मित्रहो ,
परवा काही कामानिमीत्त नाशिक वरुन पुण्याला येण झालं, त्याचा हा वृत्तांत ....
प्रवास म्हणल की कधी कधी कंटाळवाना असतो तर कधी कधी एखादा मस्त अनुभव देउन जातो.तुम्ही कुठ आणी कोणाबरोबर प्रवास करताय यावर बरच काही ठरतं.शिवाय प्रवास आपण कशानं करतोय यावरही बरच काही ठरत असतं.
असो,बरच विषयांतर झालं ,मुळ मुद्यावर येतो ,नमनालाच घडीभर तेल नको घालायला.
पुण्यात लवकर पोहचायचं म्हणून पहाटे ४ वाजता चा मोबाइल मधे अलार्म लावला होता,तरी आवरता आवरता ६वाजले मग घरी नाष्टा करायचा विचार बाजुला सारला आणी गाडी काढली ,५ मिनीटाच्या आत हायवे ला लागलो, अर्थातच सकाळी रस्त्यावर फारशी वाहनं नव्हती ,एप्रील चा महीना असला तरी सकाळी हवेत छान गारवा होता, सोबतीला महंमद रफीचा आवाज त्या सुरावटीन मन अगदी ताजतवानं झाल होत.बघता बघता सिन्नर पास झालं,सहज लक्ष गेल पेट्रोलचा मिटर तळाला जाउन पोहचला होता ,पोटाचीही थोड्याफार फरकाने तीच अवस्था झाली होती .
सिन्नर व संगमनेरच्या मधे नांदुर शिंगोटे नामक गावाजवळ गाडी बाजुला घेतली, पहील गाडीला खायला घातलं आणी मग माझ्यासाठी एका छोट्या होटेल मधे शिरलो ,दारतच मिसळीच्या कटाच्या,भज्याच्या वासानं माझ स्वागत केल, दारातच एका मोठ्या पातेल्यामधे कट उकळ्त होता,गरमागरम बटाटा भजी कढइतल्या तेलामधे ट्म्म फुगत होती,आतमधे बरीच मंडळी वाफळत्या मिसळीवर ताव मारत होती,एक पोर्या एका मोठ्या मग मधुन कट ओतत होता, थोडक्यात पोटातले कावळे आणखी कोकलावे असच एकंदरीत वातावरण होत.
मग मी ही बाह्या सावरुन मिसळ्पाव आणी भजी सांगितली आणी तोंडाच पाणी सावरत मिसळीची वाट बघु लागलो,माझ्यासमोर मिसळ्पावाची आणी भज्याची डिश आली आणी नुसत त्या मिसळीच्या रंगाकढ पाहुनच मी सांडलो,जवळ कॅमेरा नसल्याची खंत जाणवली मनात विचार आला साला...आपल्या मिपा करांसाठी फोटु काढला असता,नेहमी आपणचं का म्हणुन मिपावरचे फोटो पाहुन जळायचं असो, मिसळी चा पहीला घास घेतला आणी तोंड्,जिभ,भाजवत ठसका अगदी मस्तका पर्यंत गेला,(पुण्यात पुर्वी डेक्कन जवळ असणार्या मेहंदळेच्या मिसळीची आठवण झाली)मिसळीच्या अप्रतीम चवीन मजा आली,सोबतीला कुरकुरीत बटाटा भजी होतेच अहाहा मग अजुन काय पाहिजे ?
मिसळीने भाजलेल्या घशावर गरमागरम चहाचा शिड्काव करुन बाहेर पडलो,आणी पुण्याच्या रस्त्याला लागलो,पोटाची किमानं ४/५ तासांची बेगमी झाली होती,गाडीनं ही पाचवा गियर टाकल्यावर मस्त र्हिदम धरला होता.
आता बाहेरची हवा हळुहळु गरम होउ लागली होती.९ वाजुन गेले होत,संगमनेर ला आलो हायवे गावातुनच जात असल्याने,आणी सकाळ ची वेळ असल्याने बर्यापेकी आता ट्रफिक जॅम ला सरुवात झाली होती,कसाबसा गाव पार करुन प्रवरा नदिच्या पुलावर आलो आणी गाडी एका बाजुला जरा कलतेय अस वाटू लागल जरा संशय येउ लागला, म्हणून एका शेताजवळ गाडी बाजुला घेउन खाली उतरलो,आणी जो संशय खरा ठरु नये अस वाट्त होतं तेच झालं,गाडीचा पुढचा टायर बसला होता.
