मूठभर खजूर [पूर्वार्ध]

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
22 Oct 2015 - 10:44 pm

मूठभर खजूर [पूर्वार्ध]
(El Tayeb Salih यांच्या 'A Handful of Dates' या कथेचा स्वैर अनुवाद. ही कथा मूळ अरेबिक मध्ये लिहिली गेली, नंतर तिचे इंग्रजीत भाषांतर झाले.)

नेमके वय नाही आठवत आता, पण खूप लहान होतो. आजोबांबरोबर बाहेर पडलो, कि गावातले लोक प्रेमाने माझे गालगुच्चे घ्यायचे, डोक्यावर हळूच टपली मारायचे.... आता हे असलं काही, ते माझ्या आजोबांबरोबर करायचे नाहीत!
वडील कधीच नाही, पण आजोबा मात्र मला नेहमी त्यांच्या बरोबर बाहेर घेऊन जात. दररोज भल्या सकाळी मी कुराणपठनासाठी मशिदीत जाई. ती मशीद, ती शेते, ती नदी.....आमच्या जगण्याचे आधार! माझ्या वयाची इतर मुले मात्र मशिदीत जायला,कुराणपठन करायला कुरकुरत. पण मला मात्र ते आवडायचे! आणि मशिदीत कुणी पाहुणे कधी आले कि , तिथले मुल्लासाहेब मला, ‘ सूरत अल रहमा’ म्हणायला लावायचे. ऐकून पाहुणे बेहद्द खुश होत.
सकाळी माझे कुराणपठन संपले रे संपले कि मी अल्लाउद्दीनच्या जीन सारखा क्षणार्धात आईपाशी पोहचे. नाष्टा गबगबा पोटात कोंबला कि, नदीत उड्या ठोकायच्या. पोहून दमलो कि मग, शांतपणे नदीकिनारी बसायचो. तिथे मग माझ्या कल्पनेला धुमारे फुटत. ती नदी पुढे वळण घेऊन, बाभळीच्या बेटांपल्याड नाहीशी होत असे. मला नेहमी वाटायचे, तिकडे बेटामागे राक्षसांची एखादी जमात रहात असणार! त्या सगळ्या राक्षसांना आजोबांसारख्या शुभ्र दाढ्या आणि धारदार नाकं असणार!
माझ्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याआधी आजोबा आपल्या तर्जनीने नाकाचा शेंडा हलकेच खाजवायचे अन मग तोंड उघडायचे. त्यांची दाढी मौशार आणि एकदम सुखासीन दिसायची.रुईचा गोळाच! माझ्या आख्ख्या जिंदगीत त्याच्याइतके शुभ्र, सुंदर मी दुसरे काही पाहिले नाही. माझे आजोबा,खूप म्हणजे खूपच उंच होते....... त्यांच्याशी बोलायचं म्हणजे प्रत्येक गावकऱ्यांला मान वर करावी लागे. झालंच तर, खाली वाकल्याशिवाय त्यांना घरात प्रवेशच करता येत नसे! माझे त्यांच्यावर खूप प्रेम होते. मोठा झाल्यानंतर मी त्यांच्या सारखाच उंच, सडसडीत, रुबाबदार होईन, लांबच्या लांब ढांगा टाकीत गावात फिरेन, अशी स्वप्नं पहायचो.
माझी इतर सगळी सख्खीचुलत भावंडं म्हणजे निव्वळ ध्यान! मी मात्र हुशार, चुणचुणीत असल्याने आजोबांचा एकदम लाडका. आजोबांसमोर नेमके कधी हसायचे, कधी बोलायचे, कधी गप्प रहायचे, ते मला बरोब्बर कळायचे. त्यांच्या नमाजाच्या सगळ्या वेळा मला पाठ असत. मी पटकन नमाजाची जांमाज तयार ठेवी. वजु करण्यासाठी पाणी भरून ठेवी. त्यांना मला काही सांगावेच लागत नसे.त्यांना काही काम नसे, तेव्हा माझे कुराणपठन ते अगदी तल्लीन होऊन ऐकत. काहीकाही आयते ऐकताना तर ते एकदम आतून हलून गेल्यासारखे वाटत!
एके दिवशी बोलता बोलता मी त्यांना शेजारच्या मसूद बद्दल विचारले, “आजोबा, तुम्हाला मसूद नाही आवडत! हो ना?”
नेहमी प्रमाणे तर्जनीने नाकाचा शेंडा खुसखुसून, मग म्हणाले, “तो एक नंबरचा आळशी माणूस! मला नाहीत आवडत अशी माणसं!”
मी त्यांना परत विचारले, “आळशी म्हणजे कसा हो?”
क्षणभर आजोबांनी मान खाली घातली. मग समोर पसरलेल्या विस्तृत शेतजमिनीकडे नजर टाकीत म्हणाले, “ही वाळवंटाच्या या कड्या पासून ते नाईलच्या त्या किनाऱ्यापर्यंत पसरलेली शेती दिसतेय? शंभरेक एकर!!! त्या खजुराच्या बागा दिसतायत? हे सगळं सगळं एकेकाळी मसूदच्या मालकीचं होतं. त्याच्या वडिलांकडून त्याला वारशाने मिळालेलं!”
एवढं सांगून आजोबा थांबले. त्यांच्या शब्दांनी अंकित केलेल्या त्या प्रचंड जमिनीकडे मी एकटक पाहू लागलो. मनात म्हणालो, ‘मला काय करायचंय,कुणाची का असेना जमीन? अन कुणाच्या का असेनात बागा? आपल्याला काय! आपल्याला त्यावर मनसोक्त खेळाहुंदडायला मिळालं म्हणजे झालं!’ माझ्यासाठी तेव्हा त्याचे मोल तेवढेच!
आजोबा पुढे सांगू लागले, “होय पोरा! चाळीसेक वर्षांपूर्वी ही सगळी शेती मसूदची होती....... पण आता त्यातली निम्म्यापेक्षा जास्त जमीन माझ्या मालकीची आहे!”
हे मात्र माझ्यासाठी नवीनच होते! मला आपले वाटायचे, अल्लातालाने जग निर्माण केले तेव्हापासून ही जमीन आजोबांच्या मालकीची आहे!
ते परत सांगू लागले, “मी जेव्हा पहिल्यांदा या गावात पाय ठेवला, तेव्हा चिमूटभर मातीही माझ्या मालकीची नव्हती. या सगळ्या श्रीमंतीचा, जमीनजुमल्याचा मसूद एकमेव मालक होता. पण आज परिस्थिती बदललीय! इन्शाअल्लाह!!! अल्लाने माझे डोळे मिटण्याआधी, ती उरलेली जमीनही मला मिळायला पाहिजे!”
का कोण जाणे, पण आजोबांच्या त्या शब्दांनी मला कसेसेच वाटले. शेजारच्या मसूदविषयी वाईट वाटू लागले. मला एकदम त्याचे गाणे,त्याचा मऊ आवाज, मनापासून निखळ हसणारा त्याचा चेहरा आठवला. त्याचे हसू म्हणजे नदीचा खळखळाट जणू! माझे आजोबा मात्र कधीच हसत नसत.
मी आजोबांना विचारले, “मसूदने त्याची जमीन का विकली?”
“बायका!” हा शब्द आजोबांनी असा काही उच्चारला कि, बाई म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आहे, असे वाटू लागले!

