मी, माम्लेदारचा पंखा, राहणार ठाणे असे नमूद करतो की दि. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी नंदी पलेस डोंबिवली येथे संध्याकाळी ७. ३० च्या दरम्यान काही व्यक्ती कट्ट्यासंदर्भात एक गुप्त बैठक करणार आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तिथे साध्या वेशात उपस्थित राहायचे ठरवले. गावठी कट्टे निवडणुकीच्या काळात डोंबिवली कल्याण पट्ट्यात खात्रीलायकरीत्या उपलब्ध असल्यामुळे सावधगिरी म्हणून सदर नमूद ठिकाणी काही गडबड झाल्यास परिस्थिती नियंत्रणाखाली आणणे गरजेचे असल्यामुळे आजूबाजूला किती पोलिसबळ उपलब्ध आहे ह्याची माहिती घेण्यासाठी मी ठरलेल्या वेळेआधी अर्धा तास सदर ठिकाणी पोहोचलो आणि पाहणी केली .
सव्वा सातच्या आसपास माझ्या भ्रमणध्वनीवर एक फोन आला आणि रहस्यमय आवाजात "मी कट्ट्याचा आयोजक मुक्त विहारी बोलतोय" असे ते म्हणाले तेव्हा प्रमुख संशयित हीच व्यक्ती असावी ह्याची खात्री पटली. मी गेटवर उभा राहून टेहाळणी करत असता एका एफझी या दुचाकीवरून एक मजबूत बांध्याची आणि एक मध्यम बांध्याची अश्या दोन व्यक्ती माझ्यासमोर आल्या. चौकशीअंती त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे विनोद १८ आणि मुक्त विहारी अशी सांगितली. अजून एक व्यक्ती नामे टवाळ कार्टा तिथे येणार असल्याचे कळले. अंडरवर्ल्ड मधील लोक हे आपली नावे अशीच ठेवत असल्यामुळे त्यांना त्यांची ओळख लपवणे सोपे जाते. आम्ही नंदी पलेसमध्ये आत जाणार इतक्यात एक काळा शर्ट घातलेली व्यक्ती तिथे आली. सदर व्यक्तीने आपणच टवाळ कार्टा आहे अशी ओळख करून दिली. आजवरच्या माझ्या अनुभवात असे टोपण नाव घेतलेला साधा आणि शांत चेहरा आढळून आलेला नसल्याने थोडे बिचकायला झाले. सर्वांनी आपण इंजिनियर असल्याचे सांगितले. त्यानंतर ह्या "मिपा" टोळीची अधिक माहिती करून घेण्यासाठी मी त्यांच्याबरोबर आत गेलो. एक चांगले टेबल पाहून आम्ही तिथे स्थानापन्न झालो. त्यानंतर लगेचच मुक्त विहारी ह्यांनी नवीन घर विकत घेतलेले असल्यामुळे आजची पार्टी मी देत आहे असे जाहीर केले. मेनू कार्ड पाहून दोन बाटल्या बियर आणि चकणा याची ऑर्डर दिली गेली. मी नॉनवेज खाणारा तसेच बियर पिणारा नाही असे मी जाहीर केले म्हणून माझ्यासाठी सिंड्रेला नावाचे पेय मागवण्यात आले . विनोद १८ वगळता इतर व्यक्तींनी त्यांची नॉनवेजला हरकत नसल्याचे सांगितले. त्यानुसार प्रोन्स कोळीवाडा आणि बेबी कॉर्न पकोडा असे पदार्थ मागवण्यात आले. उपस्थित लोकांमध्ये सुरु असणारे संभाषण मी ऐकत होतो. त्या दरम्यान त्यांचेमध्ये प्यारे १, कंजूस, सुहास झेले, रामदास काका आणि प्रमोद देर्देकर यांची नावे घेण्यात आली तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले याचच अर्थ ह्या टोळीचे हस्तक देशोदेशी पसरलेले असून त्यांचा शोध घेण्यासाठी इंटरपोलची मदत घ्यावी लागेल असे जाणवले . डॉ खरे ही व्यक्ती कट्ट्याला उपस्थित राहणार आहे असे कळल्यावर मी थोडा चपापलो कारण