डोंबिवली कट्टा पंचनामा

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
23 Oct 2014 - 5:01 pm

मी, माम्लेदारचा पंखा, राहणार ठाणे असे नमूद करतो की दि. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी नंदी पलेस डोंबिवली येथे संध्याकाळी ७. ३० च्या दरम्यान काही व्यक्ती कट्ट्यासंदर्भात एक गुप्त बैठक करणार आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तिथे साध्या वेशात उपस्थित राहायचे ठरवले. गावठी कट्टे निवडणुकीच्या काळात डोंबिवली कल्याण पट्ट्यात खात्रीलायकरीत्या उपलब्ध असल्यामुळे सावधगिरी म्हणून सदर नमूद ठिकाणी काही गडबड झाल्यास परिस्थिती नियंत्रणाखाली आणणे गरजेचे असल्यामुळे आजूबाजूला किती पोलिसबळ उपलब्ध आहे ह्याची माहिती घेण्यासाठी मी ठरलेल्या वेळेआधी अर्धा तास सदर ठिकाणी पोहोचलो आणि पाहणी केली .

सव्वा सातच्या आसपास माझ्या भ्रमणध्वनीवर एक फोन आला आणि रहस्यमय आवाजात "मी कट्ट्याचा आयोजक मुक्त विहारी बोलतोय" असे ते म्हणाले तेव्हा प्रमुख संशयित हीच व्यक्ती असावी ह्याची खात्री पटली. मी गेटवर उभा राहून टेहाळणी करत असता एका एफझी या दुचाकीवरून एक मजबूत बांध्याची आणि एक मध्यम बांध्याची अश्या दोन व्यक्ती माझ्यासमोर आल्या. चौकशीअंती त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे विनोद १८ आणि मुक्त विहारी अशी सांगितली. अजून एक व्यक्ती नामे टवाळ कार्टा तिथे येणार असल्याचे कळले. अंडरवर्ल्ड मधील लोक हे आपली नावे अशीच ठेवत असल्यामुळे त्यांना त्यांची ओळख लपवणे सोपे जाते. आम्ही नंदी पलेसमध्ये आत जाणार इतक्यात एक काळा शर्ट घातलेली व्यक्ती तिथे आली. सदर व्यक्तीने आपणच टवाळ कार्टा आहे अशी ओळख करून दिली. आजवरच्या माझ्या अनुभवात असे टोपण नाव घेतलेला साधा आणि शांत चेहरा आढळून आलेला नसल्याने थोडे बिचकायला झाले. सर्वांनी आपण इंजिनियर असल्याचे सांगितले. त्यानंतर ह्या "मिपा" टोळीची अधिक माहिती करून घेण्यासाठी मी त्यांच्याबरोबर आत गेलो. एक चांगले टेबल पाहून आम्ही तिथे स्थानापन्न झालो. त्यानंतर लगेचच मुक्त विहारी ह्यांनी नवीन घर विकत घेतलेले असल्यामुळे आजची पार्टी मी देत आहे असे जाहीर केले. मेनू कार्ड पाहून दोन बाटल्या बियर आणि चकणा याची ऑर्डर दिली गेली. मी नॉनवेज खाणारा तसेच बियर पिणारा नाही असे मी जाहीर केले म्हणून माझ्यासाठी सिंड्रेला नावाचे पेय मागवण्यात आले . विनोद १८ वगळता इतर व्यक्तींनी त्यांची नॉनवेजला हरकत नसल्याचे सांगितले. त्यानुसार प्रोन्स कोळीवाडा आणि बेबी कॉर्न पकोडा असे पदार्थ मागवण्यात आले. उपस्थित लोकांमध्ये सुरु असणारे संभाषण मी ऐकत होतो. त्या दरम्यान त्यांचेमध्ये प्यारे १, कंजूस, सुहास झेले, रामदास काका आणि प्रमोद देर्देकर यांची नावे घेण्यात आली तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले याचच अर्थ ह्या टोळीचे हस्तक देशोदेशी पसरलेले असून त्यांचा शोध घेण्यासाठी इंटरपोलची मदत घ्यावी लागेल असे जाणवले . डॉ खरे ही व्यक्ती कट्ट्याला उपस्थित राहणार आहे असे कळल्यावर मी थोडा चपापलो कारण डॉक्टर वगैरे बुद्धीजीवी वर्गातील लोक सहसा अश्या कट्ट्यांना हजेरी लावताना आम्ही कधीच पाहिलेले नाही. पेशंट म्हणून अनेकदा डॉक्टर समोर बसलो आहे पण एका डॉक्टरशी अशा ठिकाणी काय बोलावे ह्याची माहिती नसल्याने थोडी गडबड उडाली. त्यानंतर विनोद १८ आणि मुक्त विहारी ह्यांनी नोकरीनिमित्त परदेशी कसे जावे ह्याबाबत टवाळ कार्टा यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सौदी अरबीया मध्ये राहण्याचे अनुभव मुक्त विहारी ह्यांनी कथन केले. दरम्यानच्या काळात कुठून तरी विषय भाजपा आणि संघ तसेच इतर राजकीय पक्ष यावर पोहोचला. विनोद १८ आणि मुक्त विहारी ह्यांनी ह्यावरची आपली मते हिरीरीने मांडायला सुरुवात केली आणि एका बाजूला बियरचे ग्लास रिकामे होत होते. सदर ठिकाणी अगोदरच मोठ्या आवाजात कुठल्या तरी लहान मुलाच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती आणि त्यात भर म्हणून हॉटेलचे गझल गायक आपली तबला पेटी घेऊन घसा खाकरत गझला गाऊ लागले परंतु जमलेल्या टोळीच्या मंडळींनी त्याहीपेक्षा मोठ्या आवाजात शिरा ताणून आपले म्हणणे मांडणे सुरूच ठेवले परंतु अगदीच अशक्य झाल्यावर त्यांनी हॉटेल म्यानेजरला पाचारण केले आणि आवाजाची पातळी खाली आणण्याचा इशारा दिला पण गझल गायकाने शेवटपर्यंत आमची सुखेनैव साथ दिली.

