(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी)

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
21 Jun 2012 - 1:50 am

(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी)

सध्या काही धागे वाचण्याचा आणि ते वाचून कंटाळा येण्याचादेखील कंटाळा आला आहे.

बरेच चित्रपट येतात जातात, बर्‍याचदा गाणी बकवास की चित्रपट अधिक बकवास हा प्रश्न पडतो. पिच्चरमध्ये चांगली सोन्ग्स असतात आणि बकवास, टुकार आणि टाकावू सोन्ग्स ही असतात आणि का असतात असे होते..
मला एक librari बनवायची आहे, असली गाणी चुकूनही पुन्हा ऐकणार नाही याची काळजी घेण्यासाठी.
मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे

माझ्याकडून कांही गाणी,

१) मै तो रस्ते से जा रहा था..
२) मेरे बाप का बेटा मुझे भाई बोलता.. (सल्लूचे आहे कुठलेतरी)
३) फिझा मधले एक गाणे.. पंजाबी ड्रेसमधली करीश्मा एकदम चकाचक जीन्स मध्ये येते आणि गाण्यानंतर परत पंजाबी ड्रेस मध्ये जाते. (ज्याच्या कुणाच्या डोक्यातून ही कल्पना आली असेल तो लै भारी समजत असावा)
४) आँटी नं १ चे टायटल साँग.

म्हटले तर विडंबन.. नाही तर फालतू आणि टाकावू गाण्यांचा डेटाबेस. :-p

कलानृत्यनाट्यविडंबनसद्भावनाशुभेच्छामतसंदर्भसल्लाप्रश्नोत्तरेमाहितीप्रतिक्रियावादआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

21 Jun 2012 - 2:01 am | बॅटमॅन

ढँटढँ!!!!!! या लैब्ररितिल सर्वोत्तम गानरत्ने कोणती याबद्दल काही अज्ञजन वाद घालतील , पण तूनळीसारख्या ठिकाणी

"world's most pathetic song" असे सर्चला देऊन जे गाणे येते ते पुरतेपणी पाहण्याचे धाडस करावेच...स्त्रीपुरुष समानतेच्या धाग्यावर तद्दन पुरुषप्रधान प्रतिक्रिया द्यायला लागणारे धैर्यच त्याची बरोबरी करू शकते.

http://www.youtube.com/watch?v=LYUBL4cWSO8

शिवाय हे गाणेपण अगदी अर्क आहे.

देशी स्पायडरमॅन. ;)

तूर्तास इतकेच. मालमासाल्य नंतर चविचवीने घातल्या जाईल.

तुषार काळभोर's picture

21 Jun 2012 - 7:32 am | तुषार काळभोर

असलं गाणं सुचवल्याबद्दल त्रिवार निषेध!!!

त्याच्या नावाने घराणे सुरु होते आहे असे कळाले.

मुर्गी क्या जाने अंडेका क्या होगा
तेरी टाय टाय फिस होगा या माकानुका होगा.

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2012 - 2:19 am | श्रीरंग_जोशी

१० - १२ मिनिटे विचार करतोय, एकही असे गाणे आठवले नाही.
बहुधा कधी मन लावून ऐकलीच नाही अशा प्रकारची गाणी, सरळ दुर्लक्ष केले.

काही आठवड्यांपूर्वी रावडी राठोड पाहायला गेलो नेमके प्रत्येक गाण्याच्या वेळी बाहेर आलो त्यामुळे मोठी संधी हुकली असावी असा अंदाज आहे.

एकदम न्यूनगंडच आलाय राव, प्रश्नपत्रिका पाहून एकही प्रश्न झेपत नाहीये म्हणजे काय?

चित्रगुप्त's picture

21 Jun 2012 - 2:31 am | चित्रगुप्त

भोजपुरी गाणी बघा. उदा:
http://www.youtube.com/watch?v=skZt4IXER00&feature=relmfu

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2012 - 2:58 am | श्रीरंग_जोशी

जरा डोळे मिटून महाविद्यालयीन दिवसांचे स्मरण केले. प्रश्नपत्रिका कितीही अवघड वाटली तरी अवसान गळू न दिल्यास उत्तीर्ण होण्यापुरते गुण नक्कीच मिळवता येतात हे अनुभवातून शिकलोय.