डॉक्टर वगैरे बुद्धीजीवी वर्गातील लोक सहसा अश्या कट्ट्यांना हजेरी लावताना आम्ही कधीच पाहिलेले नाही. पेशंट म्हणून अनेकदा डॉक्टर समोर बसलो आहे पण एका डॉक्टरशी अशा ठिकाणी काय बोलावे ह्याची माहिती नसल्याने थोडी गडबड उडाली. त्यानंतर विनोद १८ आणि मुक्त विहारी ह्यांनी नोकरीनिमित्त परदेशी कसे जावे ह्याबाबत टवाळ कार्टा यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सौदी अरबीया मध्ये राहण्याचे अनुभव मुक्त विहारी ह्यांनी कथन केले. दरम्यानच्या काळात कुठून तरी विषय भाजपा आणि संघ तसेच इतर राजकीय पक्ष यावर पोहोचला. विनोद १८ आणि मुक्त विहारी ह्यांनी ह्यावरची आपली मते हिरीरीने मांडायला सुरुवात केली आणि एका बाजूला बियरचे ग्लास रिकामे होत होते. सदर ठिकाणी अगोदरच मोठ्या आवाजात कुठल्या तरी लहान मुलाच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती आणि त्यात भर म्हणून हॉटेलचे गझल गायक आपली तबला पेटी घेऊन घसा खाकरत गझला गाऊ लागले परंतु जमलेल्या टोळीच्या मंडळींनी त्याहीपेक्षा मोठ्या आवाजात शिरा ताणून आपले म्हणणे मांडणे सुरूच ठेवले परंतु अगदीच अशक्य झाल्यावर त्यांनी हॉटेल म्यानेजरला पाचारण केले आणि आवाजाची पातळी खाली आणण्याचा इशारा दिला पण गझल गायकाने शेवटपर्यंत आमची सुखेनैव साथ दिली.
साधारण सव्वा आठच्या सुमारास एक प्रफुल्लीत चेहऱ्याचे व्यक्तिमत्व आमच्या टेबलकडे येताना दिसले. तेच डॉ खरे आहेत असे मुक्त विहारी ह्यांनी सांगितले. डॉ खरे यांच्याबरोबर एक तरतरीत व तेजस्वी चेहऱ्याचा पोरगेलासा तरुण तिथे आला . तो स्पा उर्फ स्पावड्या असल्याचे कळले. हळूहळू गप्पा रंगू लागल्या आणि त्या संध्याकाळी तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्ती ह्या केवळ नवीन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जमलेल्या असून त्यांचा कोणताही असामाजिक हेतू नाही हे लक्षात आले. दरम्यानच्या काळात बियरची मोजणी करण्याचे काम केव्हाच बाजूला पडले होते आणि माझ्या डाव्या हाताला बसलेल्या मुक्त विहारी ह्यांनी कायमस्वरूपी धुनी पेटवली होती. ह्याचे कारण विचारले असता सौदी अरेबियामध्ये ह्या मुलभूत गरजांवर बंधने येत असल्याचे त्यांनी जड अंतकरणाने सांगितले. पुन्हा एकदा सिंड्रेलाला बैठकीत बोलावले गेले आणि सामिष निरामिष स्टार्टरसुद्धा मागवले गेले . जमलेल्या लोकांनी आपापल्या भ्रमणध्वनित टोळीतील इतर सदस्यांची छायाचित्रे काढली आणि ती प्रकाशित करू असे आश्वासन दिले. थोडा वेळ झाल्यावर स्पाने मला निघायला लागेल असे सांगितले. तो गेल्यानंतर उरलेल्या लोकांनी आपापल्या व्यवसायाचे बरेवाईट अनुभव सांगायला सुरुवात केली. त्यातूनच विषयाला विषय फुटत गेला आणि मैफिल रंगत गेली. सरतेशेवटी दाबून भरलेल्या पोटांमध्ये सिझलर हा प्रकार उतरला आणि मैफिल अंतापर्यंत पोचली असे वाटत असतानाच मुक्त विहारी आणि विनोद १८ यांनी पुन्हा एक बियर येऊ दे अशी इच्छा प्रकट केली आणि तिलाही आसरा दिला.