[उर्वरित भाग उत्तरार्धात....]
[या कथेचे मराठी रुपांतर करताना आमचे स्नेही हादीभाई शेख आणि आफराह अल निजार यांनी मोलाची मदत केली. त्या दोघांचे आभार!]

वाङ्मयकथासाहित्यिकसमाजजीवनमानराहती जागाअर्थव्यवहारविचारआस्वादभाषांतर

प्रतिक्रिया

शिव कन्या's picture

22 Oct 2015 - 10:48 pm | शिव कन्या

पैताईंनी आणि संमंने तर्री ताई वरून शिव कन्या असे आमचे बारसे केले (आमच्याच विनंती वरून!) त्याबद्दल त्यांचे घुग्र्यांसह जाहीर आभार! :):)

आम्ही तुमचं कधीच अभिनंदन केलं की खफवर! :-)

कथा उत्कंठावर्धक आहे. अनुवाद छान झालाय. पुभाप्र.

राघवेंद्र's picture

22 Oct 2015 - 11:10 pm | राघवेंद्र

पु. भा. प्र.

चांदणे संदीप's picture

22 Oct 2015 - 11:20 pm | चांदणे संदीप

तुमची लेखनशैली उत्तम आहे! तुमच्या खलील जिब्रानच्या छोट्या छोट्या अनुवादित कथाही आवडल्या होत्या!

मला स्वत:ला एकंदरितच कसलेतरी गूढ आकर्षण आहे मिडल ईस्ट आणि आफिकेचा युरोपशी चिकटणारा भूप्रदेश याविषयी! आणि तुमच्या कथा वाचताना तो फील येतो लगेच!

पुभाप्र!

शिव कन्या's picture

23 Oct 2015 - 7:38 pm | शिव कन्या

खलील जिब्रान पासूनचे वाचता!! इतक्या नियमित वाचनाबद्दल आभार.

जे प्रदेश दूर, त्यांचे आकर्षण जास्त. पण माणसे, वृत्ती सगळीकडे सेम असतात.

चांदणे संदीप's picture

25 Oct 2015 - 6:16 am | चांदणे संदीप

खरंय! :-)

एक एकटा एकटाच's picture

22 Oct 2015 - 11:51 pm | एक एकटा एकटाच

नेहमीप्रमाणेच उत्तम

जव्हेरगंज's picture

23 Oct 2015 - 12:08 am | जव्हेरगंज

वा !!!
लवकर येऊ द्या पुढचा भाग!!

रेवती's picture

23 Oct 2015 - 1:18 am | रेवती

वाचतिये.