(२००१) चो. चो. चु. चु. मधलं दिवानी दिवानी...
(२००१) ल. क. लि. सा. कु. भी. क. मधलं अस्लमभाई
(२००२) ह. कि. क. न. मधलं मुन्ना मोबाईल पप्पू पेजर

रेवती's picture

21 Jun 2012 - 3:17 am | रेवती

मी काय म्हणते, अशी गाणी सहजपणे विसरली जात नाहीत का?
ती मेंदूला ताण देऊन आठवणे म्हणजे गाणे ऐकण्याइतकेच कष्ट नव्हेत काय?
;)

स्पंदना's picture

21 Jun 2012 - 5:44 am | स्पंदना

माझ्झ एक्च एक आहे
ऐका
तेरे बिना तेरे बिना तेरे बिना तेरे बिना ... किती वेळा ते?

दादा कोंडके's picture

21 Jun 2012 - 9:48 am | दादा कोंडके

तेरे बिनानेच सुरू होणारे आणखी एक गाणं अशक्य घाणेड्रं आहे. इतकं कुंथुन काढलेला आवाज मी ऐकला नाही!

चौकटराजा's picture

21 Jun 2012 - 7:59 am | चौकटराजा

लेकानो, दहा बारा मिनिटानी का होईना आठवतात म्हणजे ती बकवास कशी राव ? बकवास
गाणे म्हणजे एक ओळ चालू असली की त्याच्या अगोदरची ओळ विसरली जाते.

१. जावेद भाई सो रेले - जानी दुश्मन
२. यु तो प्रेमी पचत्तर हमारे - एजंट विनोद
३. मै लडका हो हो हो -हेरा फेरी
४. समोसे मे आलु - मि. अँड मिसेस खिलाडी
५. ऊंची है बिल्डिंग - जुडवा
६. हाय हाय मिर्ची - बिवी नं वन

व्वा! तुझा प्रतिसाद इथेही...?? :-)

त्या धाग्यावर खास गाणी होती, मात्र इथल्या गाण्यांना कोणतेही वेगळे विशेषण नाही - "फडतूस" Perfect विशेषण आहे.

योगप्रभू's picture

21 Jun 2012 - 11:16 am | योगप्रभू

१) चित्रपट - निशाना
जाना जरा सामने आना, मै बांध रहा हूं निशाना
थोडा आगे, थोडा पिछे, थोडा उपर, थोडा नीचे
ढिचक्यांव....
२) चित्रपट - आखरी रास्ता
तूने मेरा दूध पिया है, तू बिल्कुल मेरे जैसा है

आता आपल्या मराठी चित्रपटातील ही गद्य गंमत बघा.
चित्रपट -झुंज, गाणे - निसर्गराजा ऐक सांगते

का चाललात?
तुम्ही आलात म्हणून.
जरा थांबा ना.
का?
फार छान दिसतंय.
काय?
हे रुप भिजलेलं.
आणि ते पाहा.
काय?
तुमचं मनही भिजलेलं.
कशानं?
प्रेमानं..प्रेमानं..प्रेमानं
छट्

(पुढच्या कडव्यात 'काय जेवलात का? काय काय खाल्लंत? आता बरं वाटतंय का', अशी विचारपूस अपेक्षित होती. :))

रमताराम's picture

21 Jun 2012 - 1:06 pm | रमताराम

पुढच्या कडव्यात 'काय जेवलात का? काय काय खाल्लंत? आता बरं वाटतंय का', अशी विचारपूस अपेक्षित होती =)) अगदी अगदी हो देवा.

इतका सुंदर उठाव असलेला गाण्याचा तुकडा नि गाणं/काव्य हे असं भिकारडं. 'एक ब्युटिफुल मूजिक पीस वेस्ट झाला हो.' - एच्च रमताराम.

ह.भ.प. मिथुनदा यांच्या बऱ्याचशा चित्रपटातील गाणी कर्णक्षुधा शांत करतात. उदा. गुंडा

वपाडाव's picture

21 Jun 2012 - 12:54 pm | वपाडाव

आमचा विंट्रेष्ट असलेल्या गाण्यांना बकवास अन टाकावु हे दोन आगावु शब्द वापरल्यामुळे ह. भ.प.श्री. मोदकरावांचा तीव्र शब्दांत निशेध नोंदवतो...