एव्हाना घड्याळात ११. ३० ची वेळ झाली होती. कोण कसे जाणार ह्याची चर्चा करता करता टवाळ कार्टा याने माझ्या दुचाकीवरून येण्याचे मान्य केले. डॉ. नी एफझी आपल्या ताब्यात घेऊन विनोद १८ ह्यांना मागे बसवले आणि प्रमुख आयोजक मुक्त विहारी ह्यांनी प्रायोजित केलेल्या ह्या कट्ट्याबद्दल त्यांचे आभार मानून दोन्ही दुचाक्या नंदी पलेसच्या बाहेर आल्या व आपापल्या मार्गाला लागल्या. कट्ट्याच्या काळात पुढील अनेक कट्ट्यांची आखणी केली गेली असून योग्य वेळ येताच ते जाहीर केले जाईल . मी ह्या कट्ट्याचा सदस्य होण्याचे मान्य व कबूल केले असून कट्ट्याच्या वाढीसाठी योग्य ते प्रयत्न केले जातील ह्याची हमी देतो.
तरी दि १८ ऑक्टोबर रोजी डोंबिवली येथे घडलेल्या कट्ट्याचा हा पंचनामा लिहिण्यात येत आहे . मिपाटोळीतील प्रत्येक सदस्याला त्याची एक स्थळप्रत सूचना व टिपण्णी साठी आज दि २३ ऑक्टोबर २०१४ रोजी मिपा संस्थळ येथे देण्यात येत आहे.
सही
माम्लेदारचा पन्खा
प्रतिक्रिया
23 Oct 2014 - 5:49 pm | टवाळ कार्टा
पंचनामा मस्त आहे
23 Oct 2014 - 5:33 pm | कपिलमुनी
संशयित इसमांचे फोटो वाँटेड म्हणून छापावेत .
अशी विनंती
23 Oct 2014 - 5:37 pm | यसवायजी
पंचनाम्याचे फटू कुठे आहेत?
24 Oct 2014 - 1:23 pm | चिंतामणी
फटूशिवाय रिपोर्ट टाकल्याबद्दल सं.मं.ने कारवाई करावी.
23 Oct 2014 - 5:57 pm | श्रीरंग_जोशी
आजवर इतके वृत्तांत वाचले पण या वृत्तांताचा अंदाज काही निराळाच :-) .
फटु येऊद्या.
23 Oct 2014 - 5:57 pm | हरकाम्या
फोटु टाकल्याशिवायय्हा पंचनामा " ग्राह्य " धरला जाणार नाही.याची पंख्याने नोंद घ्यावी.
23 Oct 2014 - 6:01 pm | माम्लेदारचा पन्खा
स्पावड्या धाव रे.... फटु लाव रे....!
23 Oct 2014 - 6:24 pm | टवाळ कार्टा
तुझ्या "ते" चे कित्ती गुन गाव रे...मोब्ल्यातल्यां फोटुंचे दर्शन धाव रे =))
23 Oct 2014 - 6:04 pm | आदूबाळ
झक्कास लिहिलंय.
तरी "असामी" आणि "नग" हे दोन खास पंचनामा फेम शब्द नसल्याने णिषेढ.
23 Oct 2014 - 6:07 pm | माम्लेदारचा पन्खा
पन हा पोलिस पाट्लाने पंचनामा हाय....
23 Oct 2014 - 6:07 pm | बहुगुणी
पण हल्ली व्हिडिओ रेकॉर्डेड पंचनामा आवश्यक आहे म्हणे, तो केला असेलच, येऊ देत; तो या टोळीबाहेर जाणार नाही याची टोळीवाले काळजी घेतीलच!
23 Oct 2014 - 6:07 pm | रेवती
हा हा हा. झकास फटाके, तडतड्या, फुलबाज्या........
23 Oct 2014 - 6:50 pm | सतिश गावडे
भारीच. आता फोटो येऊ द्या प्रतिसादांमध्ये.
23 Oct 2014 - 7:09 pm | कंजूस
काही खबरे येताहेत या भीतीने सराईत गुंडांनी टांग मारली की काय ?
23 Oct 2014 - 7:16 pm | टवाळ कार्टा
गुंडांचे "सरदार"तर आलेले ;)
23 Oct 2014 - 7:16 pm | निनाद मुक्काम प...
झकास
23 Oct 2014 - 7:55 pm | भाते
पंचनाम्याचा शाब्दिक मजकुर आवडला. संशयितांच्या फोटोशिवाय पंचनामा ग्राह्य धरण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. :)
मुक्तविहारी,
नविन घरापध्दल हार्दिक अभिनंदन.
