क क कपलचा .....

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
17 Jun 2012 - 5:41 pm

बाकी लोकं चिंबोरीतुन बदली झाली की शक्य ते सर्व प्रयत्न करायचे ती टाळायचे, अगदी काहीही म्हणजे माझ्या आईची ट्रिटमेंट जवळच्या शामताबेन हॉस्पिटलमध्ये आहे तरी माझी बदली करु नये, अशी काहीही कारणे असायची त्या अर्जात, हर्षद्ला असे अर्ज घेतानाच काय पण आत साहेबांना नेउन देताना सुद्धा हसु आवरायचं नाही, पण ८-१० दिवसांत असेच अर्ज विनंती मंजुर होउन परत यायचे तेंव्हा आश्चर्य देखिल वाटायचं.

आज त्याच चिंबोरी पोलिस स्टेशनात हर्षदचा शेवटचा दिवस होता ३० एप्रिल , तो इथं आला तीन वर्षापुर्वी. सोलापुरात ९ वर्षांनी पोलिस भरती झालेली त्यात नशिबानं अन, वडिलांच्या ज्या वरकमाईचा त्याला एकेकाळी राग होता, त्या वरकमाईचा यथोचित उपयोग तो डिपार्ट्मेंटला जॉइन झाला. सोने पे सुहागा का काय तसं, त्याला पहिलीच रायटरची पोस्ट मिळाली चिंबोरीला. हे मात्र फक्त भाग्यातच असावं लागतं. पहिल्या दिवसापासुन चिंबोरीतला प्रत्येक जण त्याच्या नशिबाची तारीफ करायचा. प्रत्येकवेळी तो सुखावुन जायचा, दोन महिन्यात त्याला या कौतुकाची सवय झाली अन त्यामागची भावना पण समजुन यायला लागली. मग सहा महिन्यात तो सरावला, पुढं वर्षभरात स्थिरावला आणि तीन वर्षात दुणावला. अंगानं आणि पैशानं दोन्ही बाजुनं.

जानेवारीत लग्न ठरलं तेंव्हाच त्यानं सोनवणे साहेबांकडं बदलीसाठी अर्ज केला होता, कारण दिलं होतं पालकांच्या तब्येतीचं, अर्थात ते कागदावर लिहिलेलं. सोनवणेंच्या घरी गेल्यावर त्यानं स्पष्ट सांगितलं होतं ' साहेब, दोन अडीच वर्षात बरेच भले बुरे संबंध निर्माण झालेत, लग्न झाल्या झाल्या इथं नकोय आणायला मला बायकोला ' सोनवणे पाच मिनिटं डोळे मिटुन बसले आणि मग त्याला म्हणाले ' हर्षदराव, हे आपलं डिपार्टेमेंट आहेच असं *****, तिज्यायला यातुन मिळणारी सगळी ऐश पाहिजे बायकोला, पोराला पण ह्याच्या घाणीचा वास नको घरात घुसायला. तुला काय वाटतं, चिबोरी सोडलंस म्हणजे या सगळ्यापासुन दुर जाशील, हा वास जाईल का युनिफॉर्मचा , ** नाही जात, साला ही वर्दी अंगावरुन उतरवलीस ना तरी तिची मस्ती , तिचा माज डोक्यातुन कधीच नाही जाणार लिहुन ठेव , साला फुकणीचा रायटर कुठला , जा बोलतो मी त्या हराम्याशी, पाकिट मात्र तयार ठेव, ज्या दिवशी हो म्हणेल त्या दिवशीच डिल सोडवायचं, रात्र गेली की काही आठवत नाही इथं कुणाला. '

सोनवणेंनी काम केलं, अर्थात तिथंही डबल गेम केलाच, जो येणार होता त्याच्याकडनं पण पैसे घेतलेच होते. हर्षदला एवढ्याच गोष्टीचं बरं वाटलं की लग्नात स्टेशनच्या लोकांनी ४ तो़ळ्याच्या अंगठ्या दिल्या दोघांना पण आणि गेलेले थोडे वसुल झाले. आज रात्री प्रिती मध्ये पार्टी होती सेंडऑफची. त्याच्या तयारिसाठी त्यानं आपला आयफोन काढला अन महेश मांढरेना फोन लावला. ' नमस्कार, स्टँडिंग कमिटि मेंबर साहेब'...

क्रमशः

वावरकथाजीवनमानराहती जागानोकरीवादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

गणपा's picture

17 Jun 2012 - 5:54 pm | गणपा

माताय वाचता वाचता संपला देखील.
मोठे भाग टाका ना भौ.

सर्वसाक्षी's picture

17 Jun 2012 - 7:03 pm | सर्वसाक्षी

वाचायला घेतलं आणि संपल पण! जरा जास्त वेळ काढा राव.
आता पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

मन१'s picture

17 Jun 2012 - 5:54 pm | मन१

भाग मोठा असता तर बरं वाटलं असतं.

(चपला आणि सत्कार चा फ्यान)

उत्कंठावर्धक सुरुवात.
पण हा भाग खूपच लहान झालाय.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Jun 2012 - 6:01 pm | बिपिन कार्यकर्ते

छोटा भाग! निषेध! :(

जाई.'s picture

17 Jun 2012 - 6:05 pm | जाई.

इंट्रेस्टिँग

आचारी's picture

17 Jun 2012 - 6:26 pm | आचारी

मस्तच !! पुढ्चा भाग लवकर येऊ द्या !!