गणामास्तर's picture

21 Jun 2012 - 7:58 pm | गणामास्तर

http://www.misalpav.com/node/21995#comment-406471

तिथुन पुढे चालू :-

१) तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पेहचान लुंगा. (बाझी)
२) दुल्हे का सेहरा सुहाना लगता है.. (धडकन )
३) मै लडकी पो पो पो, तू लडका पो पो पो..(हेरा फेरी )
४) तुझे देख सांसे मुझे आती अब कम..(गायक -राम शंकर)
५) चांदी कि सायकल सोने कि सीट..
६) आय डोंट नो व्हाट टू डु..(हाउसफुल)
७) यारा ओ यारा तेरी अदाओने मारा..

ते पो पो पो नाहिये ओ \(
पॉ पॉ पॉ आहे :D

पियुशा's picture

21 Jun 2012 - 3:33 pm | पियुशा

मै तो रस्ते से जा रहा था..

हे गाण टु़क्कार ? आक्षेप आक्षेप ...........;)
ह्या गाण्यावर ड्यांस बसवलान आम्ही ;)
बाकी तुमची लिस्ट लै छोटी झाली मोदकभाय

पियुशाशी लॆ वेळा सहमत. आमच्या विरारच्या गोवींदाचे काहीही टुकार असुच शकत नाही.

-(विरार का छोकरा) सोकाजी

मृगनयनी's picture

21 Jun 2012 - 8:12 pm | मृगनयनी

हीहीही!... विजयपथ'मधलं तब्बू आणि अजय देवगणचं गाणं- "रुक रूक रूक अरे बाबा रुक.. ओह माय डार्लिग.. गिव्ह मी अ लूक!!!" .. अत्यन्त अर्थहीन गाणे.. ;)

पण लहानपणी खूप आवडायचे गाणे...अन्ताक्षरीच्या वेळी खूप आवडायचे.. मोठमोठ्याने ओरडून हे गाणे म्हणायला!.... पण अजय देवगण तितकासा आवडायचा नाही तेव्हा!!! :)

वपाडाव's picture

26 Jun 2012 - 6:18 pm | वपाडाव

मग तुला ते "मै लडकी पो पो पो" वालं गाणं नक्कीच आवडत असेल नै का?

मोदक's picture

22 Jun 2012 - 12:13 am | मोदक

>>बाकी तुमची लिस्ट लै छोटी झाली मोदकभाय

मी फक्त बत्ती लावून दिली.. भारी फटाके फुटत आहेत... :-)

तिमा's picture

21 Jun 2012 - 7:09 pm | तिमा

१) बैठ जा बैठ गयी खडी हो जा खडी हो गयी (पिक्चर माहित नाही)

'उलफतकी नयी मंजिल को चला' या इकबाल बानू यांच्या अजरामर गाण्याच्या मागेच तबकडीवर असलेले बकवास गाणे
२) ' अजी किवला मोहतरमा ....."

सागर's picture

21 Jun 2012 - 7:22 pm | सागर

मोदका,

एकदम मस्त धागा काढलास. :)

माझी थोडी भर

१.
दो मसताने चले जिंदगी बनाने,
बंदे सयाने और नामके दिवाने
किसी हसीनांसे , माहजबीनासे,
............................
चित्रपट : अंदाज अपना अपना

२. आग लगाके चले हो कहां,
पास तो आओ ऐ जाने जां,
कहने को मौसम बरफिला है,
सांसोंसे निकले हरदम धुआं... -
चित्रपट : पथरिला रास्ता

मराठे's picture

21 Jun 2012 - 7:37 pm | मराठे

ए.आर. रेहमानची पूर्वीची गाणी त्यातल्या भंगार शब्दांमूळे ह्या लिस्टमधे नंबर काढतील
उदा:
१. टेलीफोन धुन मे हसने वाली.. मेलबोर्न मछली मचलने वाली.
२. पट्टीरॅप
वगैरे वगैरे

त्यानंतर बाबा सहगल नावाच्या प्राण्याने उच्छाद मांडला होता
१. मेमसाब ओ मेमसाब
२. आजा मेरी गाडी मे बैठ जा

रॅप ( या प्रकाराला संगीत म्हणणं जीवावर येतं) जेव्हा बॉलीवूड मधे आलेलं तेव्हा जवळ जवळ प्रत्येक पिच्चर मधे एक तरी रॅपसाँग असायचंच. (त्यावेळी रॅपसाँग पूर्वीपासूनच कसं भारतात प्रचलीत होतं हे पटवून दिलं जात होतं !! हे खोडी म्हणून नाही.. सहज आठवलं म्हणून!!:) )
१. लव रॅप (ह्या गाण्यात नाना पाटेकर ने बिंदू बरोबर डँसपण केला आहे!!! ) (सिनेमा क्रांतीवीर)
२. बाली ब्रह्मभट नावाच्या प्राण्याची सगळी गाणी.