नविन घर डोंबिवलीतच आहे ना? मिपाचा एक महत्वाचा मध्यवर्ती डोंबिवलीकर आणि कट्टा नियोजन अधिकारी कमी व्हायला नको! :)
23 Oct 2014 - 7:57 pm | शिद
मस्त पंचनामा. तेव्हढं कट्ट्याला हजर असलेल्या संशयितांचे फोटो डकवून मिपाकरांना उपकृत करा.
23 Oct 2014 - 8:11 pm | टवाळ कार्टा
कट्ट्याला "संशयित" नाही तर "पंच" होते "पंच"नामा करायला :)
23 Oct 2014 - 10:32 pm | शिद
:)
23 Oct 2014 - 8:02 pm | स्पा
हाहा ,साॅलिड ईष्टाईल मधला व्रुतांत,
मान गये मा.प. ;-)
बाय द वे फोटो विनोद यांच्या मोबिल मध्ये आहेत, मी फक्त क्लिक केलेले :-D
23 Oct 2014 - 8:05 pm | माम्लेदारचा पन्खा
सगळ्या टोळीबांधवांना णम्र इणंती की फटुसाठी स्पावड्या ह्यांस संपर्क करा वा.
स्पाराव....करा बुवा काहीतरी... समन्स बजावलय सगळ्यांनी !
23 Oct 2014 - 8:08 pm | माम्लेदारचा पन्खा
आता कुटं शोदायचं त्यास्नी?.... फटु फटु करत बसलेत की वो सगळे हकडं !
23 Oct 2014 - 8:11 pm | प्रभाकर पेठकर
कार्यबाहुल्ल्यामुळे कट्ट्याला हजेरी लावता आली नाही ह्याची मनाला आवश्यक तेवढी खंत आहेच. कट्टा वृत्तांताचा (आय मीन, पंचनाम्याचा) नवा अविष्कार कौतुकास्पद आहे.
मुविंचा मुक्काम किती दिवस भारतात आहे?
23 Oct 2014 - 8:22 pm | प्रचेतस
मस्त कट्टा वृत्तांत.
23 Oct 2014 - 8:33 pm | खेडूत
पंचनामा आवड्ला.
त्ये फटुवाल्याना जरा हुड्का की पट्पट!
23 Oct 2014 - 9:27 pm | सूड
फोटो ??
23 Oct 2014 - 10:01 pm | पिंगू
पंचनाम्याचे पुरावे म्हणून फोटो असावेत हा नियम आहे. तेव्हा पंचनामा असा ग्राह्य धरता येणार नाही.. :)
होऊ दे खर्च, येऊ दे फोटो..
23 Oct 2014 - 10:11 pm | खटपट्या
फोटो आल्याशीवाय प्रतिक्रिया देनार नाय !!
23 Oct 2014 - 11:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
लै भारी इष्टाईलमधला कट्टापंचनामा जंक्शन आवडला आहे जाहीर करण्यास आम्हाला मनापासून आनंद होत आहे. *ok*
प्रंतू फोटूचा पुरावा दाबून ठेवल्याने कोर्ट नाराज आहे... तो पुरावा त्वरीत सादर करून वाचकांना जळवावे असा आदेश कोर्ट देत आहे. *dirol*
23 Oct 2014 - 11:13 pm | चौथा कोनाडा
फर्मास पंचनामा ! माम्लेदारचा पन्खा यांची ही स्टायल लैच आवडली. हा झणझणीत कट्टावृतांत खाऊन आय मीन वाचून दिवाळी सत्कारणी लागली !
23 Oct 2014 - 11:23 pm | नंदन
पंचनामा आवडला. फोटूही येऊद्या शक्य झाल्यास.
स्पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती! :)
24 Oct 2014 - 8:03 am | स्पा
अगागागागा --/\--
24 Oct 2014 - 10:36 am | सूड
एकच नंबर !! =))))
उजवाडच पडलो असणार थंय!! ;)
23 Oct 2014 - 11:24 pm | बोका-ए-आझम
लई भारी!
23 Oct 2014 - 11:24 pm | बोका-ए-आझम
लई भारी!
23 Oct 2014 - 11:35 pm | पैसा
मस्त लिहिलंय! फोटो घेऊन ते शिवराम गोविंद कुठं फरारी झालंय त्याला आधी हुडका!