साधारण सव्वा आठच्या सुमारास एक प्रफुल्लीत चेहऱ्याचे व्यक्तिमत्व आमच्या टेबलकडे येताना दिसले. तेच डॉ खरे आहेत असे मुक्त विहारी ह्यांनी सांगितले. डॉ खरे यांच्याबरोबर एक तरतरीत व तेजस्वी चेहऱ्याचा पोरगेलासा तरुण तिथे आला . तो स्पा उर्फ स्पावड्या असल्याचे कळले. हळूहळू गप्पा रंगू लागल्या आणि त्या संध्याकाळी तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्ती ह्या केवळ नवीन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जमलेल्या असून त्यांचा कोणताही असामाजिक हेतू नाही हे लक्षात आले. दरम्यानच्या काळात बियरची मोजणी करण्याचे काम केव्हाच बाजूला पडले होते आणि माझ्या डाव्या हाताला बसलेल्या मुक्त विहारी ह्यांनी कायमस्वरूपी धुनी पेटवली होती. ह्याचे कारण विचारले असता सौदी अरेबियामध्ये ह्या मुलभूत गरजांवर बंधने येत असल्याचे त्यांनी जड अंतकरणाने सांगितले. पुन्हा एकदा सिंड्रेलाला बैठकीत बोलावले गेले आणि सामिष निरामिष स्टार्टरसुद्धा मागवले गेले . जमलेल्या लोकांनी आपापल्या भ्रमणध्वनित टोळीतील इतर सदस्यांची छायाचित्रे काढली आणि ती प्रकाशित करू असे आश्वासन दिले. थोडा वेळ झाल्यावर स्पाने मला निघायला लागेल असे सांगितले. तो गेल्यानंतर उरलेल्या लोकांनी आपापल्या व्यवसायाचे बरेवाईट अनुभव सांगायला सुरुवात केली. त्यातूनच विषयाला विषय फुटत गेला आणि मैफिल रंगत गेली. सरतेशेवटी दाबून भरलेल्या पोटांमध्ये सिझलर हा प्रकार उतरला आणि मैफिल अंतापर्यंत पोचली असे वाटत असतानाच मुक्त विहारी आणि विनोद १८ यांनी पुन्हा एक बियर येऊ दे अशी इच्छा प्रकट केली आणि तिलाही आसरा दिला.

एव्हाना घड्याळात ११. ३० ची वेळ झाली होती. कोण कसे जाणार ह्याची चर्चा करता करता टवाळ कार्टा याने माझ्या दुचाकीवरून येण्याचे मान्य केले. डॉ. नी एफझी आपल्या ताब्यात घेऊन विनोद १८ ह्यांना मागे बसवले आणि प्रमुख आयोजक मुक्त विहारी ह्यांनी प्रायोजित केलेल्या ह्या कट्ट्याबद्दल त्यांचे आभार मानून दोन्ही दुचाक्या नंदी पलेसच्या बाहेर आल्या व आपापल्या मार्गाला लागल्या. कट्ट्याच्या काळात पुढील अनेक कट्ट्यांची आखणी केली गेली असून योग्य वेळ येताच ते जाहीर केले जाईल . मी ह्या कट्ट्याचा सदस्य होण्याचे मान्य व कबूल केले असून कट्ट्याच्या वाढीसाठी योग्य ते प्रयत्न केले जातील ह्याची हमी देतो.

