विनोद - प्राचीन कथा

वारकरि रशियात's picture
वारकरि रशियात in जनातलं, मनातलं
15 Oct 2008 - 2:57 pm

कालच्या काथ्याकूटात एक शब्द वाचला - 'बादरायण'.
मनात सहज विचार आला की हा 'बादरायण' (संबंध) शब्द आपण वापरतो, त्याचा संदर्भ (किंवा कथा) कदाचित सर्वांना माहित नसेल. शक्य असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी लिहावी असा विचार केला.
आपल्यालाही असे अनेक कथा संदर्भ (किंवा कथा) श्लोक माहित असतील. माहित असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी सह लिहा - अपेक्षा आहे चांगल्या विनोदाची !!!

तर सुरु करतोय 'बादरायण' (संबंध) कथा (श्लोकासह)
(पूर्वी ) एकदा एका गृहस्थाकडे बैलगाडीतून काही पाहुणे आले. बायकोला वाटले की नवर्‍याकडील पाहुणे असतील, तर नवर्‍याला वाटले की बायकोकडील मंडळी असतील ! (काळ पूर्वीचा होता!)
(एकदोन दिवस) आदरतिथ्य व्यवस्थित झाले. पाहुणे परत निघाले. या गृहस्थाला काही रहावले नाही आणि त्याने पाहुण्यांपै़की प्रमुखाला हळुच विचारले, "आपण कोण?"
तो पाहुणा उत्तरला,
"अस्माकं बदरी चक्रं, युष्माकं बदरी तरु: ।
बादरायणसंबंधात, यूयं यूयं वयं वयं ।"
आमच्या (बैलगाडीचे) चाक बोरीच्या लाकडाचे आणि तुमच्या दाराशी बोरीचे झाड आहे असा आपला बादरायण संबंध!
(खरं म्हणजे आपला संबंध नाही, तुम्ही ते तुम्ही ; आम्ही आमच्या ठिकाणी !

भाषाविनोदविचारसंदर्भमाहिती

प्रतिक्रिया

शाल्मली's picture

15 Oct 2008 - 3:20 pm | शाल्मली

एकदा एका राजाच्या दरबारात एक हुशार, प्रतिभावान कवी होता. अर्थातच राजाची त्याच्यावर मर्जी होती. त्या कवीच्या विरोधकांना हे बघवत नसे. त्यांनी एक दिवस राजाचे कान फुंकले. त्यांनी सांगितले की आम्ही त्या कवीला एक ओळ देऊ. त्यावर त्याने लगेच काव्य केले तर आम्ही त्याला मानू. ती ओळ होती-
ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ:

त्यावर त्या कवीनी लगेच काव्य केले-

रामाभिषेके जलमाहरत्या ।
हस्तात्च्युतो हेमघटो युवत्या
सोपानमार्गेण करोति शब्दम्
ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ: ॥

अर्थ- रामाच्या अभिषेकासाठी नदीचे पाणी आणणार्‍या युवतीच्या हातातून कुंभ खाली पडला. आणि जिन्यावरून तो कुंभ गडगडत जाताना आवाज आला-
ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ:
विरोधकांचे चेहेरे पार पडले हे सांगायला नकोच :)

--शाल्मली.

संदीप चित्रे's picture

15 Oct 2008 - 8:09 pm | संदीप चित्रे

हे माहिती नव्हते .. खूप आवडली काव्यरचना

सुनील मोहन's picture

15 Oct 2008 - 4:25 pm | सुनील मोहन

या बाबतीत आम्ही नुसतेच ठ नाही तर

साक्षात ढ आहोत.

आगाऊ कार्टा's picture

15 Oct 2008 - 5:29 pm | आगाऊ कार्टा

भोज राजाच्या दरबारात जी नवरत्ने होती, त्यांपैकी कालिदास एक होता....
भोजराजा स्वतः एक उत्तम कवी होता..
एके दिवशी त्याने खालील ओळ समस्यापूर्तीसाठी दरबारातील कवींपुढे ठेवली..
ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ:
पण कोणालाच समाधानकारक काव्य रचता येईना. म्हणून मग राजाने कालिदासाकडे पाहिले..
तेव्हा कालिदासाने खालीलप्रमाणे समस्यापूर्ती केली.

भोजस्य भार्या मदविव्हलाया:
कराच्युतो हेमघटोपिपात्रम्
सोपान मार्गेण प्रकरोति शब्दम्
ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ:

अर्थः कामविव्हळ झालेली भोजराजाची पत्नी जिन्यावरुन जात असताना तिच्या हातातील हेमघटाचे पात्र पडुन ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ: असा आवाज झाला

संदीप चित्रे's picture

15 Oct 2008 - 8:11 pm | संदीप चित्रे

शाल्मलीने सांगितलेले काव्य की आगाऊ कार्ट्याने सांगितलेले ?

छोटा डॉन's picture

15 Oct 2008 - 8:16 pm | छोटा डॉन

आगाऊ कार्ट्याने लिहलेले "भोजराजाच्या पत्नीचे" बरोबर आहे ...