24 Oct 2014 - 12:55 am | अत्रुप्त आत्मा
@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत!
आपला आ'भारी:---
आत्मू खादाड!
सब(फ़ूड) इन्सपेक्टर...
वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.
24 Oct 2014 - 12:55 am | अत्रुप्त आत्मा
@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत!
आपला आ'भारी:---
आत्मू खादाड!
सब(फ़ूड) इन्सपेक्टर...
वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.
24 Oct 2014 - 12:55 am | अत्रुप्त आत्मा
@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत!
आपला आ'भारी:---
आत्मू खादाड!
सब(फ़ूड) इन्सपेक्टर...
वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.
24 Oct 2014 - 5:22 am | खटपट्या
तीन तीन येळा टंकून कशाला कॅलरी घालवताय !! आँ !!
24 Oct 2014 - 6:54 am | अत्रुप्त आत्मा
दूसरा मार्ग काय मग!? ;-)
24 Oct 2014 - 6:58 am | अत्रुप्त आत्मा
@डॉ खरे यांच्याबरोबर एक तरतरीत व "तेजस्वी चेहऱ्याचा पोरगेलासा तरुण" तिथे आला >>> खिक्क!
24 Oct 2014 - 8:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंचनाम्याचे पुरावे टाका नस्ता मी पंचनामा गायब करून टाकीन पुन्हा म्हणू नका पंचनाम्याचा कागद इथे तर ठेवला होता म्हणून !
-दिलीप बिरुटे
(मंडल निरीक्षक)
24 Oct 2014 - 8:57 am | पाषाणभेद
साला टकलू शकीलने सही बताया था. ऐसे कट्टेकुट्टे मे मत जाते जा. लोगबाग अपनेजे धंदेमेके लोगोंका पंचनामा करते है. जो बी कुच खाते पिते है उसका पटू इंटरनेटपे डालते है. ऐसा अगर रहेगा तो अपनी पैचान सबको हो जायेगी ना बाप.
इसलिये ऐसे कट्टेकुट्टेमे मै जाताच नई. आपभी जरा सोचो अउर अपने पैचानमेके कट्टेमेच जानेका क्या?
24 Oct 2014 - 10:55 am | गवि
कट्टा अन रिपोर्ट उत्तम.
या मेल्या स्पावड्याला दरेक कट्ट्याला लवकर निघून कुठे जायचे असते ते विश्वेश्वरच जाणे..
24 Oct 2014 - 1:59 pm | टवाळ कार्टा
विनोद १८ मुद्देमालासकट बेपत्ता आहेत...
24 Oct 2014 - 2:28 pm | विनोद१८
.....काल फोटो डकवणे जमले नाही...मुविंना फोन केला....ते आज दिसतील, थोड्याच वेळात.
24 Oct 2014 - 6:32 pm | प्रमोद देर्देकर
आमची आवर्जुन आठवण काढल्याबद्दल धन्यवाद.
@ ट.का . तु महाराष्ट्र विद्यालयात होता का?
24 Oct 2014 - 10:46 pm | टवाळ कार्टा
नाय बा
24 Oct 2014 - 6:37 pm | मोहनराव
लय भारी पंचनामा!!
24 Oct 2014 - 7:55 pm | मुक्त विहारि
ह्याला म्हणातात डोंबोली कट्टा....
आमच्या कट्ट्याला हजेरी न लावता पण कंजूस ह्यांनी फोटू डकवलेच...
एक-मेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ...
26 Oct 2014 - 10:50 pm | निनाद मुक्काम प...
कलियुगात अशी मैत्री फक्त डोंबिवलीकर दाखवू शकतात
असे माझे निरीक्षण वजा मत आहे.
24 Oct 2014 - 8:03 pm | भाते
कुठे नेऊन ठेवला आहे कट्टा मिपाचा?
खादाडीचा एकही फोटो नाही? :(
सगळ्या बश्या रिकाम्या आणि अर्धे पेले रिकामे!
तेसुध्दा मिपा कट्टा आयोजक आणि नियमित कट्टेकरी असताना?
जळजळ होणारे खादाडीचे फोटो टाकल्याशिवाय मिपा कट्टा पुर्ण होत नाही!