तरी दि १८ ऑक्टोबर रोजी डोंबिवली येथे घडलेल्या कट्ट्याचा हा पंचनामा लिहिण्यात येत आहे . मिपाटोळीतील प्रत्येक सदस्याला त्याची एक स्थळप्रत सूचना व टिपण्णी साठी आज दि २३ ऑक्टोबर २०१४ रोजी मिपा संस्थळ येथे देण्यात येत आहे.

सही

माम्लेदारचा पन्खा

मुक्तकतंत्रगुंतवणूकमौजमजाशुभेच्छासमीक्षाबातमीअनुभवमाहितीचौकशी

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

26 Oct 2014 - 11:23 pm | मंदार कात्रे

लै भारी पन्चनामा

डब्बल लै भारी फटु

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2014 - 2:03 pm | टवाळ कार्टा

९८

मुक्त विहारि's picture

27 Oct 2014 - 2:08 pm | मुक्त विहारि

९९

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2014 - 2:15 pm | अत्रुप्त आत्मा

१००

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Oct 2014 - 2:21 pm | माम्लेदारचा पन्खा

१०१....

बुवा.... दक्षिणा घ्या....

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 3:08 pm | सतिश गावडे

शिंच्यानो, नुसते आकडे काय लिहिता प्रतिसादात?
धाग्यावर अवांतर करुन प्रतिसादांची संख्या कशी वाढवावी हे काय आता तुम्हाला नव्याने शिकवायला हवे का?

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2014 - 4:39 pm | अत्रुप्त आत्मा

@दक्षिणा घ्या.... >>> दीर्घायुष्य मस्तू।। दक्षिणा: पांतू बहुधेयं चास्तु।। ;-)

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 4:46 pm | सतिश गावडे

इथेही यमक जुळवले.

अगदी अगदी...फक्त ते 'तू' ऐवजी 'तु' पाहिजे सर्वत्र.

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 4:52 pm | सतिश गावडे

मस्तु म्हणजे "म: अस्तु" का? तसं असेल तर म: चा अर्थ काय?

बॅटमॅन's picture

27 Oct 2014 - 4:59 pm | बॅटमॅन

दीर्घायुष्य मस्तू।। दक्षिणा: पांतू बहुधेयं चास्तु

दीर्घायुष्यमस्तु = दीर्घायुष्यम् अस्तु |
बहुधेयं चास्तु = बहुधेयं च अस्तु |

हा तो संधीविग्रह.

मंदार कात्रे's picture

27 Oct 2014 - 5:34 pm | मंदार कात्रे

मला वाटते आत्मू बाबांच्या "मस्तु"आशिर्वादाचा अर्थ- असेच "मस्ती"त जगा असा असावा

;)

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 6:54 pm | सतिश गावडे

आम्हाला आत्मुसच्या "मस्तु" ची फोड हवी होती. :D

>>आत्मुसच्या "मस्तु" ची फोड हवी होती.

त्यांनी शब्द नको तिथे फोडलाय त्यामुळे त्यांच्या फोडीची फोड होणे शक्य नाही. ;)

सूड's picture

27 Oct 2014 - 11:34 pm | सूड

>>दीर्घायुष्यमस्तु = दीर्घायुष्यम् अस्तु |
बहुधेयं चास्तु = बहुधेयं च अस्तु |

+१

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 11:51 pm | सतिश गावडे

तू आणी बॅटमन अगदी इमान इतबारे समजावताय. :)

मी बुवांनी शब्द नको तिथे तोडल्यामुळे जरा त्यांची मस्करी करत होतो रे. हे एव्हढं संस्कृत आठवी ते दहावी शंभर मार्कांचं संस्कृत घेतलेल्या अगदी माठातल्या माठ पोरालाही येईल. ;)

>>हे एव्हढं संस्कृत आठवी ते दहावी शंभर मार्कांचं संस्कृत घेतलेल्या अगदी माठातल्या माठ पोरालाही येईल.

असेच म्हणतो !! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2014 - 1:00 am | अत्रुप्त आत्मा

नक्को तिथे पाडिला तुम्हीच तुकडा
आणि म्हणती...पहा, रे'वडी..उडाली कशी??? :-\

याला म्हणतात पंचनामा ओढवून घेणे. आ {?} मुझे मार. सीमापार जाणारा चेंडू कशाला अडवलात? गुर्जी ,घ्या पाटी हाती नि लिहा १००१वेळा. 'लक्ष्य' लिहून हात दुखतोय माझा.

आतिवास's picture

30 Oct 2014 - 12:22 pm | आतिवास

वृत्तांताची शैली आवडली.