थोडं आणखी मागे गेलं तर स्वयंघोषीत शोमन घईसाहेब यांचा सौदागर सिनेमा आल्यानंतर 'इलू' प्रकार फार म्हणजे फारच फेमस झाला होता. मग त्याची कॉपी इतर सिनेमांमधे होऊ लागली
१. वन फोर थ्री याने आय लव यु ...
बोलो वन फोर थ्री...
आय लव यु हुआ पुराना
ये नया है जमाना !
२. पी पी पी (पहेला पहेला प्यार)
वगैरे

थोडक्यात सांगायचं तर चित्रपटांच्या आणी गाण्यांच्या टुकारपणाची आपल्या बॉलीवूड मधे दैदिप्यमान परंपरा आहे.
किती मोती निवडाल तेवढे थोडेच आहेत.

साधारणपणे सगळ्या गाण्यांवर नजर टाकल्यावर 'फास्ट फॉर्वड' ची 'कळ' असणे किती मोठे वरदान आहे हे समजले.
सुदैवाने हे शिनेमे बघायची वेळ आली नाही, किंवा शिनेमे बघितले असतील तर लक्षात नाही.
जेंव्हा मिपावर एखाद्या चित्रपटाचे परिक्षण येते, त्यात त्या शिनेमाला बरे मार्क पडले की मग तो पाहण्याची शक्यता असते.

मराठी_माणूस's picture

21 Jun 2012 - 8:51 pm | मराठी_माणूस

१९८० नंतर उतरती कळा

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Jun 2012 - 9:26 pm | निनाद मुक्काम प...

टुकार गाण्यात काही मोलाची भर
मिर्ची ये मिर्ची कमाल कर गयी , धोती को फाड के रुमाल कर गयी '( मिथुन )
तुरु रु ,तुरु रु , तुरु रु , कहा से करू मे प्यार शुरू ( अक्षय , मधु )
तुझ मे रब दिखता हे ( रुक रुक खान )

उची हे बिल्डींग लिफ्ट तेरी बंद हे
अंदाज ह्या सिनेमातील बहुतेक गाणी ( जुही , अनिल , करिष्मा =

खडा हे खडा हे खडा हे

दर मे तेरे आशिष खडा हे
खोल ,खोल खोल ................

ये माल गाडी तू धक्का लगा , धक्का लगा रे धक्का लगा ( जुही )
त्यावर उत्तर देतांना अनिल
ए मालगाडी ड्रायवर मे तेरा थोडा रुक जा , चालू करुंगा इंजिन मेरा ,तू डरती हे क्या

मेरा भी दिल बोले कुकू कुकू
सदर गाणी सेन्सोर संमत असलेल्या शिनेमात आहेत.

अर्धवटराव's picture

21 Jun 2012 - 11:30 pm | अर्धवटराव

यातले जवळ जवळ सर्व गणे अतिशय टुकार होते.
उदा. तेरि प्यारी प्यारे बाते मुझे अच्छी लगती है (इथे अच्छी म्हणताना चक्क शिंका आहेत)
किंबहुना तत्कालीन माधुरी-अनिल कपुरचे अनेक गाणि होपलेस कॅटॅगिरीतलेच होते.
"ये हो गया तो वो हो ना जाए" वगैरे. अत्यंत टुकार

तसच अन्नु मलीक एक जरी ओळ गायला तरी मला ते संपूर्ण गाणं टुकार वाटतं..
ये कालि कालि आखें - बाजीगर

अर्धवटराव

पैसा's picture

21 Jun 2012 - 11:21 pm | पैसा

१) लडकी नहीं है तू

२) तुझे अक्सा बीच घुमाऊं

३) तू मैके मत जैयो

४) पडोसन अपनी मुर्गी को

५) अमिताभ च्या बर्‍याच सिनेमातली गाणी बकवास असायची आणि अन्नु मलिकची ९०% गाणी या तिन्ही विशेषणाना पात्र असायची. सगळी आठवत पण नाहीत हे माझं सुदैव!