किमान ती 'सिंड्रेला' तरी दाखवायची होती! :)
फोटो बहुदा शेवटीला कट्टा संपताना काढला असावा असा दाट संशय आहे.
24 Oct 2014 - 8:46 pm | माम्लेदारचा पन्खा
इनो नसल्यामुळे जळजळ करायला लावणारे फोटो काढले नाहीत... आणि तसेही इथे कोणीही दुष्काळग्रस्त कट्टेकरी नसल्याने खाऊचे फोटो कटाप !
24 Oct 2014 - 8:47 pm | माम्लेदारचा पन्खा
इनो नसल्यामुळे जळजळ करायला लावणारे फोटो काढले नाहीत... आणि तसेही इथे कोणीही दुष्काळग्रस्त कट्टेकरी नसल्याने खाऊचे फोटो कटाप !
24 Oct 2014 - 11:05 pm | टवाळ कार्टा
जीधर हम खाने बैठते है...उधर भरी हुई डिश २ मिनीटमे खाली हो जाती है ;)
24 Oct 2014 - 8:24 pm | प्रमोद देर्देकर
ट्का म्हणे झालो पावन
स्पाडुरंग तो प्रकटला ,
सतेज कांती अंगी तरतरी
नंदी पॅलेस तो उजळला,
स्वेतपत्रध्रुम्रपानगंडिका
अन पक्षीतीर्था समावेत
अजब तो चैतन्य सोहळा रंगला
अजब तो चैतन्य सोहळा रंगला
24 Oct 2014 - 8:27 pm | सूड
खल्लास !! =))))
24 Oct 2014 - 8:42 pm | सतिश गावडे
कटटयाला न जाता, एव्हढे का चेकाळता?
बाकी तुमच्या या प्रतिसादाच्या निमित्ताने मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे असे जाणवते.
24 Oct 2014 - 9:01 pm | मुक्त विहारि
+ १...
अवघे मिपाच एका कुटुंबासारखे आहे...
24 Oct 2014 - 9:12 pm | सतिश गावडे
ड्वाले पानावले. तो कोल्ड्रींगचा गलास द्या मना.
24 Oct 2014 - 10:03 pm | सूड
ह्या बाकी खरा !!
25 Oct 2014 - 12:39 am | विश्वनाथ मेहेंदळे
आजपासून मुविकाकान्ना मिपाचे नविन भासं म्हणावे असा प्रस्ताव मांडतो.
24 Oct 2014 - 9:02 pm | सूड
>>बाकी तुमच्या या प्रतिसादाच्या निमित्ताने मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे असे जाणवते.
हो आहे. तुमच्याकडे इनो आहे, की पाठवू?? ;)
24 Oct 2014 - 9:11 pm | सतिश गावडे
इनोची आवश्यकता नाही दादा. माझी जळजळ होत आहे असा समज का बरे झाला तुमचा?
तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने अजून एकाच्या "जिवाभावाच्या" मित्रांच्या जोडीची आठवण झाली. जी फॉर जिवाभावाचा. :)
24 Oct 2014 - 10:04 pm | सूड
>>जी फॉर जिवाभावाचा
कळ्ळं !!
24 Oct 2014 - 9:03 pm | मुक्त विहारि
मस्त काव्य...
24 Oct 2014 - 10:46 pm | टवाळ कार्टा
=))
24 Oct 2014 - 9:43 pm | राजेश घासकडवी
अर्रर्रर्र... म्हणजे तुम्हाला त्यांची कोड ल्यांग्वेज कळली नाही असं दिसतंय. तुमच्यासारख्या मुरब्बी शीआयडीचा या लोकांनी अगदीच ट्र्याफिक पोलिस मामा केला की बरोब्बर!
पंचनाम्याच्या ष्टाइलमधला लेख भारी आवडला हेवेसांनलगे.
24 Oct 2014 - 10:49 pm | खटपट्या
अन्गाशी!!
आता कसं फोटु बगून गार्गार झालो.
माप आनि टका यांचे दर्शन होउन, अजी म्या धन्य जाहलो.
24 Oct 2014 - 11:09 pm | सतिश गावडे
हा शब्द हांगाशी (मुळ शब्द बहुतेक हांग आश्शी - आता कसं) असा आहे. उगाच काहितरी अंगाशी चिकटवू नका. ;)
24 Oct 2014 - 11:32 pm | सूड
चला नदीकाठचं वारं लागलं म्हणायचं !! ;)
25 Oct 2014 - 3:27 am | खटपट्या
हान्गाशी !!