टोपलीभर खजुराची वाट पहाणारा मुलगा.

शिव कन्या's picture

23 Oct 2015 - 7:39 pm | शिव कन्या

:) कळेल पुढच्या भागात!

बिन्नी's picture

23 Oct 2015 - 8:17 am | बिन्नी

काल वाचून झोपले तर गोष्ट स्वप्नात दिसली !

शिव कन्या's picture

23 Oct 2015 - 7:40 pm | शिव कन्या

भारीय! तुम्हाला स्वप्नात दिसते!!! :)

प्रियाभि..'s picture

28 Jul 2019 - 7:10 am | प्रियाभि..

रात्री पूर्वार्ध वाचून झोपलो आणि स्वप्नात काही बाही उत्तरार्धात चालूच होते. आता पाहू खरा उत्तरार्ध. आधी प्रतिक्रिया द्यावी वाटली म्हणून पुन्हा पूर्वार्धात आलोय.

मनीषा's picture

23 Oct 2015 - 8:20 am | मनीषा

अनुवाद चांगला जमला आहे .
उत्तरार्धाच्या प्रतिक्षेत .....

नाना स्कॉच's picture

23 Oct 2015 - 8:22 am | नाना स्कॉच

छान आहे हे!!

अजया's picture

23 Oct 2015 - 8:24 am | अजया

वाचतेय.पुभाप्र.

दमामि's picture

23 Oct 2015 - 9:30 am | दमामि

पुभाप्र

बोका-ए-आझम's picture

23 Oct 2015 - 10:06 am | बोका-ए-आझम

कुठेही कृत्रिम वाटत नाही! पुभाप्र!

शिव कन्या's picture

23 Oct 2015 - 7:42 pm | शिव कन्या

अनुवादाची तीच तर कसोटी!

हेमंत लाटकर's picture

23 Oct 2015 - 10:57 am | हेमंत लाटकर

छान अनुवादित कथा.

शित्रेउमेश's picture

23 Oct 2015 - 11:23 am | शित्रेउमेश

उत्तरार्धाच्या प्रतिक्षेत .....

हेमंत लाटकर's picture

23 Oct 2015 - 12:03 pm | हेमंत लाटकर

मला शाळेत असताना अरेबिक गोष्टीची पुस्तके वाचायला आवडायची. उदा. सिंदबादच्या सात सफरी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Oct 2015 - 12:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कथा ! पुभाप्र.

मनिष's picture

23 Oct 2015 - 12:21 pm | मनिष

पुढील भागाची वाट पाह्तोय! :-)

खटपट्या's picture

23 Oct 2015 - 1:23 pm | खटपट्या

पु.भा.प्र

बाबा योगिराज's picture

23 Oct 2015 - 1:32 pm | बाबा योगिराज

मस्त आहे कथा. लवकर पुढील भाग येऊ दया...

कोमल's picture

23 Oct 2015 - 2:23 pm | कोमल

छान अनुवाद.
पुभाप्र

बॅटमॅन's picture

23 Oct 2015 - 2:44 pm | बॅटमॅन

अरे वा!!! येऊद्यात अजून.

(१६ खंडी अरेबियन नाईट्स वाचायचा केविलवाणा प्रयत्न करून क्षणोक्षणी हरखणारा) बट्टमण्ण.

द-बाहुबली's picture

23 Oct 2015 - 3:45 pm | द-बाहुबली

निरस कथानक.

सानिकास्वप्निल's picture

23 Oct 2015 - 5:28 pm | सानिकास्वप्निल

छान आहे कथा, पुभाप्र.

पैसा's picture

23 Oct 2015 - 7:04 pm | पैसा

एकदम उत्कंठावर्धक! पुढचा भाग कधी?

बादवे, घुगर्यांसाठी ठॅन्क्यु!!

शिव कन्या's picture

23 Oct 2015 - 7:43 pm | शिव कन्या

वेळ मिळाला कि टाकीन लगेच.
वेलकम पैताई! :) :)

तर्राट जोकर's picture

23 Oct 2015 - 7:14 pm | तर्राट जोकर

दुसरा भाग लवकर टाका.... उत्सुकता ताणली जातेय....

इडली डोसा's picture

23 Oct 2015 - 7:42 pm | इडली डोसा

लवकर येउ दे. भाषांतर चांगलं जमलये.

सूड's picture

23 Oct 2015 - 7:45 pm | सूड

पुभाप्र!!

चतुरंग's picture

23 Oct 2015 - 8:19 pm | चतुरंग

पुभाप्र
(खजूरमें अटका हुवा)रंगा

जेपी's picture

23 Oct 2015 - 8:42 pm | जेपी

उचललेस तु खजुर मुठभर,
अरेबियन नाईट्सचा रचला पाया.'

-लेख आवडला.

पुढील भाग वाचन्यास उत्सुक :)

वॉल्टर व्हाईट's picture

23 Oct 2015 - 9:34 pm | वॉल्टर व्हाईट

लेख आवडला. पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Oct 2015 - 11:13 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तरार्ध?