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 6:22 am | श्रीरंग_जोशी

चले आना तु पान की दुकान पे रे साडेतीन बजे...

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jun 2012 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

पी---के---=मिश्रा,नावाच्या शब्दांतर कारानी ए.आर.रेहेमानच्या संगीतात आलेल्या तिकडच्या तामिळ गाण्यांच्या काढलेल्या हिंदी भयंकर प्रती...

हमसे है मुकाबला अठवा...

उर्वशी उर्वशी गाण्याचं शब्दांतरण... मधली एकच ओळ अठवतीये...

बता दो कहं है प्यार की नाडी (???????)

विजुभाऊ's picture

23 Jun 2012 - 11:48 am | विजुभाऊ

त्या पेक्षा भयकर अनुवाद केलेले आहेत.
हिंदुस्थानी चित्रपटातील.
टेली फोन धुन मे हसने वाली या गान्यातील काही ओळी
तेरी गली मे मर्द न छोडुंगा...... औरत भी न छोडुंगा.........

विजुभाऊ's picture

23 Jun 2012 - 11:50 am | विजुभाऊ

त्या पेक्षा भयकर अनुवाद केलेले आहेत.
हिंदुस्थानी चित्रपटातील.
टेली फोन धुन मे हसने वाली या गाण्यातील काही ओळी

डिजीट मे सुर है तराशा.झाकिर हुसेन तबला........
तेरी गली मे मर्द न छोडुंगा...... औरत भी न छोडुंगा.........
एवढे असूनही ते गाणे हिट्ट झाले होते

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jun 2012 - 2:28 pm | अत्रुप्त आत्मा

तो खर्‍या अर्थानी पी+के=मिश्रा आहे... ;-)

तेरे बीन एक सिम्पलसी कॉफी भी किक देती ह्ये
मला लै आवडतं :)

गणामास्तर's picture

22 Jun 2012 - 10:12 pm | गणामास्तर

>>>तेरे बीन एक सिम्पलसी कॉफी भी किक देती ह्ये

ते तेरे बिन नाही
तेरे संग असे आहे हो. :)

जेनी...'s picture

22 Jun 2012 - 10:26 pm | जेनी...

:D

चिंतामणी's picture

22 Jun 2012 - 12:42 am | चिंतामणी

मै लैला लैला चिल्लाऊंगा (अनाड़ी नं १.)
आईला रे लड़की मस्त मस्त तू (जंग)
गले में लाल टाई, घर में एक चारपाई (हम तुम्हारे है सनम)
तडपाये तरसाए रे, दिल्ली की सर्दी (जमीन)
जवानी से अब जंग होने लगी (वास्तव)
दरवाजा खुला छोड़ आई, नींद के मारे (नाजायज)
जाओ चाहे दिल्ली मुंबई आगरा (कुरुक्षेत्र)
मम्मी को नहीं है पता (चॉकलेट)

(सौजन्य श्री.व......)

थोडी भर घालतो.

चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबुतर.
पक चिक पक राजाबाबु
ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है
जब तक रहेगा समोसे मे आलु
बत्ती ना बुझा, मुझे लगता है डर
एक चुम्मा तु मुझको उधार दई दे
नॉटी नॉटी सैया सैया - कॅश

आणि

सरकाए लियो खटिया जाड़ा लगे

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 1:05 am | श्रीरंग_जोशी

माधुरीवर चित्रित झालेले हे गाणे मला बिलकूलच रुचले नव्हते. त्यावेळी ती यशाच्या शिखरावर होती अन हे गाणे एखाद्या नवख्या नायिकेवर चित्रित झाले असते तर ठीक होते.

तसेच 'शीला की जवानी' - आमच्या दिलाची धडकन असलेली कॅटरिना या असल्या टुकार गाण्यावर भिकार नृत्य करते म्हणजे काय? आठवा ती हमको दिवाना कर गये, नमस्ते लंडन ची गाणी अन तेरी ओर गाणं. अगदी दिलच तोडलास...