किचेन's picture

17 Jun 2012 - 6:27 pm | किचेन

पुन्हा एकदा बहरात.....
पुधच्या भगाच्य प्रतिक्शेत.

मदनबाण's picture

17 Jun 2012 - 6:31 pm | मदनबाण

वाचिंग पण भाग लगेच संपिग !
लवकर लिखिंग तो आगे पढिंग ! ;)

पैसा's picture

17 Jun 2012 - 6:38 pm | पैसा

पण एका मिनिटात वाचून संपलं. जरा मोठा भाग लिही की रे!

अन्या दातार's picture

17 Jun 2012 - 7:33 pm | अन्या दातार

हा प्रोमो होता का सीरिज चा?

प्रभाकर पेठकर's picture

17 Jun 2012 - 7:43 pm | प्रभाकर पेठकर

आयला, चिंबोरी पोलीस स्टेशनचा 'हप्ता' एवढुसाच? फारच गरीब, बापुडवाणं दिसतय पोलीस स्टेशन. पुढचा हप्ता 'दणदणीत' द्यावा लागेल तरच तुमचं 'प्रतिसादांचं' काम होईल. नाहितर विसरा, आम्हाला बरीच इतर कामं आहेत.

सुरुवात मस्तं झाली आहे. कथानक लवकरच बाळसं धरेल अशी अपेक्षा आहे.

पक पक पक's picture

17 Jun 2012 - 7:55 pm | पक पक पक

चला स्टार्टर मस्त झाल, आता मेनकोर्स कधी...? :)

दादा कोंडके's picture

17 Jun 2012 - 8:00 pm | दादा कोंडके

पण मोठ्ठे भाग टाकायला का कंजुषी केली ते कळलं नै! ;)

पिंगू's picture

17 Jun 2012 - 8:49 pm | पिंगू

हा भाग वाचून मला टाटा डोकोमोच्या जाहिरातीतील इडली आठवली... ;)

- पिंगू

मुक्त विहारि's picture

17 Jun 2012 - 8:50 pm | मुक्त विहारि

थोडे थोडे का होईना, पण लिहित जा, आणि पुर्ण करा.

इथे बरेचसे भाग अर्धवट आहेत.

रेवती's picture

17 Jun 2012 - 10:18 pm | रेवती

वाचतिये.

अमृत's picture

17 Jun 2012 - 11:14 pm | अमृत

इतकच क्रमशः ;-)

अमृत

भाग इंटरेश्टींग आहे पण वाचतेय तोपर्यंत संपला पण. पुढचे भाग जरा मोठे टाका.

हं!
आता सुरवातच लग्नान तर!
पण काय हो पोलिस स्टेशनात राहुन मोजुन चारच शिव्या?अन रायटर म्हणजे काय पोस्ट असते? तेव्हढ जरा उलगडुन सांगा.

येऊ द्या पटकन पुढचा भाग. :)

प्यारे१'s picture

18 Jun 2012 - 10:03 am | प्यारे१

बर्‍याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आमीर खानच्या चित्रपटाचा प्रोमो आला आहे....! ;)

मृत्युन्जय's picture

18 Jun 2012 - 10:18 am | मृत्युन्जय

तुमच्या ष्टोर्‍या लैच विंटरेंस्टिंग अस्त्यात बघा. पुभाप्र.

श्रीरंग_जोशी's picture

18 Jun 2012 - 10:27 am | श्रीरंग_जोशी

पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

sneharani's picture

18 Jun 2012 - 11:40 am | sneharani

पुढे?? लवकर येऊ दे पुढचा भाग!!
:)

वेणू's picture

18 Jun 2012 - 3:04 pm | वेणू

वाचतेय..

नाना चेंगट's picture

18 Jun 2012 - 3:08 pm | नाना चेंगट

पुढचा भाग कधी ?

एकच छोटी चिंबोरी टाकण्याऐवजी जुळ्ञा मोठ्या चिंबोर्‍या टाकल्या असत्या तर?

सूड's picture

18 Jun 2012 - 3:10 pm | सूड

वाचतोय. पुभाप्र !!

आजच बाईक वरती येताना, तुमचे लेखन ( क क कपल ) अजुन कसे नाहि आले. असे आठवले.
येवुन आज विचारणारच होतो तर हा लेख होता. योगायोग .

सुरुवात छान झाली आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

( मनोगतः 'तुमच आमच सेम नसत' अशी रोमँटीक स्टोरी असावी असे वाटते आहे.. 'चपला आणि सत्कार' अशी गुंतागुंतीची आनी टोळीची गोष्ट नसावी असे वाटते आहे.
शंका येण्यास कारणा की शिर्षक पहिल्या शक्यते सारखे आहे, आनि मायना दूसर्या.)

बाकी लिखानास शुभेच्छा आहेतच

वपाडाव's picture

20 Jun 2012 - 11:46 am | वपाडाव

हम्म्म्म....

५० फक्त's picture

25 Jun 2012 - 11:48 pm | ५० फक्त

दुसरा भाग, - http://www.misalpav.com/node/22073

अर्धवटराव's picture

26 Jun 2012 - 12:06 am | अर्धवटराव

हे पण "नाथा" सारखं काहितरी इंट्रेस्टींग दिसतय...

अर्धवटराव