24 Oct 2014 - 11:16 pm | मनिमौ
+१११॑
25 Oct 2014 - 2:26 am | स्पार्टाकस
लय झ्याक...!!!
25 Oct 2014 - 5:30 am | चौकटराजा
मुक्त विहारी यांचा उल्लेख मुखिया बिहारी उर्फ कट्टा डॉन असा हवा ! तसेच नंदी प्यालेस हे डोंबोली टेशनाचा उतरेस किती मीटर्स वगैरे मीटर फुटातील माहिती पंचनाम्यात आवश्यक. नक्की किती नंबरचे टेबल मिपा ग्यांगने पकडले. बिअरच्या किती
बाटल्या रिचवल्या असे तपशील गाळून पंचनाम्यात मुद्दाम लूपहोल ठेवण्यात आली की काय ?
25 Oct 2014 - 9:59 am | टवाळ कार्टा
+१
25 Oct 2014 - 1:49 pm | सतिश गावडे
चौराकाका (खरं तर म्हातारा असं लिहायची खुप इच्छा होते. ;) ) केव्हा केव्हा असा सिक्सर मारतात की चेंडू सीमापार जातो.
26 Oct 2014 - 2:22 pm | चौकटराजा
केव्हा केव्हा असा सिक्सर मारतात की चेंडू सीमापार जातो. आरं तिज्या मारी म्हणजे सीमापार चेडू न
जाणारा सिक्सर कधी कधी म्हातारा मारतो असा याचा अर्थ होतो. कंच्या परकारचा शिक्सर हाय वो हा गावडेसाहेब ? आम्हाला तर फकस्त दोराच्या पलिकड जाणारा शिक्सरच ठाव हाय !
26 Oct 2014 - 4:02 pm | सतिश गावडे
ते चेंडू "सीमापार जातो" च्या ऐवजी "प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेत जातो" असे वाचावे.
"चेंडू सीमापार गेला" असं कुठंतरी वाचलं असणार मी. मला स्वतःला क्रिकेटमध्ये काडीइतकाही रस नाही. :)
26 Oct 2014 - 4:33 pm | माम्लेदारचा पन्खा
ऊर्दूतल्या "तशरीफ" चं भाषांतर नसावं अशी आशा व्यक्त करतो...
26 Oct 2014 - 5:29 pm | टवाळ कार्टा
आणखी कोणत्या भाषेत "तशरीफ" हा शब्द आहे??? :)
25 Oct 2014 - 6:23 pm | विवेकपटाईत
बिना पोटपूजा (डिनर) हे मुंबे वाले कट्टा कसा काय करतात, रात्री ११.३० पर्यंत उपाशी कसे काय राहिले, (नुसत्या स्टार्टर वर) हे तंत्र कसं जमल. आमाला नाय जमणार असल्या कट्या मंदी येण. मुंबे ला कुणा नातलगा कडे जेवायला जाऊ नका का म्हणता आता कळले. *crazy* *CRAZY* :crazy:*crazy* *CRAZY* :crazy:
26 Oct 2014 - 12:00 am | टवाळ कार्टा
आमची खादाडी ७:३० pm ते ११:३० pm सुरुच होती
रच्याकने....तुमी पुण्याचे का? :P
26 Oct 2014 - 7:25 pm | दिपक.कुवेत
कट्टा आणि आणि त्याचा नव्या अवतारातला वृत्तांत एकदम फर्मास जमलाय. नंदि पॅलेस आणि तिथलं वर्णन वाचून मागच्या कट्ट्याच्या सुखद आठवणी एका क्षणात डोळ्यासमोरुन तरळून गेल्या.
26 Oct 2014 - 8:41 pm | मुक्त विहारि
मस्त महिनाभर कट्टा करू.....
26 Oct 2014 - 9:59 pm | टवाळ कार्टा
स्टॉक मिळाला वाट्टे ;)
26 Oct 2014 - 10:29 pm | मुक्त विहारि
दिपक आणि मी एकाच पेय-कुळातले.... आम्हाला स्टॉकची कय गरज?
26 Oct 2014 - 10:38 pm | टवाळ कार्टा
:)