अर्धवटराव's picture

22 Jun 2012 - 2:56 am | अर्धवटराव

माधुरीचं छुले मुझे छुले असं काहिसं एक गाणं होतं... ते केवल चीप या एकाच कॅटॅगरीत मोडेल... तसच कॅटिचा शिला कि जवानी खुपच छान म्हणावा एज कंपेअर्ड टु चिकनी चमेली.

अर्धवटराव

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 3:09 am | श्रीरंग_जोशी

कॅटीने शीलाच्या वेळी दिल तोडला होता, चिकनी चमेली बनून तिने आमच्या हृदयातली जागा गमावली...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Jun 2012 - 2:31 pm | निनाद मुक्काम प...

माधुरीचे ते महान गाणे महानता ह्या संजू बाबाच्या जेल वारी नंतर त्याच्या पुनरागमनाच्या शिनेमातील आहे. सदर शिनेमा माधुरीने जुन्या मैत्रीखातर केला होता अशी वदंता होती.
ममता आणि मिथुन चे असेच एक गाणे
कहा गिर गया ,धुडो सजन बटन मेरी कुर्ती का
रामा रामा

बारा णा दे ............................
बारा णा ( भर रस्त्यात अशी भयाण आरोळी देत अक्षय शिल्पा का रवीना साठी भर रस्त्यात शिमगा करतो )

एक चुम्मा तू मुझ को उधार दे दे , और बदलेमे युपी ,बिहार ले ले ( चीची )

मोनिका बेदी चे असेच एक गाणे
पंडितजी मेरा हात पकड के बात करो मेरे हाल की
अब तक साजन मिला नही क्यो हुई मे सोला साल की

इडली डु इडली डु.... माधुरीचच बहुतेक
चार चाँद ........फडतुस गाण्यावर....
आणि ते गोविंदाचं ' बटाटावडा ....दील नै देना था देना पडा'
हे एक लैवेळा वंगाळ .....

अर्धवटराव's picture

22 Jun 2012 - 6:34 am | अर्धवटराव

>> ' बटाटावडा ....दील नै देना था देना पडा'
-- ते अनिल कपुरचं आहे... बहुतेक हिफाजत मधलं...

अर्धवटराव

अरे हो चुकलच. माधुरी आणि अनिल ह्यांचच आहे ते ...

कोणाला "हलवावाला आ गया" गाणे आठवते का? भयाण बंडल होते.

अर्धवटराव's picture

22 Jun 2012 - 6:36 am | अर्धवटराव

बहुतेक डान्स डान्स मधलं..

अर्धवटराव

मदनबाण's picture

22 Jun 2012 - 8:19 am | मदनबाण

बाकी खालच्या लिंक मधल कुल शेखर चे गाणे मात्र ऐकायला विसरु नका... सध्या मला फार आवडलय ते.
|
|
|
V

बर्‍याच जणांचा रोष पत्करून...

कुणी संदीप खरे आणि सलील कुलकर्णीचे सुरूवातीचे व्हिडीओज बघितले आहेत का?

१) आयुष्यावर बोलू काही - सुझुकीवर फिरणारे आणि ताम्हणीसारख्या ठिकाणी हातवारे करत गाणारे दोघे..
२) नसतेस घरी तू जेंव्हा - बीयर पिवून"देवदास" झालेला सलील... :-D

स्वप्नील बांदोडकरचा "राधा ही बावरी" चा व्हिडीओ, चेहर्‍यावरची माशी न हलतवता ड्यान्स करणारी ती तरूणी बघून स्वप्नीलचीच दया आली होती.

ऋतू हिरवा की असेच एक सुंदर गाणे अशाच टुकार व्हिडीओचे बळी पडले आहे..

ते ' जंगल मे बोले कोयल कु कु कु कु कु कु ..'

भयानक प्रकारे कु कु कु करतात ....:(

बॅटमॅन's picture

22 Jun 2012 - 2:08 pm | बॅटमॅन

ए गपे! कितीतरी बरं होतं ते बाकी भयंकर प्रकारांच्या तुलनेत.

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 10:11 am | श्रीरंग_जोशी

आला रे पाऊस आला, अरे आला रे पाऊस आला...

१९९९ च्या सफारी चित्रपटातील हे गीत आहे. गायलं आहेत अमित कुमार व अलका याज्ञिक यांनी.

