoping for a slightest possibility. Now, she got the closure she needed.
24 May 2016 - 9:06 am | साहेब..
If She was hoping for a slightest possibility, how come she got the closure she needed? In fact she got the closure that was never needed.
20 May 2016 - 11:39 pm | एस
छान आहे.
21 May 2016 - 11:13 am | विवेकपटाईत
खरंच सुंदर लेख आहे. प्रेम आणि आकर्षणात हाच फरक आहे. आकर्षण झटक्यात संपत, प्रेम आयुष्य भाराची वेदना देऊन जातो.
22 May 2016 - 4:54 pm | पैसा
आवडले
24 May 2016 - 1:24 pm | चिगो
लघुकथा आवडली.. मिपावर स्वागत.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
24 Jul 2016 - 2:53 am | निखिल निरगुडे
मस्त लिहिलय...