च्यायला,नुकताच एवढा मस्त नाष्टा झाला,झपाट्यानं अंतरही कटत होतं नी हे काय मधेच ,पण पर्याय नव्हता,टायरचे नट खोलायला लागलो,आणी मघाशी पोट तुडुंब भरुन खाल्लेली मिसळ,माझ ८२ किलोच वजन आडव येउ लागलं,घामाच्या धारांनी निथळ्त कसाबसा टायर बदलला,आणी पुढच्या प्रवासाला लागलो,चंदनापुरी घाट चढुन वरती आलो,एका केरळी अन्नाच्या पंक्चर दुकानापाशी थांबलो ,पहिलं पंक्चर कादुन घेतल,मघाशी गेलेला घाम भरुन काढण्यासाठी दोन ग्लास उसाचा रस पोटात ओतला,तेव्हा कुठे बर वाटु लागल्,घडाळाच्या काट्याकढे लक्ष ठेवुन आता एक्सलेटर दाबला आणी सुसाट निघालो.रफीसाहेबांना बाजुला सारुन सुखविंदर लावला आणी गाडी पळू लागली.
प्रतिक्रिया
22 Apr 2012 - 11:56 pm | दादा कोंडके
प्रवासाच्या आदला दिवस कसा गेला?, पुण्यातलं काम झालं ना? काय अनुभव आला,तसच पुणे ते नाशीक प्रवासाबद्दलपण सांगायचं ना! :)
23 Apr 2012 - 1:24 am | प्रभाकर पेठकर
जवळ कॅमेरा नसल्याची खंत जाणवली मनात विचार आला साला...आपल्या मिपा करांसाठी फोटु काढला असता
भ्रमणध्वनीत असतो की कॅमेरा.
बाकी प्रवास वर्णन शोधतो आहे.
23 Apr 2012 - 8:04 am | ५० फक्त
बाकी सोडा, पण पुणे - नाशिक वगैरे प्रवास गाडीनं करत असाल तर किमान गाडीची व्यवस्थित काळजी घेत जा, टिम बिएचपीवर बरेच चांगले धागे आहेत ते पहा.
23 Apr 2012 - 8:34 am | चौकटराजा
मी नाशिक एअरपोर्ट वरून मी माझ्या साठी खास बोस्टन वरून खरेदी केलेले २४ फुट लांबीचे चार प्रवाशांचे विमान घेऊन एकटाच निघालो....कोणत्याही वहानाने जा पुणे नाशिक वा नाशिक पुणे हा प्रवास रस्त्यानी कंटाळवाणाच होतो. त्यापेक्शा विमान बरे. संगमनेरला पेढा खायला घालून गुंगी आणून बॅगमधील रू. ४५६ पैसे पन्नास फक्त कुणी चोरून नेउन नये पेक्षा विमान घेतलेले बरे म्हणून........
क्रमश:
23 Apr 2012 - 10:31 am | अँग्री बर्ड
तुम्ही खऱ्या आयडीने या की हो.. बाकी तुम्ही जे नेहमीच लेखाला शीर्षक देता त्याचा संबंध कुठे आहे असा लेख वाचल्यावर प्रश्न पडतो ह्यामुळे लेख परत एकदा वाचून बघावा लागतो, ही वेळखाऊ process आहे.
23 Apr 2012 - 7:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> तुम्ही खऱ्या आयडीने या की हो..
मलाही आता अस्संच वाटायला लागले आहे. :(
प्राध्यापक आयडी म्हटल्यावर मी काय उत्साहानं प्राध्यापकांना खरडी केल्या होत्या.
छ्या, जालावर सर्व आभासाचेच खेळ आहेत, इतकेच खरे. :(
-दिलीप बिरुटे
23 Apr 2012 - 12:18 pm | आशु जोग
एक राहीलं
नारायणगावला दोन दुकाने दिसली कढीवड्याची ती सोडून दिली
रफी ऐकत असताना, ४ गाड्या अगदी जवळून गेल्या थोडक्यात वाचलो
हे सांगायच राहिलं
पहाटे गर्दी नव्हती, नंतर रस्त्यावर गर्दी झाली ही फार अनमोल माहिती दिलीत
--
असो
बाकी तुमचा वेळ छान जात असेल ना
23 Apr 2012 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार
डायरीचे पान आवडले.
23 Apr 2012 - 2:45 pm | स्पा
कोणाच्या?
23 Apr 2012 - 2:41 pm | प्राध्यापक
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे धन्यवाद.
23 Apr 2012 - 5:17 pm | आदिजोशी
अतिशय पकाऊ आणि अजिबात मनोरंजक नसलेले प्रवास वर्णन. मिसळ खाणे आणि टायर बसणे ह्या व्यतिरिक्त अजून काहीही घटना घडल्या नाहीत, निदान लेखात तरी. आणि ह्या दोन घटनांतही आवर्जून लिहावेसे काय सापडले हे लेखकाला आणि देवालाच ठाऊक. कारण कोणत्याही रस्त्यावरून कोणत्याही वाहनातून जाणार्या कोणत्याही प्रवासाचे वर्णन हे असेच असते.