या गाण्यात जूही व माकडछाप संजय दत्त हे पावसात गाणं म्हणत आलटून पालटून योगासने, एरोबिक्स व कोळीनृत्य करतात...

http://www.youtube.com/watch?v=NFdhjRl4nNw

राजकपुरचे हे गाणे बघा ऐका,

http://www.youtube.com/watch?v=NrghM5Xn8G8

आणि जितुचे हे

नेहमीच नव्या गाण्यांवर आणि नविन संगीतकारांवर टीका होत असते म्हणुन वानगी दाखल ही गाणी दिली आहेत. असल्या अनेक जुन्या गाण्यांची यात भर घालता येईल.

बाकी आमच्या गोविंदाच्या गाण्यांना बकवास म्हणणार्‍यांचा तीव्र निशेध. पण ह्या धाग्याचा सुर एकंदर विडंबनाचा दिसतो आहे त्या मुळे त्या कडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

पण उत्तमोत्तम गाण्यांच्या यादीत समीर यांचे नाव अग्रस्थानी असायला हवे. अधुनीक गालिब, समीर यांनी अनेक सुंदर गाणी बनवली आहेत. पण त्यातल्या काहीच गाण्यांचा वर उल्लेख झालेला आहे. जसे की....

सुटबुट वाले बाबु,- गजब तमाशा
संडे की रात थी पहेली मुलाकात थी- राजाजी
ईंडीयासे आया मै लाईफ बनाने - कहेता है दील बार बार
चांदनी चौक की चांदनी है तु लाल किलेकी लाली - जंग
नजरे मिली दिल धडका मेरी धडकन ने कहा लव यु राजा - राजा
बाबा तेरी ये जवानी मेरा पिछा न छोडे - घात
प्यार प्यार करते करते तुम पे मरते मरते दिल दे दिया हाँ दिल दे दिया - जुदाई
दो प्यार करने वाले जंगल में खो गए - जंगल
तू जब जब मुझको पुकारे मैं दौड़ी आऊं नदिया किनारे - कुर्बान

खरतर सचिन ऐवजी समीर गालिब यांनाच भारत रत्न ने सन्मानीत करण्यात यावे इतके मोठे उपकार त्यांनी मानव जातीवर केले आहेत. त्यांच्या बरोबरीने आनंद मिलींद, अन्नु मलीक यांना पण छोट्या मोठ्या पुरस्काराने गौरवण्यात यावे आशी या मंचावरुन आम्ही जोरदार मागणी करत आहोत.

अर्धवटराव's picture

22 Jun 2012 - 8:58 pm | अर्धवटराव

--नजरे मिली दिल धडका मेरी धडकन ने कहा लव यु राजा - राजा
याच्याच जोडीला "तुमने अगर प्यार से देखा नहि मुझको". माधुरीला स्क्रीन बाहेर खेचुन घरची धुणी भांडी करायला पाठवावे असाल वैताग आहे ते गाणे म्हणजे...

अर्धवटराव

श्रीरंग_जोशी's picture

23 Jun 2012 - 10:40 am | श्रीरंग_जोशी

>> नजरे मिली दिल धडका मेरी धडकन ने कहा लव यु राजा - राजा

अहो हे गाणे म्हणजे सर्व मेंगळट तरुणांचा न्यूनगंड दूर करणारे होते कारण त्यांचा अनभिषिक्त प्रतिनिधी 'संजय कपूर' त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रीबरोबर नायक म्हणून काम करत होता.
माधुरीचे चेहऱ्यावरील भावही जोरदार होते. फक्त गाण्याच्या सुरुवातीला काही विचित्र हावभाव करणारी मंडळी आहेत एवढंच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jun 2012 - 1:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

जोशी सर,

माधुरी दिक्षीत चा मी पण पंखा आहे. पण म्हणुन काय असले गाणे सहन करायचे?

नज़रें मिलीं दिल धड़का मेरी धड़कन ने कहा love you raja
जादू कोई छाने लगा मुझको मज़ा आने लगा
बस में नहीं है अरमां
मुझे सीने से लगा kiss me aajaa

माधुरी शिवाय या गाण्यात काहीही चांगले नव्हते.

श्रीरंग_जोशी's picture

24 Jun 2012 - 4:42 am | श्रीरंग_जोशी

पैजारबुवा - मी तसे उपहासाने म्हंटले आहे हो. संदर्भासाठी हि प्रतिक्रिया वाचा.