राहील कुठे आता ही चिमणी?

खेडूत's picture
खेडूत in जे न देखे रवी...
28 Jan 2016 - 11:18 pm

वारा वादळ हे जोराचे
शाखा तुटल्या झंजावाते
उडले घरटे फुटली अंडी
सांगेल कुणाला व्यथा मनिची
राहील कुठे आता ही चिमणी?

उघडून जरी मी कपाट माझे
बोलावत आहे तिजला
नुसती चिव-चिव करते आहे
नकळे मजला आणिक तिजला
घरात परि ती कशी रहावी

घरी वृक्ष तो आणू कैसा
घरटे मग ती कोठे बांधिल
आणेल कुठून ती पिले बिचारी
सांगेल कुणाला व्यथा आपली
राहील कुठे आता ही चिमणी?

(महादेवी वर्मा यांच्या मूळ हिंदी कवितेवर आधारित)
२८/०१/२०१६

अनुवादबालसाहित्यमुक्त कविताविराणीकरुणवाङ्मयबालगीतमुक्तकभाषा

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Jan 2016 - 11:21 pm | पैसा

:(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jan 2016 - 11:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

-_-

संदीप डांगे's picture

28 Jan 2016 - 11:24 pm | संदीप डांगे

गलबलून टाकलंय... आतून. :(

मनिष's picture

2 Feb 2016 - 10:18 am | मनिष

खरंच... :(

यशोधरा's picture

28 Jan 2016 - 11:34 pm | यशोधरा

:(

साधी पण परिणामकारक कविता!

जव्हेरगंज's picture

28 Jan 2016 - 11:38 pm | जव्हेरगंज

मस्तच की!!

चांदणे संदीप's picture

29 Jan 2016 - 5:27 am | चांदणे संदीप

.

Sandy

नाखु's picture

29 Jan 2016 - 8:47 am | नाखु

आणि अत्यंत परिणामकारक..

अश्याच सरस आणि सुरस भाषांतराचा पंखा नाखु

प्राची अश्विनी's picture

30 Jan 2016 - 2:08 pm | प्राची अश्विनी

+11

बोका-ए-आझम's picture

30 Jan 2016 - 2:12 pm | बोका-ए-आझम

शाळेत असलेल्या
चिमणीला मग पोपट बोले
का गे तुझे डोळे ओले
काय सांगू बाबा तुला
माझं घरटं कुणी नेलं

ही कविता आठवली.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2016 - 10:23 am | अत्रुप्त आत्मा

@आणेल कुठून ती पिले बिचारी >> :(