चुभुद्याघ्या ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भाग्यश्री's picture

15 Oct 2008 - 10:29 pm | भाग्यश्री

शाळेत ९वी का १०वीला हे ठंठंठठं वालं सुभाषित होतं.. तेव्हा काही कामविव्हळ वगैरे प्रकार शाळेच्या पुस्तकात असेल असं वाटत नाही.. :) बहुधा शाल्मलीने लिहीलेले सुभाषित होतं आम्हाला..

अजुन एक होतं.. जम्बुफलानि पक्वानि काहीतरी.. म्हणजे मासेमारीच्या जाळाला लावलेली गोल वस्तु, मासे जांभळं समजुन खायला जातात आणि जाळ्यात अडकतात..

मैत्र's picture

19 Oct 2008 - 5:35 am | मैत्र

जम्बुफलानि पक्वानि पतन्ति च विमले जले
मत्स्यान तान न खादन्ति जालगोलकशंकया

डुबुक डुबुक काही संदर्भ होता तो मात्र आठवत नाही..

ऋचा's picture

16 Oct 2008 - 10:02 am | ऋचा

आम्हाला होत शाळेत असताना पण रामाभिषेके नसुन राज्याभिषेकम् अस होतं..

राज्याभिषेकम् जलमाहरत्या ।
हस्तात्च्युतो हेमघटो युवत्या
सोपानमार्गेण करोति शब्दम्
ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ: ॥

आणि हे कालिदासाने लिहिल होत अस आठवतय.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

आवशीचो घोव्'s picture

26 Oct 2008 - 12:12 am | आवशीचो घोव्

राज्याभिषेकम् जलमाहरत्या ।
हस्तात्च्युतो हेमघटो युवत्या
सोपानमार्गेण करोति शब्दम्
ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ: ॥

आमच्या संस्कृत च्या बाईंनी, ठ आणि ठं चा क्रम चुकता कामा नये असे बजावले होते.

वारकरि रशियात's picture

18 Oct 2008 - 2:51 pm | वारकरि रशियात

मुक्तसंगः अनहंवादि

वैद्यराज नमस्तुभ्यं, यमराज सहोदरः ।
यमस्तु हरति प्राणान, त्वं तु प्राणान धनानि च ॥

अहो वैद्यराज, तुम्हाला वंदन असो.तुम्ही यमाचे सख्खे भाउ आहात. यम केवळ प्राणच घेतो, तुम्ही तर (आधी) धन व (नंतर) प्राणही हरण करता!

चितां प्रज्वालितां द्रुष्ट्वा, वैद्यो विस्मयं आगता: ।
नाहं गतो न मे भ्राता, कस्य इदं हस्तलाघवम ॥

स्मशानात एक चिता जळत असलेली पाहून एक वैद्य स्वतःशी म्हणतो, " या माणसावर उपचार करायला मी गेलो नव्हतो, माझा भाऊही गेला नव्हता. मग कोणाचे हे हस्तकौशल्य म्हणावे बरे?

ऋषिकेश's picture

18 Oct 2008 - 3:01 pm | ऋषिकेश

समस्यापुर्ती हा मला संस्कृतातील एक आवडलेला खेळ.. चवथा चरण दिला जात असे व त्या अनुरूप पहिले तीन चरण लिहिले जात असत. शाळेत असताना आम्हाला शाल्मली यांनी सांगितलेली समस्यापुर्ती होती. पण दुसरा स्लोकही असु शकतो कारण अनेक कवी त्या स्पर्धेत भाग घेत असत

शाळेत त्याच बरोबर एक बुक्वुबुबुक्वुकबुक.. अश्या काहिश्या चवथ्या चरणाच्या दोने समस्या पुर्तता होत्या त्या कोणला आठवत आहेत का?
त्यांचा अर्थ असा होता...
१. नदीवर पाणी भरायला गवळणी आल्या आहेत आणि त्यांचा घ्डा भरताना बुक्वुबुबुक्वुकबुक असा आवाज होत आहे
२. तळ्याच्या किनार्‍यावर जांभळाअची झाडे आहेत आणि त्यावरील माकडे जांभळे खाऊन बिया पाण्यात टाकत आहेत. त्यांचा आवाज होतो आहे बुक्वुबुबुक्वुकबुक

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

सुक्या's picture

26 Oct 2008 - 3:45 am | सुक्या

शाळेत असताना संस्कृत मधे बरेच सुंदर श्लोक वाचनात आले होते. काही तर आजही स्मरणात आहेत. त्यातला एक. .

कन्या वरयते रुपम, माता वित्तं पिता श्रुतम |
बांधवः कुलम इच्छंती, मिष्टान्नम इतरे जनः ||

अर्थः लग्न ठरण्याचे वेळी उपवर कन्या वराचे रुप पाहते, कन्येची माता मुलाकडे धन किती आहे ते पाहते, मुलीचा पिता मुलगा किती विद्यासंपन्न आहे हे पाहतो. नवर्‍या मुलीचे नातेवाइक मुलाचे कुळ चांगले असावे अशी तर इतर लोक लग्नामधे फक्त गोड धोड खायला मिळावे एवढीच अपेक्षा करतात.

(महापंडीत) सुक्या